February 11 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 11: दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच पाचवा दिवस.
व्हॅलेंटाईन आठवड्याचा पाचवा दिवस (प्रॉमीस डे)
11 फेब्रुवारी 660 मध्ये जपानचा सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले. जे आज जगामध्ये विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जाते.
11 फेब्रुवारी 1660 रोजी मोगल सम्राट औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
11 फेब्रुवारी 1750 मध्ये बिहार मधील सुलतानगंज सध्याचे झारखंड राज्य जवळील एक वनवासी ग्राम तिलकापूरमध्ये तीलका माझी उर्फ जबरा पहाडिया यांचा जन्म झाला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून हा देश मुक्त व्हावा म्हणून त्यांनी 1771 ते 1784 या कालखंडामध्ये आंदोलन सुरू केले. 1778 मध्ये जंगलातील सर्व सरदारांना घेऊन इंग्रजांनी बसवलेला रामगड कॅम्प वर हल्ला करून तो कब्जात घेतला आणि इंग्रजांना तिथून हाकलून लावले. त्यांनी भागल्पुर भागात इंग्रज कलेक्टर क्लिव लंद् या इंग्रज अधिकाऱ्याला 1784 मध्ये आपल्या बाणाने गतप्राण केले. त्यामुळे त्यांना इंग्रजांनी पकडून 1785 मध्ये फाशीला दिले.
11 फेब्रुवारी 1752 रोजी पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्घाटन झाले.
11 फेब्रुवारी 1826 रोजी ब्रिटनमध्ये लंडन या शहरात लंडन विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
X X
11 फेब्रुवारी 1818 रोजी महाराष्ट्रातील सातारा येथील सुप्रसिद्ध अजिंक्यतारा हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. हा किल्ला म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी पहिली राजगड दुसरी रायगड तिसरी जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. हा किल्ला शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने अकराशे 90 मध्ये बांधला त्यानंतर तो बहामणी सत्तेकडे गेला आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. या किल्ल्याचा उपयोग 17 व्या शतकापर्यंत जेल म्हणून करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती हा किल्ला 27 जुलै 1673 रोजी आला. महाराज दोन महिने या किल्ल्यावर वास्तव्यास होते, कारण त्यांना जीवन असल्यामुळे त्यांनी विश्रांती या किल्ल्यावर घेतली.या किल्ल्याचे जुने नाव सातारा किल्ला असे होते. मोगलांनी जेव्हा ताब्यात घेतला तेव्हा या किल्ल्याला सुभानजी ने जिंकून घेतला. त्यावेळी त्याचे नाव अजमतारा करण्यात आले .त्यानंतर ताराराणीच्या सैन्याने पुन्हा हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव अजिंक्यतारा असे केले. त्यानंतर छत्रपती शाहू ने 1708 मध्ये हा किल्ला प्राप्त करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा शहराची स्थापना केली आणि दुसऱ्या शाहूच्या निधनानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला.
अजिंक्यतारा
11 फेब्रुवारी 1830 रोजी मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊ . ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
11 फेब्रुवारी 1911 रोजी हेन्र्री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली "एअर मेल" अलाहाबादवरुन नैनी या 10 किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
11 फेब्रुवारी 1929 रोजी पोप पायस (11 वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या "लॅटेरान ट्रिटी" या विशेष करारानुसार "व्हॅटिकन सिटी" हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.
11 फेब्रुवारी 1979 रोजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती. या जेलचा पाया 897 मध्ये रचला होता आणि 1906 मध्ये हे काम पूर्ण झाले होते इंग्रजांनी बनवलेल्या वास्तू पैकी हा एक सुंदर आर्किटेक चा नमुना होता तिथे 694 खोल्या आहेत. प्रत्येक कोठडीचा आकार हा 5.4.5 बाय 2.7 मीटर असा होता व्हेंटिलेशन साठी फक्त एकच खिडकी नऊ फूट उंचीवर याच्यातून फक्त उजेड येत होता सूर्य कधीच दिसत नव्हता.या जेलची दहा मार्च 2006 रोजी शताब्दी पूर्ण झाली.
