February 28 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 28: दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day) 2024 मधील या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान ही आहे ज्यामध्ये वैज्ञानिक तंत्रिक आणि नाविन्यपूर्ण कौशल्यांना प्रोत्साहन देण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे.
28 फेब्रुवारी 1719 रोजी शिवछत्रपतींची स्नुषा, शंभूराजांची महाराणी, श्रीसखी राज्ञी जयति, कुलमुखत्यार मराठी साम्राज्याची राजलक्ष्मी, महालक्ष्मी, स्वराज्याचा मंगल कलश असणारी “महाराणी सरकार येसूबाईसाहेब” तब्बल 30 वर्षाच्या कैदेतून यांची मुक्तता. राजमाता येसूबाई यांच्या सुटकेसाठी त्यांचे पुत्र छत्रपती शाहूंच्या अधिपत्याखाली खंडेराव दाभाडे तसेच शंकराजी मल्हार व सय्यद हुसेन अली यांच्या नेतृत्वात 35000 ची मोठी फौज दिल्लीला रवाना झाली. बादशाह फारुखसियर ने येसूबाई व इतर राजबंदी यांच्या सुटकेच्या अटी मान्य केल्यातर ठीक नाहीतर बादशाह बाजूला करावा. असा ठराव होता. मराठे दिल्लीत पोचले आणि त्यांनी दिल्ली शहराचा ताबा घेऊन दिल्ली च्या किल्ल्याला वेढे दिले शंकराजी मल्हार आणि हुसेन अली ने शाहूराजांच्या मागण्या बादशहा समोर मांडल्या. त्या बादशाह ने अमान्य केल्या. त्यावेळी तिथे दोन्ही बाजूंमध्ये अश्लील शिवीगाळ झाली. दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये बादशहा समर्थकांनी मोठी दंगल घडवून आणली. ज्यामध्ये 2000 मराठे मारले गेले. ज्यात सेनापती संताजी भोसले सुद्धा होते. या गोष्टीमुळे मराठे चवताळले. बादशाह ऐकत नाही हे बघून दुसरा पर्याय म्हणजे बादशहा हटवण्याचे निश्चित झाले. 27 फेब्रुवारी 1719 ला लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले. मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली 28 तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ. कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले. रफी ऊत दर्जत ला नवीन बादशाह घोषित करण्यात आले. व 30 वर्षांचा राजबंदी नावाच्या सोनेरी कुंपणातून राजमाता येसूबाईसाहेबांची सुटका झाली. पुढे 19 एप्रिल 1719 रोजी बादशाह फारुखसियर चे मुंडके कापून त्याला संपवण्यात आले. नवीन बादशहा रफी ऊत दर्जत कडून मराठ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या व कागदोपत्री येसूबाईंची सुटका झाली आणी मराठे पुन्हा साताऱ्याला परतले.
28 फेब्रुवारी 1847 रोजी अमेरिकेने सकरामेंटो च्या युद्धात मेक्सिको ला हरविले.
28 फेब्रुवारी 1849 रोजी अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज 4 महिने व 21 दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.
X X
28 फेब्रुवारी 1922 रोजी इजिप्तला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
28 फेब्रुवारी 1928 रोजी चंद्रशेखर वेंकट रमण आणि कृष्णन यांनी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली, ज्याला त्यांनी "सुधारित विखुरणे" असे संबोधले, पण त्याला रामन इफेक्ट म्हणून ओळखले जाते. भारत सरकारतर्फे दरवर्षी 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. रमण 1933 साली बेंगळुरूयेथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पहिले भारतीय संचालक बनले.

(रामन इफेक्ट आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस:)
(आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून त्याला समुद्राच्या निळ्या रंगाचे वर्णन करण्याची प्रेरणा मिळाली.
त्यांनी 1926 मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली.
त्याने आणि कृष्णन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली, ज्याला त्यांनी "सुधारित विखुरणे" असे संबोधले. पण त्याला रामन इफेक्ट म्हणून ओळखले जाते.)
