March 5 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 5 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
समता दिन
5 मार्च 1558 रोजी फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.
5 मार्च 1666 रोजी शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.
5 मार्च 1851 रोजी 'जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया' ची (GSI) स्थापना करण्यात आली. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ही भूशास्त्रीय सर्वेक्षण करणारी भारतातील केंद्रीय शासकीय संस्था आहे हे भारताच्या खनिज मंत्रालयाच्या अंतर्गत येते. ही संस्था ब्रिटिश काळा खंडामध्ये स्थापन करण्यात आली भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि त्याचा अभ्यास करणे या संस्थेचे कार्य आहे तिचे कार्यालय कोलकत्ता या ठिकाणी आहे. 1767 मध्ये भारतातील सर्वेक्षण ऑफ इंडिया यानंतरचे हे सर्वात मोठे जुने सर्वेक्षण संस्था भारतात स्थापन करण्यात आली. 1836 मध्ये कोळसा समिती ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून स्थापन करण्यात आली. भारताच्या पूर्वेकडील भागात कोळशाच्या उपलब्धतेचा अभ्यास आणि शोध घेण्यासाठी ही संस्था स्थापन केली होती. यासाठी भूवैज्ञानिक ब्रिटिश सर्वेक्षणाचा पहिले डेव्हिड हिराम विल्यम हे होते. 4 फेब्रुवारी 1848 मध्ये त्यांना भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे भूवैज्ञानिक सर्वेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
X X
5 मार्च 1904 रोजी निकोला टेसला यांनी बॉल लाइटनिंग ची व्याख्या जगासमोर ठेवली.
5 मार्च 1931 रोजी दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
5 मार्च 1931 रोजी महात्मा गांधीजीनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला.
5 मार्च 1933 रोजी भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
5 मार्च 1949 रोजी आजच्या दिवशी झारखंड पार्टी ची स्थापना झाली.
X X
5 मार्च 1966 रोजी मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत करण्यात आले.
5 मार्च 1978 रोजी महाराष्ट्राचे सातवे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा वसंतदादा पाटील यांनी पदभार स्वीकारला ते 18 जुलै 1978 पर्यंत मुख्यमंत्री होते. 2 फेब्रुवारी 1983 मध्ये महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद स्वीकारले .त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल 1 फेब्रुवारी 1985 मध्ये संपला. 1977 ते 1985 या कालखंडात दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंत दादा पाटील हे खऱ्या अर्थाने औद्योगिक वर्गात महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. सहकार क्षेत्रात आज महाराष्ट्र जो काही आहे त्यात वसंत दादा पाटलांचे खूप मोठे योगदान आहे. 1983 मध्ये त्यांनी वैद्यकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन विनाअनुदानित महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठी महाराष्ट्रात क्रांती झाली. वसंत दादा पाटील हे 1985 ते 1987 या कालखंडात राजस्थानचे राज्यपाल राहिलेले आहेत.
5 मार्च 1982 रोजी आजच्या दिवशी "वेनेरा 14" या अवकाशयानाने बुध ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला.
5 मार्च 1997 रोजी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्या टपाल तिकिटाचे प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
5 मार्च 1997 रोजी धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.
X X
5 मार्च 1998 रोजी नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्या, रशियाकडुन घेतलेल्या "सिंधुरक्षक" या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन झाले. आय एन एस सिंधू रक्षक ही पाणबुडी 24 डिसेंबर 1997 रोजी नऊ दलात सामील करण्यात आली हे किलो वर्गातील दहापैकी नववी पाणबुडी होती. चार जून 2010 रोजी भारतीय संरक्षण मंत्री आणि जवेद्दोचका गोदी पाणबुडीच्या आधुनिकरण आणि आवश्यक दुरुस्तीसाठी सुमारे आठ कोटी अमेरिकन डॉलरच्या करारावर सह्या केल्या. आवश्यक दुरुस्ती आणि आधुनिक करणार नंतर ही पाणबुडी रशियाकडून भारतीय नौदलाला मे जून 2013 दरम्यान परत करण्यात आली.
5 मार्च 1999 रोजी "इंडियन फिजिक्स असोसिएशन" तर्फे देण्यात येणार्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड करण्यात आली.
5 मार्च 2000 रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट – 2) राष्ट्राला अर्पण
5 मार्च 2002 रोजी आजच्या दिवशी ऑस्ट्रेलिया येथे कॉमनवेल्थ समिट चा समारोप झाला.
5 मार्च 2007 रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना करण्यात आला. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स ही एक भारतीय वैधानिक संस्था आहे. संसदेच्या कायद्याने स्थापन केली गेलेली आहे. कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स कायदा 2005 आयोग महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करतो. सीपीसीआर कायदा 2005 च्या कलम 13 अंतर्गत आयोगाला बंधनकारक आहे." सर्व कायदे धोरण कार्यक्रम आणि प्रशासकीय यंत्रणा भारताच्या संविधानात आणि यु एन कन्वेंशन ऑफ द राइट्स मधील बाल हक्कांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत याची खात्री करण्यासाठी मुल". आयोगाने परिभाषित केल्याप्रमाणे बालकांमध्ये 18 वर्षापर्यंतच्या व्यक्तीचा समावेश होतो.
5 मार्च 2009 रोजी इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर को-ऑपरेटिव लिमिटेड (IFFCO) हि आजच्या दिवशी एका वर्षामध्ये एक करोड़ टन ची विक्री करणारी जगातील पहिली कंपनी ठरली.
