Subscribe Us

header ads

February 13- Day of Special (Dinvishesh)

February 13- Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 13 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना


13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

सरोजनी नायडू यांची जयंती.

व्हॅलेंटाईन आठवड्याचा सातवा दिवस (कीस डे)

13 फेब्रुवारी 1630 रोजी आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.

13 फेब्रुवारी 1668 मध्ये स्पेनच्या अधिपत्याखाली पोर्तुगाल यास स्वातंत्र्याची मान्यता दिली.

13 फेब्रुवारी 1739 रोजी कर्नालची लढाई झाली त्यात पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
X X
13 फेब्रुवारी 1931 रोजी भारतातील शहर दिल्ली भारताची राजधानी म्हणून घोषित केले.

13 फेब्रुवारी 1948 रोजी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली.

13 फेब्रुवारी 1984 रोजी युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.


13 फेब्रुवारी 1988 रोजी अमेरिकेतील कॅनडात कॅल्गारी येथे 15वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू झाले.



13 फेब्रुवारी 2003 रोजी मृणाल सेन यांना भारतातील हिंदी चित्रपट सृष्टी चित्रपट सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला
                   मृणाल सेन



X X
13 फेब्रुवारी 2010 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात 17 ठार, 60 जखमी झाले.

13 फेब्रुवारी 1766 रोजी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म झाला. 1819 मध्ये माल्थस रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवडला.1821 मध्ये तो पॉलिटिकल इकॉनॉमी क्लबमध्ये सामील झाला. ज्याच्या सदस्यांमध्ये रिकार्डो आणि स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचा समावेश होता. 1824 मध्ये रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरच्या 10 शाही सहकाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांची निवड झाली. 1833 मध्ये त्यांची फ्रेंच अकादमी डेस सायन्सेस मोरालेस एट पॉलिटिक्स आणि बर्लिनच्या रॉयल अकादमीसाठी निवड झाली. त्यांचा मृत्यू 23 डिसेंबर 1934 झाला.


13 फेब्रुवारी 1835 रोजी अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 26 मे 1908 रोजी.

13 फेब्रुवारी 1879 रोजी भारतातील प्रसिद्ध प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला. त्या रौलेट कायदा, मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचा मृत्यू 2 मार्च 1949 रोजी झाला.
X X
13 फेब्रुवारी 894 रोजी भारतातील सुप्रसिद्ध इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 16 जुलै 1986 रोजी झाला.

13 फेब्रुवारी 1910 रोजी भारतातील प्रसिद्ध वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा "दत्तमहाराज" कवीश्वर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 1 मार्च 1999 रोजी झाला.
पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज

13 फेब्रुवारी 1911 रोजी लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 20 नोव्हेंबर 1984 रोजी झाला.

13 फेब्रुवारी 1916 रोजी भारतीय सेनेतील सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल जगजीत सिंह अरोड़ा यांचा जन्म झाला.बांगलादेश मुक्तिसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणारे ते भारतीय लष्कराचे थ्री-स्टार जनरल होते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ते इस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते. 1972 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
           लेफ्टिनेंट जनरल जगजीत सिंह अरोड़ा

X X
13 फेब्रुवारी 1987 रोजी भारतातील तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचे निधन झाले.

13 फेब्रुवारी 1883 रोजी सुप्रसिद्ध जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर याचे निधन झाले. त्याचा जन्म 22 मे 1813 रोजी झाला होता.

13 फेब्रुवारी 1901 रोजी भारतातील सुप्रसिद्ध गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ "भाऊराव" कोल्हटकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 9 मार्च 1863 रोजी झाला होता.

13 फेब्रुवारी 1968 रोजी सुप्रसिद्ध संगीत समीक्षक गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन झाले.

13 फेब्रुवारी 1974 रोजी भारतातील इंदोर घराण्याचे संस्थापक व सुप्रसिद्ध गायक "सुररंग" उस्ताद आमिर खॉं यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1912 रोजी झाला होता.
X X
13 फेब्रुवारी 2018 ची भारतातील हिंदी व पंजाबी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते राजेंद्र नाथ यांचे निधन झाले.

13 फेब्रुवारी 2012 रोजी भारतातील सुप्रसिद्ध उर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे निधन झाले भारत सरकारने त्यांना त्यांच्या उर्दू साहित्य बद्दल ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांचा जन्म 16 जून 1936 रोजी झाला होता.
 


https://www.insearchofknowledge.org/2023/03/sarojini-naidu-indian-political.html
👆
Open link
जन्मदीन: 13 फेब्रुवारी

"Nightingale of India" "Bharat Kokila"

सरोजिनी नायडू : भारताची कोकिळा, प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी

Sarojini Naidu (Chattopadhyay): Indian political activist, feminist and poet.



XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-12-day-of-special-dinvishesh.html 👆 February 12 - Day of Special (Dinvishesh) फेब्रुवारी 12 : दिनविशेष

XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-14-day-of-special-dinvishesh.html
👆
February 14 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 14 : दिनविशेष







X
X
View, Comments and share......

 

Post a Comment

1 Comments