August 1 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 1 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
1 ऑगस्ट 1760 रोजी सदाशिवराव उर्फ भाऊसाहेब पेशवे यांनी दिल्ली काबीज केली. हे उत्तरेत अब्दालीने दिलेले आव्हान परतून लावण्यासाठी मोहिमेवर निघाले होते.
1 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाकडून 1ते 7आगस्ट दरम्यान महसूल आठवडा साजरा करण्यात येतो.
1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन झाले. या दिवशी त्यांची या पुण्यतिथी साजरी करण्यात येते.
1 ऑगस्ट 1920 ला देशात अहिंसक असहकार चळवळ महात्मा गांधी यांनी सुरू केली.
1 ऑगस्ट 1920 रोजी औरंगाबाद येथे "बलवंत वाचनालय "ची स्थापना झाली आ.कृ. वाघमारे हे या वाचण्याचे प्रवर्तक होते.
1 ऑगस्ट 1920 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म भाऊराव व बालू भाई यांच्या पावन कुशीत वाटेगाव तालुका वाळवे जिल्हा सांगली महाराष्ट्र राज्य या ठिकाणी झाला.
1 ऑगस्ट 2016 पासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचा विमा उतरवण्यासाठी पशुधन विमा पंधरवाडा पाळण्यात आला. शेवटचा दिवस 15 ऑगस्ट हा होता.
1 अगस्त 1949 रोजी सातारा जिल्ह्याचे विभाजन करुन उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण केले. नंतर ते 20 नोव्हेंबर 1960 ला फेरफार करून दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात करण्यात आले.
1 ऑगस्ट 1982 मध्ये केंद्र सरकारने श्रमजीवी कुटुंबकल्याण योजना ची सुरुवात केली .यात अपघातात मृत्यू पावणाऱ्या अथवा अपंग होणाऱ्या असंरक्षित कुटुंबियांना अर्थसहाय्य करणे हा उद्देश होता.
1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा निर्माण झाला.
X X
1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट – जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येतो.
1 ऑगस्ट 1291 रोजी: स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना केली.
1 ऑगस्ट 1774 रोजी जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
1 ऑगस्ट 1876 रोजी कोलोरॅडॊ अमेरिकेचे 38 वे राज्य बनले.
1 ऑगस्ट 1914 रोजी पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार चळवळ प्रारंभ झाला होता.
1 ऑगस्ट 1920 रोजी महात्मा गांधी यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घटनेमुळे दु:खी होऊन इंग्रज सरकारने दिलेला ‘केसर ए हिंद’ हा किताब वापस केला.
1 ऑगस्ट 1936 रोजी बर्लिनमध्ये अकरावे ऑलिंपिक खेळ सुरू झाले.
1 ऑगस्ट 1944 रोजी पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
1 ऑगस्ट 1917 रोजी भारत पाकिस्तानच्या फाळणी नंतर लॉर्ड माउंटबॅटन(Louis Mountbatten) हे भारताचे गव्हर्नर जनरल बनले तर मोहम्मद अली जिन्ना हे पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनले.
X X
1 ऑगस्ट 1956 रोजी दुर्बा बॅनर्जी या इंडियन एअरलाइन्सच्या तसचं भारतातील पहिल्या महिला वैमानिक बनल्या.
1 ऑगस्ट 1957 रोजी भारतीय प्रकाशन गृह नॅशनल बुक ट्रस्ट ची स्थापना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली. ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालय, सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्य करते.
1 ऑगस्ट 1958 रोजी आचार्य विनोबा भावे यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
1 ऑगस्ट 1960 रोजी इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
1 ऑगस्ट 1981 रोजी अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
1 ऑगस्ट 1994 रोजी भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. जगातील अशा तर्हेची ही पहिलीच योजना आहे.
1 ऑगस्ट 1996 रोजी मायकेल जॉन्सनने 200 मीटर अंतर 19.32 सेकंदात धावून विश्वविक्रम रचला गेला.
X X
1 ऑगस्ट 1996 रोजी कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
1 ऑगस्ट 2001 रोजी सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.
1 ऑगस्ट 2004 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाची स्थापना झाली. 3 ऑगस्ट 2004 रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.
1 ऑगस्ट 2008 रोजी अकरा पर्वतारोहणांचा के- 2 या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.
ख्रिस्त पूर्व 1 ऑगस्ट 10 रोजी क्लॉडियस – रोमन सम्राट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू ख्रिस्त पूर्व 56 रोजी झाला होता.
1 ऑगस्ट 1744 रोजी जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 18 डिसेंबर 1829 मध्ये झाला.
