Subscribe Us

header ads

July 27 - Day of Special (Dinvishesh) जुलै 27 : दिनविशेष

 July 27 - Day of Special (Dinvishesh)

जुलै 27 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

27 जुलै 1944 रोजी कोल्हापूरच्या रत्नाप्पा कुंभार यांच्या गटातील तरुणांनी जेजुरीच्या खंडेरायाचा खजिना लुटला. याप्रकरणी 13 जणावर रीतसर खटला भरण्यात आला. माफीचा साक्षीदार वगळता सर्वांना निरनिराळ्या मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या.

27 जुलै 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे मोठा मोर्चा काढला कारण मुंबई,विदर्भ, मराठवाडा, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. अशी समितीची घोषणा होती. महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केले व त्यानंतर दिल्ली येथे मोर्चा काढला.
27 जुलै 2016 16 रोजी सन 2016 चे रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त सहा व्यक्तींची नावे घोषित करण्यात आली. त्यात गायक टी. एम . थोडुर मदाबुसी कृष्णा कर्नाटक, (भारत.) समाज सुधारक बेजवडा विल्सन, कर्नाटक (भारत.) कोंचीता कारपीओ , मोरालीस (फिलिपाईन्स). डॉम्पेट धुआफा (इंडोनेशिया) ओवरसिज कोप्रेशन विलेंटियार ( जपान) विएनटाईम रेस्क्यू (लाऊस). रॅमन मॅगसेस पुरस्कार आला आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार असे सुद्धा म्हणतात.

27 जुलै 2016 रोजी रामेश्वर तामिळनाडू येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्मारक पेईकारूम्बु येथे उभारण्यास प्रारंभ करण्यात आला.

X X
27 जुलै 1761 रोजी माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव हे मराठा साम्राज्यातील 4 थे पेशवे बनले.

27 जुलै 1866 रोजी आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.


27 जुलै 1890 रोजी डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडुन घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.

27 जुलै 1897 रोजी बाळ गंगाधर टिळक यांना पहिल्यांदा कैद करण्यात आलं.


27 जुलै 1921 रोजी रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.
X X
27 जुलै 1940 रोजी अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.


27 जुलै 1949 रोजी पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.

27 जुलै 1955 रोजी दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

X X
27 जुलै 1983 रोजी कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी 18 तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.

27 जुलै 1987 रोजी पुरातत्व विभागाच्या संशोधकांना टायटॅनिक जहाजाचा मलबा सापडला.


27 जुलै 1997 रोजी तामिळनाडुचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.

27 जुलै 1999 रोजी द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने मंजूर केला.

27 जुलै 2001 रोजी सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक वाहने या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व थुंकण्यावर तसेच या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय


27 जुलै 2012 रोजी लंडन येथे 30 व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
X X
27 जुलै 1667 रोजी योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 जानेवारी 1748 मध्ये झाला.


27 जुलै 1724 रोजी राजस्थान मधील मेवाड प्रांताचे शासक महाराणा प्रतापसिंह द्वितीय यांचा जन्म झाला.


27 जुलै 1899 रोजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म झाला.

27 जुलै 1911 रोजी डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (1971) यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 जानेवारी 1997 मध्ये.

27 जुलै 1913 रोजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्या कल्पना दत्त यांचा जन्म झाला.

27 जुलै 1915 रोजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म झाला.
X X
27 जुलै 1940 रोजी भारतीय वंशीय अमेरिकन लेखिका व कादंबरीकार भारती मुखर्जी यांचा जन्म झाला.

27 जुलै 1950 रोजी ग्रामी पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वीणा वादक व्ही. एम. भट्ट यांचा जन्म झाला.

27 जुलै 1954 रोजी भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म झाला.

27 जुलै 1955 रोजी अ‍ॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म झाला.

27 जुलै 1963 रोजी पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म झाला.

27 जुलै 1967 रोजी भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म झाला.

27 जुलै 1969 रोजी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू व मुंबई इंडियन संघाचे प्रशिक्षक जोंटी रोड्स यांचा जन्म झाला.

27 जुलै 1983 रोजी भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म झाला.

27 जुलै 1990 रोजी भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कृती सॅनॉन यांचा जन्म झाला.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
X X
27 जुलै 1844 रोजी जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म 6 सप्टेंबर 1766 मध्ये झाला.

27 जुलै 1995 रोजी उस्ताद बंदे अली खाँ – बीनकार यांचा मृत्यू झाला. किराणा घराण्याचे प्रवर्तक, सूक्ष्म स्वरांचे भान असणारे व मधुर वादन करणारे असा त्यांचा लौकिक होता. पुण्यात नव्या पुलाजवळील दर्ग्याच्या परिसरात उस्ताद बंदे अली खाँ यांची कबर आहे.

27 जुलै 1935 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन झाले.

27 जुलै 1975 रोजी त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार यांचे निधन झाले. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन 26 जानेवारी 1950 रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले.
X X
27 जुलै 1980 रोजी मोहम्मद रझा पेहलवी – इराण देशाचे शेवटचे शासक व शाह ऑफ इराण म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1919 मध्ये झाला होता.


27 जुलै 1992 रोजी अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1940 मध्ये अफगाणिस्तानातील गजनी या ठिकाणी झाला होता.

27 जुलै 1997 रोजी बळवंत लक्ष्मण वष्ट – हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते यांचे निधन झाले.

27 जुलै 2002 रोजी कृष्णकांत – भारताचे 10 वे उपराष्ट्रपती त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1927 मध्ये झाला.

27 जुलै 2007 रोजी वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1917 मध्ये झाला होता.


27 जुलै 2015 रोजी भारताचे 11 वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला होता. भारतीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न, तसचं, पद्मभूषण व पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित “मिसाईल मॅन” म्हणून प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक व माजी भारतीय राष्ट्रपती होते.


X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/06/july-26-day-of-special-dinvishesh-26.html
👆
July 26 - Day of Special (Dinvishesh)

जुलै 26 : दिनविशेष
X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

X X



https://gyaaniinfo.blogspot.com/2022/10/blog-post_14.html
👆
A. P. J.Abdul Kalam (Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam): Indian aerospace scientist, President of India 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम उर्फ अवुल पाकिर जैनुलब्दीन: भारतरत्‍न वैज्ञानिक आणि भारताचे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक

स्मृतिदिन: 27 जुलै








View, Comments and Share......

Post a Comment

0 Comments