Subscribe Us

header ads

February 15 - Day of Special (Dinvishesh)

February 15 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 15 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


उत्पादकता आठवड्याचा चौथा दिवस.

15 फेब्रुवारी 399 रोजी सुप्रसिद्ध ग्रीक विचारवंत सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. हा ग्रीक तत्त्वज्ञ होता अथेन्समधील पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून तर त्याला ओळखले जाते. त्याने तत्त्वज्ञ म्हणून कुठलाही ग्रंथ लिहिला नाही. पण त्यांच्या विचाराची प्रभाव त्याचे शिष्य प्लेटो आणि झेनोफण यांच्या लिखाणातून जगाला हा महान तत्त्वज्ञ कळाला. त्याचा जन्म अथेन्स या ग्रीक नगरात इसवी सन पूर्व 470 मध्ये झाला तो दिसायला अतिशय कुरूप होता. सुरुवातीला तो एक सैनिक होता त्याने तीन युद्धामध्ये सहभाग घेऊन निवृत्त झाल्यावर त्याने ज्ञानदानाचे कार्य सुरू केले.

                     सॉक्रेटिस
सॉक्रेटिस

15 फेब्रुवारी 1779 रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.

15 फेब्रुवारी 1939 रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.

15 फेब्रुवारी 1942 रोजी दुसरे महायुद्ध चालू असताना सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. 80,000 भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
X X
15 फेब्रुवारी 1965 रोजी अमेरिकेतील कॅनडाने नवीन ध्वज स्वीकारला.

15 फेब्रुवारी 1967 रोजी म्हणजे आजच्या दिवशी भारतामध्ये चौथ्या लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या.

15 फेब्रुवारी 1976 रोजी भारतातील मध्य प्रदेश भोपाळ येथे केंद्रीय कृषि अनुसंधान संस्थान ची स्थापना करण्यात आली. हे संस्था भारत सरकारच्या कृषी मंत्रालय भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग अंतर्गत स्वायत्त संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण देशात फलोत्पादन मत्स्यपालन आणि प्राणी विज्ञान यासह कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाचे समन्वय मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणारी सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेने भारतात संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे हरीतक्रांतीची महत्त्वाची भूमिका बजावली.


15 फेब्रुवारी 2000 रोजी डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली "राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 " ची घोषणा करण्यात आली. याचा उद्देश दोन मुले हम दो हमारे दो या तत्त्वांचा पुरस्कार करण्यात आला. 2043 पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्यात येईल असा उद्देश होता.
X X
15 फेब्रुवारी 1998 रोजी भारतीय चित्रपट दिग्दर्शक बी.आर चोपड़ा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. त्यांचे पूर्ण नाव बलदेव राज चोप्रा यांचा जन्म 22 एप्रिल 1914 मध्ये झाला होता त्यांनी नया दौर ,साधना, कानून, गुमराह, हमराज,इंसाफ का तराजू, इत्यादी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले बिअर चोप्रा यांनी महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेचे निर्माण केले. त्यांनी 1944 मध्ये सिने हेरॉल्ड मॅक्झिन मध्ये सेने पत्रकार म्हणून काम केले. 1947 वर्षी बॉलीवूड मध्ये आपली ओळख सिने पत्रकार म्हणून त्यांनी निर्माण केली. त्यांनी पहिला चित्रपट 1948 मध्ये करवट हा बनवला त्यानंतर 1954 मध्ये चांदणी चौक हा चित्रपट बनवला होता. त्यांनी 1970 मध्ये यश फिल्म स्टुडिओची स्थापना. त्यांना भारत सरकारने 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.त्यांचा मृत्यू पाच नोव्हेंबर 2018 रोजी झाला.



                बी.आर चोपड़ा

15 फेब्रुवारी 2010 रोजी प्रसिद्ध नृत्यांगना प्रेरणा श्रीमाली यांना 2009 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.

