August 4 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 4 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
Single Working Women’s Day
4 ऑगस्ट 2007 रोजी मंगळावरची सर्वांत अलीकडील मोहीम म्हणजे नासाचे फीनिक्स लॅंडर नासाने प्रक्षेपित केले. फीनिक्स लॅंडर मंगळाच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशात 25 मे 2008 रोजी उतरले. या लॅंडरला 2.5 मीटर लांबीची यांत्रिक भुजा होती, जी मंगळाच्या मातीत मीटरभर खोल खणू शकत असे. यासोबतच लॅंडरवर सूक्ष्मदर्शी कॅमेरा होता जो मानवी केसाच्या एक हजारांश लहान वस्तूंची छायाचित्रे काढू शकत असे. या यानास उतरण्याच्या जागेवर 15 जून 2008 रोजी एक पदार्थ मिळाला, जो जून 20 रोजी बर्फ आहे असे प्रयोगांती सिद्ध झाले.यानाशी संपर्क करण्यात नासाच्या तंत्रज्ञांना अपयश आल्यावर 10 नोव्हेंबर 2008 रोजी नासाद्वारे मोहिमेच्या समाप्तीची घोषणा करण्यात आली.
4 ऑगस्ट 1923 रोजी मुंबई कायदेमंडळात सीताराम बोले यांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा या अर्थाचा कायदेवजा ठराव मांडला.तो मंजूर झाला व सरकारने 11 सप्टेंबर 1927 रोजी आदेश काढला. परंतु त्यांचा फारसा उपयोग झाला नाही.
4 ऑगस्ट 2016 पासून रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानी ह्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य पदी नियुक्त होणाऱ्या त्या प्रथम भारतीय महिला आहेत.
4 ऑगस्ट 2016 रोजी इस्लामाबाद ( पाकिस्तान) याठिकाणी सार्क संघटनेतील गृहमंत्र्यांची परिषद संपन्न झाली त्यात भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह हजर होते.
X X
4 ऑगस्ट 1666 रोजी नेदरलँड्स (डच) आणि इंग्लंड देशांत झालेल्या समुद्री युद्धात इंग्रज सैन्यांनी विजय मिळविला.
4 ऑगस्ट 1854 रोजी जपानच्या जहाजातून अधिकृत पणे हिनोमारा ध्वज वापरण्यात सुरवात झाली.
4 ऑगस्ट 1870 रोजी युद्धाच्या वेळी आजारी व जखमी सैनिकांना मदत करण्यासाठी लंडन या देशांत ब्रिटीश रेड क्रॉस सोसायटीची स्थापना करण्यात आली.
4 ऑगस्ट 1886 रोजी कोलंबिया देशाच्या राज्यघटनेनुसार कोलंबिया चे नाव बदलून अमेरिका करण्यात आले तेव्हा त्यांनी नवीन संविधान स्वीकारले.
X X
4 ऑगस्ट 1914 रोजी पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.
4 ऑगस्ट 1924 रोजी सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
4 ऑगस्ट 1935 रोजी ब्रिटीश सरकारने गवर्नमेंट ऑफ इंडिया ऐक्ट ला मंजुरी दिली.
4 ऑगस्ट 1947 रोजी जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
4 ऑगस्ट 1656 रोजी भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे आशियातील संशोधन पहिली अणुभट्टी ट्रॉम्बे येथील’अप्सरा’ ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली. पाच दशकाहून अधिक काळाच्या अविरत सेवेनंतर 2009 मध्ये ही अनुभट्टी बंद करण्यात आली.
4 ऑगस्ट 1967 रोजी तेलंगाना राज्यातील कृष्ण नदीवर बांधण्यात आलेला जगातील सर्वात लांब दगडी नागार्जुन सागर धरणाचे उद्घाटन करण्यात आलं. या धरणाचे बांधकाम 10 डिसेंबर 1955 मध्ये सुरू झाले होते धरणाची लांबी 1450 पासून उंची 124 मीटर आहे. याचे स्थान तेलंगणा राज्यातील नालगोंडा जिल्ह्यातील आहे. एकूण 26 दरवाजे आहेत. एक दरवाजा 45 फूट उंच आणि 42 फूट रुंद असून या धरण बांधण्यास 132. 32 कोटी रुपये इतका खर्च आला. हे धरण बांधकाम करत असताना 70 हजार पेक्षा अधिक लोकांनी यात सहभाग घेतला होता. धरणाचे बांधकाम 1972 मध्ये पूर्ण झाले. या धरणाचा विस्तार 284 चौरस किलोमीटर इतका असून या धरणाची खोली पायापासून त्याची उंची 490 फुट इतकी आहे.
