Subscribe Us

header ads

February 24 - Day of Special (Dinvishesh)

February 24 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 24: दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


24 फेब्रुवारी जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
केन्द्रीय उत्पादनशुल्क दिवस

24 फेब्रुवारी 1918 रोजी एस्टोनियाने (राष्ट्रध्वज चित्रित) रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.

24 फेब्रुवारी 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकले सुपुत्र मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म राजगडावर झाला. त्यांचा मृत्यू 2 मार्च 1700 मध्ये झाला.

24 फेब्रुवारी 1822 मध्ये जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे भारतातील गुजरात राज्यातील शहर अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.
X X
24 फेब्रुवारी 1920 मध्ये जर्मनीमध्ये नाझी पार्टीची स्थापना करण्यात आली.

24 फेब्रुवारी 1924 रोजी स्वातंत्र्य आंदोलनातील सक्रिय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जेलमधून सुटका झाली.

24 फेब्रुवारी 1918 रोजी रशियापासुन इस्टोनियाला स्वातंत्र्य मिळाले.

24 फेब्रुवारी 1938 पासून ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.

24 फेब्रुवारी 1942 रोजी अमेरिकेमध्ये "व्हॉइस ऑफ अमेरिका" या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.

24 फेब्रुवारी 1952 रोजी भारत सरकारने कर्मचारी राज्य विमा आयोगाची (ESIC) सुरुवात केली.

X X
24 फेब्रुवारी 1961 रोजी दक्षिण भारतातील मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू राज्य असे करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

24 फेब्रुवारी 1987 रोजी इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात " ए" या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून 1,68,000 प्रकाशवर्षे दूर होता.

24 फेब्रुवारी 2018 रोजी फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.

24 फेब्रुवारी 2010 रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.

24 फेब्रुवारी 1483 रोजी मुगल सम्राट बाबर याचा जन्म झाला.

24 फेब्रुवारी 1924 रोजी भारतातील सुप्रसिद्ध पार्श्वगायत व अभिनेता गझलचे बादशहा तलक महमूद यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 मे 1998 रोजी महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी झाला.

24 फेब्रुवारी 1939 रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 मार्च 2012 मध्ये झाला.
X X
24 फेब्रुवारी 1948 रोजी भारतातील तामिळनाडू मधील तामिळी दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा सुप्रसिद्ध राजकारणी आणि तामिळनाडू राज्याच्या माजी मुख्यमंत्री जे . जयललिता यांचा जन्म झाला.
                  जयललिता

24 फेब्रुवारी 1955 रोजी अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 ऑक्टोबर 2011 रोजी झाला.

24 फेब्रुवारी 1963 रोजी भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा जन्म झाला.

24 फेब्रुवारी 1966 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील वारसदार सातारा घराण्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जन्म झाला. ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य आहेत.
  छत्रपती उदयनराजे भोसले 

24 फेब्रुवारी 1674 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील नेसरी ची लढाई नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे 6 सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी "वेडात मराठे वीर दौडले सात" हे काव्य लिहिले आहे. अवघे सात मराठे पंधरा हजार सैन्यावर हल्ला करतात..
१) विसाजी बल्लाळ
२) दिपाजी राउत
३) विठ्ठल पिलाजी अत्रे
४) कृष्णाजी भास्कर
५) सिद्धी हिलाल
६) विठोजी शिंदे
७) आणि खुद्द सरनोबत कुडतोजी उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच प्रतापराव गुजर.
त्यातल्या एकाचेही पाय डगमगत नाहीत, आपण मृत्यूकडे जात आहोत हे माहीत असून देखील ते घाबरत नाहीत, ते माघार घेत नाहीत, या सर्वांची ताकद म्हणजे "श्री छत्रपती शिवाजी महाराज"🚩

#..






X X
24 फेब्रुवारी 1810 मध्ये हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री कॅव्हँडिश यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1731 रोजी झाला होता.

24 फेब्रुवारी 1815 रोजी वाफ़ेवर चालणारे जहाज व पाणबुडी संशोधक "रॉबर्ट फ़ुलटोन" यांचे निधन झाले. वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणतीराचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला.

                रॉबर्ट फ़ुलटोन

          वाफ़ेवर चालणारे जहाज

24 फेब्रुवारी 1936 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन झाले. 'स्मृतिचित्रे' हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले आहे. त्यांच्या स्मृती दिना प्रित्यर्थ भारतात क्षयरोग निवारण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1868 मध्ये झाला होता.


24 फेब्रुवारी 1975 रोजी सोवियत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिनयांचे निधन झाले. त्यांचा जन्म 30 मार्च 1895 रोजी झाला होता.

X X
24 फेब्रुवारी 1986 रोजी भारतातील सुप्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणी देवी अरुंडेल यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1904 रोजी झाला होता.
             रुक्मिणी देवी अरुंडेल



24 फेब्रुवारी 1998 रोजी महाराष्ट्रातील मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन झाले.
                  ललिता पवार

24 फेब्रुवारी 2011 रोजी महाराष्ट्रातील अमरचित्र कथा चे जनक म्हणून ओळखले जाणारे अनंत पै ऊर्फ 'अंकल पै' यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1929 रोजी झाला होता.



24 फेब्रुवारी 2018 रोजी भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध आघाडीची अभिनेत्री तथा दक्षिण चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री श्रीदेवी चे निधन झाले.
X X
                     श्रीदेवी

XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-23-day-of-special-dinvishesh.html
👆
February 23 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 23: दिनविशेष

XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-25-day-of-special-dinvishesh.html
👆
February 25 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 25: दिनविशेष

XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-25-day-of-special-dinvishesh.html
👆
February 25 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 25: दिनविशेष




View, Comments and share....

Post a Comment

0 Comments