Subscribe Us

header ads

February 18- Day of Special (Dinvishesh)

February 18- Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 18: दिनविशेष


महत्त्वाच्या घटना

’गांबिया’चा स्वातंत्र्यदिन
उत्पादकता आठवड्याचा शेवटचा दिवस.

18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म झाला. त्यांना सरकारने " रावबहादूर" ही पदवी दिली होती. त्यांनी भाऊ महाजन यांच्या" प्रभाकर" मध्ये हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला "शतपत्रे" असे म्हणतात.

18 फेब्रुवारी 1871 रोजी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा मृत्यू झाला. त्यांचे नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते. त्यांनी "वर्तमानदीपिका" या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी भावार्थ सिंधू, वेदोक्त, धर्मप्रकाश, सुखदायक, राज्य प्रकरणी निबंध, सद्यस्थितीचा निबंध, बोध सागर रहस्य , सेतुबंधानी टीका इत्यादी ग्रंथ लिहिले.
X X
18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या जहाजावरील भारतीय नौसैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध व पर्यायाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला.

18 फेब्रुवारी 2016 रोजी भारत सरकारने " प्रधानमंत्री फसल बीमा योजना" ची सुरुवात केली.

18 फेब्रुवारी रोजी पहाटे २.३० वाजता नासाच्या पर्सिव्हियरन्स रोव्हरचे मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आले. या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे. या यानाच्या मदतीने मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही यासंदर्भात संशोधन करण्यात येणार आहे. मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतील अंतराळ संस्था ‘नासा’ने (National Aeronautics and Space Administrations) हाती घेतलेल्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.

18 फेब्रुवारी 1965 रोजी गांभी या देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य इंग्लंड कडून मिळाले.
X X
18 फेब्रुवारी 1979 रोजी सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.

18 फेब्रुवारी 1998 रोजी भारतातील ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर केला.

18 फेब्रुवारी 2019 रोजी सुप्रसिद्ध भारतातील संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

18 फेब्रुवारी 2006 रोजी म्हणजे आजच्या दिवशी भारत पाकिस्तान मध्ये थार एक्सप्रेस ची सुरुवात झाली होती.

18 फेब्रुवारी 2006 रोजी म्हणजे आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या एका पोल्ट्री फार्म येथे देशातील पहिले बर्ड फ्लू ची केस नोंदविल्या गेली.

18 फेब्रुवारी 2014 रोजी भारताच्या संसद मध्ये आंध्रप्रदेश पासून तेलंगाना हे भारताचे 29 वे नवीन राज्य बनण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.

18 फेब्रुवारी 1486 रोजी योगी चैतन्य महाप्रभू यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 जून 1534 रोजी झाला.
X X
18 फेब्रुवारी 1775 रोजी इटलीतील सुप्रसिद्ध इटालियन भौतिक शास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा याचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 5 मार्च 1827 रोजी झाला.

18 फेब्रुवारी 1823 रोजी भारतातील सुप्रसिद्ध महाराष्ट्र राज्यातील पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ "लोकहितवादी" यांचा जन्म झाला. 1848 ते 1850 या काळात 'प्रभाकर' या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रांचे लेखन केले. स्त्रियांचा कोंडमारा करणार्‍या रुढींवर त्यांनी प्रहार केला. त्यांनी 43 मराठी ग्रंथ लिहिले. 'लक्ष्मीज्ञान' हा त्यांचा ग्रंथ हा अर्थशास्र्तावरील पहिला मराठी ग्रंथ आहे. त्यांचा मृत्यू नो ऑक्टोबर 1892 मध्ये झाला.

18 फेब्रुवारी 1836 रोजी पश्चिम बंगालमधील आध्यात्मिक ज्यांनी अमेरिकेमध्ये भारताचे हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व केले असे स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण खुदीराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 ऑगस्ट 1886 मध्ये पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता या ठिकाणी झाला.

