Subscribe Us

header ads

C.D.Deshmukh (Sir Chintaman Dwarakanath Deshmukh): Governor, Reserve Bank of India ,Former Finance Minister of India

C.D.Deshmukh (Sir Chintaman Dwarakanath Deshmukh): Indian civil servant Governor, Reserve Bank of India ,Former Finance Minister of India 

चिंतामणराव देशमुख : भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर

(14 January 1896 – 2 October 1982)


बालपण आणि शिक्षण:

संपूर्ण नाव चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील नाते या गावी इ. स. 1896 मध्ये झाला. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते. 'अतिशय कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी' म्हणून चिंतामणरावांचा प्राथमिक शाळेपासूनच लौकिक झाला होता. इ. स. 1912 मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत ते प्रथम श्रेणीत प्रथम आले होते आणि त्यांना 'जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती' मिळाली होती. इंटर झाल्यानंतर चिंतामणराव उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. तेथे केंब्रिज विद्यापीठाच्या जीझस् कॉलेजातून ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनतर ते आय. सी. एस. च्या परीक्षेला बसले. या परीक्षेतही ते सर्वप्रथम आले.

इंग्लंडमधील वास्तव्यात चिंतामणरावांचा पहिला विवाह रोझिना सिल्कॉक्स या नावाच्या इंग्लिश युवतीशी इ. स. 1920 मध्ये झाला. तिच्या निधनानंतर त्यांनी सुप्रसिद्ध समाजसेविका दुर्गाबाई या विदुषीसोबत दुसरा विवाह केला.

X X

महत्वपूर्ण जबाबदारी:

इंग्लंडहून आय. सी. एस. होऊन भारतात परतल्यावर त्यांनी अनेक उच्चपदी कार्यक्षमतेने काम करून 'कुशल प्रशासक' म्हणून कीर्ती मिळविली. ब्रिटिश सरकारने आयोजित केलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला एक सचिव म्हणून ते उपस्थित राहिले होते. त्या ठिकाणी त्यांचा महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, लालबहादुर शास्त्री इत्यादी भारतीय नेत्याशी संबंध आला. या नेत्यांवर त्यांच्या विद्वत्तेचा प्रभाव पडला होता.

X X

भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर:

चिंतामण देशमुख हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर बनले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती तसेच जागतिक मुद्रा परिषदेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यूरोप व अमेरिकेत भारत सरकारचे वित्त प्रतिनिधी म्हणून ते गेले होते. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक या संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. 

X X

केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री:

चिंतामणराव देशमुख इ. स. 1950 ते 1956 पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. अर्थमंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वाची कामे केली होती. त्यांनी आयुर्विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना व इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण ही महत्त्वाची कामे केली. इ. स. 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांची लोकसभेवर निवड झाली होती. याशिवाय इ. स. 1950 ते 1957 या काळात भारताच्या नियोजन मंडळाचे एक सभासद म्हणूनही त्यांनी काम केले होते. पुढे इ. स. 1956 मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या राज्याला केंद्र सरकार विरोध करू लागताच त्यांनी लोकसभेच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे भाषण करून अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अर्थमंत्रिपदावरून दूर झाल्यावरही चिंतामणरावांनी सार्वजनिक महत्त्वाची अनेक पदे भूषविली होती. चिंतामण देशमुखांनी इ. स. 1969 मध्ये भारताच्यां राष्ट्रपतिपदाची निवडणूक - लढविली परंतु त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.

X X

सन्मान:

1. विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष

2. इ. स. 1960 ते 1963 या काळात हैद्राबाद येथील भारत सरकारच्या प्रशासकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष.

3. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू.

4. भारत सरकारच्या केंद्रीय संस्कृत मंडळाचे अध्यक्ष.

5. सामाजिक विकास परिषदेचे अध्यक्ष.

6. भारतीय आर्थिक विकास संस्थेचे अध्यक्ष.

7. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर

8. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री

9. आय. सी. एस. (इंडियन सिव्हल सर्व्हिसेस) च्या परीक्षेत त्यांनी मिळविलेल्या गुणांइतके गुण पुढील काळात कोणाही भारतीय विद्यार्थ्यांना मिळविता आले नाहीत.

X X

ग्रंथसंपदा:

1. कालिदासांच्या 'मेघदूत' या संस्कृत काव्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. 

2. महात्मा गांधी यांच्या सुमारे शंभर वचनांचे त्यांनी संस्कृतमध्ये 'सूक्तिमुक्तावली' या नावाने श्लोकबद्ध रूपांतर केले.

3. 'दी कोर्स ऑफ माय लाईफ' हे आत्मचरित्रही त्यांनी इंग्रजी भाषेत लिहिले होते.

X X

पुरस्कार:

1. लेस्टर विद्यापीठ (इंग्लंड), प्रिन्स्टन (अमेरिका) आणि भारतातील म्हैसूर व उस्मानिया या विद्यापीठांनी एलएल. डी. ही पदवी त्यांना बहाल केली होती. याशिवाय पुणे, नागपूर, पंजाब व अलाहाबाद या विद्यापीठांनी त्यांना डी.लिट् ही सन्माननीय पदवी दिली.

2. कलकत्ता विद्यापीठाने त्यांना डी. एस्सी ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.

3. इ. स. 1959 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला होता.

4. इ. स. 1975 मध्ये भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.

X X

निधन:

2 ऑक्टोबर 1982 रोजी त्यांचे निधन झाले.










X X

View, comments and share.....

Post a Comment

0 Comments