Subscribe Us

header ads

February 22 - Day of Special (Dinvishesh)

February 22 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 22: दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

सेंट लुशियाचा स्वातंत्र्यदिन
विश्व विचार दिवस

22 फेब्रुवारी 1819 रोजी स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला 50 लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.


X X
22 फेब्रुवारी 1931 रोजी स्वा. सावरकर व भागोजी शेठ यांच्या पुढाकाराने अस्पृश्यादी सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरात पतितपावन मंदिर व देवालयाची स्थापना करण्यात आली. पतित पावन या शब्दाचा अर्थ म्हणजे समाजाकडून अहवरल्या गेलेल्या समाजाल स्वीकारून शुद्ध करून घेणे होय. हे मंदिर 1931 मध्ये भागोजी सेठ किर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सांगण्यावरून बांधले. या देवळामध्ये मुख्य देवता म्हणून लक्ष्मी नारायणाची मूर्ती आहे. सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेमध्ये असताना हे त्यांनी वेगळे काम केले. भागोजी सेठ किर हे भंडारी समाजातील एक सधनग्रस्त होते. ते शिवभक्त होते. त्यांना सामान्य मंदिरात प्रवेश नसल्याने त्यांनी भागेश्वर मंदिर स्वतःच्या नावाचे खाजगी बांधले होते. पण सावरकरांनी त्यांना उपदेश केला. आपण स्वतंत्र देऊ बांधले. ते महार निर्धन त्यांना देव नाही. मंदिर नाही म्हणून त्यांच्यासाठी एक स्वतंत्र मंदिर बांधावे म्हणून भागोजी सेठणे तीन लाख रुपये खर्च करून पतित पावन मंदिराची उभारणी केली. मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी काशीवरून ब्राह्मण बोलवले होते. पण त्यांनी भागोजी शेठ सारख्या अस्पृश्य समाजातील व्यक्तीच्या हातून हिंदू धर्म पद्धतीने मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नाही. असे म्हणल्यामुळे मसूरकर महाराजांच्या आश्रमातील वेधशास्त्र संपन्न गणेश शास्त्री मोडक यांनी वेदोक्त विधीने विधीने यथाशास्त्र पूजा सांगून भागोजी किरांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली. याच मंदिराच्या परिसरात प्रेरणादायी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक आहे.



22 फेब्रुवारी 1942 रोजी दुसरे महायुद्ध चालू असताना फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

22 फेब्रुवारी 1948 रोजी झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी क्रांती केली.

22 फेब्रुवारी 1954 रोजी महाराष्ट्रात देशाची राजधानी असलेले शहर मुंबई या ठिकाणी पहिली कापड गिरणीची सुरुवात झाली.

22 फेब्रुवारी 1974 रोजी पाकिस्तान ने आजच्या दिवशी बांगलादेश ला मान्यता प्रदान केली.

X X
22 फेब्रुवारी 1978 रोजी श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे 16 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (2696 दिवस) त्यांनी काम केले. त्यांचा जन्म ब्रिटिश भारतातील मुंबई प्रांतात पुणे या ठिकाणी 12 जुलै 1920 रोजी झाला होता. ते भारताचे माजी सरन्यायाधीश होते. त्यांनी 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 रोजी निवृत्ती होईपर्यंत भारताचे सरन्यायाधीश पद भूषविले. 28 ऑगस्ट 1972 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदी त्यांची नेमणूक झाली होती. त्यांनी 1940 मध्ये मुंबईच्या एल्फिनस्टंन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. 1942 मध्ये पुण्याच्या विधी महाविद्यालयातून एलएलबी ची कायद्याची पदवी उत्तीर्ण झाले. 19 मार्च 1961 रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी शहाबानो प्रकरणात मुख्य न्यायमूर्ती चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने घटस्फोटीत मुस्लिम महिलेला देखभाल नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये तरतूद केली. या प्रकरणामुळे राजीव गांधी सरकारने पूर्ण बहुमताने मुस्लिम महिला (घटस्फोटावरील हक्कांचे संरक्षण) कायदा 1986 संबंध केला ज्याने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कमी केला.

22 फेब्रुवारी 1979 रोजी ब्रिटन पासून सेंट लुशिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

22 फेब्रुवारी 1980 रोजी अफगानिस्तान ने मार्शल लॉ ची घोषणा केली.

