August 2 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 2 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
2 ऑगस्ट 2006 रोजी सार्क ( दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटना, South Asian Association for Regional co-operation -SAARC ) सभासद राष्ट्रांच्या सभेमध्ये दक्षिण कोरियाला निरीक्षक दर्जा देण्यात आला.
2 ऑगस्ट 2016 भारतात तीसरी वेगवान 'टॉलगो ट्रेन' चाचणी दिल्ली ते मुंबई या दोन स्टेशनदरम्यान यशस्वीपणे घेण्यात आली.
2 ऑगस्ट 2022 रोजी संयुक्त राष्ट्रातील भारतीय राजदूत रुचिरा कंबोज यांनी भारताच्या स्थायी प्रतिनिधी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे या पदावर नियुक्त झालेल्या त्या भारतीय पहिल्या महिला ठरल्या आहेत.
X X
2 ऑगस्ट 1677 रोजी शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
2 ऑगस्ट 1790 रोजी अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.
2 ऑगस्ट 1820 रोजी जॉन टिंडाल – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 डिसेंबर 1893 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1835 रोजी अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक यांचा जन्म झाला. 21 जानेवारी 1901 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1861 रोजी आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, यांचा जन्म झाला. देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ’बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. 1896 मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ’मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत. त्यांच्यामध्ये 16 जून 1944 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1870 रोजी जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे ची लंडन मध्ये सुरवात झाली.
X X
2 ऑगस्ट 1910 रोजी पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 फेब्रुवारी 1978 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1918 रोजी दादा जे. पी. वासवानी – आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य यांचा जन्म झाला.
2 ऑगस्ट 1923 रोजी काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे 30 वे राष्ट्राध्यक्ष बनले. हे अतिशय मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.
X X
2 ऑगस्ट 1951 रोजी दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
2 ऑगस्ट 1979 रोजी नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
2 ऑगस्ट 1990 रोजी इराकने कुवेतवर आक्रमण केले.
X X
2 ऑगस्ट 1996 रोजी अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.
2 ऑगस्ट 2001 रोजी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.
X X
2 ऑगस्ट 1834 रोजी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 ऑक्टोबर 1904 मध्ये झाला.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
2 ऑगस्ट 1876 रोजी पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यु 4 जुलै 1963 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1876 रोजी पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यु 4 जुलै 1963 मध्ये झाला.
पिंगाली वेंकय्या
X X
2 ऑगस्ट 1877 रोजी भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर शुक्ला यांचा जन्म झाला. त्यांचा बर्थडे 31 डिसेंबर 1965 मध्ये झाला.
X X
2 ऑगस्ट 1877 रोजी भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर शुक्ला यांचा जन्म झाला. त्यांचा बर्थडे 31 डिसेंबर 1965 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1892 रोजी वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 सप्टेंबर 1978 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1929 रोजी भारतीय राजकारणी विद्याचरणा शुक्ला यांचा जन्म झाला. 11 जून 2013 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1922 रोजी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती जी. पी. बिरला उर्फ गंगाप्रसाद बिरला यांचा जन्म झाला.
2 ऑगस्ट 1932 रोजी अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक लमेर हंट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यु 13 डिसेंबर 2016 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1941 रोजी ज्यूल्स हॉफमन – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला.
2 ऑगस्ट 1945 रोजी भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म झाला.
X
X
2 ऑगस्ट 1956 रोजी गुजरात राज्याचे राजकारणी व विद्यमान मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा जन्म झाला.
2 ऑगस्ट 1958 रोजी अर्शद अयुब – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक यांचा जन्म झाला.
X X
2 ऑगस्ट 1589 रोजी हेन्री (तिसरा) – फ्रान्सचा राजा यांचा मृत्यु झाला. त्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1551 मध्ये.
2 ऑगस्ट 1781 रोजी सखारामबापू बोकील – पेशवाईतील मुत्सद्दी, साडेनीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे यांचा मृत्यु झाला.
2 ऑगस्ट 1922 रोजी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक यांचा मृत्यु झाला.3 मार्च 1847 रोजी टेलिफोन चा जनक स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याचा जन्म झाला. ग्रहणबेलने दूरध्वनी यंत्राचा शोध 1875 मध्ये लावला आणि अमेरिकन टेलिफोन कंपनीचे सहसंस्थापक म्हणून त्यांनी कंपनी स्थापन केली. बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले दोन जून 1875 या दिवशी सहकारी वाटसन यांच्यासह काम करीत असताना दुसऱ्या खोलीतील वाटसन यांच्या हाताच्या धक्क्याने ट्रान्समीटर थरथरला. तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटर चा उपयोग करून सहकारी वाटसन यांना आपल्या खोलीत येणे विषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश वाटसन यांना ऐकू आला आणि त्यांनी प्रतिसाद दिला वर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल त्यांची खात्री पटली. त्यांनी आणखी प्रयोग केले आणि 15 फेब्रुवारी 1876 दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला. त्यांना पेटंट मिळाले. बेल यांनी तयार केलेल्या या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले जाऊ लागले. नोव्हेंबर 1877 मध्ये बेल यांनी बर्लिन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. आणि एक 1885 वर्षी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचा मृत्यू 2 ऑगस्ट 1922 मध्ये झाला. ते नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स चे सदस्य होते. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे ते मानत सदस्य होते.
2 ऑगस्ट 1934 रोजी पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा मृत्यु झाला. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1847 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1979 रोजी भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व गायक करन दिवाण यांचे निधन झाले.
2 ऑगस्ट 1978 रोजी मोनॅको ग्रांप्री चे स्थापक ॲन्टोनी नोगेस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1890 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1980 रोजी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय शिल्पकलेचे प्रणेते भारतीय शिल्पकार आणि चित्रकार रामकिंकर बैज यांचे निधन झाले.
2 ऑगस्ट 2010 रोजी भारतीय हिंदी, पंजाबी आणि गुजराती भाषिक चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते व चित्रपट निर्माता कमल कपूर यांचे निधन झाले.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/07/august-1-day-of-special-dinvishesh-1.html
👆
August 1 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 1 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
View, Comments and Share...........
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
View, Comments and Share...........





0 Comments