Subscribe Us

header ads

February 7 - Day of Special (Dinvishesh)

February 7 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 7: दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

वन अग्नि सुरक्षा दिवस.

"ग्रेनाडा" चा स्वातंत्र्यदिन

व्हॅलेंटाईन आठवड्याला सुरुवात. (रोस डे)

7 फेब्रुवारी 1856 रोजी ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.

X X

7 फेब्रुवारी 1915 रोजी गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील "आर्यन" हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता "हिर्‍याची अंगठी".


7 फेब्रुवारी 1920 रोजी बाबूराव पेंटर यांच्या "महाराष्ट्र फिल्म कंपनी" ने तयार केलेला "सैरंध्री" हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.




7 फेब्रुवारी 1948 रोजी कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.


7 फेब्रुवारी 1965 रोजी महाराष्ट्रात नाट्यकलेमध्ये नाटक हे प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यात यावे यासाठी मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.


7 फेब्रुवारी 1971 रोजी स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

X X

7 फेब्रुवारी 1974 रोजी युनायटेड किंगडम पासून ग्रेनाडा हा देश स्वतंत्र झाला.


7 फेब्रुवारी 1977 रोजी सोवियेत संघाने सोयुझ- 24 हे अंतराळयान प्रक्षेपित केले.


7 फेब्रुवारी 1992 रोजी "मास्त्रीक्त करार" अंमलात येऊन "युरोपीय संघा" ची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला व त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा समावेश झाला. या करारातून आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन "युरो" या समान चरणाचा उदय झाला. हे युरोपीय संघातील 28 पैकी 19 देशांचे अधिकृत चलन आहे. या देशांना एकत्रितपणे " युरोझोन" म्हणून ओळखले जाते.


7 फेब्रुवारी 1999 रोजी अंतराळातून स्टारडस्ट नावाचे अंतरीक्ष यान रवाना झाले. हे यान नासाने प्रक्षेपित केले. 385 किलोग्रॅम चे रोबोटिक्स प्रोब होते. याचे उद्दिष्ट वाइल्ड टू धूमकेतूच्या कोमामधून धुळीचे नमुने गोळा करणे तसेच कॉस्मिक डस्टचे नमुने गोळा करणे आणि ते विश्लेषणासाठी पृथ्वीवर परत पाठवणे असे होते. अशा प्रकारचे हे पहिले सॅम्पल रिटर्न मिशन होते. 15 जानेवारी 2006 रोजी याची यशस्वीरित्या प्राथमिक मोहीम पूर्ण झाली.

7 फेब्रुवारी 2003 मध्ये क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना "श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार" जाहीर करण्यात आला.



7 फेब्रुवारी 2010 रोजी म्हणजे आजच्या दिवशी अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचा समारोप झाला.



X X

7 फेब्रुवारी 1693 रोजी रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म झाला.


7 फेब्रुवारी 1804 मध्ये डिरे अँड कंपनीचे संस्थापक जॉन डिरे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 मे 1886 मध्ये झाला.

 

7 फेब्रुवारी 1812 रोजी इंग्लिश कादंबरीकार व सुप्रसिद्ध लेखक चार्ल्स डिकन्स त्याचा जन्म झाला. त्याचा मृत्यू नो जून 1870 रोजी झाला.

 

7 फेब्रुवारी 1873 रोजी आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस ॲन्ड्रयूज यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 एप्रिल 1992 मध्ये झाला.

             थॉमस ॲन्ड्रयूज

7 फेब्रुवारी 1898 मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या . डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई असे संबोधतात. माता रमाबाई आंबेडकर यांचा जन्म दाभोळ जवळील वननंदगावच्या नदीकाठी महारपूर या वस्तीत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे वलंगकर आईचे नाव रुक्मिणी बाई असे होते. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये 1906 यावर्षी झाले. 27 मे 1935 रोजी माता रमाईची प्राणज्योत मावळली. माता रमाईने बाबासाहेब यांना 28 वर्ष साथ दिली.


7 फेब्रुवारी 1906 रोजी रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 एप्रिल 1984 मध्ये झाला.

               ओलेग अँतोनोव्ह

7 फेब्रुवारी 1274 रोजी महानुभव पंथाचे संस्थापक व मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ "लीळाचरित्र" ग्रंथाचे निर्माते श्री चक्रधर स्वामी यांचे निधन झाले. पंडित माहीम भट सराळेकर हे या लीळाचरित्राचे करते आहेत हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ, अध्यग्रंथ आणि चरित्र ग्रंथ म्हणून ओळखला जातो. सर्व महानुभाव वाङ्मयाचे बीच या ग्रंथात आहे ही रचना इसवीसन 1200 या काळात रचलेली आहे. श्री चक्रधर स्वामींचे हे चरित्र ग्रंथ आहे. त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1221 मध्ये झाला होता.

              श्री चक्रधर स्वामी 


X X

7 फेब्रुवारी 1333 रोजी निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन झाले.


7 फेब्रुवारी 1938 रोजी अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 20 डिसेंबर 1868 रोजी झाला होता.


7 फेब्रुवारी 1942 रोजी भारतात “हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन” ची स्थापना करणारे शचींद्रनाथ सान्याल यांचे निधन झाले.

                शचींद्रनाथ सान्याल




7 फेब्रुवारी 1999 रोजी नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन झाले त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1935 रोजी झाला होता.





https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-6-day-of-special-dinvishesh.html

👆

February 6 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 6: दिनविशेष



https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-8-day-of-special-dinvishesh.html

👆

February 8 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 8: दिनविशेष




X X

View, Comments and share..... 

Post a Comment

1 Comments