22 फेब्रुवारी 1998 रोजी जपान च्या नगानो शहरात हिवाळी ऑलिम्पिक चा समारोह पार पडला.

22 फेब्रुवारी 2006 रोजी जपान ने भारतातून आयात होणाऱ्या पोल्ट्री पदार्थांवर बंधी घातली होती


22 फेब्रुवारी 1732 रोजी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 डिसेंबर 1799 रोजी झाला. ते 1789 ते 1797 या काळात अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या कालखंडामध्ये 1783 या काळात अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातल्यांनी खंडीय सैन्याचे नेतृत्व केले.
 1787 
साली नव स्वतंत्र संस्थानांच्या राष्ट्रासाठी राज्यघटना लिहिणाऱ्या मंडळाचे ते अध्यक्षपत्यांनी सांभाळले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा पहिला अध्यक्ष म्हणून त्यांनी 1789 साली त्यांची एकमुखाने निवड झाली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात व त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या जडणघडणीवर त्यांचा खूप मोठा प्रभाव होता त्या कार्यामुळे त्यांना अमेरिकेचा राष्ट्रपिता असेही मानले जाते. ते व्हर्जिनियातील जमीनदार होते. त्यांनी सप्तवार्षिक युद्धात तसेच फ्रेंचांशी व रेड इंडियन यांच्याशी झालेल्या अनेक लढाया त्यांनी भाग घेतला. वसाहतींच्या संयुक्त सैन्यांच्या सेनापतीपदावर त्यांची निवड झाली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे नेतृत्व जॉर्ज वाशिंग्टन कडेच होते.

X
22 फेब्रुवारी 1836 रोजी महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र "न्यायरत्‍न" भट्टाचार्य यांचा जन्म झाला. 1876 मध्ये ते प्रसन्न कुमार सर्वाधिकारी यांच्यानंतर संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते 19 वर्षे प्राचार्य पदाच्या कार्यकाळात त्यांनी संस्कृत शिक्षणाच्या विशेष विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासाठी संस्कृत पदवी परीक्षा सुरू करण्याचा पुढाकार घेतला. त्यांनी त्यांच्या मूळ गावी नरित येथे माध्यमिक अंगलो संस्कृत शाळा सुरू केली. जी आज पर्यंत नारीत न्यायरत्न संस्था म्हणून अस्तित्वात आहे. राणी व्हिक्टोरिया च्या राजवटीच्या काळात महामहोपाध्याय ही पदवी 16 फेब्रुवारी 1887 रोजी त्यांना त्यांच्या प्राची विद्येतील उत्कृष्ट ते बद्दल वैयक्तिक भेद म्हणून बहाल करण्यात आली. 24 मे 881 रोजी महेश चंद्र न्याय रत्न यांना भारतीय साम्राज्याच्या सर्वात प्रतिष्ठित ऑर्डर चे साथीदार बनवण्यात आले आणि भारतीय विद्वानांनी ज्या अंदाजाने त्यांना न्यायरत्न ही पदवी प्रदान केली.
त्यांचा मृत्यू 12 एप्रिल 1906 मध्ये झाला. बुडापेस्ट येथील हंगेरीयन अकादमी ऑफ सायन्सचे परदेशी सदस्य म्हणून त्यांचे निवड करण्यात आली होती ते बंगाल आशियाटिक सोसायटीचे सदस्य होते. बॉम्बे मानववंश शास्त्रीय सोसायटीचे ते सदस्य होते. इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स चे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती.
पण्डित महेशचंद्र "न्यायरत्‍न" भट्टाचार्य


22 फेब्रुवारी 1856 रोजी भारतातील आर्या समाजाचे संन्यासी म्हणून ओळखले जाणारे स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म झाला.

