Subscribe Us

header ads

Dayanand Saraswati: Indian philosopher, social leader

Dayanand Saraswati: Indian philosopher, social leader and founder of the Arya Samaj

स्वामी दयानंद सरस्वती : संस्थापक, आर्य समाज

जन्मदिन -15 ऑगस्ट 1824 

स्मृतिदिन- 23 सप्टेंबर 1883

बालपण आणि शिक्षण:

स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूलशंकर अंबाशंकर तिवारी हे आहे त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1824 मध्ये झाला त्यांचा जन्म टंकारा मोरबी संस्थान गुजरात राज्य या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आंबा शंकर तर आईचे नाव अमृत बाई असे होते. ते बालपणापासूनच शालेय शिक्षणापासून वंचित राहिले व स्वामी दयानंद सरस्वती हे आयुष्यभर अविवाहित राहिले.

X X

कार्य:

जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटना :

एकदा शिवरात्री होती. वडील म्हणाले, "मूलशंकर, आज सर्वांनी उपवास करायचा. रात्रभर देवळात जागायचे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करायची. हे ऐकून मूलशंकरने उपवास केला. दिवस संपला, रात्र झाली. मूलशंकर आणि वडील शंकराच्या देवळात गेले. त्यांनी पूजा केली, पिंडीवर फुले वाहिली, तांदळाच्या अक्षता वाहिल्या. रात्रीचे बारा वाजले. वडिलांना झोप येऊ लागली पण मूलशंकर जागा राहिला. आपला उपवास निष्फळ होईल या भीतीने तो झोपला नाही. देवळातल्या बिळांतून उंदीर बाहेर आले आणि शंकराच्या पिंडीभोवती फिरू लागले. ते पिंडीवरच्या अक्षता खाऊ लागले. है दृश्य पाहून जी मूर्ती उंदरापासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही ती भक्तांचे संकटापासून रक्षण कशी काय करू शकेल, मूर्तीत काहीही सामर्थ्य नसते; तेव्हा मूर्तिपूजेलाही काही अर्थ नाही, अशा त-हेचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. त्या वेळेपासून त्यांच्या मनात धर्माविषयी जिज्ञासा जागृत झाली. परमेश्वराचे शाश्वत स्वरूप व धर्माचा खरा अर्थ जाणून घेण्याची ओढ त्यांना लागली. एकदा टंकारा नगरामध्ये कॉलन्याची साथ आली. त्या साथीमध्ये मूलशंकरची चौदा वर्षांची बहीण मरण पावली. या घटनेनंतर तीन वर्षांनी मूलशंकरच्या आवडत्या काकांचाही कॉलऱ्यामुळे मृत्यू झाला. मूलशंकरला याचा जबरदस्त धक्का बसला. जणू काही त्याचे जीवनसर्वस्वच हरवले.

X X

गृहत्याग :

कौटुंबिक बंधनाचा त्याग करावा. अशी मूलशंकरच्या मनात इच्छा निर्माण झाली. जीवन काय आहे? मृत्यू काय आहे? या प्रश्नांची उत्तरे सुयोग्य महात्म्याकडून समजवून घ्यावीत, असे त्यांना वाटत होते. या ध्येय प्राप्तीकरिता वयाच्या 21 व्या वर्षीच त्यांनी घरदार सोडले. त्यांच्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांच्या लग्नाचा चालविलेला विचार हे त्यांच्या निर्णयास निमित्त झाले होते. भौतिक सुखाचा आनंद लुटण्यापेक्षा स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले. त्यासाठी घरादाराचा त्याग करून गुरूचा शोध घेत फिरण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

X X

गुरूचा शोध :

गृहत्याग केल्यानंतर मूलशंकर अहमदाबाद, बडोदा, हरिद्वार, काशी, कानपूर या ठिकाणी गुरूंच्या शोधार्थ जंगलातून व पहाडातूनसुद्धा प्रवास करीत राहिले परंतु त्यांना योग्य गुरू मिळाला नाही. याच सुमारास त्या काळचे प्रकांड पंडित आणि संन्यासी स्वामी पूर्णानंद यांची मूलशंकरशी भेट झाली. त्यांचे शिष्यत्व पत्करून मूलशंकरनी संन्यास धर्माचा स्वीकार केला. संन्यास धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती हे नाव धारण केले.

पंधरा वर्षांपर्यंत सर्वत्र भ्रमंती केल्यावर स्वामी पूर्णशर्मा नामक साधूच्या म्हणण्यानुसार स्वामी दयानंद मथुरेस येऊन पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी स्वामी विरजानंद यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून वेद व इतर हिंदू धर्मग्रंथांचे ज्ञान घेतले.

X X

 वैदिक ज्ञानाचा प्रसार :

स्वामी दयानंदांना वेद सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वाटत होते. मुख्य म्हणजे वेदांमध्ये मूर्तिपूजा नव्हती किंवा उच्च-नीच हा भाव नव्हता. वेदातील ज्ञान हे खरेखुरे ईश्वरीय ज्ञान आहे, पवित्र ज्ञान आहे आणि समाजाकरिता ते अत्यंत उपयुक्त आहे. अशी दयानंदांची श्रद्धा होती म्हणूनच त्यांनी 'वेदांकडे परत जा' अशी भारतीयांना शिकवण दिली.

