February 26 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 26: दिनविशेषकुवेतचा मुक्तीदिन
26फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी करण्यात येते.
26 फेब्रुवारी राज्य महिला आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
26 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ सिंचन दिन म्हणून साजरा केला जातो. 21 फेब्रुवारी 1975 रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांनी पदभार स्वीकारला. ते 17 मे 1977 पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये अनेक निर्णय घेतले. त्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या सचिवालयाचे नामांतर करून मंत्रालय हे केले. मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर चहाची गाडी. शेतीला आठ माही पाणी देणे ही योजना त्याने यशस्वीपणे राबवली. महाराष्ट्राची विजेची मागणी लक्षात घेता कोराडी येथील औष्णिक वीज केंद्र दुसरे युनिट सुरू केले व मुबलक प्रमाणात वीज निर्मिती केली. तसेच त्यांच्या काळात पारस, येलदरी, चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्रांची निर्मिती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी राज्यात पाटबंधारे प्रकल्पाला मोलाचे स्थान दिले. जायकवाडी, विष्णुपुरी यासारखे मोठे जलसिंचन प्रकल्प उभारण्यात शंकरराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. त्यानंतर उजनी, इस्लामपूर , पैनगंगा, अप्पर मांजरा अशी मोठे जलसिंचन प्रकल्पाची मालिकाच निर्माण त्यांनी केली. त्यांनी कापूस एकाधिकार योजना, घरकुल योजना, रेल्वे रुंदीकरण योजना अशा योजना राबवल्या. त्यांच्या या पाटबंधारे क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्राचे जलसंस्कृतीचे जनक म्हणून ओळखले जातात. 20 पेक्षा अधिक धरणांची त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बांधणी केली. केंद्र सरकार मध्ये इंदिरा गांधींच्या सरकार मध्ये त्यांना संरक्षणमंत्री, गृहमंत्री , अर्थमंत्री यासारखी महत्त्वाची साथ खाते सांभाळली. ते रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांना आपले राजकीय गुरु माणित असत . एक कर्तव्यदक्ष मितभाशी ,प्रशासक आणि अभ्यासू वृत्तीचे ते एक व्यक्तिमत्व होते. त्यांचे निधन 26 फेब्रुवारी 2004 ला झाले.
26 फेब्रुवारी 320 रोजी म्हणजे आजच्या दिवशी चंद्रगुप्त मौर्य ला 21 व्या वर्षी पाटलीपुत्राचा सम्राट बनविल्या गेले.
X X
26 फेब्रुवारी 1975 रोजी गुजरात येथे देशातील पहिले पतंग संग्रालय “संस्कार केंद्र” गुजरात च्या अहमदाबाद येथे स्थापन केले.
26 फेब्रुवारी 1990 रोजी सिनेमाकलर या पहिल्या रंगीत चित्रपट प्रथम पॅलेस थिएटर, लंडन मध्ये प्रदर्शित झाला.
26 फेब्रुवारी 1928 रोजी बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.
26 फेब्रुवारी 1976 रोजी वि. स. खांडेकर यांना (ययाती कादंबरीसाठी) मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान. विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म सांगली येथे 11 जानेवारी 1898 रोजी झाला. ते सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात 16 कादंबऱ्या ,6 नाटके, 250 ललित लेख आणि 100 निबंध एवढे लेखन कार्य केले. खांडेकर हे सोलापूरच्या 1941 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या ययाती या कादंबरीला 1960 चा साहित्य अकादमी चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच त्यानंतर 1974 मध्ये याच कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना भारत सरकारने 1968 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
X X
26 फेब्रुवारी 1984 रोजी "इन्सॅट-1-इ" हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला. हा उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने आकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. भारतीय राष्ट्रीय उपग्रह हा इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय भूस्थिर कक्षा उपग्रह श्रृंखला कार्यक्रम आहे. या उपग्रहाचा वापर दळणवळण उपग्रह प्रसारण हवामानशास्त्र शोध व इतर कार्यकर्ता केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात 1983 मध्ये करण्यात आली.
26 फेब्रुवारी 1995 रोजी बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.
26 फेब्रुवारी 1998 रोजी परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात 14.709 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
26 फेब्रुवारी 1999 रोजी आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील "अभिरुची हॉटेल" आगीत भस्मसात झाले.
26 फेब्रुवारी 1999 रोजी आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
प्रा. जी. पी. तलवार
X
X
26 फेब्रुवारी 2006 रोजी रशिया आणि इराण यांच्यात अणुशक्ती संशोधन या विषयी तोडगा काढण्यात आला.
26 फेब्रुवारी 2008 रोजी भारताने समुद्रातून सक्षम बैलिस्टिक मिसाइल ची चाचणी केली, जे मिसाईल अण्वस्त्रे घेऊन जाण्याची क्षमता ठेवते.
26 फेब्रुवारी 2019 रोजी आजच्या दिवशी पुलवामा हल्ल्याच्या 12 दिवसानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तान मध्ये जाऊन आतंकवाद्यांचे लाँचपॅड उडवून टाकले.