X X
4 ऑगस्ट 1984 रोजी ‘अपर व्होल्टा’ या देशाचे नाव बदलुन ’बुर्किना फासो’ असे करण्यात आले.
4 ऑगस्ट 1993 रोजी राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून 18,383 फुटांवर असलेली ‘खारदुंग ला‘ ही खिंड आपल्या चार सहकार्यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची ’गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मधे नोंद झाली.
4 ऑगस्ट 1998 रोजी फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अॅक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
4 ऑगस्ट 2001 रोजी मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.
X X
4 ऑगस्ट 2007 रोजी नासा चे फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.
4 ऑगस्ट 2008 रोजी भारत सरकारने शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एससीआय) नवरत्न दर्जा प्रदान केला.
4 ऑगस्ट 1522 रोजी मेवाड राजघराण्यातील 53 वे शासक व राजस्थान राज्यातील उदयपुर शहराचे संस्थापक तसचं, महाराणा प्रताप यांचे वडिल राणा उदय सिंह यांचा जन्म चित्तोडगढ या ठिकाणी झाला. हे मेवाड राज्याचे शासक महाराणा होते त्यांनी उदयपूर या शहराची स्थापना केली. 1540 मध्ये कुंभलघढ मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते मेवाड राज्याचे महाराणा बनले त्यांचे सर्वात मोठे पुत्र महाराणा प्रताप हे होते. 1541 मध्ये मेवाड मध्ये मोगल सम्राट अकबर याने हल्ला केला त्यानंतर तिथून ते सही सलामत निघाले आणि अरवली च्या घनदाट जंगलामध्ये गेले त्या ठिकाणी त्यांनी उदय सागर नावाचे सरोवर निर्माण केले आणि आपली उदयपूर नावाची नवीन राजधानी निर्माण केली.
4 ऑगस्ट 1730 रोजी सदाशिवराव भाऊ उर्फ सदाशिव चिमाजी आप्पा भट– पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ होते त्यांनी पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचे नेतृत्व केले होते. त्यांची आई लहानपणीच वारली त्यामुळे त्यांच्या आजीने राधाबाई साहेब यांनी त्यांना लहानाचे मोठे केले. लहानपणी सदाशिव भाऊ शाहू महाराजांकडे दौलतीचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते जितके लेखणीमध्ये तरबेज तितकेच ते तलवारबाजीतही तरबेज होते. लग्न झाल्यानंतर गोपिकाबाई यांच्या माध्यमातून नानासाहेबांनी भाऊसाहेब यांच्यामध्ये अंतर पडू लागले. गोपिका भाई यांच्या कारस्थानामुळे शनिवार वाड्यावर नानासाहेब बरेच काळ आले नाही ते शाहू महाराजांकडे साताऱ्यातच राहिले. पण काही कालावधीनंतर नानासाहेबांनी सदाशिव भाऊंना पुण्यात आणले आणि दौलतीचे कारभारी म्हणून त्यांची नेमणूक करून त्यांना सूत्रे हाती दिली. दौलतीच्या हिशेब इतका पक्का त्यांचा असे की मोठ्यात मोठी माणसे सुद्धा हिसाब द्यायला त्यांना घाबरत असे. सदाशिव भाऊंनी पहिल्यांदा लढाईचे नेतृत्व निजाम विरुद्ध केले. त्यावेळी त्यांनी दौलताबादचा किल्ला सर केला. आणि निजाबांकडून इब्राहिम खान गार्दी यास आपल्या सैन्यात दाखल केले. उमाबाई ही सदाशिव भाऊंची पत्नी. त्यांचे कमी कालावधीतच निधन झाल्यामुळे पेनचे सावकार कृष्णराव उर्फ भिकाजी नाईक कोल्हटकर यांची कन्या पार्वतीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पानिपतच्या लढाईत 14 जानेवारी 1761 मध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली.
