Subscribe Us

header ads

February 27 - Day of Special (Dinvishesh)

February 27 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 27: दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

मराठी राजभाषा दिवस


मराठी भाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र आणि गोवा या भारतातील राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस राज्य सरकारद्वारे नियंत्रित केला जातो. प्रख्यात मराठी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी झाला होता. ते मराठी भाषेतील कवी लेखक नाटककार कथाकार व समीक्षक होते. कुसुमाग्रज या टोपण नावाने त्यांनी कविता लेखन केले. त्यांची सर्वात लहान लाडकी बहीण कुसुम चे अग्रज म्हणून त्यांनी कुसुमाग्रज हे नाव धारण केले. त्यांनी शिक्षण घेत असताना चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका केल्या त्यानंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे ते संपादक म्हणून त्यांनी काम केले. 1930 मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचा सहभाग होता आणि त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लड्यापासून झाली. त्यांनी 1933 मध्ये ध्रुव मंडळाची स्थापना केली. त्या काळात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. पत्रकारितेच्या निमित्ताने त्यांनी मुंबईत मराठी साहित्य संघाचे डॉ. अनंत भालेराव यांना भेटले. भालेराव यांनी त्यांना नाटके लिहिण्यास सांगितले आणि त्यानंतर ते यशस्वी नाटककार झाले. कुसुमाग्रज यांचे कवितासंग्रह अक्षरबाग 1990, किनारा 1952 , चाफा 1958, मराठी माती 1960 , विशाखा 1942, हिमरेषा 1964 इत्यादी. त्यांचे निबंध संग्रह आहे आणि लघु निबंध संग्रह, प्रतिसाद लघु निबंध संग्रह इत्यादी. त्यांची प्रसिद्ध नाटके आथेल्लो, किमयागार, एक होती वाघीण, दुसरा पेशवा, देवाचे घर, नटसम्राट, मुख्यमंत्री, ययाती देवयानी, राजमुकुट, वैजयंती इत्यादी प्रसिद्ध नाटके. त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या कल्पनेच्या तीरावर, जानवी, वैष्णव इत्यादी. त्यांचे कथासंग्रह अंतराळ ,एकाकी तारा, जादूची होडी, बारा निवडक कथा, सतारीचे बोल इत्यादी. त्यांनी लिहिलेल्या एकांकिका दिवाणी दावा 1954 ,देवाचे घर 1955 ,प्रकाशाची दारे, मौज दिवाळी अंक 1959 इत्यादी. महाराष्ट्र शासनाचे त्यांच्या उत्कृष्ट पुस्तकांसाठीचे पुरस्कार मराठी मातीला 1960, स्वागत 1962, हिमरेषाला 1962, नटसम्राटला 1971, साली मिळाला. त्यांच्या नटसम्राट या साहित्याला साहित्य अकादमीचा 1974 चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. "वीज म्हणाली धरतीला" या नाटकास 1967 आणि "ययाती आणि देवयानी" या नाटकाचे 1966 चा राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले. त्यांच्या एकूण समग्र साहित्य साठी भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. तसेच भारत सरकारने साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल 1991 मध्ये "पद्मभूषण" पुरस्काराने सन्मानित केले. अंतराळातील एका ताऱ्यास कुसुमाग्रज हे नाव दिले गेले आहे. 1960 मध्ये मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. 1964 मध्ये मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्यांनी भूषविले. 1970 मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या 51 व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते. 1990 मध्ये मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.


27 फेब्रुवारी 1740 रोजी मुंगी पैठण च्या तहाने निजामाचा पुत्र नासिरजंगने पहिला पेशवा बाजीराव यांच्या सोबत झालेल्या युद्धात पराभूत झाला व त्याने मुंगी पैठण च्या तह करून नर्मदेच्या दक्षिणेकडील हंडिया व खारगाव हे दोन जिल्हे मराठ्यांना खंडणी म्हणून दिले. पेशवे पहिले बाजीराव यांचा हा शेवटचा विजय होता.

28 फेब्रुवारी 1918 रोजी राजर्षी शाहू महाराजांनी कुलकर्णी वतनाची पद्धत बंद करून तलाठी पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला. कुलकर्णी वतने नष्ट केल्यामुळे कोल्हापूर संस्थानातील जनता कुलकर्ण्यांची कारस्थाने, अन्याय ,लबाडी यापासून मुक्त झाली.
X X
27 फेब्रुवारी 2015 रोजी नदीजोड प्रकल्पासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालानुसार केंद्रीय ने समिती स्थापन करून या अहवालात हिमालयीन नद्या अंतर्गत 116 नदीजोड प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून केन-बेटवा प्रकल्पाचा प्रथम प्रथम क्रमांक यात लागतो. जो हा देशातील 30 नद्यांचा जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेला नदीजोड प्रकल्पापैकी एक आहे. जो प्रकल्प मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश अंतर्गत सर्वात मोठा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला होता.

