August 3 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 3 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
3 आगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली.
3 आगस्ट 1492 रोजी इटालियन खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस(Christopher Columbus) हे आपल्या तीन जहाजांसह स्पेनहून भारताच्या शोधात निघाले.
3 आगस्ट 1783 रोजी जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे 35,000 जण मृत्यूमुखी पडले.
X X
3 आगस्ट 1811 रोजी जंगफ्राऊ शिखर – या बर्नीज आल्प्स पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जोहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यांनी पहिली चढाई केली.
3 आगस्ट 1900 रोजी ’द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.
3 आगस्ट 1914 रोजी बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती झाली.
X X
3 आगस्ट 1936 रोजी आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्या ’महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
3 आगस्ट 1946 रोजी सांताक्लॉज लँड, थीम पार्क – जगातील पहिले थीम पार्क सांताक्लॉज, इंडियाना, अमेरिका येथे उघडले.
3 आगस्ट 1948 रोजी भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
3 आगस्ट 1960 रोजी नायजरला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
X X
3 आगस्ट 1977 रोजी TRS-80 कॉम्पुटर – टँडी कॉर्पोरेशन कपंनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकांची घोषणा केली.
3 आगस्ट 1985 रोजी प्रसिद्ध भारतीय समाजसेवक व सक्रीय कार्यकर्ते बाबा आमटे यांना सार्वजनिक सेवेसाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
3 आगस्ट 1994 रोजी सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर करण्यात आला.
X X
3 आगस्ट 1994 रोजी संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
3 आगस्ट 1997 रोजी स्काय टॉवर, ऑकलंड, न्यूझीलंड – या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंगइमारतीचे उदघाटन झाले.
3 आगस्ट 2000 रोजी मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ’नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.
3 आगस्ट 2004 रोजी राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. 1 ऑगस्ट 2004 रोजी या विद्यापीठाची स्थापनाझाली होती.
3 आगस्ट 2004 रोजीअमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपला मैसेंजर हा उपग्रह बुध ग्रहाकडे प्रक्षेपित केला.
X X
3 आगस्ट 1886 रोजी मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी यांचा जन्म झाला. त्यांचे सुमारे 40 स्वतंत्र ग्रंथ आणि 6 अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. त्यांचा मृत्यू 12 डिसेंबर 1964 रोजी झाला.
3 आगस्ट 1898 रोजी उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचा जन्म झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठातून’शास्त्री’ आणि कलकत्ता विद्यापीठातून ’काव्यतीर्थ’ या उपाध्या मिळवल्या. त्यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1966 रोजी झाला.
X X
3 आगस्ट 1900 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1976 रोजी झाला.
3 आगस्ट 1916 रोजी शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 एप्रिल 1970 रोजी मुंबईया ठिकाणी झाला.
3 आगस्ट 1924 रोजी लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म झाला. यांचा मृत्यू 21 जून 2003 मध्ये झाला.
3 आगस्ट 1936 रोजी पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या घराण्यातील शास्त्रीय ठुमरी गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचा जन्म झाला.
3 आगस्ट 1937 रोजी फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेता स्पॅनिश टेनिसपटू आंद्रेस गिमेनो टोलागिरा(Andrés Gimeno Tolaguera) यांचा जन्म झाला.
3 आगस्ट 1939 रोजी भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म झाला.
X X
3 आगस्ट 1956 रोजी बलविंदरसिंग संधू – 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू यांचा जन्म झाला.
3 आगस्ट 1960 रोजी भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म झाला.
3 आगस्ट 1984 रोजी सुनील छेत्री – पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू व कर्णधार यांचा जन्म झाला.
3 आगस्ट 1792 रोजी औद्योगिक क्रांतीच्या काळातील अग्रणी इंग्रज शोधक व उद्योजक रिचर्ड आर्कराईट (Richard Arkwright) यांचे निधन झाले.
3 आगस्ट 1908 रोजी पटना येथील खुदाबक्श ग्रंथालयाचे संस्थापक मौलवी खुदाबक़्श खान यांचे निधन झाले.
3 आगस्ट 1929 रोजी फोनोग्राफ चे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 20 मे 1851 मध्ये झाला.
X X
3 आगस्ट 1930 रोजी व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1854 मध्ये झाला.
3 आगस्ट 1957 रोजी देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 2 आक्टोबर 1900 – दरबान, दक्षिण अफ्रिका येथे झाला.
3 आगस्ट 1993 रोजी स्वामी चिन्मयानंद सरस्वती – भारतीय हिंदू अध्यात्म नेते आणि अद्वैत वेदांत, भगवद्गीता, उपनिषद प्रसारक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 मे 1916 मध्ये झाला.
3 आगस्ट 1993 रोजी उत्तरप्रदेश मधील हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रीय सदस्य व क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांचे निकटवर्तीय प्रेम किशन खन्ना यांचे निधन झाले.
X X
3 आगस्ट 2007 रोजी सरोजिनी वैद्य – लेखिका यांचे निधन झाले. यांचा जन्म 15 जून 1933 मध्ये झाला.
3 आगस्ट 2020 रोजी जॉन ह्यूम – आयरिश राजकारणी – नोबेल पुरस्कार यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1937 मध्ये झाला.
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/07/august-2-day-of-special-dinvishesh-2.html
👆
August 2 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 2 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/08/nana-patil-krantisinhfreedom-fighter.html
👆
Nana Patil: Krantisinh, Indian independence activist, freedom fighter and Member of Parliament
क्रांतिसिंह नाना पाटील: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी
3 ऑगस्ट: जन्मदिन
X
X
View, Comments and Share...........
View, Comments and Share...........



0 Comments