26 फेब्रुवारी 1802 रोजी जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबरीकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 मे 1885 रोजी झाला.
X X
26 फेब्रुवारी 1829 रोजी अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योजक लेव्ही स्ट्रॉस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 सप्टेंबर 1902 मध्ये झाला.
26 फेब्रुवारी 1866 रोजी अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योगपती हर्बर्ट डाऊ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 ऑक्टोबर 1930 मध्ये झाला.

26 फेब्रुवारी 1887 रोजी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 31 मार्च 1865 मध्ये झाला होता.
डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी
26 फेब्रुवारी 1874 रोजी प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी,सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ "कलापि"यांचा जन्म झाला. त्यांचा "कलापिनो केकारव" हा काव्यसंग्रह खूप गाजला आहे. गुजरात मधील लाठी राज्याचे ठाकूर ते राजकुमार होते. गुजरात मधील सौराष्ट्र भागात असलेल्या लाठी गोहिलवाडमध्ये त्यांचे वास्तव्य होते. त्यांनी एकूण 250 कविता लिहिल्या. ज्यामध्ये 15000 हजार श्लोक आहेत. त्यांनी अनेक नवदूत कवींना मार्गदर्शन केले त्यामध्ये प्रमुख कवी ललितजी होते. पुढे त्यांना लाठीचे राज्य कवी त्यांनी बनवले. "आपनी यादी" ही त्यांचे गुजराती साहित्यातील सर्वोत्कृष्ट गझल आहे. कलापी यांच्या स्मरणार्थ मुंबई येथील इंडियन नॅशनल थेटर हे 1997 पासून दरवर्षी एका कुशल गुजराती गझल कवीला कलापी पुरस्कार प्रदान करत असते.
26 फेब्रुवारी 1908 रोजी सुप्रसिद्ध भारतीय लेखिका लीना मुजुमदार यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू पाच एप्रिल 2007 रोजी झाला.
26 फेब्रुवारी 1937 रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील निर्माते दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म मुंबई येथील गिरगाव या ठिकाणी झाला. त्यांचे वडील किकुभाई देसाई हे चित्रपट निर्माते होते. त्यांचा स्वतःच्या मालकीचा पॅरामाउंट स्टुडिओ नंतर त्याचे नाव फिल्मालय स्टुडिओ असे ठेवण्यात आले. त्यांना 1970 मध्ये प्रदर्शित झालेला सच्चा झूट या चित्रपटामुळे हे मोठे यश प्राप्त. त्यांचा 1977 मधील दिग्दर्शित अमर, अकबर, अँथनी हा प्रचंड लोकप्रिय चित्रपट ठरला आणि व्यावसायिक हिंदी चित्रपट सृष्टीतील हा एक मैलाचा दगड मानला जातो.त्यांचा मृत्यू 1 मार्च 1994 रोजी झाला.
X X
26 फेब्रुवारी 1946 मध्ये सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक, तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या मृणाल पांडे यांचा जन्म झाला.
26 फेब्रुवारी 1957 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकचे 25 वे गवर्नर शक्तीकांत दास यांचा जन्म झाला. त्यांनी 11 डिसेंबर 2018 मध्ये गव्हर्नर पदाचा पदभार स्वीकारला. त्यांचा जन्म ओरिसामधील भुवनेश्वर या ठिकाणी झाला त्यांचे शिक्षण सेंट कॉलेज, दिल्ली विद्यापीठ या ठिकाणी झाले. यापूर्वी पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. जी 20 चे भारताचे शेर्पा होते.दास हे तामिळनाडू केरळ 1980 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांनी जागतिक बँक एडीबी, एनडीबी आणि ए आय आय बी मध्ये भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. आय एम एफ, जी -20, बी आर आय सी एस, एस आर सी यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. भारत सरकार आणि तामिळनाडू सरकार या दोघांसाठी त्यांनी प्रधान सचिव उद्योग विभाग मध्ये काम केलेली आहे. 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांना त्यांची केंद्रीय महसूल सचिव म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर ऑगस्ट 2014 मध्ये त्यांची केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दास हे केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात. बँकिंग प्रणाली सेवा मजबूत बनवण्यासाठी च्या प्रयत्नासाठी त्यांना लंडनमधील द बँकर द्वारे सेंट्रल "बँकर ऑफ द इयर एशिया पॅसिफिक 2020 " या पुरस्काराने सन्मानित केले. लंडनमधील वित्तीय जर्नल सेंट्रल बँकिंग ने त्यांना "गव्हर्नर ऑफ द इयर 2023" या पदवीने सन्मानित केले.
