March 9 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 9 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटन
शिक्षक दिन: लेबेनॉन
9 मार्च 1776 रोजी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एडम स्मिथ यांचे “द वेल्थ ऑफ नेशन्स” हे पुस्तक प्रकाशित झाले.
9 मार्च 1822 रोजी आजच्या दिवशी चार्ल्स एग ग्राहम यांनी कृत्रिम दातांचा पेटंट नोंदविला.
9 मार्च 1916 रोजी आजच्या दिवशी जर्मनी ने पोतुर्गाल च्या विरोधात युद्धाची घोषणा केली.
X X
9 मार्च 1945 रोजी अमेरिकेच्या बी-29 विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात 1 लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
9 मार्च 1952 रोजी पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन
9 मार्च 1959 रोजी बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.
बार्बी
9 मार्च 1982 रोजी सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग.
9 मार्च 1911 रोजी युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने केली.
X X
9 मार्च 1992 रोजी कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला "सरस्वती पुरस्कार" उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 मध्ये उत्तर प्रदेश मधील प्रतापगड जिल्ह्यातील बाबू पट्टी या गावी झाला. ते हिंदी भाषेचे एक प्रसिद्ध कवी आणि लेखक हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ते त्यांचे एम.ए. पर्यंत शिक्षण अलाहाबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. अलाहाबाद विद्यापीठामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करू सेवानिवृत्तीनंतर ते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात हिंदी विशेषतज्ञ म्हणून त्यांना नोकरी मिळाली. राज्यसभेच्या 12 नामनिर्देशित सदस्यांपैकी ते एक होते. त्यांची मधुशाला नावाची दीर्घ कविता प्रसिद्ध आहे. त्यांचे मधुशाला 1935, मधून कलश 1937, एकांत संगीत 1939, बंगाल का काल 1946, खादी के फूल 1948, असे एकूण 26 कवितासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. बसेरे से दूर 1977 प्रवासी की डायरी क्या बोलू क्या याद करू 1969 असे पाच आत्मकथा पुस्तके त्यांचे प्रसिद्ध आहेत. यापेक्षा वेगळे 24 इतर साहित्यकृती त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कृती दो चट्टाने या साहित्य कृतस 1968 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 1968 मध्ये त्यांना सोवियत लँड नेहरू पुरस्कार तथा एफ्रो आशियाई संमेलन के कमल पुरस्कार ने त्यांना सन्मानित केले. भारत सरकारने त्यांना 1976 मध्ये साहित्य आणि शिक्षा या क्षेत्रामध्ये पद्मभूषण सन्मान या पदवीने सन्मानित केले.
9 मार्च 2015 रोजी सोलार इम्पल्स -2 सौर विमान इंधनाचा वापर न करता फक्त सौरऊर्जेचा वापर करून जग प्रवासासाठी निघाले .या विमानाचे संशोधक ,प्रकल्प संचालक व चालक बरटार्ड पीकार्ड व आंद्रे बोशरबर्ग हे होते. त्यांनी 26 जुलै 2016 पर्यंत जगप्रदक्षणा पूर्ण केली व अबू धाबी(संयुक्त अरब अमिराती ) येथे यशस्वीपणे पोहोचले.
इम्पल्स -2 सौर विमान
9 मार्च 2088 रोजी एस.सी.जमीर गोव्याचे राज्यपाल असताना त्यांनी आजच्या दिवशी महाराष्ट्राचा कारभार सुद्धा सांभाळला.
9 मार्च 1454 रोजी इटालियन खलाशी अमेरिगो वेस्पुची याचा जन्म झाला.
9 मार्च 1824 रोजी अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 जून 1893 मध्ये झाला.
स्टॅनफर्ड विद्यापीठ
X X
9 मार्च 1863 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ "भाऊराव" कोल्हटकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 फेब्रुवारी 1901 मध्ये झाला.
9 मार्च 1899 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 नोव्हेंबर 1985 रोजी झाला.