28 फेब्रुवारी 1935 रोजी वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.
X X
28 फेब्रुवारी 1995 रोजी आजच्या दिवशी अमेरिकेच्या कॉलरेडो येथील डेनवर आंतराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात.
28 फेब्रुवारी 1940 रोजी बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.
28 फेब्रुवारी 2011 रोजी “द किंग्स स्पीच” या हॉलीवूड चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही एक 2010 ची ब्रिटिश ऐतिहासिक ड्रामा फिल्म आहे ज्याचे निर्देशक टॉम हूपर यांनी केले या चित्रपटाची पटकथा डेव्हिड सीड्लर यांनी लिहिलेली आहे. कॉलिंग फर्थ यांनी किंग जॉर्ज सहावा याची भूमिका केलेली आहे. या चित्रपटात फर्थ यांना सात गोल्डन ब्लॉक पुरस्कार प्राप्त झाला. या चित्रपटाने 2010 टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये पीपल्स चॉईस अवार्ड जिंकला.
28 फेब्रुवारी 1873 रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या 'सायमन कमिशन' या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचा जन्म झाला. सायमन कमिशन हे 1928 मध्ये ब्रिटिश भारताच्या वसाहतीतील घटनात्मक सुधारणा राबविण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसद सदस्यांचा एक आयोग होता या आयोगाची निर्मिती 1919 मध्ये कायद्याप्रमाणे झाली. या कायद्याने कोणत्या सुधारणा भारतामध्ये झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांना नवीन योजना जाहीर करण्यासाठी सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांचा विरोध पत्करावा लागला. या आयोगाच्या विरोधामध्ये खूप मोठी निदर्शने झाले. त्यापैकी लाहोर मधील एक निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले व त्यातून त्यांचा मृत्यू झाला. भारतातील लोकांनी 1919 च्या कायद्यावर बहिष्कार टाकून असहकार चळवळ सुरू या सायमन कमिशन मध्ये भारतीय व्यक्तींचा समावेश नव्हता.क्लेमंट अॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. त्यांचा मृत्यू 11 जानेवारी 1954 रोजी झाला.
X X
28 फेब्रुवारी 1897 रोजी मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म झाला. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (1955) ते अध्यक्ष होते. त्यांचे प्रकाशित साहित्य महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, ज्ञानदेव आणि नामदेव, पौराणिक भागवत धर्म , साक्षात्कारी संत तुकाराम इत्यादी. त्यांचा मृत्यू 23 ऑगस्ट 1974 मध्ये झाला.
28 फेब्रुवारी 1901 रोजी रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [1954 – रसायनशास्त्र, 1962 – शांतता] लिनस कार्ल पॉलिंग यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 19 ऑगस्ट 1994 मध्ये झाला.
लिनस कार्ल पॉलिंग
लिनस कार्ल पॉलिंग
28 फेब्रुवारी 1913 मध्ये भारतातील हिंदी भाषेचे सुप्रसिद्ध लेखक नरेंद्र शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील जहांगीरपुर सध्याचे ग्रेटर नोएडा येथे झाला. शर्मा आहे भारतीय लेखक कवी आणि गीतकार आहेत त्यांनी भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीसाठी काही गाणी सुद्धा दिली आहे. त्यामध्ये सत्यम शिवम सुंदरम 1979 चे शीर्षक गीत यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकारासाठीचा फिल्म फेर पुरस्कार नामांकन झाले होते. त्यांचे इंग्रजी साहित्यामध्ये एम ए पूर्ण हे अलाहाबाद युनिव्हर्सिटी मध्ये केले. त्यांनी 1934 मध्ये अभ्युदय वृत्तपत्र प्रकाशित केले त्याची पहिली हिंदी चित्रपट हमारी बात 1943 हा होता. ते ऑल इंडिया रेडिओच्या विविध भारती सेवेचे संस्थापक होते. शर्मा यांनी शंभरहून अधिक चित्रपटासाठी लेखन केले. टीव्हीवर चालणाऱ्या महाभारत या मालिकेचे ते वैचारिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी लिहिलेली काही कवितेची पुस्तके कहानी कहते कहते पाणी हरीण रातवान इत्यादी. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांच्या कथा सुभाष, प्रेम रोग, सत्यम शिवम सुंदरम, राधाकृष्ण, सागर नरसिंह अवतार, हमारी बात इत्यादी. त्यांचे निधन 12 फेब्रुवारी 1989 मध्ये झाले.
