March 6 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 6 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
स्वांतत्र्य दिन : घाना.
अलामो दिन : टेक्सास.
6 मार्च 1840 रोजी बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले
6 मार्च 1869 रोजी दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.
6 मार्च 1902 रोजी रेआल माद्रिद फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.
6 मार्च 1915 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर शांतीनिकेतन येथे पहिल्यांदा भेटले.
X X
6 मार्च 1921 रोजी पोतुर्गाली कम्युनिस्ट पार्टी ची स्थापना करण्यात आली.
6 मार्च 1940 रोजी रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.
6 मार्च 1953 रोजी जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
5 मार्च 1953 रोजी सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचे निधन झाले. जोसेफ विसारीओनोविच जुगाश्विली हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म 21 डिसेंबर 1878 रोजी जॉर्जिया या देशातील तिफलीस प्रांतातील गोरी या गावी झाला होता. सोवियत संघास जागतिक महाशक्ती घडविणारे स्टॅलिन अतिशय सामान्य कुटुंबातील होते. त्यांचे वडील चांभार काम करत असत. स्टॅलिन लहानपणी खूप हुशार होता. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना त्याची बंडखोर वृत्ती जागी झाली. आणि त्याने अभ्यास सोडून सामाजिक व राजकीय ग्रंथ वाचणे सुरू केले. त्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही काळ त्यांनी वेधशाळेत नोकरी केली मार्क्सवादाचे ते कट्टर समर्थक बनले. 894 पासून राजकीय क्रांतीसाठी त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर बाकु व बाटुम या चळवळीसाठी काम त्याने सुरू केले त्यामुळे त्यांना 18 महिन्याची कारावासाची शिक्षा भोगाव लागली व त्यानंतर त्याला सायबेरियात हद्दपारही केली. 1904 पासून दहा वर्ष ते भूमिगत राहील राहून त्यांनी आपले काम सुरू केले त्यानंतर त्यांना आठ वेळा पकडण्यात आले आणि शिक्षा देण्यात आली. 1905 मध्ये पहिल्यांदा स्पेलिंग लेनिन यांना भेटले. आणि ते 1913 पासून लेनिनचे निकटचे सहकार्य म्हणून राहिले. लेनिन यांच्या सांगण्यावरून त्यांनी "मार्क्सवाद व राष्ट्रीय समस्या" नावाचा प्रबंध लिहिला. लेनिन स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली झालेल्या "ऑक्टोबर क्रांती" सहभागी झाले होते. या क्रांतीनंतर स्थापन झालेल्या नव्या सरकारमध्ये अल्पसंख्या राष्ट्रीय गटाचे मंत्रिपद स्टॅलिन कडे देण्यात आले. 1918 मध्ये यादवी युद्धात त्याला संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली. मुलगा नदीवरील एका शहरास स्टॅलिनग्राड हे नाव देण्यात आले. 1922 मध्ये स्टॅलिन यांना बोलशेविक पक्षाचे महासचिव करण्यात आले. 1928 ते 1953 या काळात सोवियत संघाचे नेतृत्व स्टॅलिनकडे होते त्यांनी बारा वर्षाच्या काळात देशाची उभारणी केली. जागतिक महासत्ता म्हणून सोवियत संघ उदयस आले सोवियत संघाची घटना तयार करण्यात आली.
स्टॅलिन
6 मार्च 1953 रोजी मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी "श्यामची आई" हा चित्रपट पडद्यावर आणला. हा चित्रपट आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केला. यात माधव वझे वनमाला व दामू अण्णा जोशी या अभिनेत्यांची प्रमुख भूमिका आहेत. 1954 मध्ये या चित्रपटाला भारतीय केंद्र शासनातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्ण कमळ पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 1953 मध्ये राष्ट्रपती स्वर्ण पदक मिळाले.
6 मार्च 1957 रोजी घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.
6 मार्च 1964 रोजी कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.
X X
6 मार्च 1971 रोजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.
6 मार्च 1975 रोजी इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.
6 मार्च 1983 रोजी आजच्या दिवशी १९८३ ला युनाटेड स्टेट ने पहिल्या फुटबॉल लीग ची स्थापना केली.
6 मार्च 1990 रोजी भारताने इंदिरा गांधी गोल्ड कप हॉकी टूर्नामेंट चा खिताब आपल्या नावावर केला.