18 फेब्रुवारी 1871 मध्ये भारतातील स्वातंत्र्य चळवळीतील थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 ऑक्टोबर 1933 रोजी झाला.
X X
18 फेब्रुवारी 1883 रोजी भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 ऑगस्ट 1909 मध्ये झाला.

18 फेब्रुवारी 1898 रोजी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 14 ऑगस्ट 1988 रोजी झाला.

18 फेब्रुवारी 1899 रोजी भारतातील स्वातंत्र्य चळवळीतील एक स्वातंत्र्यसेनानी जय नारायण व्यास यांचा जन्म झाला.

18 फेब्रुवारी 1911 रोजी भारतातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 जून 2000 रोजी झाला.

18 फेब्रुवारी 1294 रोजी मंगोल सम्राट कुबलाई खान याचा मृत्यू झाला. त्याचा जन्म 23 सप्टेंबर 1215 मध्ये झाला होता.

18 फेब्रुवारी 1486 रोजी भारतातील बंगालमधील वैष्णव संत व पंथ प्रवर्तक चैतन्य महाप्रभुंचा जन्म बंगालमधील नवद्वीपधाम ना दिया सध्याचे मायापूर येथे झाला. त्यांना गौरांग या नावानेही ओळखले जाते त्यांनी बंगालमध्ये गौरीय वैष्णव सांप्रदाय स्थापन केला भगवान श्रीकृष्णाचे उत्साही ते भक्त होते. जगन्नाथाची भक्ती आणि उपासना करण्यासाठी निलाचल येथे ते गेले 18 वर्षे तेथे राहिले आणि अवघ्या 24व्या वर्षी त्यांनी गृहस्थांचा आश्रम सोडला. संन्यास दीक्षा केशव भारती कडून पंधराशे नऊ मध्ये घेतली त्यानंतर त्यांना श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू असे नाव धारण केले. त्यांनी वृंदावन मध्ये सात वैष्णव मंदिराची स्थापना केली त्यास सप्त देवालय म्हणतात. त्यांचे शिष्य कृष्णदास कविराज यांनी चैतन्य चरितामृत हा ग्रंथ लिहिला त्यानंतर वृंदावन दासणे चैतन्य भागवत लिहिले लोचनदासने चैतन्यमंगलची रचना केली. चैतन्य महाप्रभूंचा मृत्यू 14 जून पंधराशे 34 मध्ये पुरी या ठिकाणी ओडिसा राज्यात झाला.
                चैतन्य महाप्रभु
           चैतन्य महाप्रभु


18 फेब्रुवारी 1546 रोजी जर्मन धर्म सुधारक मार्टिन ल्युथर यांचे निधन झाले.

18 फेब्रुवारी 1564 रोजी सुप्रसिद्ध इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकल अँजेलो याचे निधन झाले. त्याचा जन्म 6 हामार्च 1475 रोजी झाला होता.
X X
18 फेब्रुवारी 1967 रोजी अमेरिकेतील सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ ज्यांनी अणुबॉम्बचा शोध लावला. त्यांना अणुबॉम्बचे जनक म्हणतात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1904 रोजी झाला होता.

18 फेब्रुवारी 1992 रोजी भारतातील आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीमध्ये आत्मसात केलेले चित्रकार नारायण श्रीधर बेद्रे यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1910 रोजी झाला होता.

18 फेब्रुवारी 1994 रोजी भारतातील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचे निधन झाले. भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आदी नृत्यप्रकारांतही त्यांनी नैपुण्य मिळवले होते. 1957 मध्ये त्यांनी 82 दिवसांत 87 कार्यक्रम करुन विक्रम केला. त्यांचा जन्म 22 ऑगस्ट 1935 रोजी झाला होता.


XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-17-day-of-special-dinvishesh.html
👆
February 17- Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 17: दिनविशेष
XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-19-day-of-special-dinvishesh.html
👆
February 19 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 19: दिनविशेष



X
X
View, Comments and share......

Post a Comment

0 Comments