28 फेब्रुवारी 1927 रोजी भारताचे दहावे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 जुलै 2002 रोजी झाला.
28 फेब्रुवारी 1929 रोजी भारतीय-अमेरिकन संशोधन रंगास्वामी श्रीनिवासन यांचा जन्म मद्रास प्रांतात झाला. ते भौतिक रसायन शास्त्रज्ञ आणि आयबीएम संशोधन येथे तीस वर्षाची कारकीर्द असलेले शोध संशोधक आहेत.त्यानी ॲब्लेटिव्ह फोटोडीकम्पोझिशनसाठी तंत्र विकसित केले आहे. LASIK नेत्र शस्त्रक्रियेच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांचा वापर केला आहे. लेझर नेत्र शस्त्रक्रियेतील योगदानाबद्दल त्यांना 2 फेब्रुवारी 2013 रोजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्याकडून तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय पदक मिळाले. त्यांनी मद्रास विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि 1953 मध्ये ते युनायटेड स्टेट ला गेले. 1956 मध्ये त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात भौतिक रसायनशास्त्र त्यांनी डॉक्टरेट मिळवली. 1957 ते 61 या काळात रॉंचेस्टर विद्यापीठात पोस्ट डॉक्टरां पदावर त्यांनी काम केले. 1997 मध्ये त्यांना अमेरिकन केमिकल सोसायटीचा क्रिएटिव्ह इन्वेंशन चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2004 मध्ये त्यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स कडून भौतिकशास्त्राच्या औद्योगिक अनुप्रयोग यासाठी पारितोषिक प्रदान करण्यात आले.

28 फेब्रुवारी 1942 रोजी "द रोलिंग स्टोन्स" चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक ब्रायन जोन्स याचा जन्म झाला त्याचा मृत्यू 3 जुलै 1969 मध्ये झाला.
X X
28 फेब्रुवारी 1944 रोजी भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार व गीतकार रवींद्र जैन यांचा जन्म झाला.
28 फेब्रुवारी 1947 मध्ये भारतातील उत्तराखंड चे सावे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचा जन्म झाला. त्यांनी 13 मार्च 2012 रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि 31 जानेवारी 2014 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी घेऊन त्यानंतर एलएलबी केले अलाहाबाद उच्च न्यायालयात वकील म्हणून काही वर्ष त्यांनी काम केले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केले त्यानंतर ते मुंबई उच्चलयाचे न्यायाधीश म्हणून काही दिवस काम केले. 2002 ते 2007 मध्ये उत्तराखंडच्या नियोजन आयोगाचे ते उपाध्यक्ष होते.
28 फेब्रुवारी 1947 रोजी भारतातील मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा जन्म झाला. हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान राज्यसभा सदस्य आहेत. ते मध्यप्रदेशाचे 1993 ते 2003 यादरम्यान मुख्यमंत्री होते. त्यांची राजकारणातील सुरुवात 1971 मध्ये नगरपालिकेच्या अध्यक्षपदापासून सुरू झाली त्यानंतर ते विधानसभेचे सदस्य झाले. 1984 आणि 1992 मध्ये ते लोकसभेचे खासदार झाले.
28 फेब्रुवारी 1948 रोजी ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांचा जन्म झाला.
28 फेब्रुवारी 1572 मध्ये मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचे वडील उदयसिंह राणा यांचे निधन झाले.
28 फेब्रुवारी 1926 रोजी स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन झाले. लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1874 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी झाला होता.