6 मार्च 1993 रोजी महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी चौथ्यांदा पदभार स्वीकारला. ते 13 मार्च 1995 पर्यंत मुख्यमंत्री होते. शरद गोविंदराव पवार हे त्यांचे पूर्ण नाव ते भारतातले एक प्रसिद्ध राजकारणी आहेत. महाराष्ट्र राज्याचे चार वेळेस ते मुख्यमंत्रीपदि ते होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती या तालुक्यात 12 डिसेंबर 1940 मध्ये झाला. त्यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री कृषी मंत्री ही वेगवेगळी कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे सांभाळली. सुरुवातीला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली व त्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. तसेच ते महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे सुद्धा अध्यक्ष आहेत. ते भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे 2005 ते 2008 या दरम्यान अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच ते 2010 ते 2012 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सुद्धा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष ऑक्टोबर 2013 ते जानेवारी 2017 या कालावधीत होते. 2017 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले. गोवा मुक्ती संग्रहाला पाठिंबा देण्यासाठी 1956 मध्ये ते शाळेत असताना त्यांनी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आणि त्यांच्या राजकीय जीवनाची तिथून सुरुवात झाली. कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यावेळेस त्यांनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आमंत्रित केले. त्यांच्या भाषणाला प्रभावित होऊन यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यावयास सांगितला आणि ते त्यांचे शिष्य बनले. वयाच्या 24व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पवार यांना युनोस्कोची 1966 मध्ये शिष्यवृत्ती मिळाली त्या अंतर्गत त्यांनी पश्चिम जर्मनी फ्रान्स इटली इंग्लंड या देशांना भेटी देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि पक्ष बांधणीचा अभ्यास जवळून केला. 1967 मध्ये राज्य विधानसभेची निवडणूक त्यांनी बारामती मतदारसंघातून जिंकली. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्री म्हणून वयाच्या 19 व्या वर्षी त्यांचा प्रवेश झाला. 18 जुलै 1978 रोजी पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1984 मध्ये लोकसभा लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. 26 जून 1988 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून महाराष्ट्र राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद स्वीकारले. मार्च 1990 मध्ये केवळ बारा अपक्ष आमदारांच्या बळावर तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. केंद्रीय मंत्री मंडळात त्यांना 26 जून 1991 रोजी संरक्षण मंत्री पदाची शपथविधी झाला. 6 मार्च 1993 रोजी राज्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री मध्ये त्यांनी सूत्रे स्वीकारली.
6 मार्च 1991 रोजी भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर राव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
6 मार्च 1992 रोजी "मायकेल अँजेलो" नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली.
6 मार्च 1997 रोजी स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड
X X
6 मार्च 1998 रोजी विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा "लता मंगेशकर पुरस्कार" जाहीर
6 मार्च 1999 रोजी जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन
खजुराहो मंदिर
6 मार्च 2000 रोजी शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
6 मार्च 2005 रोजी देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.
6 मार्च 2024 रोजी भारतीय नौदलात एमएच- 60 आर सी -हॉक हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला. ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचा हा सागरी प्रकार असून सी-हॉक तुकडी नौदलात हाय एन ए एस 334 म्हणून नियुक्ती केली आहे. सि-हॉक हेलिकॉप्टरची रचना पाणबुडी भेदी युद्ध, जमिनीवरील युद्ध, शोध व बचाव कार्य, वैद्यकीय सेवा किंवा स्थलांतर प्रक्रिया तसेच इतर सागरी मोहिमांना पार पाडण्याच्या अनुषंगाने केली आहे. विविध वातावरणात हेलिकॉप्टरच्या कार्यप्रणालीच्या यशस्वी चाचणी केली आहे. प्रगत शस्त्रे, सेन्सर आणि एव्हियोनिक्स सूट तसेच विविध प्रकारच्या धोक्यांसाठी सक्षम असलेले सिहॉक हेलिकॉप्टर नौदलाच्या सागरी सुरक्षा व गरजांना पूर्ण करेल.
सी -हॉक हेलिकॉप्टर
सहा मार्च 1475 रोजी सुप्रसिद्ध इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकल अँजेलो यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 फेब्रुवारी 1564 मध्ये झाला.
X X
6 मार्च 1508 मध्ये भारतातील मुघल सम्राट अकबर जलालुद्दीन यांचे वडील हुमायू यांचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 17 जानेवारी 1556 मध्ये झाला.
6 मार्च 1787 रोजी जर्मनीचे भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ वॉन फ्रॉनहोफर यांचा जन्म झाला.