15 फेब्रुवारी 1564 रोजी सुप्रसिद्ध इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली याचा जन्म इटलीमधील तस्किन मधील पिसा या ठिकाणी झाला. गॅलेलियो गॅलिली यास आधुनिक खगोल विज्ञानाचे जनक आणि आधुनिक भौतिक शास्त्राचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी लहानपणी Aristotle यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्याला पिसा विद्यापीठामध्ये गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. त्याने त्याचे संशोधन सुरू केले त्यात समुद्राला येत असलेल्या भरती आणि ओहोटीच्या निरीक्षणाच्या माध्यमातून त्यांनी पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण यांचा सिद्धांत मांडला. त्याच्या सिद्धांतानुसार समुद्राला येत असलेली भरती आणि ओहटी ही पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमण यामुळेच होते. परंतु केपलर यांनी गॅलेलियो गॅलिली ची यांचा समुद्राच्या बाबतीत असलेला सिद्धांत मोडीत काढून समुद्राला भरती आणि ओटी ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येत असल्याचे प्रतिपादन केले. गॅलिलिओने लंबकाचा वापर च्या साह्याने नियम मांडण्यासाठी सोळाशे एकोणचाळीस मध्ये केला त्यावेळेस त्यांनी गतीसंबंधी एक महत्त्वाचा शोध लावल्यावर लंबकाचा घड्याळात उपयोग होऊ लागला. 1593 मध्ये त्याने साधा हवेचा तापमापक तयार केला त्यात सुधारणा करून त्यांनी अल्कोहोलचा तापमापक तयार केला. 1556 मध्ये त्याने वस्तूचे द्रवातील वजन करण्याचा तराजू शोधून काढला. सोळाशे चार मध्ये त्याने ज्योतिष शास्त्राचे खरे अध्ययन सुरू केले आणि त्यांनी दुर्बीण बनवायला सुरुवात केली. ज्योतिष शास्त्रासाठी त्यांनी सर्वप्रथम दूरदर्शकाचा उपयोग केला त्यात त्यांनी गुरुचे चार मोठे व तेजस्वी उपग्रह शोधून काढले. दूरदर्शकातून त्यांना तारका समूह डोळ्यांनी दिसतात त्यापेक्षा जास्त आहेत असे आढळले. आकाशगंगेत असंख्य तारे त्यांना त्यातून दिसले. त्यांनी दूरदर्शकातून शुक्र बुध आणि मंगळ यांच्या कला पाहिल्या आणि शनी लंबगोल दिसल्याचे सांगितले. ते सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारे पहिले शास्त्रज्ञ ठरले. त्यांनी धूमकेतूच्या ब्रह्मणाविषयी शोध लावला. पण त्यांना त्याकाळी लोकांना भ्रमित करता म्हणून त्यांना कैद करण्यात आले कैदेत असताना त्यांनी "टू न्यू सायन्सेस" या पुस्तकाचे लिखाण करून ते गुप्तपणे हॉलंड या शहरात प्रकाशित केले. त्याचा मृत्यू 8 जानेवारी 1642 मध्ये इटलीमधील टास्किन या ठिकाणी आर्केस्ती मध्ये झाला.