9 मार्च 1915 रोजी भारतातील सुप्रसिद्ध हिंदी भाषेचे विचारक डॉक्टर नागेंद्र यांचा जन्म झाला.
9 मार्च 1931 रोजी भारतातील केंद्रीय मंत्रिमंडळातील माजी मंत्री डॉ. करण सिंग यांचा जन्म झाला.
9 मार्च 1933 रोजी अमेरिकन गायक-गीतकार लॉईड प्राईस यांचा जन्म झाला.
9 मार्च 1934 रोजी पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला सोवियत संघाचा अंतराळवीर युरी गागारीन याचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 27 मार्च 1968 मध्ये झाला. एका ग्रामीण कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. त्यामुळे लहान वयात धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउंडर म्हणून तो काम करू लागला. त्याचे कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने तो चांगला कामगार म्हणून प्रसिद्ध झाला. व त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी मिळाली. त्यातही त्याने काम उत्कृष्ट करून त्याला विमान दलात घेण्यात आले. हळूहळू युरी ला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. एप्रिल 12 ,1961 मध्ये युरी अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्ष बाहेर युरीने 89 तास 34 मिनिटे भ्रमण केले. त्यामुळे त्याला अनेक देशाने पुरस्कार प्रदान केले. त्याला ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्काराने त्याला सन्मानित केले. वयाच्या चौथी सहाव्या वर्षी विमान अपघातात त्याचा मृत्यू झाला.
9 मार्च 1935 रोजी क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म झाला.
X X
9 मार्च 1943 रजी अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स ऊर्फ 'बॉबी' फिशर याचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 17 जानेवारी 2008 मध्ये झाला.
9 मार्च 1951 रोजी भारतातील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म झाला.
9 मार्च 1952 रोजी भारतातील पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म झाला.
9 मार्च 1956 रोजी भारतातील सुप्रसिद्ध अखिल भारतीय काँग्रेसचे नेते तथा केंद्रीय माजी मंत्री आणि अर्थतज्ञ शशी थरूर यांचा जन्म झाला.
9 मार्च 1970 रोजी भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म झाला.
9 मार्च 1972 रोजी भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांचा जन्म झाला.
सुशांत सिंग
9 मार्च 1985 रोजी भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म झाला.
9 मार्च 1997 रोजी भारतातील हिंदी चित्रपटातील बाल कलाकार दरशील सफ़ारी चा जन्म झाला.
9 मार्च 1650 रोजी महाराष्ट्रातील संत परंपरेतील सर्वश्रेष्ठ संत तुकाराम यांना वैकुंठवास.
संत तुकाराम9 मार्च 1851 रोजी सुप्रसिद्ध डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड याचे निधन झाले. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1777 रोजी झाला होता.
X X
9 मार्च 1969 रोजी भारतातील उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा 'होमी' मोदी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1881 मध्ये झाला होता.
9 मार्च 1971 रोजी भारतातील हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक के. असिफ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 14 जून 1922 रोजी झाला होता.
9 मार्च 1992 रोजी इस्त्रायलचे 6 वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट 1913 मध्ये झाला होता.
नोबेल पारितोषिक
9 9 मार्च 1994 रोजी भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी तिचे निधन झाले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तसेच त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले गेले. त्यांचा जन्म 30 मार्च 198 मध्ये झाला होता.
देविका राणी
9 मार्च 1997 रोजी भारतातील सुप्रसिद्ध राजनीति तज्ञ बीजवाडा गोपाल रेड्डी यांचे निधन झाले.
9 मार्च 2000 रोजी महाराष्ट्रातील मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्यांनी शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून आपल्या भूमिका गाजवल्या मुंबईच्या त्या नगरपाल होत्या. अशा उषा मराठे- खेर उर्फ उषाकिरण यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1929 रोजी झाला होता.
9 मार्च 2012 रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1939 रोजी झाला होता.
X X
View, Comments and share















0 Comments