6 मार्च 1899 रोजी भारतातील सुप्रसिद्ध चित्रकार आणि संपादक शी. ल. करंदीकर यांचा जन्म झाला.
6 मार्च 1915 रोजी बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म झाला.
6 मार्च 1947 रोजी सुप्रसिद्ध ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन झाले.
6 मार्च 1936 रोजी भारतातील रामपूर चे नवाब रझा अली खान बहदूर यांचे निधन झाले.
X X
6 मार्च 1968 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक नारायण गोविंद चाफेकर उर्फ ना. गो. चाफेकर यांचे निधन झाले.
6 मार्च 1973 रोजी सुप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म पश्चिम व्हर्जीयनियातील हिल्सबारा येथे धर्मप्रचार कुटुंबात झाला वडील चीनमध्ये धर्मपदेशक असल्याने बालपण चीनमध्ये केले सुरुवातीचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून आईकडे चिनी भाषेचे शिक्षण कुंग यांच्याकडे झाले. 1914 मध्ये पदवी संपादन करून त्यांनी मानसशास्त्रीय शिक्षिका म्हणून काही काळ नोकरी केली 1917 मध्ये जॉन बक या धर्मप्रचारकाशी विवाह केला. पर्लने आपल्या सहकार्यासोबत वेलकम हाऊस नावाची संस्था सुरू केली. 1922 पासून पर्ल ने मासिकात लघुकेत कथा व लेख लिहिण्यास सुरुवात केली. 1930 मध्ये इष्ट विंड, वेस्ट विंड ही तिची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. 1931 मध्ये द गुड अर्थ ही पर्लची पुलिtझर पुरस्कार कादंबरी प्रकाशित झाली. 1932 मध्ये सन्स 1935 मध्ये हाऊस डिव्हायडेड ह्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. पुढे ही त्रयी द हाऊस ऑफ द अर्थ या नावाने 1935 मध्ये प्रकाशित झाली. या लेखनाबद्दल आणि स्वतःच्या आई चे 1936 मध्ये द एक्साइल आणि वडिलांच्या चरित्र 1936 मध्ये द फायटिंग एंजल लेखनाबद्दल पर्ल ला 1938 मध्ये नोबल पुरस्कार प्राप्त झाला. अमेरिकन साहित्यात नोबेल पुरस्कार मिळवणारी पर्लही पहिली महिला होय. 1973 पर्यंत जवळपास 70 प्रकार पुस्तके प्रकाशित केली. त्यांचा जन्म 26 जून 1892 रोजी झाला होता.
पर्ल एस. बक
6 मार्च 1981 रोजी महाराष्ट्रातील मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ, "रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स" चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 13 जानेवारी 1891 मध्ये झाला. ते सुप्रसिद्ध भौतिक शास्त्राचे प्राध्यापक " सृष्टीज्ञान" मासिकाचे संस्थापक संपादक त्यांनी मराठीमध्ये विज्ञान परिभाषा निर्मितीसाठी अखंड कृतिशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. 1907 मध्ये त्यांनी पुण्याच्या फरगुशन महाविद्यालयातून बीएससी पदवी संपादन केली. 1908 मध्ये प्राध्यापक कानिटकरांनी "शास्त्रीय उपकरण निर्मिती" वर्ग सुरू केला त्यामध्ये गोरापजपे व नाम आठवले या दोन विद्यार्थ्यांना "व्हीमशर्ट स्थिर विद्युत उपकरण" भरण्याचे काम दिले. 1912 मध्ये ते पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेले. 1920 मध्ये मुंबईत रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स उर्फ विज्ञान संस्था ही विज्ञानाचे उच्च शिक्षण देणारी संस्था सरकारने सुरू केले परांजपे या संस्थेत भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून लागले. त्यानंतर ते विभाग प्रमुख आणि या कॉलेजचे पहिले भारतीय प्राचार्य झाले. विज्ञान शिक्षण हे मराठीतून व्हावे त्यासाठी मी त्यांनी विज्ञान विषयावर विपुल लेखन केले आणि पुण्यामध्ये 1928 मध्ये विज्ञान विषयक मासिक सृष्टी ज्ञान हे शास्त्रीय मासिक सुरू केले व त्याच्या संपादकीय जबाबदारी गो रा परांजपे यांनी स्वतः स्वीकारली. मासिकाची जबाबदारी 53 वर्षे त्यांनी सांभाळली मराठीतून शास्त्रीय लेखन करण्यासाठी विविध शास्त्रांची मराठी परिभाषा ही निर्माण करणे गरजेची होती. त्यामुळे त्यांनी 1966 मध्ये मराठी विज्ञान परिषद स्थापन झाली. त्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. पुणे मराठी विज्ञान परिषदेचे ते अध्यक्ष होते. 1938 मध्ये मराठी विज्ञान परिषदेच्या मासिक पत्रिकेच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन त्यावेळेसचे शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते झाले. त्या भाषणात परांजपे यांनी असे सांगितले की परिभाषिक शब्दसंग्रह शासनाने करावा अशी सूचना केली. त्यानुसार शासनातर्फे भाषा संचालनालय स्थापन करण्यात आले. त्यानंतर शास्त्रीय विषयावर शासनातर्फे शब्दकोश प्रसिद्ध करण्यात आले.