22 फेब्रुवारी 1857 रोजी बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म लंडन येथे झाला. जगभरात पसरलेल्या स्काऊट व गाईड या संघटनेचे ते जनक होते. 1876 मध्ये ते लष्करात तेराव्यानुसार फलटणीत कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी भारत अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका अशा विविध ठिकाणी आपली कामगिरी बजावली. आफ्रिकेतील बोहर युद्धात 1899 ते 1902 मध्ये मेफेकिंग या शहराची शत्रूच्या वेढ्यापासून केलेली मुक्तता ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यामुळे त्यांना मेजर जनरल पदावर बढती मिळाली. त्या दलाचे इन्स्पेक्टर जनरल म्हणून 1903 पर्यंत त्यांनी काम केले. त्यानंतर 1907 मध्ये ते लेफ्टनंट जनरल झाले. त्यांचा मृत्यू 8 जानेवारी 1941 मध्ये झाला. सैनिकी स्काऊट करिता त्यांनी लिहिलेले एडसुट स्काउटिंग हे 1899 मध्ये पुस्तक शाळेतील मुलांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे लक्षात येतात. त्यांनी इंग्लंडच्या ब्राऊन अशी बेटावर मुलांचे पहिले स्काऊट शिक्षण शिबिर भरविले. ते 1907 मध्ये व अशाप्रकारे बालवीर स्काऊटची संघटना चळवळ सुरू केली. त्यानंतर ही चळवळ अनेक देशात पसरली. 1910 मध्ये त्यांनी आपली बहीण अग्निस बेडन पॉवेल हिच्या मदतीने मुलींसाठी वीरबाला (गर्ल गाईड) ही संघटना स्थापन केली मुलांना व मुलींना जगाचे आदर्श नागरिक बनविणे या संघटने मागील प्रमुख हेतू होता 1910 मध्ये सातव्या ऍड वर्डच्या सल्ल्यानुसार ते सेवानिवृत्त होऊन त्यांनी आपले सर्व आयुष्य बालवीर संघटनेसाठी वाहून घेतले. या दोघा बहीण भावांनी भारतामध्ये 1921 ते 1937 मध्ये भेट दिली. लंडनमध्ये भरलेल्या 1920 च्या आंतरराष्ट्रीय स्काऊट मेळाव्याच्या वेळी जगाचे प्रमुख स्काऊट म्हणून त्यांना सर्वांमध्ये बहुमान दिला .लंडनमधील गिरवेल हे बालवीर शिक्षणाचे जागतिक केंद्र बनले. त्यांनी 1908 मध्ये लिहिलेले स्काऊटींग फॉर बॉईज 1915, मध्ये एडवेंचर्स अस् ए स्पाय,1917, मध्ये गर्ल गाइडिंग 1921 मध्ये व्हॉट स्काऊटस कॅन डू ही पुस्तके लिहिली.

22 फेब्रुवारी 857 रोजी जर्मनीतील सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचा जन्म जर्मनीतील हॅम्बर्ग येथे झाला. हा जर्मनीतील एक सुप्रसिद्ध बहुतेक शास्त्रज्ञ होता त्याने 1888 मध्ये रेडिओ लहरींचा शोध लावला. नंतर त्याने सिद्ध केले की प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय लहरींचाच एक प्रकार आहे. वारंवारिकतेच्या एककाचे नाव हर्टस असे ठेवण्यात आले आहे. त्यांचा मृत्यू 1 जानेवारी 1894 रोजी जर्मनीतील बॉन येथे झाला.


22 फेब्रुवारी 1902 रोजी जर्मनीतील सुप्रसिद्ध जर्मन भौतिक शास्त्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 एप्रिल 1980 रोजी झाला.
X X
22 फेब्रुवारी 1922 रोजी भारतातील सुप्रसिद्ध चित्रकार यांचा जन्म झाला. त्यांना भारत सरकारने 22 फेब्रुवारी रोजी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

22 फेब्रुवारी 1964 रोजी जगातील मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म झाला.

22 फेब्रुवारी 1964 रोजी भारतातील हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुरज बडजात्या यांचा जन्म झाला.

22 फेब्रुवारी 1972 रोजी महाराष्ट्रातील पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध सचिन वझे यांचा जन्म झाला.

22 फेब्रुवारी 1556 रोजी मुगल सम्राट नसिरुद्दीन हुमायून यांचे निधन झाले.
X X
22 फेब्रुवारी 1815 रोजी हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन झाले. त्यांनी ऑस्मिअम व इरिडिअम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट (Cu12As4S13) असे नाव दिले आहे. त्यांनी हिरा आणि कोळशाच्या ओळखीच्या पुराव्यातही योगदान दिलेले आहे. त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1761 रोजी झाला.

             
स्मिथसन टेनांट

22 फेब्रुवारी 1827 रोजी अमेरिकेतील सुप्रसिद्ध चित्रकार निसर्ग वैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पिल अमेरिकन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1741 मध्ये झाला होता.