X X
11 फेब्रुवारी 1990 रोजी 27 वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन रोलीहलाहला मंडेला यांची तुरूंगातुन सुटका करण्यात आली. ते दक्षिण आफ्रिकेचे स्वातंत्र्य सरांना आणि व पहिले राष्ट्राध्यक्ष होते. वैचारिक दृष्ट्या आफ्रिकन राष्ट्रवादी आणि समाजवादी होते 1991 ते 1997 पर्यंत आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 18 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. देशातील रंगाच्या आधारावर भेदभाव दूर करण्यासाठी त्यांनी राजकारणात देश हितासाठी पुढाकार घेतला व राजकारणात हळूहळू सक्रिय झाले ते 1941 मध्ये. त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस युथ लीगची स्थापना केली व ते सचिव झाले 1961 मध्ये नेल्सन मंडेला आणि त्यांच्या काही मित्रावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला पण त्यात ते निर्दोष असल्याचे आढळले त्यानंतर 5 ऑगस्ट 1962 रोजी पुन्हा त्यांना अटक झाली ती प्रसिद्ध रिव्होनिया या खटल्यात 1964 मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. 27 वर्षे तुरुंगात घातल्यानंतर त्यांची अकरा फेब्रुवारी 1990 रोजी सुटका झाल्यानंतर ते श्वेत सरकारची करार केला आणि त्यांनी नवीन दक्षिण आफ्रिका तयार केली. त्यांच्या या राजकीय कामगिरीबद्दल त्यांना 250 हून अधिक पुरस्कार जगातील वेगवेगळ्या देशांनी प्रदान केले. त्यात 1993 मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त झाला. 2002 मध्ये यु एस प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडम प्रदान करण्यात आले. भारत सरकारने त्यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले ते पहिले अ भारतीय पुरस्कार प्राप्त करणारे नेते होते. 1992 मध्ये त्यांना पाकिस्तानने निशान- ए -पाकिस्तान हा पुरस्कार प्रदान केला.
11 फेब्रुवारी 1997 रोजी भारतातील सुप्रसिद्ध खगोलशास्त्री “जयंत नारळीकर” यांना 1996 चा युनेस्को कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांचा जन्म 19 जुलै 1938 मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी झाला. त्यांचे बीएससी पर्यंतचे शिक्षण हे बनारस या ठिकाणी झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी गणित विषयात पदवी प्राप्त केली. नारळीकर हे 1963 पासून रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटी यांचे फेलो आहेत. 1972 पासून मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत खगोलीय भौतिकीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत ते 1974 मध्ये इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स चे फेलो झाले. त्यांनी फ्रेड हाईल या वैज्ञानिकांसोबत खगोलशास्त्रामध्ये संशोधन करून आपल्या संशोधनाद्वारे गुरुत्वाकर्षणाविषयीचा नवा सिद्धांत मांडला. त्यांना केंब्रिज विद्यापीठाने 1960 मध्ये टायसन पदक देऊन सन्मानित केले. 1967 मध्ये त्यांना ऍडम्स पारितोषिक मिळाले आणि मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरव केला. भारत सरकारने त्यांना 1965 मध्ये पद्मभूषण 2004 मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी निर्माण केलेल्या आयुका या विज्ञान संस्थेच्या माध्यमातून देशातील भावी संशोधक आणि शास्त्रज्ञांची जडणघडण होत असते. त्यांनी स्ट्रक्चर ऑफ द युनिव्हर्स हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. महाराष्ट्रातील अभ्यासू आणि जिज्ञासाधारकांना विश्वाचा परिचय करून देण्यासाठी त्यांनी आकाशाशी जडले नाते हा विशेष ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यांनी सायन्स फिक्शन कथा लिहिलेले आहेत त्यात "प्रेषक", "व्हायरस" आणि "वामन परत न आला" इत्यादी आहेत.
11 फेब्रुवारी 1999 रोजी भारतातील मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
11 फेब्रुवारी 2011 रोजी 18 दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
11 फेब्रुवारी 1750 रोजी आजच्या दिवशी आदिवासी लीडर तिलका मांझी यांचा जन्म झाला.
11 फेब्रुवारी 1800 रोजी छायाचित्रांकनेचा पाया घालणारे सुप्रसिद्ध हेन्री फॉक्स टॅलबॉट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 सप्टेंबर 1877 रोजी झाला.
X X
11 फेब्रुवारी 1839 रोजी टेलिफोन एक्सचेंज क्षेत्रातील सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 मे 1902 रोजी झाला.
11 फेब्रुवारी 1847 रोजी अमेरिकेतील सुप्रसिद्ध संशोधक आणि उद्योजक उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 ऑक्टोबर 1931 रोजी झाला.
11 फेब्रुवारी 1942 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कादंबरीकार लघुकथा लेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एक मार्च 2003 मध्ये झाला.
11 फेब्रुवारी 1967 रोजी सुप्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी यांचा जन्म झाला भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
X X
11 फेब्रुवारी 1650 रोजी फ्रेंच मधील सुप्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ आणि गणितज्ञ रेनेदेवार्त यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म 31 मार्च 1596 रोजी झाला होता.
11 फेब्रुवारी 1942 रोजी भारतातील सुप्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते स्वातंत्र सेनानी आणि बजाज उद्योग समूहाचे प्रणेते सर्वेसर्वा जमनालाल बजाज यांचे निधन झाले. बजाज उद्योग समूह हा एक भारतीय बहुराष्ट्रीय समूह म्हणून ओळखला जातो. याची स्थापना 1926 मध्ये मुंबईत जमनालाल बजाज यांनी केली. या उद्योग समूहामध्ये एकूण 34 कंपन्यांचा समावेश आहे. या उद्योगातील पहिली आणि प्रमुख कंपनी म्हणजे बजाज ऑटो ही जगातील चौथी सर्वात मोठी दुचाकी आणि तीन चाकी वाहन उत्पादन करणारी कंपनी आहे. यानंतर या उद्योग समूहामध्ये अनेक कंपन्यांचा समावेश होतो त्यात बजाज फायनान्स, बजाज फिन्ससर्व , बजाज इलेक्ट्रिकल्स, बजाज हिंदुस्तान आणि बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट इत्यादी. 1920 मध्ये नागपूर मध्ये भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले त्यांनी 1921 मध्ये ब्रिटिश सरकारने दिलेली रायबहादूर ही पदवी सोडून दिली आणि असहकार चळवळीत सामील झाले. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमासाठी जमनालाल बजाज यांनी जमिनीचे व्यवस्थापन करून हे केंद्र उभे केले. जन्म 4 नोव्हेंबर 1884 रोजी झाला होता.
