Bipin Chandra Pal: Indian nationalist, writer, orator, social reformer and Indian independence movement freedom fighter. He was one third of the "Lal Bal Pal" trio
बिपीनचंद्र पाल : भारतीय राजकारणी, स्वतंत्र सेनानी
जन्मदीन : 7 नोव्हेंबर
बालपण आणि शिक्षण:
बिपीनचंद्र रामचंद्र पाल यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1858 रोजी सिल्हेटजवळील खेडेगावात (सध्या बांगला देशात) झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र होते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर समाजसुधारणांकडे वाटचाल. त्यांचा विवाह दोन वेळेस झाला त्यांची पहिली पत्नी वारल्यानंतर विधवेशी पुनर्विवाह.
X X
कार्य:
वयाच्या 16 व्या वर्षी बिपीनचंद्रांनी ब्राह्मो समाजात प्रवेश केला. इ. स. 1876 मध्ये शिवनाथ शास्त्रींनी पाल यांना ब्राह्मो समाजाची दीक्षा दिली. मूर्तीपूजा न मानणाऱ्या ब्राह्मो समाजाचे अनुयायी होणे म्हणजे अर्धे ख्रिश्चन होणे, असे जुन्या विचारांचे लोक समजत. ही सर्व माहिती रामचंद्र पाल यांना कळली, ते चिडले. त्यांनी मुलाशी संबंध तोडले. ब्राह्मो समाजाचे काम ते अत्यंत निष्ठेने करीत असत.कटक, म्हैसूर व सिल्हेट या ठिकाणी त्यांनी शिक्षकाची नोकरी केली होती. भारतीय समाजाची प्रगती शिक्षणामुळे होईल, असे त्यांचे मत होते.
इ. स. 1880 मध्ये बिपीनचंद्रांनी सिल्हेट या ठिकाणी 'परिदर्शक' या नावाचे बंगाली वृत्तपत्र प्रकाशित केले. तसेच कलकत्ता येथे आल्यावर त्यांना तेथील 'बंगाल पब्लिक ओपिनियन' च्या संपादक मंडळात घेण्यात आले. इ. स. 1887 मध्ये बिपीनचंद्रांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनात पहिल्यांदा भाग घेतला. 'शस्त्रबंदी कायद्याविरुद्ध' त्या ठिकाणी भाषण उत्तेजनापूर्ण आणि प्रेरक ठरले.
इ. स. 1887-88 मध्ये त्यांनी लाहोरच्या 'ट्रिब्यून' चे संपादन केले. इ. स. 1900 मध्ये बिपिनचंद्र पाल पाश्चात्त्य व भारतीय तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथे असलेल्या भारतीयांसाठी 'स्वराज्य' नावाचे मासिक त्यांनी काढले. इ. स. 1901 ला इंग्लंडहून आल्यानंतर कलकत्त्याहून ते 'न्यू इंडिया' नावाचे इंग्रजी साप्ताहिक चालवू लागले. इ. स. 1905 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय जहाल नेत्या समवेत त्यांनी या फाळणीस तीव्र विरोध केला. देशभर जागृती केली. ब्रिटिश सरकारविरुद्ध सर्व देशभर आंदोलन सुरू झाले. यातूनच भारतीय राजकारणात लाल बाल पाल ही त्रिमूर्ती उदयास आली.
इ. स. 1907 च्या ऑक्टोबर महिन्यात अरविंद घोषांविरुद्ध जो राजद्रोहाचा खटला चालला होता, त्यात, न्यायालयाने बिपीनचंद्रांना साक्षीकरिता बोलावीले असता त्यांनी स्वाभिमानपूर्वक नकार दिला. तेव्हा न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपावरून त्यांना सहा महिन्यांची शिक्षा देण्यात आली तसेच याच वर्षी 'वंदे मातरम्' च्या संपादनाचे कार्य त्यांनी केले. बिपीनचंद्र पाल विविध वृत्तपत्रांतून जहाल लेख लिहीत असत. त्यांच्या ब्रिटिशविरोधी लेखनामुळे सरकार त्यांना हद्दपार करण्याच्या विचारात होते पण त्यांनी 1905 ते 1911 पर्यंत स्वतःच हद्दपारी पत्करली व ते इंग्लंड मध्ये जाऊन राहिले. इ. स. 1916 मध्ये लोकमान्य टिळकांच्या होमरूल लीग शिष्टमंडळाबरोबर ते विलायतेस गेले होते.
जेव्हा भारतीय राजकारणाची सूत्र म. गांधींच्या हाती आली. त्या वेळेपासून बिपिनचंद्रांचा भारतीय राजकारणाशी संबंध हळूहळू कमी होत गेला. त्यांनी 1921 मध्ये काँग्रेसचा त्याग केला.
X X
ग्रंथसंपदा:
1. भारतीय राष्ट्रवाद.
X X
विशेषता:
लाल-बाल-पाल या त्रिमूर्तीपैकी एक.
X X
मृत्यू:
20 मे 1932 रोजी त्यांचे निधन झाले.
X X
View, comments and share....



0 Comments