27 फेब्रुवारी 2016 रोजी महाराष्ट्र शासनाचा सन 2015 चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा. रावसाहेब गणपतराव जाधव प्रसिद्ध समीक्षक व कवी यांना प्रदान करण्यात आला.


27 फेब्रुवारी 2010 या दिवशी भारतरत्न श्री. नानाजी देशमुख यांचा मृत्यू झाला. त्यांनी आपला देह दान केला होता. त्यांचा देह एम्स रुग्णालय दिल्ली या ठिकाणी सोपवण्यात आला.
X X
27 फेब्रुवारी 1900 मध्ये ब्रिटन या देशात मजूर पक्षाची (Labour Party) स्थापना झाली.

27 फेब्रुवारी 1844 मध्ये डॉमिनिकन रिपब्लिकला (हैतीपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

27 फेब्रुवारी 1874 रोजी आजच्या दिवशी इंग्लंड च्या लॉर्ड क्रिकेट मैदानावर पहिल्यांदा बेसबॉल खेळ खेळला गेला.

27 फेब्रुवारी 1951 मध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेत 21 वा बदल करण्य़ात आला. ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी 8 वर्षे असा करण्यात आला.

27 फेब्रुवारी 1987 रोजी मराठी राजभाषा दिन,मराठी भाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र आणि गोवा या भारतातील राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस राज्य सरकारद्वारे नियंत्रित केला जातो. प्रख्यात मराठी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

27 फेब्रुवारी 1999 रोजी पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक पार पडली.
X X
27 फेब्रुवारी 2001 रोजी जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या "आकाश" या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र भारतीय बनावटीचे असून याचा पल्ला 60 किलोमीटर आहे. 55 किलो स्फोटके घेऊन प्रवास हे करू शकते. आकाश चे वजन 720 किलो असून त्याची लांबी 5.2 मीटर आहे या क्षेपणास्त्रात अण्वस्त्रे वाहून येण्याची क्षमता आहे ध्वनीच्या साडेतीन पट वेगाने हे क्षेपणास्त्र प्रवास करते. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ ने हे क्षेपणास्त्र तयार केले आहे त्यासाठी 1990 पासून संशोधन कार्य सुरू होते.


27 फेब्रुवारी 2002 रोजी मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या 59 हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

27 फेब्रुवारी 807 मध्ये अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो याचा जन्म झाला त्याचा मृत्यू 24 मार्च 1882 मध्ये झाला.

27 फेब्रुवारी 1894 रोजी सुप्रसिद्ध जर्मन रसायन शास्त्रज्ञ कार्ल श्मिट याचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 13 जून 1822 मध्ये झाला.

27 फेब्रुवारी 1899 रोजी इन्सुलिन चे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म झाला. 1918 मध्ये त्यांनी दुसऱ्या कॅनडियन टॅंक बटालियनमध्ये सेवा देणाऱ्या कॅनडियन सैन्यात भरती झाली युद्धानंतर त्यांनी शरीर शास्त्र आणि जैव रसायनशास्त्रात पदवी पूर्ण केली. टोरंटो विद्यापीठात बाविसाव्या वर्षी वैद्यकीय विद्यार्थी म्हणून त्यांनी सर्जन डॉ. फ्रेडरिक बँक यांचे सहाय्यक म्हणून काम केले आणि स्वादुपिंडातील इन्सुलिन या संप्रेरकाच्या शोधात योगदान दिले.ज्यामुळे मधुमेहावर प्रभावी उपचार झाले. टोरंटो विद्यापीठात 1929 मध्ये फिजिओलॉजीचे प्रोफेसर म्हणून उत्कृष्ट उत्तर अधिकारी मॅकलीओडचे ते बनले. त्यानंतरच्या काळात संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या वैद्यकीय संशोधन समितीचे ते सल्लागार होते. 1946 मध्ये रॉयल नेदरलँड अकादमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस चे परदेशी सदस्य म्हणून ते निवडून 1967 मध्ये त्यांना औषधातील योगदान विशेषतः इन्सुलिनचा सहसोदक म्हणून ओळखल्याबद्दल कॅनडाचा "ऑर्डर ऑफ द कॅनडाचा साथीदार" बनवण्यात आला आणि 1971 मध्ये वैद्यकीय संशोधन सेवांसाठी "ऑर्डर ऑफ द कॉम्पेनन्स ऑफ ओनर" चे सदस्य ते रॉयल सोसायटी ऑफ लंडन रॉयल सोसायटी ऑफ कॅनडाचे फेलो. 1994 मध्ये त्यांना "कॅनडियन मेडिकल हॉल ऑफ द फेम" मध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यांचा मृत्यू 31 मार्च 1978 रोजी झाला.
               चार्ल्स हर्बर्ट बेस्ट 