15 फेब्रुवारी 824 मध्ये भारतातील राज्य बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (1885), भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा यांचा जन्म कलकत्त्याच्या पूर्वेकडील सुरा या उपनगरात झाला. राजेंद्र लाल एशियाटिक सोसायटीत सुरुवातीला 1846 ते 1856 या काळात ग्रंथपाल म्हणून काम केले. त्यानंतर ते सहाय्यक चिटणीस बनले. पुढे जमीनदारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या शासकीय संस्थेचे ते संचालक झाले ते 1856 ते 80 या दरम्यान आणि एकूण 1885 मध्ये ते एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय अध्यक्ष झाले. भारतीय काँग्रेस अधिवेशन 1886 कलकत्ता याचे ते स्वागत अध्यक्ष होते. कलकत्ता नगरपालिकेचा कारभार सुरू झाला .तेव्हा ते कमिशनर म्हणून निवडून आले. 1853 मध्ये कलकत्ता विद्यापीठाने त्यांना "फेलो" म्हणून निवडले. पुढे त्यांना "डॉक्टर ऑफ लॉज्" ही पदवी 1876 मध्ये प्रदान केली. त्यांनी 851 मध्ये पहिले बंगाली चित्र मासिक विविधार्थ संग्रह सुरु केले. त्यांनी लिहिलेल्या सु. 114 शोधनिबंधापैकी ‘द रिप्रेझेंटेशन ऑफ फॉरिनर्स इन्‌ अजंठा फ्रेस्कोज’ हा निबंध विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यांचे पुढील ग्रंथ उल्लेखनीय आहेत द अँटिक्विटिज ऑफ ओरिसा (2 खंड, 1880),द पार्सीज ऑफ बॉम्बे (1880),इंडो आर्यन्स (2 खंड, 1881),नोटिसीस ऑफ संस्कृत मॅन्युस्क्रिप्ट्स (9 खंड 1870-88),द संस्कृत बुद्धिस्ट लिटरेचर ऑफ नेपाल (1882), द योग सूत्राज ऑफ पतंजली (1880). याशिवाय मेषारेर राजेतिहास (1861), शिवाजीर जीवनी (1860), व्याकरण प्रवेश आणि भारतवर्षे सांस्कृतिक इतिहास हे बंगालीतील उल्लेखनीय ग्रंथ होत. त्यांचा मृत्यू 26 जुलै 1891 मध्ये झाला.
X X
15 फेब्रुवारी 1924 रोजी भारतातील सुप्रसिद्ध चित्रकार के.जी. सुब्रह्मण्यम यांचा जन्म झाला.

15 फेब्रुवारी 1934 रोजी स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते निकालूस विर्थ याचा जन्म झाला.

15 फेब्रुवारी 1949 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दलित साहित्यिक लेखक सामाजिक चळवळीतील एक धुरंदर कार्यकर्ते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील कनेरसर शेजारच्या पूर या खेड्यात झाला. मुंबईतील गोलपिठा या भागात त्यांचे आयुष्य गेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता काही वर्ष त्यांनी मुंबईमध्ये टॅक्सी चालवली . त्यांनी काव्य, गद्य ,वृत्तपत्रातील स्तंभ लेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवर घेतल्या गेली. 1973 मध्ये त्यांनी पहिला कवितासंग्रह गोलपिठा प्रकाशित प्रियदर्शनी हा त्यांचा इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कवितासंग्रह आहे आणि खेळ हा शृंगारिक कवितांचा संग्रह तसेच मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले हा माओवादी विचारावर आधारित कवितासंग्रह प्रसिद्ध. महाराष्ट्राने प्रभावित करणाऱ्या दलित पॅंथर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. ही चळवळ त्यांनी 1972 मध्ये उभी या चळवळी संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर चळवळीचा प्रभाव होता .नामदेव ढसाळ हे 1960 नंतरच्या मराठी कवी मधील प्रमुख कवी समजले. त्यांच्या कृतीमध्ये वेदना विद्रोह आणि नकार हा स्थायीभाव होता. त्यांनी अंधार यात्रा नावाचे नाटक काचे लेखन करून ते प्रकाशित. त्यांच्या कादंबऱ्या निगेटिव्ह स्पेस, हाडकी, हाडवळा, उजेडाची काळी दुनिया इत्यादी प्रकाशित आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर दलित पॅंथर - एक संघर्ष हे मासिक त्यांच्या स्मृतिदिनी प्रकाशित करण्यात आले. त्यांना मायस्थेनिया ग्रेव्हस या दूरधर आजाराने ग्रासले होते. त्यांचा मृत्यू 15 जानेवारी 2014 मध्ये मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये झाला. ते 64 वर्षाचे होते. त्यांच्या गोलपिठा या कवितासंग्रहासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार 1972 प्राप्त झाला. त्यांना 1975 76 चा सोवियत लँड नेहरू पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1983 मध्ये महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार सन्मानित केले. भारत सरकारने त्यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. बहिणाबाई चौधरी पुरस्कार तसेच पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटील साहित्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. साहित्य अकादमी सुवर्ण जयंती जीवन गौरव पुरस्काराने त्यांना 2005 मध्ये सन्मानित केले. गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्काराने त्यांना 2006 मध्ये सन्मानित केले. तसेच त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्काराने गौरव करण्यात आला.


