February 19 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 19: दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती.
19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाऊ ने शिवनेरी किल्ल्यावर शिवबांना जन्म दिला. महाराजांची जयंती तारखेप्रमाणे साजरी करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु 3 एप्रिल 1680 मध्ये झाला.
शिवनेरी
19 फेब्रुवारी गोपाळ कृष्ण गोखले यांची पुण्यतिथी.
19 फेब्रुवारी 1878 रोजी थॉमस एडिसनने फोनोग्राफचे पेटंट घेतले होते.
19 फेब्रुवारी 1884 रोजी यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला 60 चक्रीवादळांनी तडाखा दिला.
19 फेब्रुवारी 1942 रोजी पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या होत्या.
X X
19 फेब्रुवारी 1986 रोजी पहिल्यांदा संगणकीकृत रेल्वे आरक्षण तिकिटांची सुरुवात झाली.
19 फेब्रुवारी 2003 रोजी तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
19 फेब्रुवारी 2014 रोजी आजच्या दिवशी फेसबुक ने व्हॉट्सअॅप ला 19 बिलियन डॉलर ला विकत घेण्याचे घोषित केले, आणि दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअॅप ला विकत सुद्धा घेतले.
19 फेब्रुवारी 1473 रोजी सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस याचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 मे 1543 रोजी झाला.
19 फेब्रुवारी 1859 रोजी स्वीडीश भौतिक शास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 ऑक्टोबर 1927 रोजी झाला.
19 फेब्रुवारी 1899 रोजी भारतातील गुजरात राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बळवंतराव मेहता यांचा जन्म झाला.
X X
19 फेब्रुवारी 1906 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. त्यांचे मूळ गाव कोकणातील गोळवल हे आहे. नागपूर मधील हीलॉप्स कॉलेज येथून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ते बनारस येथे बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी बी एस सी आणि एम एस सी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा पास होऊन 1933 मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठात प्राणीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून तीन वर्षासाठी त्यांची नेमणूक झाली. डॉ. केशव बळीराम हेडगेवार संघाचे पहिले सरसंघचालक त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये केली. त्यांच्या संपर्कामध्ये श्री गुरुजी आले व त्यांनी गुरुजींच्या खांद्यावर द्वितीय सरसंघचालक म्हणून जबाबदारी दिली. 1940 ते 1973 पर्यंत त्यांनी सलग 33 वर्षे ही जबाबदारी अत्यंत छान पद्धतीने पार पाडली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचारांचा प्रचार आणि प्रसार देशात आणि परदेशात त्याच्याबद्दलचा विस्तार हिंदुत्ववादी विचारसरणीचे पोषण आणि संवर्धन त्यांनी केले. विचार सूत्ररूपाने त्यांनी सांगितले गुरुजीचे जीवन म्हणजे एक अलौकिक व ऋषितुल्य होते. खऱ्या अर्थाने ते एक राष्ट्रपुरुष होते . त्यांचा मृत्यू 5 जून 1973 रोजी झाला.
श्री गुरुजी
19 फेब्रुवारी 1919 रोजी महाराष्ट्रातील साहित्यक तथा मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचा जन्म झाला., "गंधवार्ता" या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना 1984 मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती. त्यांचा मृत्यू 24 ऑक्टोबर 1992 रोजी झाला.
19 फेब्रुवारी 1922 रोजी पंजाब मधील "खलिस्तानी" विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकतीस अगस्त 1995 रोजी झाला.
19 फेब्रुवारी 1930 रोजी भारतातील दक्षिणात्य चित्रपटाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक काशिनाथ विश्वनाथ यांचा जन्म झाला.
19 फेब्रुवारी 1818 मध्ये पेशव्यांचे शेवटचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी या ठिकाणी निधन झाले.
X X
19 फेब्रुवारी 1915 रोजी भारतातील थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 9 मे 1866 रोजी झाला होता.
19 फेब्रुवारी 1956 रोजी भारतातील सुप्रसिद्ध ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत केशव लक्ष्मण दफ्तरी यांचे निधन झाले. वैदिक वाङ्मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1880 रोजी झाला होता.
19 फेब्रुवारी 1956 रोजी भारतातील प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू, सत्याग्रहाचे पुरस्कर्ते व उत्तर प्रदेशातील आमदार आचार्य नरेन्द्र देव यांचे निधन झाले.
X X
19 फेब्रुवारी 1997 रोजी चीन मधील सुप्रसिद्ध सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 22 ऑगस्ट 1904 रोजी झाला होता.
19 फेब्रुवारी 1997 रोजी भारतातील सुप्रसिद्ध मराठी चित्रपट सृष्टीतील संगीतकार राम कदम यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1918 रोजी झाला होता.
19 फेब्रुवारी 2003 मध्ये भारतातील पौराणिक हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते अनंत मराठे यांचे निधन झाले.
19 फेब्रुवारी 2017 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांचे निधन झाले.
https://www.insearchofknowledge.org/2022/02/blog-post_13.html
👆
शिवजन्मोत्सव : 19 फेब्रुवारी
छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....💐💐💐💐💐💐💐
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-19-day-of-special-dinvishesh.html
👆
February 19 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 19: दिनविशेष
XXhttps://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-20-day-of-special-dinvishesh.html
👆
February 20 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 20: दिनविशेष
X X
View, Comments and share.......










1 Comments
👌👍
ReplyDelete