22 फेब्रुवारी 1925 रोजी ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 20 जुलै 1836 रोजी ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड या ठिकाणी झाला. त्यांनी क्लिनिकल थर्मामीटर चा शोध लावल्यामुळे आणि मेडिसिन सोसायटीच्या इतिहासाच्या स्थापनेत सर विल्यम ओसल्लरला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून 1920 मध्ये निवड केली गेली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात 1860 मध्ये नैसर्गिक विज्ञानात प्रथम श्रेणी पदवी प्राप्त केली. ते 1889 मध्ये इंग्लंड आणि वेल्स मध्ये युनिसिसाठी आयुक्त म्हणून त्यांनी काम केले.1892 मध्ये ते केंब्रिज विद्यापीठात फिजिक (औषधा)चे रेगीयस प्राध्यापक म्हणून काम केले. त्या ठिकाणी त्यांनी सिस्टिम ऑफ मेडिसिन हे संपादित ग्रंथ केले. एका चरित्रकाराने त्यांना "समकालीन वैद्यकातिल त्यांची सर्वात मोठी सेवा" असे म्हटले आहे. हे आठ खंडात आहे. 1896 ते 1899 ,11 खंडात दुसरी आवृत्ती 1905 ते 1911 मध्ये प्रकाशित झाले. अनेक वर्षापासून या खंडांना "डॉक्टरांचे बायबल" असे मानले जाते. 1907 मध्ये "ऑर्डर ऑफ द बाथचे नाईट कमांडर" म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1925 मध्ये इंग्लंड मधील केंब्रिज येथे त्यांचे निधन झाले.



22 फेब्रुवारी 1944 रोजी महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे महाराष्ट्रातील पुणे या शहरातील आगाखान पॅलेस मध्ये निधन झाले. आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शाह यांनी इ.स. 1892 मध्ये सुरू केली. 1897 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी बारा लाख रुपये खर्च आला आणि हजारो लोकांना रोजगार मिळाला. 1942 ते 1944 या काळात गांधीजी या वास्तूत राहिले असल्यामुळे, या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1869 रोजी झाला होता.
                 कस्तुरबा गांधी

                आगाखान पॅलेस


X X
22 फेब्रुवारी 1958 रोजी भारतातील स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रसिद्ध विद्वान नेते तसेच भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पडली व भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले, असे मौलाना अबुल कलाम आझाद यांचा मृत्यू झाला. त्यांचे मूळ नाव मोहीउद्दीन अहमद असे होते .अबुल कलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांना मिळालेली पदवी होती. त्यापुढे आझाद हे टोपण नावही त्यांना ची उपाधी मिळाली होती त्यांचा जन्म मकेला झाला होता. 1890 मध्ये ते कलकत्त्याला आले. त्यांनी कलकत्ता आल्यानंतर क्रांतीकारकाच्या संपर्कात आल्यानंतर लोकांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा असे त्यांनी मत मांडले आणि लोकजागृतीसाठी 1912
मध्ये त्यांनी कलकत्ता येथे अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. ते आझाद या टोपण नावाने लेखन करीत असत. ब्रिटिश सरकारने कार्यवाही केल्यामुळे हे वृत्तपत्र बंद पडले पण त्यानंतर त्यांनी 1915 मध्ये अल बलाघ दुसरे वृत्तपत्र काढले. त्यांना दुसऱ्या प्रांतात जाण्यास इंग्रजांनी बंदी घातली पण ते वावरत असताना सांचीला त्यांना स्थानबद्ध करण्यात आले 1920 मध्ये त्यांची सुटका झाली आणि असा कराच्या चळवळीत ते सामील झाले. 1921 मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि एक वर्षाचा कारावास करण्यात आला. 1923 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले आणि 1930 मध्ये पुन्हा त्यांना कैद झाली. आजारांना 19 39 ते 1946 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष पद त्यांच्याकडे होते 1942 च्या चलेजाव आंदोलनाच्या वेळी पुन्हा त्यांना तुरुंगवास भाव 1942 ची चले जा चळवळ एक क्रिप्स योजना १९४५ ची वेळची शिमला परिषद आणि 1946 ची ब्रिटिश मंत्रांचे शिष्टमंडळ या प्रसंगात वाटाघाटी साठी काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी पुढाकार घेतला होता. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले. शेवटपर्यंत ते शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी प्रभावी काम केले. त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम 1959 मध्ये लिहिलेले आत्मचरित्र खूप प्रसिद्ध आहे.त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1818 रोजी झाला होता.