15 फेब्रुवारी 1949 रोजी भारतातील सुप्रसिद्ध संस्कृत भाषेचे साहित्यकार राधावल्लभ त्रिपाठी यांचा जन्म झाला.

15 फेब्रुवारी 1964 रोजी भारतातील हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा जन्म मुंबईत झाला.
त्यांच मूळ गाव कोल्हापूर असलं तरीही वांद्र्यात ते लहानचे मोठे झाले. त्यांच्या घरातले सगळे शिक्षणात अव्वल होते. त्यामुळे दिग्दर्शकाने देखील रसायनशास्त्रात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयात त्यांचं पदवी शिक्षण पूर्ण झालं.1993 मध्ये ‘पहला नशा’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. यामध्ये दीपक तिजोरी, पूजा भट्ट आणि रविना टंडन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.त्यांना दिग्दर्शक केतन मेहताच्या ‘होली’ चित्रपटात भूमिका मिळाली.‘लगान’मुळे गोवारीकरांचं आयुष्य रातोरात बदललं. 2002 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी त्यांना बॉलीवूडमधील मानाचे सगळे पुरस्कार मिळाले. पण, या जोडीला भारतीय सिनेमाला एक वेगळी दिशा दाखवणारी गोष्ट घडली ती म्हणजे, ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ यांच्यानंतर ऑस्करवारी करण्याचा बहुमान मिळाल्याने ‘लगान’च्या यशाला चार चाँद लागले. आशुतोषच्या दिग्दर्शनाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आणि 2004 मध्ये त्यांना ऑस्करचा आजीवन मतदार (व्होटिंग मेंबर) व्हायची संधी मिळाली.‘पानिपत’चा इतिहास व शौर्यगाथा तरुणपिढीला कळावी या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.
                आशुतोष गोवारीकर


X X
15 फेब्रुवारी 1869 रोजी भारतातील सुप्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब यांचे निधन झाले त्यांचा जन्म 27 डिसेंबर 1797 रोजी झाला होता.

15 फेब्रुवारी 1948 रोजी भारतातील हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध हिंदी कवयित्री सुभद्राकुमारी चव्हाण यांचे निधन झाले. त्यांनी महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला सहभाग घेणाऱ्या त्या पहिल्या महिला त्यांनी हिंदी साहित्यामध्ये कविता लेखन कथालेखन इत्यादी केले. झाशी की राणी हा कवितासंग्रह त्यांचा सुप्रसिद्ध मुकुल या कवितासंग्रहासाठी त्यांना सेकसरिय पारितोषिक 1931 मध्ये प्रदान करण्यात आले. त्यांना 1932 मध्ये बिखरे मोती या कविता संग्रहासाठी पुन्हा
सेकसरिय पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद सध्याचे प्रयागराज या ठिकाणी झाला होता. 6 ऑगस्ट 1976 मध्ये भारत सरकारने पंचवीस पैशाचे तिकीट पोस्टाचे त्यांच्या नावे सुरू केले. भारत सरकारच्या भारतीय सीमा सुरक्षा दलाने 26 एप्रिल 2006 रोजी एका सुरक्षा जहाजाला सुभद्रा कुमारी चव्हाण यांचे नाव दिले आहे.



15 फेब्रुवारी 1953 रोजी भारतातील किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक सुरेश बाबू माने यांचे निधन झाले.