11 फेब्रुवारी 1968 रोजी भारतातील सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, पत्रकार तसेच राजकीय नेते आणि भारतीय जनसंघाचे एक संस्थापक सदस्य ज्यांचे अज्ञात मारेकर्याकडून हत्या झाली. असे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी झाला होता.अंत्योदयाचे प्रणेते आणि एकात्म मानवतावादाचा सिद्धांत मांडणारे थोर विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांची आज पुण्यतिथी.
11 फेब्रुवारी 1977 रोजी भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन झाले. त्यांनी 1974 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले. 25 जून 1975 रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली. त्यांचा जन्म 13 मे 1905 रोजी झाला होता.
X X
11 फेब्रुवारी 1989 रोजी भारतातील सुप्रसिद्ध लेखक पंडित नरेंद्र शर्मा यांचे निधन झाले.
11 फेब्रुवारी 1993 रोजी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक संवाद लेखक पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्वी उर्फ कमाल अमरोही यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1918 रोजी झाला होता.
11 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध मराठी साहित्यातील साहित्यिक तथा प्राचार्य रा. र. बोराडे सर यांचे निधन झाले. रावसाहेब रंगराव बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर 1940 मध्ये काटगाव लातूर जिल्ह्यामध्ये झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण बार्शी या ठिकाणी झाले होते त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सोलापूर या ठिकाणी पूर्ण केले. पद्युत्तर परीक्षा एम ए मराठी मध्ये त्यांनी मराठवाडा विद्यापीठांमध्ये पूर्ण केली. त्यांच्या अनेक कथा कादंबरी नाटक समीक्षा पर लेख इत्यादी विषयावर त्यांचे लिखाण आहे. 1963 मध्ये विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर 1971 पासून ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात त्यांची प्राचार्य म्हणून बदली झाली आणि त्यानंतर श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथून इसवी सन 2000 मध्ये त्यांनी प्राचार्य पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली. महाराष्ट्र सरकारने त्यांची अध्यक्षपदी निवड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वर केली होती. त्यांचा पेरणी हा पहिला कथासंग्रह पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशांनी 1965 मध्ये प्रकाशित केला होता. सत्यकथा मासिकामध्ये त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाले आहेत. शेतकरी मासिकामध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आमदार सौभाग्यवती, इथे होतं एक गाव, कथा एका तंटामुक्त गावाची, पाचोळा राजसा वळणाचं पाणी इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहे. पेरणी, मळणी, राखण, गोंधळ, नातीगोती हे त्यांचे कथासंग्रह एकूण 15 प्रसिद्ध आहेत. आमदार सौभाग्यवती, कशात काय आणि फाटक्यात पाय, पाच ग्रामीण नाटिका, पाणी! पाणी!, पिकलं पान हे त्यांचे नाटके सुप्रसिद्ध आहेत. ग्रामीण साहित्य हा समीक्षपर ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला होता. हरवलेली शाळा, शिका तुम्ही हो शिका हे दोन बालसाहित्य त्यांचे प्रकाशित आहेत. 1967 मध्ये "मळणी" हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वांग्मय निर्मितीचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या एकूण साहित्य नर्मितीला महाराष्ट्र राज्य सरकारचे पाच उत्कृष्ट वांग्मय निर्मिती पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये मळणी, पाचोळा, पाच ग्रामीण नाटिका, कंस आणि कडबा, चोरीचा मामला इत्यादी. त्यांना मराठवाडा गौरव पुरस्काराने 2001 मध्ये सन्मानित केले. महाराष्ट्र शासनाचा 2010 चा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या चारापाणी या कादंबरीला मराठवाडा साहित्य परिषदेच्या नरहर कुरुंदकर पुरस्कारावर प्रदान करण्यात आला. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद होते. ग्रामीण साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते. जळगाव येथे सर्वोदय सर्वसमावेशक मंडळ आयोजित राज्यस्तरीय सर्वोदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांच्याकडे होते. नाशिक येथे विखे पाटील प्रतिष्ठान व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 16 17 फेब्रुवारी 2012 मध्ये पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-10-day-of-special-dinvishesh.html
👆
February 10 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 10: दिनविशेष
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-12-day-of-special-dinvishesh.html
👆
February 12 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 12 : दिनविशेष
X X
View, Comments and share....










0 Comments