27 फेब्रुवारी 1912 मध्ये मराठीतील ज्येष्ठ कवी व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांचा जन्म, हा दिवस “मराठी भाषा दिवस” मराठी भाषा दिवस शुभेच्छापत्रे म्हणून साजरा केला जातो.
X X
27 फेब्रुवारी 1926 रोजी मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्‍ना देवधर यांचा जन्म राजस्थान मधील जोधपुर या ठिकाणी झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून एम ए हिंदी या विषयांमध्ये पूर्ण करून एक कादंबरीकार म्हणून लोकप्रियता मिळवली 1966 मध्ये तरुण भारत मासिकात मालिका आली आणि पुढच्या वर्षी ती पुस्तक रूपात आली ती पहिली कादंबरी म्हणजे घर गंगेच्या काठी. त्यांच्या 1968 मध्ये कल्याणी या कादंबरीला लोकप्रियता मिळाली. त्यांचा मृत्यू 17 जानेवारी 2013 रोजी झाला होता.
              ज्योत्स्‍ना देवधर


27 फेब्रुवारी 1932 रोजी ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री सुप्रसिद्ध एलिझाबेथ टेलर हिचा जन्म झाला.तिचा मृत्यू 23 मार्च 2011 रोजी झाला.

27 फेब्रुवारी 1943 रोजी भारतातील कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचा जन्म कर्नाटकातील बुकनाकेरे मंड्या येथे झाला. 2016 मध्ये कर्नाटक राज्याचे भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष होते. कर्नाटक राज्याचे एकोणिसावे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. कर्नाटक राज्याचे ते चार वेळेस मुख्यमंत्री झाले. पहिला कार्यकाळ 12 नोव्हेंबर 2007 ते 19 नोव्हेंबर 2007. त्यानंतर दुसऱ्यांदा 30 मे 2008 ते 31 जुलै 2011. तिसऱ्यांदा त्यांचा कार्यकाळ 27 मे 2018 ते 29 मे 2018 आणि चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून 26 जुलै 2019 ते 28 जुलै 2019 मध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर होते.
              बी.एस.येडियुरप्पा


27 फेब्रुवारी 1952 मध्ये भारतातील सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते प्रकाश झा यांचा जन्म झाला.

27 फेब्रुवारी 1986 रोजी भारतातील सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग यांचा जन्म झाला.

27 फेब्रुवारी 1712 रोजी भारतातील मुगल सम्राट बहादुर शहा जफर पहिला याचा मृत्यू झाला. त्याचा जन्म 14 ऑक्टोबर 1643 रोजी झाला होता.
X X


27 फेब्रुवारी 892 रोजी फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर लुई वूत्तोन यांचे निधन झाले त्यांचा जन्म 4 आगस्ट 1821 मध्ये झाला होता.

27 फेब्रुवारी 1931 रोजी भारतातील स्वातंत्र्यसंग्रामातील घटना म्हणजे काकोरी कट व लाहोर कट यातील नेते क्रांतिकारक चंदशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत चंद्रशेखर आझाद यांनी अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडता झाडता स्वत:वरच गोळी झाडाली व मृत्यूला कवटाळले. रामप्रसाद बिस्मिल् यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. व ते या संघटनेचे प्रमुख होते. त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते. वयाच्या पंधराव्या वर्षी 1921 मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवला त्यावेळेस त्यांना अटक झाली न्यायालयात चंद्रशेखरने आपले नाव आझाद सांगितल्यामुळे तेव्हापासून त्यांचे नाव आझाद या नावाने त्यांना ओळखले जाते. आझाद केवळ एक नाव नसून ते अदम्य साहस आणि निर्भयतेचे प्रतीक होते; त्यांनी ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’च्या माध्यमातून तरुणांमध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवली आणि काकोरी कटासारख्या धाडसी मोहिमांतून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले. “मी आझाद होतो, आझाद आहे आणि आझादच राहीन,” या आपल्या शब्दांना जागून, 27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कवर शेवटच्या श्वासापर्यंत लढताना त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, पण कधीही शत्रूच्या हाती जिवंत लागले नाहीत. अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क या ठिकाणी झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला. त्या मैदानाला चंद्रशेखर आझाद मैदान असे नामकरण करण्यात आले. त्यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी हावरा आली राजपुर झाला होता.