15 फेब्रुवारी 1980 मध्ये भारतात कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय मनोहर दिवाण यांचे निधन झाले. त्यांनी गांधीजींच्या अहवालानुसार महाविद्यालयीन शिक्षण सोडून खामगाव येथे टिळक राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना केली. महात्मा गांधी स्वतः मनोहर दिवानांना महात्मा दिवाण असे संबोधत होते. विनोबा भावे यांची परवानगी घेऊन डॉक्टर जगन्नाथ महोदय यांच्या सहकार्याने कुष्ठरोगी सेवा कार्य त्यांनी सुरू केले. त्यासाठी रायपूर जवळील मिशनऱ्यांच्या संस्थेत त्यांनी उपचाराचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ते कोलकत्ता येथील स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेत परीक्षेत प्रशिक्षणासाठी गेले तेथे डॉक्टरांना प्रवेश मिळत होता पण मिशनरींच्या शिफारशीमुळे त्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळाला. 1936 मध्ये त्यांनी "महारोगी सेवा मंडळा" ची स्थापना केली आणि कुष्ठरोग यांच्या सेवेला वाहून घेतले. दत्तपूर येथे त्यांनी कुष्ठधाम स्थापन केले. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेत घेऊन त्यांना तुरुंगवासही झाला होता. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. पण त्यांनी तो स्वीकारला नाही. विनोबाजींच्या आग्रहाखातर कुष्ठरोग यांच्या सेवेसाठी हा पुरस्कार त्यांनी नंतर स्वीकारला. त्यांनी "कुष्ठरोग्यापासून वेदापर्यंत" असे मराठी आणि हिंदी विषयात अनेक ग्रंथ लिहिले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुष्ठधामाचे नाव "मनोहर आरोग्य निकेतन" असे ठेवण्यात आले. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1901 रोजी बुलढाणा या ठिकाणी झाला होता.
                    मनोहर दिवाण


15 फेब्रुवारी 1980 रोजी भारतातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष कॉम्रेड एस एस मिरजकर यांचे निधन झाले.
X X
15 फेब्रुवारी 1988 रोजी "क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स पार्टिकल थेअरी फाईनमन डायग्राम " मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक ( 1965) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचे निधन अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील लॉस एंजलिस या ठिकाणी झाले. ते प्रिन्स्टन येथे सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1940 ते 41 मध्ये त्यांनी काम दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजे 1943 ते 45 मध्ये न्यू मेक्सिकोतील येथे हँस बेथे यांच्यासह सुप्रसिद्ध मॅनहटन प्रकल्पावर अमेरिकेच्या अणुबॉम्ब प्रकल्पाचे सदस्य म्हणून त्यांनी संशोधन कार्य केले आणि त्या ठिकाणी विखंडन प्रक्रियेने स्फोट होणाऱ्या अणुबॉम्बची परिणामकारकता ठरविण्यासाठी "बेथे फाईनमन सुत्र "त्यांनी विकसित केले.
नॅनो टेक्नॉलॉजी ही संज्ञा नारियो तनिगुची यांनी 1974 मध्ये सर्वप्रथम वापरली. परंतु 1986 मध्ये रिचर्ड फाईनमन यांच्या कल्पनेने प्रेरित झालेल्या अमेरिकेच्या माचास्यूट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील के एक टॅक्सलर या संशोधकाने "इंजिन्स ऑफ क्रिएशन" हे नॅनो तंत्रज्ञानावर आधारित जगातील पहिले पुस्तक प्रसिद्ध केले. फाईनमन यांना 1954 मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. 1954 मध्ये अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स वर त्यांची निवड करण्यात आली. ते अमेरिकेतील अमेरिकन असोसिएशन फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे सदस्य होते. 1965 साली लंडनच्या रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली.क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्स (1961), थिअरी ऑफ फंडामेंटल प्रोसेसेस (1961), फाइनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स (तीन खंड – 1963-64) आणि ए. आर. हिब्ज यांच्याबरोबर लिहिलेला क्वांटम मेकॅनिक्स अँड पाथ इंटिग्रल्स (1966) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.त्यांचा जन्म 11 मे 1918 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील क्वीन्स या ठिकाणी झाला होता.
                             रिचर्ड फाईनमन









https://www.insearchofknowledge.org/2021/11/blog-post.html
👆

Open link 

पहिला आधुनिक शास्त्रज्ञ गॅलिलिओ -1

Galileo di Vincenzo Bonaiuti de' Galilei: Italian Astronomer, Physicist and Engineer





झांसी की रानी यह कविता कवयित्री 'सुभद्रा कुमारी चौहान' ने लिखी है।



 ‘ख़ूब लड़ी मर्दानी’

सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी
बूढ़े भारत में भी आई फिर से नयी जवानी थी 
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी 
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी


चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी

कानपूर के नाना की, मुँहबोली बहन छबीली थी,
कानपूर के नाना की, मुँहबोली बहन छबीली थी, 
लक्ष्मीबाई नाम, पिता की वह संतान अकेली थी, 
नाना के सँग पढ़ती थी वह, नाना के सँग खेली थी, 
बरछी, ढाल, कृपाण, कटारी उसकी यही सहेली थी।

वीर शिवाजी की गाथायें उसको याद ज़बानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार
लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार, 
देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार, 
नकली युद्ध-व्यूह की रचना और खेलना खूब शिकार, 
सैन्य घेरना, दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवाड़। 

महाराष्ट्र-कुल-देवी उसकी भी आराध्य भवानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥ 

हुई वीरता की वैभव के साथ सगाई झाँसी में
हुई वीरता की वैभव के साथ सगाई झाँसी में, 
ब्याह हुआ रानी बन आई लक्ष्मीबाई झाँसी में, 
राजमहल में बजी बधाई खुशियाँ छाई झाँसी में, 
सुघट बुंदेलों की विरुदावलि-सी वह आयी थी झांसी में।

चित्रा ने अर्जुन को पाया, शिव को मिली भवानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

उदित हुआ सौभाग्य, मुदित महलों में उजियाली छाई,
उदित हुआ सौभाग्य, मुदित महलों में उजियाली छाई, 
किंतु कालगति चुपके-चुपके काली घटा घेर लाई, 
तीर चलाने वाले कर में उसे चूड़ियाँ कब भाई, 
रानी विधवा हुई, हाय! विधि को भी नहीं दया आई।

निसंतान मरे राजाजी रानी शोक-समानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

बुझा दीप झाँसी का तब डलहौज़ी मन में हरषाया
बुझा दीप झाँसी का तब डलहौज़ी मन में हरषाया, 
राज्य हड़प करने का उसने यह अच्छा अवसर पाया, 
फ़ौरन फौजें भेज दुर्ग पर अपना झंडा फहराया, 
लावारिस का वारिस बनकर ब्रिटिश राज्य झाँसी आया। 

अश्रुपूर्ण रानी ने देखा झाँसी हुई बिरानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

अनुनय विनय नहीं सुनती है, विकट शासकों की माया
अनुनय विनय नहीं सुनती है, विकट शासकों की माया, 
व्यापारी बन दया चाहता था जब यह भारत आया, 
डलहौज़ी ने पैर पसारे, अब तो पलट गई काया, 
राजाओं नव्वाबों को भी उसने पैरों ठुकराया। 

रानी दासी बनी, बनी यह दासी अब महरानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥ 
छिनी राजधानी दिल्ली की, लखनऊ छीना बातों-बात
छिनी राजधानी दिल्ली की, लखनऊ छीना बातों-बात, 
कैद पेशवा था बिठूर में, हुआ नागपुर का भी घात, 
उदैपुर, तंजौर, सतारा,कर्नाटक की कौन बिसात? 
जब कि सिंध, पंजाब ब्रह्म पर अभी हुआ था वज्र-निपात। 

बंगाले, मद्रास आदि की भी तो वही कहानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

रानी रोयीं रनिवासों में, बेगम ग़म से थीं बेज़ार
रानी रोयीं रनिवासों में, बेगम ग़म से थीं बेज़ार, 
उनके गहने कपड़े बिकते थे कलकत्ते के बाज़ार, 
सरे आम नीलाम छापते थे अंग्रेज़ों के अखबार, 
'नागपुर के ज़ेवर ले लो लखनऊ के लो नौलख हार'। 

यों परदे की इज़्ज़त परदेशी के हाथ बिकानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

कुटियों में भी विषम वेदना, महलों में आहत अपमान
कुटियों में भी विषम वेदना, महलों में आहत अपमान, 
वीर सैनिकों के मन में था अपने पुरखों का अभिमान, 
नाना धुंधूपंत पेशवा जुटा रहा था सब सामान, 
बहिन छबीली ने रण-चण्डी का कर दिया प्रकट आहवान। 

हुआ यज्ञ प्रारम्भ उन्हें तो सोई ज्योति जगानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

