Subscribe Us

header ads

Dhundiraj Govind Phalke (Dadasaheb Phalke): Indian producer-director-screenwriter, known as "The Father of Indian cinema".

Dhundiraj Govind Phalke (Dadasaheb Phalke): Indian producer-director-screenwriter, known as "The Father of Indian cinema". 

दादासाहेब फाळके : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक

जन्मदिन: 30 एप्रिल

स्मृतीदिन:16  फेब्रुवारी


बालपण आणि शिक्षण:

दादासाहेब फाळके यांचे संपूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके असे होते. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 30 एप्रिल 1870 रोजी झाला. त्यांचे वडील गोविंद सदाशिव ऊर्फ दाजीशास्त्री त्र्यंबकेश्वरास भिक्षुकी करीत व पुराण सांगत. त्यांचा संस्कृतचा व्यासंग चांगला असल्याने काही काळ त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात 'संस्कृतचे शास्त्री' म्हणूनही नोकरी केली. त्यामुळे धुंडिराजांचे हायस्कूलचे शिक्षण मुंबईच्या मराठा हायस्कूलमध्ये झाले. इ. स. 1885 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्याच जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये नाव दाखल केले. येथे त्यांनी ड्रॉईंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे इ. स. 1890 मध्ये त्यांनी बडोद्याच्या कला भवनामधून वास्तुकला, साचेकाम याचा अभ्यास केला. याच सुमारास त्यांना प्रोसेस फोटोग्राफी व त्यावरील प्रक्रिया, हाफ्टोन ब्लॉक तयार करणे या गोष्टींचा छंद जडला. तेथील कलाभवनचे प्राचार्य गज्जर यांच्या प्रोत्साहनाने दादासाहेबांनी श्री कलर प्रोसेस, फोटोलिथो छायाचित्रण इत्यादी क्षेतांत विविध प्रयोग केले. बडोद्यात एका इंग्रज जादुगाराचे प्रयोग पाहून त्यांनी जादूविद्या हस्तगत केली व त्यांनी विविध ठिकाणी जादूचे प्रयोगही केले. काही काळ त्यांनी बडोदा व गोवा या ठिकाणी छायाचित्रकार तसेच रंगभूमीचे नेपथ्यकार म्हणूनही कामे केली.

X X

कार्य:

दादासाहेब फाळके यांना इ. स. 1903 मध्ये भारत सरकारच्या पुराणसंशोधन खात्यात प्रारूपकार व छायाचित्रकार म्हणून नोकरी मिळाली; परंतु बंगालच्या फाळणीच्या कारणावरून त्यांनी इ. स. 1906 मध्ये या नोकरीचा राजीनामा दिला.

त्यांनी लोणावळा या ठिकाणी इ. स. 1908 मध्ये 'फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस' ही संस्था सुरू केली. पुढे ती मुंबईतील दादरला हलविली आणि तिचे रूपांतर 'लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स' मध्ये केले. इ. स. 1909 मध्ये ते जर्मनीहून तीन रंगी मुद्रण प्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन आले. त्यांनी काही दिवस 'सुवर्णमाला' हे मराठी-गुजराथी भाषांतील मासिकही चालविले.

इ. स. 1911 मध्ये दादासाहेबांनी 'ख्रिस्ताचे जीवन' या नावाचा मूकपट पाहिला. त्यावरून प्रेरणा घेऊन त्यांनी आपला स्वतःचा चित्रपट व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडला जाऊन त्यांनी चित्रपटनिर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री आणि अन्य वस्तूंची खरेदी केली. त्यासोबतच त्यांनी परदेशातून चित्रपट निर्मितीबाबतचं वाङ्मय मागवून त्याचा अभ्यास केला.

 प्रथम इ. स. 1912 मध्ये त्यांनी 'रोपट्याची वाढ' हा एक मिनिटाचा लघुपट तयार केला. त्यानंतर भारतीय पौराणिक कथांवर चित्रपट काढावे असे त्यांना वाटले. त्यांनी 'फाळके फिल्म कंपनी' काढून तिच्याद्वारे 'राजा हरिश्चंद्र' हा भारतातील पहिला मूक चित्रपट काढला व तो नानासाहेब चित्रे यांच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात दिनांक 8 मे 1913 रोजी प्रदर्शित केला. हाच भारतातील पहिला चित्रपट होय. म्हणूनच दादासाहेब फाळके यांना 'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक' असे म्हटले जाते. आपल्या या पहिल्याच चित्रपटात त्यांनी निर्माता, दिग्दर्शक, लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, संकलनकार, रसायनकार इत्यादी विविध भूमिका एकट्यानेच पार पाडल्या.

दादासाहेब फाळक्यांनी पौराणिक विषयांवरील 'मोहिनी-भस्मासुर' आणि 'सत्यवान सावित्री' हे दोन चित्रपट तयार केले. त्यांनी 'रंगभूमी' नावाचे एक नाटकही लिहिले. इ. स. 1918 मध्ये दादासाहेबांनी 'हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी' स्थापन केली. या कंपनीने 97 चित्रपट काढले. त्यापैकी 40 चित्रपट दादासाहेबांनी दिग्दर्शित केले होते. त्यातील लंकादहन, श्रीकृष्णजन्म, कालियामर्दन इत्यादी चित्रपट विशेष गाजले. इ. स. 1937 मध्ये 'गंगावतरण' या नावाचा बोलपटही काढला.

X X

दादासाहेबांनी तयार केलेले काही लघुपट व अनुबोधपट :

आगकाड्यांची मौज, लक्ष्मीचा गालिचा, धुम्रपानलीला, केल्फाच्या जादू, स्वप्नविहार, सिंहस्थपर्वणी, गंधर्वाचा स्वप्नविहार, खंडाळा घाट, धांदल भटजींचे गंगास्नान, विंचवाचा दंश, खोड मोडली, वचनभंग इत्यादी.

XX

सन्मानार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार:

इ. स. 1970 मध्ये फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत व तंत्रज्ञ यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' प्रतिवर्षी देण्याचा उपक्रम भारत सरकारतर्फे राबविला जातो.

X X

निधन:

16 फेब्रुवारी 1944 रोजी दादासाहेबांचे निधन झाले.

XX


https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-16-day-of-special-dinvishesh.html

👆

February 16 - Day of Special (Dinvishesh)


फेब्रुवारी 16: दिनविशेष


XX


https://www.insearchofknowledge.org/2023/10/dadasaheb-phalke-award-best-award-in.html

👆

Dadasaheb Phalke Award: Best award in Indian cinema

दादासाहेब फाळके पारितोषिक: भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोत्कृष्ट पुरस्कार-स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती

X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/dadasaheb-phalke-award-best-award-in.html

👆

Dadasaheb Phalke Award: Best award in Indian cinema


दादासाहेब फाळके पारितोषिक: भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोत्कृष्ट पुरस्कार-स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती

=======================

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-16-day-of-special-dinvishesh.html

👆

February 16 - Day of Special (Dinvishesh)


फेब्रुवारी 16: दिनविशेष





View, comments and share....

Post a Comment

0 Comments