26 फेब्रुवारी 1887 मध्ये भारताच्या संविधान समितीचे सल्लागार बेनेगल नरसिंह राव यांचा जन्म झाला. हे त्या काळातील प्रमुख भारतीय न्यायशास्त्रज्ञ पैकी एक प्रमुख होते. त्यांनी 1947 मध्ये बर्मा आणि 1950 मध्ये भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात मदत केली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर ते 1950 ते 52 या काळात प्रतिनिधित्व केले. 1910 मध्ये त्यांनी भारतीय नागरिक सेवेत प्रवेश केला. भारतीय संहितेमध्ये 1935 ते 37 या काळात सुधारणा केल्यानंतर त्यांना नाईट 1938 मध्ये आणि बंगाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 1939 ते 44 मध्ये भरवण्यात आले. त्यांनी 1944 ते 45 या काळात जम्मू कश्मीर राज्याचे पंतप्रधान म्हणून काम केले. 1949 मध्ये ते युनायटेड नेशन मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी काम केले. हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या स्थायी न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली होती.
26 फेब्रुवारी 1994 मध्ये सुप्रसिद्ध भारतीय कुश्तीपटू बजरंग पुनिया यांचा जन्म झाला.
26 फेब्रुवारी 1712 रोजी दिल्लीचा सातवा बादशाह बहादुर शाह (प्रथम) चे निधन झाले.
26 फेब्रुवारी 1877 रोजी सुप्रसिद्ध कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचे निधन झाले. त्यांनी मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली, इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. थॉमस यांनी 1822 मध्ये भारतीय भाषांचे अभ्यासपूर्वक ज्ञान संपादन केल्यामुळे त्यांची इष्ट इंडिया कंपनीतील पायदळात दुभाषी व क्वार्टर मास्टर या पदावर नेमणूक झाली. त्यानंतर ते ब्रिटिश सरकार लष्करात लेफ्टनंट, कॅप्टन व मेजर या पदावर त्यांनी काम केले. 1835 मध्ये सरकारने त्यांना हिंदू कॉलेज व दक्षिणेकडील सरकारी शाळा यांचा superitendent म्हणून नेमणूक केली. त्यामुळे त्यांनी इंग्रजी, मराठी कोशाचे काम स्वीकारले आणि परिश्रम घेऊन सहा सात वर्षात 1840 ते 47 या वर्षात पूर्ण केले. 1837 मध्ये पुणे पाठशाळेच्या मुख्याध्यापकाचे कामही त्यांनी केले. 1848 मध्ये "नीती ज्ञानाची परिभाषा", 1860 मध्ये "द इंडियन पिनल कोड" इत्यादी अनुवादित मराठी पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केली. 1851 ते 57 या काळात पुना कॉलेजचे प्राचार्य पद त्यांच्याकडे देण्यात आले. 1867 मध्ये काही काळ ते डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. मराठी भाषेला आधुनिक वळण लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचा जन्म 13 डिसेंबर 1804 रोजी इंग्लंडमधील इस्टनॉयले या ठिकाणी झाला होता.
26 फेब्रुवारी 1886 रोजी सुप्रसिद्ध गुजराथी लेखक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ 'नर्मद' यांचा मृत्यू झाला. त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 833 रोजी झाला होता.
26 फेब्रुवारी 1903 रोजी गटलिंग गन चे निर्माते रिचर्ड जॉर्डन गटलिंग यांचे निधन झाले . त्यांचा जन्म 12 सप्टेंबर 818 रोजी झाला होता.
X X
26 फेब्रुवारी 1937 रोजी सुप्रसिद्ध दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचे निधन झाले त्यांचा जन्म 6 जुलै 1862 रोजी झाला होता.
26 फेब्रुवारी 1966 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर व महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन झाले त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला होता.
26 फेब्रुवारी 2000 रोजी कर्नाटकातील बेळगाव येथील सुप्रसिद्ध उद्योगपती बा. म. तथा "रावसाहेब" गोगटे यांचे निधन झाले.
26 फेब्रुवारी 2003 रोजी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार राम वाईरकर यांचे निधन झाले. महाराष्ट्रातल्या बालवाचकांना सुपरिचित असलेला फास्टर फेणे वाईरकर यांच्या कुंचल्यातून उतरला होता.
X X
26 फेब्रुवारी 2004 रोजी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक धुरंदर राजकीय व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच भारतीय काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व केंद्रीय अर्थमंत्री केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 14 जुलै 1920 रोजी झाला होता.
26 फेब्रुवारी 2005 रोजी अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉश चे निर्माते जेफ रस्किन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 9 मार्च 1943 रोजी झाला होता.
26 फेब्रुवारी 2024 रोजी गेली अनेक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांच्या निधनाने कला - संगीत क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे. आपल्या जादूई आवाजाच्या माध्यमातून ते कायम स्मरणात राहतील.
XX
XX
X X
View, Comments and share..

👆
26 फेब्रुवारी : स्मृतिदिन
Vinayak Damodar Savarkar: Veer Savarkar, Indian politician and writer
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-25-day-of-special-dinvishesh.html
👆
February 25 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 25: दिनविशेष
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-27-day-of-special-dinvishesh.html
👆
February 27 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 27: दिनविशेष
X X
View, Comments and share..

0 Comments