Subscribe Us

header ads

Erode Venkatappa Ramasamy( Periyar or Thanthai): Indian social activist, 'Father of the Dravidian movement'

Erode Venkatappa Ramasamy( Periyar or Thanthai[b] Periyar): Indian social activist and politician, Self-Respect Movement and Dravidar Kazhagam. 'Father of the Dravidian movement'

पेरियार इ. व्ही. रामासामी: समाजसुधारक 

17 सप्टेंबर : जन्मदिन 

24 डिसेंबर: स्मृतीदिन 


बालपण आणि शिक्षण:

17 सप्टें. 1879 पेरियार इ. व्ही. रामासामी यांचा एक श्रीमंत व्यापारी कुटुंबात जन्म झाला.

1889 वयाच्या दहाव्या वर्षीच शिक्षण सोडून दिले.

1898 वयाच्या 13 व्या वर्षी नागाम्मलशी विवाहबद्ध झाले.

1902 आंतर्जातीय तसेच आंतर्धर्मीय रोटी-बेटी व्यवहाराचा पुरस्कार करण्यात पुढाकार घेतला.

1904 संन्यास घेऊन इरोडे शहर सोडले. कलकत्ता, बनारस इत्यादी ठिकाणी भटकंती झाल्यानंतर त्यांना कळून चुकले की, अशा अवस्थेत जीवनाचा अर्थ सापडणे शक्य नाही.

1907 प्लेगसारख्या जीवघेण्या साथीची इरोडे येथे लागण झाल्यानंतर जेथे सर्वसामान्य माणूस रोग्याच्या जवळ जाण्यासही घाबरत होता तेथे पेरियार रामसामींनी रोग्यांच्या मदतीसाठी स्वतःला झोकून दिले. याच वर्षी काँग्रेस चळवळीकडेही ते आकर्षित झाले.

1909 विधवा विवाहास प्रखर विरोध असूनही आपल्या विधवा पुतणीचा विवाह लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

1917 इरोडे नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून नियुक्ती, 'ऑनररी मॅजिस्ट्रेट' म्हणून नियुक्ती. हे पद 19 वर्षे भोगले.

X X

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभाग:

1920 विविध समित्यांवरील जवळ जवळ 29 पदांचा राजीनामा देऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. असहकार चळवळीत सक्रिय सहभाग. 

1921 ताडीची दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन. या आंदोलनात त्यांच्या पत्नी नागाम्मल आणि बहीण एस. आर. कन्नमल यांनीही साथ दिली. या आंदोलनाची दखल म. गांधींनी सुद्धा घेतली होती.

1922 काँग्रेस आंदोलनात अटक व तुरुंगवास. कोईम्बतूर जिल्ह्यातील तिरुपूर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात मनुस्मृती व रामायण जाळण्याची जाहीर घोषणा केली.

1924 केरळ राज्यातील वायकोम येथील प्रसिद्ध सत्याग्रहाची सुरुवात. अस्पृश्यांना रस्त्यावरून चालण्याची बंदी उठविण्यासाठीच्या या सत्याग्रहामुळे दोन वेळा त्यांना तुरुंगवास झाला होता. त्यांच्या पत्नी व भगिनीही या सत्याग्रहात सहभागी झाल्या होत्या. शेवटी हा लढा त्यांनी जिंकला व इझावा या अस्पृश्य जातीसह सर्वांनाच 'तो' रस्ता खुला करण्यात आला. तेव्हापासून त्यांना 'वायकोम हिरो' म्हणून संबोधले जात आहे. गुरुकुलम या वर्णाश्रमात चाललेली जातीयता थांबवण्याचे प्रयत्न. थिरुवन्नमल्लाई येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविले.

2/5/1925 इरोडे येथून साप्ताहिक 'कुडी आरसू' च्या प्रकाशनास आरंभ. या साप्ताहिकाच्या माध्यमातूनच ब्राह्मणेतरांना देव, धर्म, जात, धर्मशास्त्र या विषयी पुनर्विचार करण्याची नवी जाणीव निर्माण करून दिली. कांचीपूरम येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात आरक्षणास विरोध केल्यामुळे काँग्रेसचा त्याग करण्याची सिंहगर्जना केली. काँग्रेस नष्ट करण्याची प्रतिज्ञाही याच ठिकाणी केली. म. गांधींची भेट घेऊन काँग्रेसमध्ये असलेले ब्राह्मणांचे वर्चस्व त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

X X

1927 सायमन कमीशनचे भव्य स्वागत करण्याची घोषणा त्यांनी केली.