28 फेब्रुवारी 1966 रोजी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा मृत्यू झाला. त्यांची कन्या इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या होत्या. हरिलाल गांधीसोबत कमला यांचा राष्ट्रीय चळवळीत सहभाग होता 1931 च्या असहकार चळवळीत त्यांनी अलाहाबाद मध्ये महिलांचे गट तयार केले. त्यांचा जन्म एक ऑगस्ट 1899 रोजी झाला होता.
28 फेब्रुवारी 1963 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 मध्ये झाला होता.
X X
28 फेब्रुवारी 1966 रोजी आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.उदयशंकर भट्ट यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी पंजाब विद्यापीठातून "शास्त्री" आणि कलकत्ता विद्यापीठातून "काव्यतीर्थ" या उपाध्या मिळवल्या.
28 फेब्रुवारी 1967 रोजी जगातील सुप्रसिद्ध टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लूस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1898 मध्ये झाला होता.
28 फेब्रुवारी 1986 रोजी स्वीडनचे 26 वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या झाले . त्यांचा जन्म 30 जानेवारी 1927 रोजी झाला होता.
28 फेब्रुवारी 1995 रोजी कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचे निधन झाले. 'सासरमाहेर', 'भाऊबीज', 'चाळ माझ्या पायांत' या चित्रपटांचे त्यांनी कथा, संवाद व गीतलेखन केले होते.
28 फेब्रुवारी 1998 रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते राजा गोसावी यांचे निधन झाले.
28 फेब्रुवारी 1999 रोजी महाराष्ट्रातील औंध संस्थांचे राजे पंतप्रतिनिधी भगवंतराव श्रीपतराव यांचे निधन झाले.
1928 मध्ये महाराष्ट्रात विज्ञानाची पाळीमुळे मराठीतून रुजवावी या उद्देशाने गोरा परांजपे यांनी सृष्टी ज्ञान हे मासिक सुरू केले. या मासिकाचे संपादन डॉक्टर जयंत नारळीकर डॉक्टर चिपळूणकर निरंजन घाटे या मान्यवरांनी केले होते. हे मासिक लक्ष्मीनारायण मुद्रानालय महात्मा फुले वस्तू संग्रहालय या संस्थांकडून प्रकाशित होत होते त्यानंतर मार्च 2023 मध्ये विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र द्वारा हे मासिक प्रकाशित होत आहे. 1966 मध्ये मराठी आणि विज्ञान हे दोन शब्द एकत्र करून मराठी विज्ञान परिषदेची स्थापना मुंबईत करण्यात आली ही मराठीतून विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते. या परिषदेच्या माध्यमातून 1966 पासून विज्ञान अधिवेशन घेण्यात येते. 830 ते 1950 या काळातील 130 वर्षाच्या कालखंडातील मराठीतून प्रकाशित झालेल्या विज्ञान विषयक लेखातील निवडक 200 लेखांचा संग्रह मराठीतील विज्ञान विषयक लेखन या ग्रंथातून मराठी विज्ञान परिषदेने प्रकाशित केला आहे. मराठी विज्ञान परिषदेकडून 1968 पासून मराठी विज्ञान परिषद पत्रिका हे विज्ञान विषयक मासिक प्रशासित सुरू केले.
👆
28: फेब्रुवारी
National Science Day
राष्ट्रीय विज्ञान दिवस
C.V. Raman or Chandrasekhara Venkata Raman: Indian Physicist, Raman effect or Raman scattering
चंद्रशेखर वेंकट रामन
https://www.insearchofknowledge.org/2022/12/rajendra-prasad-first-president-of.html
👆
स्मृतिदिन: 28 फेब्रुवारी
Dr. Rajendra Prasad: Indian politician & first president of Republic of India
डॉ.राजेंद्रप्रसाद: स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-27-day-of-special-dinvishesh.html
👆
February 27 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 27: दिनविशेष
X X
View, Comments and share...

1 Comments
Excellent information about science day
ReplyDelete