27 फेब्रुवारी 1966 रोजी चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (1904) रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचे निधन झाले. त्यांना 890 मध्ये मिलिटरी मेडिकल अकादमी मध्ये थर्माकोलॉजीचे प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले आणि ते या पदावर पाच वर्ष त्यांनी काम केले. त्यांना 2007 मध्ये रॉयल सोसायटी चे परदेशी सदस्य म्हणून निवडून आले. त्यांना 1915 मध्ये रॉयल सोसायटीचे कोपली पदक प्रदान करण्यात आले 1932 मध्ये ते अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे आंतरराष्ट्रीय सदस्य म्हणून निवडून त्यांच्या स्मरणार्थ पावलोव्हचा कुत्रा पावलोव्हची सत्र आणि पावलोव्हची टायपोलॉजी अशी नावे आहेत.त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1849 रोजी झाला होता.
      इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह 


X X
27 फेब्रुवारी 1956 रोजी भारतातील सुप्रसिद्ध वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव माळवणकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1888 रोजी झाला होता.

27 फेब्रुवारी 1976 रोजी भारतातील कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री के. सी. रेड्डी यांचे निधन झाले. ते म्हैसूर राज्याचे सध्याचे कर्नाटक असलेले ते पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते मध्य प्रदेशाचे तिसरे राज्यपाल झाले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अनेक आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला ते कायद्याचे पदवीधर होते. त्यांनी 1930 मध्ये प्रजा पक्षाची स्थापना केली आणि म्हैसूर संस्थानात जबाबदार सरकार स्थापन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांना ग्रामीण भागामध्ये चांगला प्रतिसाद मिळत होता. मैसूर संस्थानांमध्ये प्रजापक्ष आणि प्रजा मित्रमंडळी यांनी 1934 मध्ये प्रजा संयुक्त पक्ष म्हैसूर पीपल्स फेडरेशन ची स्थापना केली. या फेडरेशनचे रेड्डी हे 1935 ते 1936 दरम्यान अध्यक्ष होते. यानंतर हा संघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला. आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यानंतर 1937 ते 38 आणि 1946 ते 47 असे दोनदा म्हैसूर काँग्रेसचे ते अध्यक्ष होते आणि भारताच्या संविधान सभेचे ते सदस्यही होते. त्यांचा जन्म 4 मे 1909 रोजी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यामधील कायसंबली या ठिकाणी झाला.


27 फेब्रुवारी 1997 भारतातील सुप्रसिद्ध गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ "इंदीवर" यांचा मृत्यू महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी झाला. ते 1960 या दशकामध्ये प्रमुख हिंदी गीतकारांमध्ये एक होते. त्यांची ओळख भारतीय चित्रपट सृष्टीला 1951 मध्ये "मल्हार" चित्रपटाच्या निमित्ताने झाली त्यामध्ये त्यांनी "बडे आरामानो से रखा है बलम, तेरी कसम" हे गीत त्यांनी त्यावेळेस लिहिले होते. त्या गीतासाठी संगीत रोशन यांनी तयार केले होते. 40 वर्ष म्हणजे चार दशकांमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 300 पेक्षा जास्त चित्रपटांसाठी 1000 पेक्षा अधिक गीत ते लिहिली. भारतीय चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध पॉप जोडी नजिया हसन आणि जोहेब हसन यांच्यासाठी त्यांनी गीत लिहिले होते. त्यांचे साठी लिहिलेले एक प्रसिद्ध गीत "आप जैसा कोई " "बूम बूम" "मेहरबानी" "दिल की लगी". जन्म 1924 मध्ये धामणा, झांशी, उत्तर प्रदेश येथे झाला.
श्यामलाल बाबू राय ऊर्फ "इंदीवर"


27 फेब्रुवारी 2010 रोजी भारतातील शिक्षक , सुप्रसिद्ध समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचे निधन झाले. त्यांना पुणे विद्यापीठाने डी. लिट. (पुणे विद्यापीठ – 1994) प्रदान केली. तसेच भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली. डोमरी येथील सोनदरा गुरुकुलम, ग्रामोदय विश्वविद्यालय, उदयमिता विद्यापीठ, आयुर्वेद विद्याप्रतिष्ठान, गोमाता संगोपन प्रकल्प अशा विविध संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे जाळे त्यांनी विकसित केले. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील कडोळी या गावी झाला होता.







https://www.insearchofknowledge.org/2023/12/chandikadas-amritrao-deshmukh-nanaji.html
👆
27 फेब्रुवारी: स्मृतिदीन

Chandikadas Amritrao Deshmukh (Nanaji Deshmukh): social reformer and politician

चंडिकादास अमृतराव देशमुख उर्फ नानाजी देशमुख : समाज सुधारक राजकीय नेते


XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-26-day-of-special-dinvishesh.html
👆
February 26 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 26: दिनविशेष






X X
View, Comments and share

Post a Comment

1 Comments