1928 दक्षिण भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाल्यामुळे पेरियार रामसामींना अटक झाली होती.

7/11/1928 'Revolt' या इंग्रजी नियतकालिकाच आरंभ करण्यात आला.

17-18/2/1929 चेंगलपूत येथे स्वाभिमान चळवळीचे पहिले अधिवेशन संपन्न.

13/12/1929 मलेशिया आणि सिंगापूरचा सपत्निक दौरा.

16/1/1930 दौऱ्यावरून परत आल्यानंतर प्रथमच दाढी वाढवलेल्या अवस्थेत लोकांनी त्यांना पाहिले. नंतर 'गर्बा आच्छी' हे कुटुंबनियोजनावर ग्रंथ लिहून त्याची आवश्यकता लोकांना पटवून सांगितली. दुसरे स्वाभिमान चळवळींचे अधिवेशनही यावर्षीच पार पडले. देवदासी पद्धती नष्ट झाल्या पाहिजेत यासाठी आंदोलन.

ऑगस्ट 1931 तिसरे स्वाभिमान चळवळ प्रादेशिक अधिवेशन विरूधू नगर येथे श्री. आर. के. शतमूधम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. 

13/12/1931 युरोपियन राष्ट्रांच्या दौऱ्यावर प्रस्थान. दक्षिण आफ्रिका, इजिप्त, ग्रीस,तुर्क, सोविएत रशिया, इंग्लंड, वालेसु, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इटाली इत्यादी राष्ट्रांचा दौरा. परतीच्या प्रवासात श्रीलंका येथे मुक्काम.

11/5/1933 पेरियार रामासामींना सतत सर्व कार्यत साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी नागम्मल यांचे अल्पशा आजाराने निधन.

12/5/1933 एका आंतरधर्मीय विवाह समारंभात उपस्थित राहण्यासाठी ताबडतोब तिरुची येथे रवाना.

X X

29/10/1933 "अशा अवस्थेतील सरकार हवे कशाला?" अशा मथळ्याखाली 'कुडी आरसू'मध्ये संपादकीय लिहिल्याबद्दल त्यांना व प्रकाशक म्हणून त्यांच्या भगिनी ए.आर. कन्नमल यांना अटक. नंतर 'पुराच्छी' हे तामिळ साप्ताहिक सुरू केले.

12/1/1934 'पगुथारिऊ', हे तामिळ साप्ताहिक सुरू केले.

1935 जस्टीस पार्टीला समर्थन देण्यास सुरुवात. 'विड्थलाई' या वर्तमानपत्राची सुरुवात.

1936 हिंदीला विरोध करण्याच्या उद्देशाने कांचीपुरम येथे आयोजित केलेल्या अधिवेशनात एक बील मांडण्याची व्यवस्था केली.

13/11/1938 मद्रास येथे आयोजित एका अधिवेशनात महिलांनी 'पेरियार' ही उपाधी बहाल केली.

1940 मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बॅ. मोहम्मद अली जिन्हा यांची भेट.

1942 'द्रविडनाडू' या वेगळ्या प्रदेशाची मागणी करण्यात आली.

27/8/1944 सलेम येथे आयोजित जस्टीस पार्टीच्या विशेष अधिवेशनात जस्टीस पार्टीचे नामांतर 'द्रविड कळघम' असे करण्यात आले.

11/5/1946 'ब्लॅकशर्ट कॉन्फरन्स' हे मदुराई येथे आयोजित अधिवेशन अधिक गाजले.

15/8/1947 भारत देश स्वतंत्र झाल्यामुळे सर्वत्र जल्लोष होता परंतु पेरियार रामासामी या दिनास तामिळनाडूसाठीचा दुखवटा दिन असे संबोधित होते.

