Sister Nivedita: Irish teacher, author, social activist
भगिनी निवेदिता उर्फ मागरिट एलिजाबेथ सॅम्युअल नोबल:
जन्मदीन :28 ऑक्टोबर
बालपण आणि शिक्षण:
भगिनी निवेदिता यांचे संपूर्ण नाव मागरिट एलिजाबेथ सॅम्युअल नोबल आहे. त्यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1867 रोजी डंगनॉन टायरान (आयर्लंड) या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सॅम्युअल रिचमंड नोबल आणि आईचे नाव मेरी इसाबेल नोबल होते. हॅलीफेंक्स महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या.
X X
कार्य:
शिक्षिका म्हणून इ. स. 1884 मध्ये त्यांनी नोकरी धरली आणि अध्यापनाचे कार्य करू लागल्या. इ. स. 1892 मध्ये त्यांनी विम्बल्डन येथे 'रस्किन स्कूल' या नावाने शाळेची स्थापना केली. तेथे नवीन शिक्षण पद्धतीप्रमाणे शिक्षण मिळत असे.
स्वामी विवेकानंद इ. स. 1895 मध्ये इंग्लंडला गेले असता त्यांच्या सखोल्ल चिंतनाने व नव्या युगाला अत्यंत उपयुक्त अशा विचारांनी भरलेल्या व्याख्यानांनी मागरिट नोबल प्रभावित झाल्या. 28 जानेवारी 1898 रोजी मागरिट नोबल भारतात आल्या. पुढे 25 माच् 1898 रोजी स्वामी विवेकानंदानी त्यांना विधिपूर्वक 'ब्रह्मचारिणी' व्रताची दीक्ष देऊन त्यांचे नाव 'निवेदिता' (निवेदिता म्हणजे जिने आपले जीवन समर्पित केल आहे अशी) असे ठेवले आणि ते पुढे चालून मागरिट नोबल यांनी आपले बदलल नाव खरे करून दाखविले. याच वर्षी कलकत्ता येथे 'निवेदिता बालिका विद्यालया'ची स्थापना त्यांनी केली.
कलकत्त्यात उद्भवलेल्या इ. स. 1899 मध्ये प्लेगच्या साथीत स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्णांची सेवा केली. रामकृष्ण मिशनला मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका इत्यादी देशांचा दौरा केला. इ. स. 1902 मध्ये पुण्यास जाऊन देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या चाफेकर बंधुंच्या आईच्या चरणांना स्पर्श करून तिच्या चरणाची धूळ त्यांनी आपल्या मस्तकी लावली.
इ. स.1905 मध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला.
X X
ग्रंथसंपदा:
1. द मदर,
2. हिंट्स ऑन नॅशनल एज्युकेशन इन इंडिया,
3. वेब ऑफ द इंडियन लाईफ,
4. रिलीजिएन ॲण्ड धर्मा,
5. सिव्हिल ॲण्ड नॅशनल आइडियल्स
X X
मृत्यू:
13 ऑक्टोबर 1911 रोजी दार्जिलिंग (पं. बंगाल) येथे त्यांचे निधन झाले.
X X
View, comments and share....


0 Comments