5 मार्च 2011 रोजी सौदी अरेबिया च्या मक्का मदिना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत 40 यात्रेकरू मारले गेले.
X X
5 मार्च 1512 रोजी सुप्रसिद्ध भूगोलतज्ज्ञ, गणित आणि नकाशा शास्त्राचे जनक जेरार्डस मर्केटर यांचा जन्म झाला.
5 मार्च 1512 रोजी सुप्रसिद्ध नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ गेरहार्ट मरकेटर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 डिसेंबर 1594 रोजी झाला होता.
5 मार्च 1898 रोजी चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 जानेवारी 1976 रोजी झाला.
5 मार्च 1905 रोजी आजच्या दिवशी भगत सिंह यांची काही देशाहिता च्या कार्यांमध्ये मदत करणारी स्वातंत्र्य सैनिक सुशीला दीदी यांचा जन्म झाला.
5 मार्च 1908 रोजी सुप्रसिद्ध ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 जून 1990 रोजी झाला.
5 मार्च 1913 रोजी भारतातील किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 जुलै 2009 रोजी झाला.
X X
5 मार्च 1916 रोजी भारतातील ओरिसा राज्याचे मुख्यमंत्री तथा केंद्रीय पोलाद खानकाम आणि कोळसामंत्री बिजू पटनायक यांचा जन्म झाला. ते भारतातले राजनीति तज्ञ होते. भारतातील ओडिशा राज्याचे ते दोन वेळेस मुख्यमंत्री झाले त्यांचा पहिला कार्यकाळ 5 मार्च 1990 ते 15 मार्च 1995 आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ 23 जून 1961 ते 2 ऑक्टोबर 1963 हा होता. भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते खान मंत्री उद्योग आणि कोळसा असे त्यांच्याकडे खाते होते त्यांचा कार्यकाळ 30 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 असा होता. त्यानंतर तेच पद त्यांना मोरारजी देसाई पंतप्रधान असताना 26 मार्च 1977 ते 15 जुलै 1979 या कालावधीमध्ये त्यांनी मंत्रिपद सांभाळले. त्यांचा जन्म ओरिसा मधील गंजाम या ठिकाणी त्यांचे शिक्षण कटक मधील रावेंच्या कॉलेजमध्ये पूर्ण झाले विमान उद्योगांमध्ये त्यांची रुची असल्यामुळे त्यांनी पायलटचे शिक्षण व प्रशिक्षण घेतले आणि एका खाजगी कंपनीमध्ये ते नोकरी करू त्यानंतर त्यांनी दुसऱ्या जागतिक युद्धात दरम्यान रॉयल इंडियन एअर फोर्स मध्ये ते जॉईन भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत सहभाग घेतला होता. पंडित नेहरूंनी आयोजित केलेल्या 1947 जुलै महिन्यातील पहिल्या अंतर आशिया परिषदेला इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रण दिले होते. पण हवाई आणि सागरी मार्गावर डचांचे नियंत्रण असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष भारतात पोहोचू शकले नाही त्यामुळे बिजू पटनायक यांनी जावाला उड्डाण केले. आणि सुलतान जहरीरला डकोटा येथे आणले या धाडसा मुळे इंडोनेशिया सरकारने त्यांना मानद नागरिकत्व दिले आणि भूमिपुत्र हा सर्वोच्च इंडोनेशियन पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांचा मृत्यू 17 एप्रिल 1997 रोजी झाला.
5 मार्च 1959 रोजी भारतातील मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा जन्म मध्यप्रदेश मधील शिहोर जिल्ह्यातील जयंत या ठिकाणी झाला. ते भारतीय जनता पक्षाचे मध्य प्रदेशातील नेते आहेत. मध्यप्रदेश सरकारमध्ये ते चार वेळेस मुख्यमंत्रीपद त्यांनी सांभाळले. तसेच ते मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 19 नोव्हेंबर 2005 ते 12 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये पदभार स्वीकारला त्यानंतर 23 मार्च 2020 ते 13 डिसेंबर 2023 मध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे भोपाळ मधील बरकतउल्ला खान विद्यापीठांमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी 1977 ते 78 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री म्हणून काम केले. भारतीय जनता युवा मोर्चा चे ते मध्य प्रदेशाचे संयुक्त सचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर 1985 ते 88 या काळामध्ये ते महासचिव झाले. आणि 1988 ते 1991 या काळामध्ये युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष झाले.
5 मार्च 1990 रोजी भारतातील हिंदी चित्रपटांमध्ये तसेच ऑस्ट्रेलियन चित्रपटांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी शारदा यांचा जन्म झाला.
5 मार्च 1539 रोजी भारतातील पोर्तुगीज गव्हर्नर नुनो दा कुन्हा यांचा मृत्यू झाला.
5 मार्च 1827 रोजी सुप्रसिद्ध इटालीय भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1745 रोजी झाला होता.
5 मार्च 1914 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाटककार समीक्षक आणि प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे निधन झाले.
5 मार्च 1966 रोजी भारतातील साम्यवादी विचारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन झाले.
X X
5 मार्च 1985 रोजी भारतातील तथा महाराष्ट्रातील कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन झाले.
5 मार्च 1989 रोजी भारतातील गदर पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वी सिंग आझाद यांचे निधन झाले.
5 मार्च 2013 रोजी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 28 जुलै १९५४ मध्ये झाला होता.
X X
View, Comments and share....


0 Comments