1 ऑगस्ट 1835 रोजी महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक यांचा जन्म झाला. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले. त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 1888 मध्ये महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी झाला.
X X
1 ऑगस्ट 1869 रोजी ब्रिटीश कालीन भारतातील आग्रा व अवध या संयुक्त प्रांतांचे पहिले गव्हर्नर सर स्पेन्सर हार्कोर्ट बटलर(Harcourt Butler) यांचा जन्म झाला.
1 ऑगस्ट 1882 रोजी पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (1961), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 1 जुलै 1962 मध्ये झाला.
1 ऑगस्ट 1899 रोजी कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1936 मध्ये झाला.
1 ऑगस्ट 1910 रोजी मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म झाला.
1 ऑगस्ट 1913 रोजी भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 4 फेब्रुवारी 2002 मध्ये झाला.
X
X
1 ऑगस्ट 1915 रोजी श्री. ज. जोशी – कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा जन्म झाला.
1 ऑगस्ट 1920 रोजी ’लोकशाहीर’ अण्णाभाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 जुलै 1969 मध्ये झाला.
1 ऑगस्ट 1915 रोजी श्री. ज. जोशी – कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा जन्म झाला.
1 ऑगस्ट 1920 रोजी ’लोकशाहीर’ अण्णाभाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 जुलै 1969 मध्ये झाला.
1 ऑगस्ट 1924 रोजी सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 मार्च 1967 मध्ये झाला.
1 ऑगस्ट 1932 रोजी महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री हिचा जन्म झाला. तिच्या मृत्यू 31 मार्च 1972 मध्ये झाला.
1 ऑगस्ट 1948 रोजी मार्वल स्टुडिओ चे संस्थापक एव्ही अराद यांचा जन्म झाला.
1 ऑगस्ट 1952 रोजी यजुर्वेंद्र सिंग – क्रिकेटपटू याचा जन्म झाला.
1 ऑगस्ट 1955 रोजी अरुणलाल – क्रिकेटपटू व समालोचक याचा जन्म झाला.
X X
1 ऑगस्ट 1969 रोजी ग्रॅहॅम थॉर्प – इंग्लिश क्रिकेटपटू याचा जन्म झाला.
1 ऑगस्ट 1137 रोजी लुई (सहावा) – फ्रान्सचा राजा यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म एक डिसेंबर 1081 मध्ये झाला.
1 ऑगस्ट 1591 रोजी मुघल शासक बादशाहा अकबर यांच्या दरबारातील प्रसिद्ध कवी उर्फी शीराजी यांचे निधन झाले.
1 ऑगस्ट 1863 रोजी साली पंजाब प्रांताचे महाराज रणजीत सिंह यांची पाचवी पत्नी तथा महाराज दलीप सिंह यांची आई ज़िन्दाँ राणी यांचे निधन झाले.
1 ऑगस्ट 1913 रोजी भारतीय हिंदी भाषेतील लोकप्रिय कादंबरीकार व लेखक देवकी नंदन खत्री यांचे निधन झाले.
1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्दगीतेचे भाष्यकार यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म महाराष्ट्राचे रत्नागिरी या ठिकाणी 23 जुलै 1856 मध्ये झाला.
X X
1 ऑगस्ट 1999 रोजी निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (1975) बंगाली/इंग्लिश लेखक यांचे निधन झाले. 1951 मधे त्यांचे ’अॅन आटोबायोग्राफी ऑफ अॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या 14 आवृत्त्या निघाल्या. त्यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1997 मध्ये बांगलादेश मधील म्यामेनसिंग येथील किशोरगंज या ठिकाणी झाला.
1 ऑगस्ट 2000 रोजी भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखक, कवी व चित्रपट गीतकार अली सरदार जाफरी यांचे निधन झाले.
1 ऑगस्ट 2005 रोजी फहाद – सौदी अरेबियाचा राजा यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म 16 मार्च 1921 मध्ये झाला.
1 ऑगस्ट 2008 रोजी अशोक मांकड – क्रिकेटपटू यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1946 मध्ये झाला.
1 ऑगस्ट 2008 रोजी हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 23 मार्च 1916 मध्ये झाला होता.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/06/july-31-day-of-special-dinvishesh-31.html
👆
July 31 - Day of Special (Dinvishesh)
जुलै 31 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/07/1.html
👆
Lokmanya Bal Gangadhar Tilak
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
23 जुलै: पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
💐💐💐💐💐💐💐💐
X
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/08/1.html
👆
अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
💐💐💐💐💐💐🙏🙏
ऑगस्ट : 1 जयंती
💐💐💐💐💐💐💐💐
🙏 विनम्र अभिवादन
X
X
View, Comments and Share...........
View, Comments and Share...........


0 Comments