Subscribe Us

header ads

February 6 - Day of Special (Dinvishesh)

February 6 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 6: दिनविशेष


महत्त्वाच्या घटना

6 फेब्रुवारी 1685 मध्ये इंग्लंडचा राजा जेम्स दुसरा हा बनला.

6 फेब्रुवारी 1778 मध्ये फ्रान्सने अमेरिकेला राष्ट्र म्हणून मान्यता दिली.

6 फेब्रुवारी 1888 मध्ये म्हणजे आजच्या दिवशी गिलिस बिल्दट हे स्वीडन चे प्रधानमंत्री बनले.

X X

6 फेब्रुवारी 1918 मध्ये 30 वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1928 मध्ये हे वय 21 करण्यात आले.


6 फेब्रुवारी 1932 रोजी कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.


6 फेब्रुवारी 1932 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील "प्रभात फिल्म कंपनी" चा "अयोध्येचा राजा" हा मराठी भाषेतील पहिला बोलपट व्हि . शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मुंबईच्या "कृष्णा" या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.


6 फेब्रुवारी 1942 रोजी दुसरे महायुद्ध दरम्यान इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.


6 फेब्रुवारी 1952 मध्ये इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली. ती राणी बनल्याची बातमी तिला केनियातील झाडावरच्या एका हॉटेलमधे देण्यात आली.


6 फेब्रुवारी 1959 रोजी जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.

X X

6 फेब्रुवारी 1968 रोजी दहावे हिवाळी ऑलिम्पिक फ्रान्सच्या ग्रोनेबल येथे सुरु झाले.


6 फेब्रुवारी 1890 रोजी भारतरत्नने सन्मानित ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान यांचा जन्म ब्रिटिश इंडिया पेशावर सध्याचे पाकिस्तान या ठिकाणी उत्तमान जाई या ठिकाणी झाला. त्यांना सरहद्द गांधी व बादशहा खान या नावाने सुद्धा ओळखले जाते ते वायव्य सरहद्द प्रांतातील एक स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवला होता. भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले ते पहिले अभारतीय होते. गफारखान यांनी 1929 मध्ये "खुदाई खितमत गार" ही संघटना स्थापन केली या संघटनेच्या सदस्यांना लाल डगले वाले म्हणून ओळखले जाते ही संघटना "सुर्खपोष" या नावाने सुद्धा ओळखली जात होती.

X X

6 फेब्रुवारी 1911 रोजी सुप्रसिद्ध अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 5 जून 2004 रोजी झाला.


सहा फेब्रुवारी 1912 रोजी ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण एव्हा ब्राउन यांचा जन्म झाला तिचा मृत्यू 30 एप्रिल 1945 रोजी झाला.


6 फेब्रुवारी 1915 रोजी भारतातील सुप्रसिद्ध गीत "ए मेरे वतन के लोगो" या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म मध्य प्रदेशातील बडनेर जिल्हा उज्जैन या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण हे लखनऊ विद्यापीठांमध्ये 1939 मध्ये पूर्ण झाले त्यांची पानिपत कविता ही श्रोत्यांना खूप आवडली त्यानंतर त्यांनी ऋषी गाथा या नावाने दयानंद सरस्वती यांच्या जीवनावर 300 ओळींची कविता तयार केली. मुंबईच्या कवी संमेलनामध्ये दिग्दर्शक हिमांशु राय यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव बदलून कवी प्रदीप हे ठेवले. या नावाने ते हिंदी चित्रपट सृष्टीत गीत लेखन करण्यास सुरू केले. 1940 मध्ये "चल चल रे नौजवान" हे बंधन या चित्रपटातील त्यांचे गीत खूप गाजले .स्वातंत्र्य चळवळीत हे गीत एवढे गाजले की सिंध व पंजाबच्या विधानसभेने या गीताला राष्ट्रगानाचा मान दिला. विधानसभेतील गायले जाऊ लागले .त्यानंतर त्यांचे "चणे जोर गरम मै लाया मजेदार" हे गीत सुद्धा खूप गाजले. 1943 मध्ये किस्मत या चित्रपटातील "हिमालय की छोटी से फिर हमने ललकार आहे दूर हटो ये दुनियावालो हिंदुस्तान हमारा है" या गीताने स्वातंत्र्यसेनानींच्या देश प्रेमाच्या चेतना निर्माण झाली.त्यांनी त्यानंतर नास्तिक चित्रपटासाठी "देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान" हे गीत समाजात वाढत चाललेल्या कुप्रथावर त्यांनी जागृती या चित्रपटातील "आओ बच्चो तुम्हे दिखाये झांसी हिंदुस्तान की" या जी गीते आजही लोकप्रिय आहेत या चित्रपटातील दुसरे गीत "दे दी हमे आजादी बिना खडक बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल" हे प्रसिद्ध गीतातून त्यांनी महात्मा गांधींना मानवंदना दिली. भारत चीन युद्ध दरम्यान भारतीय सैनिकांना च्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी त्यांनी या युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून "ए मेरे वतन के लोगो" हे अतिशय भावनिक गीत लिहिले. 26 जानेवारी 1963 मध्ये राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर लता मंगेशकर यांनी हे गीत सादर केले . कवी प्रदीप यांना 1961 चा संगीत अकादमी चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच त्यांना "राष्ट्रीय कवी" म्हणून सन्मानित करण्यात आले. 1995 मध्ये त्यानंतर 1998 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी एकूण  540 गीते लिहिली आणि काही चित्रपटातील गायली.त्यांचा मृत्यू 11 डिसेंबर 1998 रोजी वयाच्या 83 व्या वर्षी मुंबईमध्ये झाला.