रामभाऊ म्हाळगी
6 मार्च 1982 रोजी भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष रामभाऊ म्हाळगी यांचे निधन झाले. त्यांनी त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण सरस्वती मंदिर शाळा पुणे या ठिकाणी 1939 मध्ये पूर्ण केले त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी आणि एम ए ही पदवी प्राप्त केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 1950 ते 54 या काळात विभागीय सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सहभाग नोंदवला ती विद्यार्थी विंगचे प्रमुख होते त्यानंतर प्रचारक म्हणून ते भारतातील केरळ या राज्यांमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यांचा राजकीय प्रवास लक्षात घेता 1977 पर्यंत ते जनसंघामध्ये त्यांनी विविध पदावर कार्य केले त्यानंतर 1977 ते 1980 मध्ये ते जनता पार्टी यामध्ये त्यांनी काम केले. त्यांचा जन्म 9 जुलै 1921 रोजी महाराष्ट्रातील मुंबई प्रांतातील पुणे या ठिकाणी झाला.भारतातील आणीबाणी 1976 च्या काळात त्यांना मिसच्या अंतर्गत अटक करण्यात आली .(मेंटेनन्स इन इंटरनल सेक्युरिटी ॲक्ट). महाराष्ट्रातील ठाणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय लोक दलाचे उमेदवार म्हणून ते 1977 मध्ये निवडून आले आणि 1980 मध्ये जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. पूर्वीच्या जनसंघाच्या गटाने जनता पक्षापासून फारकत घेतली. आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. तेव्हा म्हाळगी यांना भाजपच्या महाराष्ट्र राज्य युनिटचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले होते. रामभाऊ मळगे यांच्या नावाने मुंबईत एक प्रबोधिनी संस्था आहे ही एक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आहे. जी नेतृत्व विकास आणि सामाजिक राजकीय संशोधनावर लक्ष केंद्रित करते. त्यांच्या मृत्यूनंतर 1982 मध्ये तिची स्थापना झाली.
6 मार्च 1992 रोजी महाराष्ट्रातील प्रसिध्द कादंबरीकार रणजित देसाई यांचे निधन मुंबई येथे झाले. हे मराठीतील एक सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी या कादंबऱ्या मराठी साहित्य विश्वात एक मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या पत्नी माधवी देसाई ह्या एक सुप्रसिद्ध लेखिका आहेत त्यांनी त्यांच्या जीवनावर नाच ग घुमा हे आत्मचरित्र लिहिले ते खूप गाजले. रणजीत देसाई यांना भारत सरकारने 1973 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. शेकरा, राजा रविवर्मा, राधेय, समिधा, मेघ, माझा गाव, मधुमती, पावनखिंड, कणव, गरुड झेप, कातळ, कांचनम्रग, अभोगी, आलेख इत्यादी त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. त्यांच्या स्वामी या कादंबरीसाठी 1963 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार. त्यानंतर 1963 मध्ये हरिनारायण आपटे पुरस्कार. त्यानंतर 1964 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना 1990 मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचा जन्म 8 एप्रिल 1928 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी झाला.
रणजित देसाई
6 मार्च 1995 रोजी दक्षिण भारतात हिंदी भाषेचे प्रचारक मोटूरि सत्यनारायण यांचे निधन झाले.
6 मार्च 2000 रोजी भारतातील कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन झाले.
6 मार्च 2006 रोजी भारतातील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के शंकर यांचे निधन झाले.
X X
View, Comments and share.......













0 Comments