March 4 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 4 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
औद्योगिक सुरक्षा दिवस
राष्ट्रीय दिन
4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात येतो.
4 मार्च 1979 रोजी कोटा येथे भारतीय किसान संघ या संघटनेची स्थापना दत्तोपंत ठेंगडी यांनी केली.
दत्तोपंत ठेंगडी
4 मार्च 1990 रोजी महाराष्ट्राचे सोळावे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी तिसर्यांदा पदभार स्वीकारला ते 25 जून 1991 पर्यंत मुख्यमंत्री होते.
शरद पवार
4 मार्च 2016 रोजी भारत सरकारने "सेतू भारतम परीयोजना" ची सुरुवात केली.
4 मार्च 2016 रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांना चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठेचा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
४ मार्च 2018 रोजी भारताच्या शहजार रिजवीने मेक्सिको विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक व मेहुली घोषणे, ब्रांच पदक पटकावले.
X X
4 मार्च 1791 मध्ये अमेरिकेचे 14 वे राज्य रमाँट हे बनले.
4 मार्च 1861 मध्ये अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे झाले.
अब्राहम लिंकन
4 मार्च 1836 रोजी अमेरिकेत शिकागो या शहराची स्थापना झाली.
4 मार्च 1882 रोजी ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.
इलेक्ट्रिक ट्राम
4 मार्च 1936 रोजी हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.
हिंडेनबर्गर
4 मार्च 1951 रोजी आशियायी सामन्यास प्रारंभ झाला.
4 मार्च 1961 रोजी भारतीय नौदलात 1 ले विमानवाहू जहाज "विक्रांत" दाखल झाले.
X X
4 मार्च 1974 रोजी पिपल मॅगझिन चे पहिले प्रकाशन झाले.
4 मार्च 1980 रोजी प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
4 मार्च 1984 रोजी महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.
4 मार्च 1996 रोजी चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
4 मार्च 2001 रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजित सागर धरण देशाला अर्पण केले.
रणजित सागर धरण
4 मार्च 1868 रोजी चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म झाला.
X X
4 मार्च 1893 रोजी पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म झाला . त्यांचा मृत्यू चार मार्च 1985 रोजी झाला.
4 मार्च 1906 रोजी फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1994 रोजी झाला.
4 मार्च 1926 रोजी ॲमवे चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म झाला.
रिचर्ड डेवोस
4 मार्च 1935 रोजी कॉंग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म झाला.
4 मार्च 1973 रोजी भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्रशेखर येलेती यांचा जन्म झाला.
4 मार्च 1980 रोजी भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म.
4 मार्च 1986 रोजी इंस्टाग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.
माईक क्रीगेर
4 मार्च 1852 रोजी रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार निकोलय गोगोल यांचे निधन झाले.
4 मार्च 1915 रोजी ब्रिटिश समर टाईम चे निर्माता विल्यम विल्लेत्त यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1858 रोजी झाला होता.
4 मार्च 1925 रोजी रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकत्ता या ठिकाणी 4 मे 1849 रोजी झाला होता.
ज्योतीन्द्रनाथ टागोर
X X
4 मार्च 1948 रोजी बाळकृष्ण शिवराम मुंजे भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक यांचे निधन झाले.
4 मार्च 1952 रोजी नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 857 मध्ये आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड येथे झाला.
4 मार्च 1971 रोजी महाराष्ट्रातील कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन श्री संत निळोबाराय यांचे निधन झाले
4 मार्च 1976 रोजी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचे निधन झाले . त्यांचा जन्म 23 जुलै 1886 रोजी झाला होता.
4 मार्च 1992 रोजी महाराष्ट्रातील वर्तमानपत्र सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.
4 मार्च 1997 रोजी अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट इह डिक यांचे निधन झाले.
4 मार्च 1999 रोजी भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन झाले.
4 मार्च 2000 रोजी स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 जानेवारी 1924 रोजी झाला होता.
4 मार्च 2007 रोजी भारतातील सुप्रसिद्ध संसद सदस्य सुनील कुमार महातो यांचे निधन झाले.
4 मार्च 2011 रोजी भारताचे केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, 3 वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुनसिंग यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1930 रोजी झाला होता.
X X
View, Comments and share.......

















0 Comments