6 फेब्रुवारी 1952 मध्ये ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी डॉ. रिक चार्ल्सवर्थ याचा जन्म झाला.


6 फेब्रुवारी 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू तथा सट्टेबाज व फिक्सर श्रीशांत यांचा जन्म झाला.

X X


6 फेब्रुवारी 1804 मध्ये सुप्रसिद्ध इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्टले याचा मृत्यू झाला. त्याचा जन्म 13 मार्च 1733 मध्ये झाला होता.


6 फेब्रुवारी 1931 रोजी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील सुप्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचा मृत्यू झाला. 1922 मध्ये देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपतराय यांच्याबरोबर त्यांनी काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 1928 मध्ये कोलकत्ता या ठिकाणी भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर 1928 मध्ये काँग्रेस पक्षाने भारताची भावी राज्यघटना बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या ठिकाणी सध्याचे प्रयागराज यांचे प्रशस्त घर आहे त्या घराचे नाव आनंद भवन असे आहे त्यांनी पुढे हे स्वतःचे राजवाड्यासारखे घर काँग्रेस पक्षाला देऊन टाकले. त्यांचा जन्म सहा मे 1861 मध्ये झाला होता.


6 फेब्रुवारी 1939 रोजी भारतातील सुप्रसिद्ध संस्थानिकापैकी असलेले बडोदा संस्थानचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे निधन झाले . त्यांनी पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली. त्यांचा जन्म दहा मार्च 1863 रोजी झाला होता.



6 फेब्रुवारी 1976 रोजी भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक ऋत्विक घटक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1925 रोजी झाला होता.


6 फेब्रुवारी 1983 रोजी भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आत्माराम यांचे निधन झाले. चष्म्याची काच निर्माण करण्यामध्ये त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. भारत सरकारने त्यांना 1959 रोजी पद्मश्री पुरस्कार देऊन पुरस्कृत केले होते. त्यांना 1959 रोजी शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित केले होते. आत्माराम यांना 21 ऑगस्ट 1966 रोजी वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषद तेचे संचालक म्हणून पदभार दिला. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारत सरकार केंद्रीय हिंदी संस्थांच्या माध्यमातून आत्माराम पुरस्कार दिला जातो. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1908 रोजी उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील पिलाना गाव या ठिकाणी झाला.

X X

6 फेब्रुवारी 1993 मध्ये अमेरिकेतील सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू आर्थर अ‍ॅश याचा मृत्यू झाला त्याचा जन्म दहा जुलै 1943 रोजी झाला होता.


6 फेब्रुवारी 2001 मध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते आणि भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील केंद्रीय नभोवाणी मंत्री बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचे निधन झाले.

         बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ







https://www.insearchofknowledge.org/2023/03/blog-post.html

👆

Open link 

बडोदा संस्थानचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक सर सयाजीराव गायकवाड



X X

View, Comments and share.........


आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप का गीत 

ऐ मेरे वतन के लोगों

ऐ मेरे वतन के लोगों
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने हैं प्राण गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो -२
जो लौट के घर न आये -२

ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी

जब घायल हुआ हिमालय
खतरे में पड़ी आज़ादी
जब तक थी साँस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पे धर कर माथा
सो गये अमर बलिदानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी

जब देश में थी दीवाली
वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में
वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो अपने
थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी

कोई सिख कोई जाट मराठा
कोई गुरखा कोई मदरासी
सरहद पर मरनेवाला
हर वीर था भारतवासी
जो खून गिरा पर्वत पर
वो खून था हिंदुस्तानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी

थी खून से लथ-पथ काया
फिर भी बन्दूक उठाके
दस-दस को एक ने मारा
फिर गिर गये होश गँवा के
जब अन्त-समय आया तो
कह गये के अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों
अब हम तो सफ़र करते हैं
क्या लोग थे वो दीवाने
क्या लोग थे वो अभिमानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी

तुम भूल न जाओ उनको
इसलिये कही ये कहानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी

जय हिन्द...
जय हिन्द की सेना -२
जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्दl

XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-5-day-of-special-dinvishesh.html

👆

February 5 - Day of Special (दिनविशेष

फेब्रुवारी 5: दिनविशेष

XX



Post a Comment

2 Comments