आपल्या अस्खलित प्रवचनांद्वारे ते मूर्तिपूजा, जन्मजात उच्च-नीचता, जातिभेद, घातक रूढी, यज्ञांमध्ये केली जाणारी पशुहत्या यांच्यावर घणाघाती आघात करू लागले.

इ. स. 1869 मध्ये त्यांनी काशीच्या सनातनी ब्राह्मण पंडितांशी शास्त्रार्थावर वादविवाद केला त्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले.

X X

स्वातंत्र्यप्रेम :

इ. स. 1857 च्या असफलतेपासून तर काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत भारतीयांच्या हृदयामध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत ठेवण्याचे कार्य ज्या ज्या महापुरुषांनी केले त्यांपैकी दयानंद हे एक होते. भारतातून ब्रिटिशांना हाकलण्याकरिता सशस्त्र क्रांती हा एकमेव मार्ग आहे, अशी स्वामी दयानंदांची पक्की खात्री होती. आर्यसमाज आणि गुरुकुलं यामध्ये राष्ट्रभक्तांना सशस्त्र क्रांतीकरिता प्रेरणा आणि प्रशिक्षण मिळत असे. स्वामी श्रद्धानंद, लाला लजपतराय आणि लाला हरदयाल इत्यादी. ब्रिटिशांना भारतातून हाकलण्याकरिता उघडपणे लढणारे नेते आर्यसमाजीच होते.

X X

शुद्धीकरण :

स्वामी दयानंदांनी ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मात गेलेल्या लोकांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदू केले. समाजाच्या सर्व घटकांना एका सूत्रामध्ये बांधण्याकरिता समान भाषा आवश्यक आहे. अशी त्यांची धारणा होती. हिन्दी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान मिळावे, असे त्यांचे स्पष्ट मत होते.

X X

आर्य समाजाची स्थापना :

स्वामी दयानंद सरस्वतींनी धर्मसुधारणेच्या कार्याची प्रेरणा ब्राह्मो समाजाकडून घेतली होती. प्रारंभीच्या काळात त्यांच्या सहकार्यानेच धर्मप्रचाराचे व धर्मसुधारणेचे कार्य करीत. तथापि पुढे त्यांनी आपला वेगळा संप्रदाय निर्माण करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी मुंबई येथे 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली.

आर्य समाजाने धार्मिक व सामाजिक सुधारणांबरोबरच शैक्षणिक सुधारणा केल्या. वेदांचे शिक्षण घेणारा तरुण हा निर्भय, तेजस्वी आणि काळाचे आव्हान स्वीकारणारा निर्माण होईल, असे स्वामी दयानंदांना वाटत होते. उत्तर भारतात त्यांनी चालविलेले शिक्षण प्रसाराचे कार्य तर अतिशय महत्त्वपूर्ण ठरले. आर्य समाजाने लाहोर येथे दयानंद अँग्लोवैदिक कॉलेज सुरू केले तसेच गुरुकुल संस्थेची स्थापना करून राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालये देशाच्या विविध भागांत उघडली.

X X

विचार:

1. सर्व मानव एक, सर्वांचे देव एक, सर्वांचा धर्म एक, पृथ्वी माता एक हीच जीवनाची चतुःसूत्री आहे.

2. स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही, त्यांना अज्ञानात ठेवले जाते, हे भारताच्या अधःपतनाचे एक कारण आहे. ज्याप्रमाणे गाठोड्यात असलेल्या रत्नांचे प्रतिबिंब आरशात पडू शकत नाही त्याप्रमाणे जोपर्यंत स्त्रिया पडदा पद्धतीसारख्या मूर्ख रूढीचे बंधन तोडत नाहीत तोपर्यंत त्यांची प्रगती होणे अशक्य आहे. त्यांनी हा पडदा फेकून दिला पाहिजे. सीता आणि सावित्री चिरस्मरणीय झाल्या ते त्यांच्या सतीत्वामुळे आणि सद्गुणांमुळे, त्यांच्या पडद्यामुळे नाही.

3. स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे. स्त्री ही कुटुंबाची स्वामिनी असल्याने तिला तिचे अधिकार मिळाले पाहिजेत.

X X

ग्रंथसंपदा:

'सत्यार्थ प्रकाश' हा महान ग्रंथ म्हणजे स्वामी दयानंदांनी आपल्या समाजाला दिलेली अनमोल देणगी होय. या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय असून त्यामध्ये वेदांचा सत्यार्थ दिलेला आहे. म्हणून या ग्रंथाला 'सत्यार्थ प्रकाश' म्हटले आहे. हा ग्रंथ पूर्णपणे वेदांवर आधारलेला आहे.

वेदभाष्य, संस्कारनिधी, व्यवहार भानू इत्यादी ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिले.

X X

मृत्यू:

इ. स. 1883 मध्ये स्वामी दयानंदांचे विषप्रयोगामुळे निधन झाले.









X X

View, comments and share.. 

Post a Comment

0 Comments