महलों ने दी आग, झोंपड़ी ने ज्वाला सुलगाई थी
महलों ने दी आग, झोंपड़ी ने ज्वाला सुलगाई थी, 
यह स्वतंत्रता की चिनगारी अंतरतम से आई थी, 
झाँसी चेती, दिल्ली चेती, लखनऊ लपटें छाई थी, 
मेरठ, कानपुर,पटना ने भारी धूम मचाई थी, 

जबलपुर, कोल्हापुर में भी कुछ हलचल उकसानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

इस स्वतंत्रता महायज्ञ में कई वीरवर आए काम
इस स्वतंत्रता महायज्ञ में कई वीरवर आए काम, 
नाना धुंधूपंत, ताँतिया, चतुर अज़ीमुल्ला सरनाम, 
अहमदशाह मौलवी, ठाकुर कुँवरसिंह सैनिक अभिराम, 
भारत के इतिहास गगन में अमर रहेंगे जिनके नाम। 

लेकिन आज जुर्म कहलाती उनकी जो कुरबानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी

इनकी गाथा छोड़, चले हम झाँसी के मैदानों में
इनकी गाथा छोड़, चले हम झाँसी के मैदानों में, 
जहाँ खड़ी है लक्ष्मीबाई मर्द बनी मर्दानों में, 
लेफ्टिनेंट वाकर आ पहुँचा, आगे बढ़ा जवानों में, 
रानी ने तलवार खींच ली, हुया द्वंद असमानों में। 

ज़ख्मी होकर वाकर भागा, उसे अजब हैरानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

रानी बढ़ी कालपी आई, कर सौ मील निरंतर पार
रानी बढ़ी कालपी आई, कर सौ मील निरंतर पार, 
घोड़ा थक कर गिरा भूमि पर गया स्वर्ग तत्काल सिधार, 
यमुना तट पर अंग्रेज़ों ने फिर खाई रानी से हार, 
विजयी रानी आगे चल दी, किया ग्वालियर पर अधिकार। 

अंग्रेज़ों के मित्र सिंधिया ने छोड़ी राजधानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

विजय मिली, पर अंग्रेज़ों की फिर सेना घिर आई थी
विजय मिली, पर अंग्रेज़ों की फिर सेना घिर आई थी, 
अबके जनरल स्मिथ सम्मुख था, उसने मुहँ की खाई थी, 
काना और मंदरा सखियाँ रानी के संग आई थी, 
युद्ध श्रेत्र में उन दोनों ने भारी मार मचाई थी। 

पर पीछे ह्यूरोज़ आ गया, हाय! घिरी अब रानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

तो भी रानी मार काट कर चलती बनी सैन्य के पार
तो भी रानी मार काट कर चलती बनी सैन्य के पार, 
किन्तु सामने नाला आया, था वह संकट विषम अपार, 
घोड़ा अड़ा, नया घोड़ा था, इतने में आ गये सवार, 
रानी एक, शत्रु बहुतेरे, होने लगे वार-पर-वार। 

घायल होकर गिरी सिंहनी उसे वीर गति पानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

रानी गई सिधार चिता अब उसकी दिव्य सवारी थी
रानी गई सिधार चिता अब उसकी दिव्य सवारी थी, 
मिला तेज से तेज, तेज की वह सच्ची अधिकारी थी, 
अभी उम्र कुल तेइस की थी, मनुज नहीं अवतारी थी, 
हमको जीवित करने आयी बन स्वतंत्रता-नारी थी, 

दिखा गई पथ, सिखा गई हमको जो सीख सिखानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

जाओ रानी याद रखेंगे ये कृतज्ञ भारतवासी
जाओ रानी याद रखेंगे ये कृतज्ञ भारतवासी, 
यह तेरा बलिदान जगावेगा स्वतंत्रता अविनासी, 
होवे चुप इतिहास, लगे सच्चाई को चाहे फाँसी, 
हो मदमाती विजय, मिटा दे गोलों से चाहे झाँसी। 

तेरा स्मारक तू ही होगी, तू खुद अमिट निशानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥


साभार- कविताकोश 
(झाशी की राणी- सुभद्रा कुमारी चौहान 

👆
February 14 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 14 : दिनविशेष






X
X
View, Comments and share....

Post a Comment

0 Comments