19/9/1947 'द्रविडनाडू' च्या वेगळ्या मागणीसाठी कुड्डालोर येथे अधिवेशन संपन्न.

30/1/1948 महात्मा गांधीच्या हत्येनंतर पेरियार रामासामी यांनी भारताचे नामांतर 'गांधीनाडू', हिंदुधर्माचे नामांतर 'गांधीधर्म' आणि वर्ष हे 'गांधीवर्ष' म्हणून संबोधले जावे अशी मागणी करून गांधी हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला.

10/8/1948 कुंभकोनम येथे हिंदी विरोधी अधिवेशन संपन्न.

X X

22/8/1948 भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून दि. 23/8/48 ला सी. राजगोपालाचारी यांचे आगमन मद्रास येथे होणार असल्याने त्यांना काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत असतानाच एक दिवस अगोदरच पेरियार रामसामी व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून मद्रास येथे दि. 27/8/48 पर्यंत स्थानबद्ध केले.

9/7/1949 पेरियार रामासामी यांनी मनी अम्माल यांच्याशी दुसरा विवाह केला. सी. एन. अन्नादुराई यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत द्रविड कळघमचा राजीनामा दिला आणि वेगळा पक्ष काढला.

22/1/1950 'सोनेरी बोल' या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे पेरियार रामासामींना अटक झाली.

26/1/1950 दुखवटा दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले. 

1951 आरक्षण रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालय व सवोंच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रचंड आंदोलन छेडले. नंतर भारतीय राज्यघटनेत पहिली दुरुस्ती करून 150 या कलमामध्ये पोटकलम क्र. 4 जोडून मागासवर्गीयांना आरक्षण प्राप्त झाले.

1952 पेरियार रामासामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तामिळनाडूमधील सर्व नामफलकावरील हिंदी अक्षरास डांबर लाऊन पुसण्याचा प्रयत्न केला. 

1953 गणपतीची मूर्ती फोडून मूर्तीमध्ये देव नसतो हे जनतेस दाखवून दिले. मलेशिया व बर्मा येथे सपत्निक भेट देऊन जागतिक बौद्ध अधिवेशनात सहभाग घेतला. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीही भेट झाली.

1955 रामाचीप्रतिमा दहन केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

3/11/1956 पेरियार रामासामी यांची चांदीची नाणेतुला करण्यात आली. 

1958 तामिळनाडूमधील हॉटेलवर 'ब्राह्मण हॉटेल' असे नाव जेथे जेथे असेल तेथे तेथे 'ब्राह्मण' हा शब्द डांबर लाऊन खोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला. पेरियार रामासामी आणि रामनोहर लोहिया यांची भेट.

1959 उत्तर प्रदेशचा दौरा, त्यामध्ये कानपूर, दिल्ली, अलाहाबाद, येथे व्याख्याने दिली.

1960 तामिळनाडू वगळून भारताच्या इतर नकाशाचे दहन. 

X X

1967 'द्रविड मुन्नेम कळघम' पक्षाचे सी. एन. अन्नादुराई तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. पेरियार रामासामी यांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला.

1968 रामायणाचे संपूर्ण तामिळनाडू प्रांतात दहन करण्यात आले.

1969 मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाची घोषणा करून जातीयव्यवस्थेचा निषेध केला. 

1970 तामिळ द्विमासिक "उनमई" तिरुचिरापल्ली येथून सुरू केले. 'रॅशनॅलिस्ट फोरम' या नव्या सामाजिक संघटनेची बांधणी. "मॉडर्न रॅश्नॉलिस्ट" या इंग्रजी मासिकाची सुरुवात.

19/12/1973 मद्रास येचील, थियागराया नगर येथे दिलेले भाषण हे त्यांचे अखेरचे भाषण ठरले.

X X

निधन:

24/12/1973 'हर्निया' या व्याधीमुळे दवाखान्यात भरती करण्यात आले. परंतु हृदयक्रिया बंद पडल्यामुळे सकाळीच वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. एक महान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले! 

25/12/1973 मद्रास येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला.









X X

View, comments and share....

Post a Comment

0 Comments