4 ऑगस्ट 1821 रोजी लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 फेब्रुवारी 892 मध्ये झाला.
4 ऑगस्ट 1834 रोजी जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 एप्रिल 1923 मध्ये झाला.
X X
4 ऑगस्ट 1845 रोजी सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक यांचा जन्म झाला. 1913 मधे ’बॉम्बे क्रॉनिकल’ हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईत सुरू केले. त्यांचा मृत्यू पाच नोव्हेंबर 1915 मध्ये झाला.
4 ऑगस्ट 1863 रोजी महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान यांचा जन्म झाला.
4 ऑगस्ट 1888 रोजी भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 नोव्हेंबर 1965 मध्ये झाला.
4 ऑगस्ट 1894 रोजी नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यातील साहित्यिक व वक्ते यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 ऑक्टोबर 1978 मध्ये झाला.
X
4 ऑगस्ट 1929 रोजी आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक यांचा जन्म मध्य प्रदेश छातीत खांडवा या गावी झाला होता. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते आई गौरा देवी ह्या एका श्रीमंत घराण्यातील होत्या. त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले. त्यांनी बंगाली मराठी असामी गुजराती कन्नड भोजपुरी मल्याळम आणि उर्दू या अनेक भारतीय भाषांमध्ये गायन केले. बॉलीवूड मध्ये अशोक कुमार प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांनी अशोक कुमार हे नाव ठेवून आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. पहिला चित्रपट शिकारी हा 1946 मध्ये त्यांची प्रमुख भूमीका असलेला होता. 1946 मध्ये त्यांना खेमचंद प्रकाश यांनी जिद्दी या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. त्यांचे गाणे होते," मरने की दुवाये क्यू मांगू" आणि यानंतर त्यांना अनेक संधी गायनाच्या मिळाल्या. सुरुवातीच्या काळात बॉम्बे टॉकीजमध्ये ते समूह गायक म्हणून काम करीत असत. बॉम्बे टॉकीजच्या फनी मजुमदार दिग्दर्शित आंदोलन 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे मध्ये ते अभिनेता म्हणून काम करत होते. त्यांचे प्रमुख चित्रपट चलती का नाम गाडी पडोसन दिल्ली का ठग नई दिल्ली झुमरू आशा हाफ तिकीट श्रीमंत फंटूश इत्यादी. एस डी बर्मन यांनी किशोर कुमार यांना प्रशिक्षण दिले. त्यांनी त्यांच्यासाठी 50 च्या दशकापासून ते सत्तरच्या दशकापर्यंत देव आनंद यांच्यासाठी गायन केले. 1966 नंतर अभिनेता म्हणून त्यांनी शूटिंगला यायला उशीर करायचे किंवा गैरहजर राहायचे त्यामुळे त्यांचे चित्रपट वारंवार ब्लॉक होत असेल आणि आयकर विभागाचा छापा पडून त्यांना खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. 1969 मध्ये शक्ती सामंत च्या आराधना चित्रपटासाठी त्यांनी रूप तेरा मस्ताना हे गीत गायले आणि त्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. किशोर कुमार यांनी राजेश खन्ना साठी चित्रित केलेली 255 गाणी 92 चित्रपटात गायली ही त्यांची नाबाद नोंद आहे. तसेच जितेंद्र साठी 202 देवानंद साठी 119 आणि अमिताभ बच्चन साठी 131 गाणे त्यांनी गायली. 1975 ते 77 मध्ये भारतीय आणीबाणीच्या काळात संजय गांधींनी किशोर कुमार यांना मुंबईतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या रॅलीसाठी गाणे सांगितले. त्यावेळेस त्यांनी गाण्यास नकार दिला. त्याचा परिणाम म्हणून माहिती व प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांनी 4 मे 1976 पासून आपत्कालीन संपेपर्यंत अखिल भारतीय रेडिओ आणि दूरदर्शनवरील राज्य प्रसारकांवर किशोर कुमार यांची गाणी वाजवण्यास अनधिकृत बंदी घातली. 