22 फेब्रुवारी 1993 रोजी भारतातील हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच ओरिसा आणि मध्य प्रदेश राज्याचे माजी गव्हर्नर भागवत दयाळ शर्मा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1918 मध्ये हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील बैरो या ठिकाणी झाला. त्यांचे एमएपर्यंतचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठ उत्तर प्रदेश या ठिकाणी झाले त्यानंतर त्यांनी डिलीट ही पदवी महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतक या ठिकाणाहून प्राप्त केली. बुद्धिबळ हा त्यांचा आवडता खेळ होता. ते हरियाणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक नोव्हेंबर 1966 ते 23 मार्च 1967 या कालखंडात काम केले ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामामध्ये 1941 ते 1947 पर्यंत खूप मोठे योगदान दिले. त्यांना दोन वेळेस तुरुंगवास भोगावा लागला. ते पंजाब हरिया हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर या राज्यातील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ते सचिव होते आणि नंतर अध्यक्ष झाले. ते 1968 ते 1974 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. ते कार्यकर्त्यांमध्ये पंडित जी या नावाने ओळखले जात असत. त्यानंतर ते 23 सप्टेंबर 1977 मध्ये ओडिसा राज्याचे राज्यपाल झाले. त्यानंतर ते 1980 ते 1984 पर्यंत मध्यप्रदेश या राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले.

22 फेब्रुवारी 2000 रोजी सुप्रसिद्ध प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले व प्रकाशक व श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1923 रोजी झाला होता.

22 फेब्रुवारी 2000 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक व पत्रकार साहित्यिक विनायक सदाशिव तथा वी.स. वाळिंबे यांचे निधन झाले. 1948 मध्ये गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. त्या सत्याग्रहात त्यांना तीन महिने येरवडा करारात बंदी बनवण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण खंडले. त्यानंतर ते लगेच प्रभात वृत्तपत्रांमध्ये नोकरी करू लागले.त्यानंतर ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरी केली आणि 1962 ते 66 च्या दरम्यान केसरी वृत्तपत्र तात वृत्त संपादक म्हणून रुजू झाले. केसरी वृत्तपत्रात असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डफ येथे गेले होते. विजयाराजे शिंदे यांच्यावर राजमाता ही आत्मकथन पर कादंबरी त्यांची विशेष उल्लेखनीय त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या अनुवादित काही पुस्तके असे त्यांचे उल्लेखनीय साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1928 रोजी झाला होता.

22 फेब्रुवारी 2009 रोजी देशातील तसेच महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध नाटककार लेखक दिग्दर्शक व प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे निधन झाले. ते मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाचे ते विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यांचे नाव "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये समाविष्ट 2004 मध्ये झालेले आहेत. कारण त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या "वऱ्हाड निघाले लंडनला" ह्या एक पत्री नाटकासाठी त्यांना हा बहुमान मिळालेला आहे. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी 1979 मध्ये केला. त्यानंतर त्या नाटकाचे 1,960 पेक्षा अधिक प्रयोग करून हा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. या एका तासाच्या तीन तासाच्या एकपात्री प्रयोगात 52 पात्रे ते स्वतः सादर करायचे म्हणून त्यांना लोक वऱ्हाडकार असे म्हणत. त्यांचे वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकाचे जागतिक पातळीवर खूप मोठे प्रयोग झाले. त्यांनी 2000 मध्ये विद्यापीठातून आपल्या नोकरीतून शुभेच्छा निवृत्ती घेतली. त्यांना 2000 मध्ये परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष पदी ही निवड करण्यात आली. त्यांनी वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. प्राध्यापक देशपांडे यांना 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाचा कलावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर 2004 मध्ये विष्णुदास भावपूर्ण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे त्यांना साहित्य सम्राट आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा जन्म 5 डिसेंबर 1943 रोजी झाला होता.





https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/11-22.html
👆

स्मृतिदिन: 22 फेब्रुवारी
Muhiyuddin Ahmed bin Khairuddin Al-Hussaini Azad : Indian independence activist

मौलाना अबुल कलाम आझाद : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेते

XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-21-day-of-special-dinvishesh.html
👆
February 21 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 21: दिनविशेष
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-23-day-of-special-dinvishesh.html
👆
February 23 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 23: दिनविशेष






X X
view, Comments and share...

Post a Comment

0 Comments