July 26 - Day of Special (Dinvishesh)
जुलै 26 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
कारगिल विजय दिवस
राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन
26 जुलै 1888 रोजी The Ramabai Association of Pacific cost" नावाची संस्था कडून पश्चिम अमेरिकेतील लोकांनी पंडिता रमाबाईच्या कार्यास हातभार लावण्यास प्रारंभ केला.
26 जुलै 1892 रोजी पुण्यात शारदा सदन पंडिता रमाबाई यांनी उभी केलेली संस्था ही स्वतःच्या मालकीच्या इमारतीत गेली. या इमारतीचे उद्घाटन डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या हस्ते झाले.
X X
26 जुलै 1902 मध्ये शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील नोकऱ्यांमध्ये मागासलेल्या जाती-जमातीच्या लोकांसाठी 50 टक्के राखीव जागा ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊन तो प्रत्यक्षात राबविण्यात सुरुवात केली.
26 जुलै 1918 कुळकर्णी वतन खारीज केल्यानंतर 26 जुलै 1918 रोजी छत्रपती शाहू महाराजांनी एक अनोखी भेट समाजाला दिली. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी या दिवशी जाहीरनामा प्रसिद्ध केला.
26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानने पराभव स्वीकारला होता. 1999 साली झालेले कारगिल युद्ध भारतीय लष्कराने "ऑपरेशन विजय" नावाने लढवले तर भारतीय हवाई दलाने "ऑपरेशन सफेद सागर" या नावाने लढविले या लढाईत भारताने विजय संपादन केला.
26 जुलै 1509 रोजी सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.
X X
26 जुलै 1745 रोजी इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला.
26 जुलै 1788 रोजी न्यूयॉर्क अमेरिकेचे 11 वे राज्य बनले.
26 जुलै 1847 रोजी लायबेरिया स्वतंत्र झाला.
26 जुलै 1876 रोजी ब्रिटीश कालीन भारतातील कलकत्ता शहरात इंडियन असोसिएशन ची स्थापना करण्यात आली होती.
26 जुलै 1891 रोजी फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद करण्याचा निर्णय छत्रपती शाहू महाराज यांनी घेतला.
26 जुलै 1953 रोजी फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ 26 जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.
X X
26 जुलै 1956 रोजी जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
26 जुलै 1963 रोजी सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
26 जुलै 1965 रोजी मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
26 जुलै 1994 रोजी सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना ’राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
X X
26 जुलै 1998 रोजी 1997 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
26 जुलै 1999 रोजी भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणार्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड करण्यात आली.
26 जुलै 2005 रोजी मुंबई परिसरात 24 तासात सुमारे 995 मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.
26 जुलै 2005 रोजी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अंतरीक्ष यान डिस्कव्हरी चे प्रक्षेपण केले.
X X
26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमधे झालेल्या 21 बॉम्बस्फोटांमधे 56 जण ठार तर 200 जण जखमी झाले.
26 जुलै 1094 रोजी फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 7 सप्टेंबर 1981 मध्ये झाला.
26 जुलै 1844 रोजी भारतीय कलकत्ता येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व कलकत्ता विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू गुरूदासदास बॅनर्जी यांचा जन्म झाला.
X X
26 जुलै 1856 रोजी नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 नोव्हेंबर 1950 मध्ये झाला.
26 जुलै 1865 रोजी भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 सप्टेंबर 1910 मध्ये झाला.
26 जुलै 1875 रोजी मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल युंग यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 जून 1961 मध्ये झाला.
X X
26 जुलै 1893 रोजी ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित . राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता. यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 ऑगस्ट 1989 मध्ये झाला.
26 जुलै 1894 रोजी ब्रिटीश लेखक व तत्त्वज्ञ तसचं, काल्पनिक कथा व कादंबरीकार अल्डस हक्सले यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 नोव्हेंबर 1963 मध्ये झाला.
26 जुलै 1894 रोजी “शिशुगीते” हा संगीताचा प्रकार मराठी भषेत रूळविणारे महान महाराष्ट्रीयन मराठी बालगीत कवी वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 मार्च 1969 मध्ये झाला.
26 जुलै 1904 रोजी फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू सात सप्टेंबर 1981 मध्ये झाला.
26 जुलै 1914 रोजी प्रसिद्ध भारतीय कवयित्री विद्यावती कोकीळ यांचा जन्म झाला.
26 जुलै 1927 रोजी भारतीय क्रिकेट खेळाडू जी. एस. रामचंद यांचा जन्म झाला.
X X
26 जुलै 1928 रोजी भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्न-ए-सफ़ी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 जुलै 1980 मध्ये झाला.
26 जुलै 1939 रोजी ऑस्ट्रेलियाचे 25वे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म झाला.
26 जुलै 1942 रोजी स्लोव्हेकियाचे पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म झाला.
26 जुलै 1949 रोजी थायलंडचे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म झाला.
26 जुलै 1954 रोजी अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 सप्टेंबर 1994 मध्ये झाला.
X X
26 जुलै 1955 रोजी पाकिस्तानचे 11 वे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांचा जन्म झाला.
26 जुलै 1380 रोजी जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन झाले.
26 जुलै 1843 रोजी टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन झाले.
26 जुलै 1867 रोजी ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन झाले.
X X
26 जुलै 1891 रोजी बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (1885), भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1824 मध्ये झाला.
26 जुलै 1952 रोजी अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन झाले.
26 जुलै 1967 रोजी भारतातील प्रसिद्ध इतिहास, संस्कृत, कला आणि साहित्यांचे अभ्यासक व दिल्ली येथील राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयाचे सह-संस्थापक वासुदेव शरण अग्रवाल यांचे निधन झाले.
26 जुलै 2005 रोजी माजी कॅनडीयन हॉकीपटू जीन गिलेस मारॉटे (Gilles Marotte) यांचे निधन झाले.
X X
26 जुलै 2009 रोजी प्रसिद्ध भारतीय सितार वादक, शैक्षणिक, चित्रपट व नाट्य संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 16 मार्च 1936 मध्ये झाला होता.
26 जुलै 2010 रोजी भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म २० डिसेंबर 1945 मध्ये झाला होता.
26 जुलै 2015 रोजी भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म एक डिसेंबर 1934 मध्ये झाला होता.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/06/july-25-day-of-special-dinvishesh-25.html
👆
July 25- Day of Special (Dinvishesh)
जुलै 25 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
View, Comments and Share......
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
View, Comments and Share......



2 Comments
छान महिती मिळालि
ReplyDeleteछान महिती मिळालि
ReplyDelete