1980 मध्ये आयकर विभागाचा छापा पडल्यामुळे आयकर भरण्यासाठी त्यांनी अनेक स्टेज शो केले. त्यामध्ये ममता की छाव मे या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अभिनय करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी 1981 पासून अमिताभ बच्चन साठी गाणे गायने बंद केले. किशोर कुमार यांचे चार वेळेस लग्न झाले. पहिल्यांदा त्यांचे लग्न रुमा गुहा ठाकुरता उर्फ रुमाघोष यांच्याशी झाले. त्यानंतर प्रख्यात अभिनेत्री मधुबाला यांच्सोबत विवाह झाला. तिसरे लग्न 1976 मध्ये योगिता बाली यांच्याशी झाले.त्यानंतर 1980 मध्ये लीना चंदावरकर यांच्याशी लग्न झाले. किशोर कुमार यांनी 81 चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. 574 चित्रपटांमध्ये त्यांनी गायक म्हणून काम केले. एकूण 14 चित्रपटांची त्यांनी निर्मिती केले. त्यात काही लेखन करून काही संगीत दिले. त्यातील सहा चित्रपट अपूर्ण राहिले पाच चित्रपटाच्या पटकथाही लिहिल्या आणि बारा चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले. त्यांना आठ वेळा फिल्मफेअर सर्वोत्तम पार्श्वगायंकाचा सन्मान प्राप्त झाला. त्यांच्या स्मरणार्थ मध्य प्रदेश सरकार किशोर कुमार अलंकारण नावाचा पुरस्कार 1898 पासून दरवर्षी देत असते ही व्यक्ती हिंदी चित्रपट सृष्टीशी संबंधित असते. 13 ऑक्टोबरला खांडवा येथे समारंभात हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे पहिले मानकरी 2002 ते तीन मध्ये अमिताभ बच्चन हे होत.त्यांचा मृत्यू 13 ऑक्टोबर 1987 मध्ये महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी झाला.
4 ऑगस्ट 1931 रोजी नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 मार्च 2002 मध्ये झाला.
4 ऑगस्ट 1950 रोजी भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी यांचा जन्म झाला.
4 ऑगस्ट 1961 रोजी बराक ओबामा – अमेरिकेचे 44 वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म झाला.
4 ऑगस्ट 1978 रोजी भारतीय राजकारणी संदीप नाईक यांचा जन्म झाला.
4 ऑगस्ट 1060 रोजी हेन्री (पहिला) – फ्रान्सचा राजा याचा मृत्यू झाला. त्याचा जन्म 4 मे 1008 मध्ये झाला होता.
X X
4 ऑगस्ट 1875 रोजी हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक यांचे निधन झाले त्यांचा जन्म 2 एप्रिल 1805 मध्ये झाला होता.
4 ऑगस्ट 1937 रोजी डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1881 मध्ये झाला होता.
4 ऑगस्ट 1977 रोजी नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट एडगर अॅड्रियन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1889 मध्ये झाला होता.
4 ऑगस्ट 1997 रोजी जीन काल्मेंट – 122 वर्षे आणि 164 दिवस जगलेली फ्रेन्च महिला यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1875 मध्ये झाला होता.
4 ऑगस्ट 203 रोजी नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 25 ऑगस्ट 1916 मध्ये झाला होता.
4 ऑगस्ट 2006 रोजी नंदिनी सत्पथी – भारतीय लेखक व राजकारणी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 9 जून 1931 मध्ये झाला होता.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/07/august-3-day-of-special-dinvishesh-3.html
👆
August 3 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 3 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/07/pherozeshah-mehta-indian-politician-and.html
👆
Sir Pherozeshah Mehta: Indian Politician and lawyer
सर फिरोजशहा मेहता : भारतीय राजनीतितज्ञ व कायदेतज्ञ
जन्मदिन: 4 ऑगस्ट
X
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/10/fadke-narayan-sitaram-great-novels.html
👆
Fadke Narayan Sitaram: Great Novels Writer in Maharashtra
ना. सी. फडके ( फडके नारायण सीताराम): कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक
जन्मदिन : 4 ऑगस्ट
View, Comments and Share...........


0 Comments