Subscribe Us

header ads

Bharat Ratna: India's highest honor award

Bharat Ratna: India's highest honor award

भारतरत्न : भारतातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार-स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती



 भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार 2,50,000 रू. रोख व स्मृतिचिन्ह या स्वरूपात दिले जाते लाल बहादूर शास्त्री, के. कामराज, आचार्य विनोबा भावे, श्री. एम.जी. रामचंद्रन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ही पारितोषिके मरणोत्तर दिली गेली. 

खान अब्दुल गफारखान व नेल्सन मंडेला अभारतीय गृहस्थ आहेत.

x x

भारतरत्न:

1. 1954 मध्ये सी राजगोपालाचारी हे भारताचे एकमेव आणि शेवटचे गव्हर्नर जनरल होते तसेच ते मद्रास राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला.

2. 1954 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून 1968 ते 77 मध्ये काम केले. ते भारताचे 1952 ते 62 या काळात उपराष्ट्रपती होते पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


3. 1954 मध्ये डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण (C.V.) भारताचे अनुशास्त्रज्ञ आणि चुंबकीय शास्त्रामध्ये संशोधन करणारे तसेच रमण इफेक्ट चे निर्माते जनक ज्यामुळे त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.

4. 1955 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील व नंतरच्या काळातील महत्त्वाचे नेते देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यांनी 1947 ते 64 पर्यंत काम केले त्यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून 14 नोव्हेंबर साजरा केला जातो असे पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

5. 1955 मध्ये डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे दिवाने मैसूर म्हणून त्यांनी 1912 ते 18 या दरम्यान काम केले त्यांचा जन्मदिवस हा इंजीनियरिंग डे 15 सप्टेंबर म्हणून साजरा केला जातो त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केल्या गेले.


6. 1955 मध्ये महात्मा गांधीजी बरोबर काम करणारे व ज्यांनी काशी विद्यापीठाची स्थापना तसेच बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना त्यांनी मदन मोहन मालवीय यांच्यासोबत स्थापना केली.असे भगवानदास यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केल्या गेले.

7. 1957 मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक प्रमुख नेते गोविंद वल्लभ पंत त्यांनी 1950 ते 1954 या कालखंडात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केले त्यानंतर ते 1955 ते 1961 या कालखंडामध्ये देशाचे गृहमंत्री म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


8. 1958 मध्ये भारतीय समाज सुधारक ज्यांनी महिलांचे शिक्षण आणि विधवा विवाह याला चालना दिली. 1883 मध्ये widow मॅरेज असोसिएशनची स्थापना करून 896 मध्ये widow होम आणि 1976 मध्ये दामोदर ठाकरसी वुमन्स युनिव्हर्सिटी ची मुंबईला स्थापना केली. असे थोर समाज सुधारक धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

9. 1961 मध्ये ज्यांना मेकर ऑफ मॉडर्न वेस्ट बंगाल या नावाने संबोधतात ते स्वतः डॉक्टर होते त्यांनी 1948 ते 1962 या कालखंडात पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या स्मरणार्थ 1 जुलै हा दिवस नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून दरवर्षी साजरा केला जातो असे बिधानचंद्र रॉय यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

x x


10. 1961 मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक महत्त्वपूर्ण नेते ज्यांना राजर्षी म्हणून ओळखले जायचे . भारतात हिंदी भाषेला अधिकृत भाषा बनविण्यासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे त्यांना पुरुषोत्तम दास टंडन भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

11. 1962 मध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असहकार चळवळीचे प्रमुख नेते महात्मा गांधी यांच्याबरोबर काम केलेले आणि 1950 ते 1962 या कालखंडात भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असे डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

12. 1963 मध्ये संस्कृत मध्ये उत्कृष्ट प्राविण्य मिळवलेले व ज्यांना five volume literary masterpiece म्हणून ओळखले जाते. त्यांनी history of Dharma Shastra ancient and medieval religious and civil law in India 6500 पाणी ग्रंथ लिहून पूर्ण केला असे  पांडुरंग वामन काने यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


13. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख लढवय्ये नेते लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हे घोषवाक्य दिले व 1966 मध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

14. 1971 मध्ये भारताच्या पंतप्रधान ज्यांना आयरन लेडी ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते त्या 1966 ते 1971 या कालखंडात प्रधानमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर 1980 ते 84 मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्या त्यांनी त्यांच्या सरकारने बांगलादेश लिबरेशन वारला सपोर्ट दिला. ज्या मधून बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती झाली अशा श्रीमती इंदिरा गांधी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

15. 1975 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1926 ला all India trade union Congress first president म्हणून नियुक्ती ज्यांची झाली देश स्वतंत्र झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री यांनी काम केले व त्यानंतर 1969 ते 1974 या कालखंडात देशाचे चौथे राष्ट्रपती म्हणून त्यांची नेमणूक झाली असे वी वी गिरी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

16. 1976 मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक प्रमुख नेते व त्यानंतर तामिळनाडूचे 1954 ते 1963 या कालखंडातील मुख्यमंत्री म्हणून यांनी उत्कृष्ट काम केले असे के के कामराज यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


17. 1980 मध्ये ज्यांनी मशिनरी ऑफ चारिटी हे पश्चिम बंगालमधील कलकत्ता या ठिकाणी सुरुवात करून सामाजिक कार्य उत्कृष्ट केल्याबद्दल त्यांना 1979 मध्ये नोबल पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले अशा संत मदर टेरेसा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

18. 1983 मध्ये भारतातील एक स्वातंत्र्य सेनानी तसेच समाज सुधारक यांनी महात्मा गांधींच्या समावेत उत्कृष्ट कामगिरी केली.ज्यांना भूदान चळवळीसाठी सुद्धा ओळखले जाते. त्यांना 1958 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल रमण मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असे आचार्य विनोबा भावे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

19. 1987 मध्ये महात्मा गांधीजींचे शिष्य ज्यांना फ्रंटटायर गांधी म्हणून ओळखले जाते. ज्यांनी देशात 1920 मध्ये खिलाफत चळवळ सुरू केली त्यानंतर 1929 मध्ये खुदाई खिदमतगार चळवळ सुरू केली असे खान अब्दुल गफार खान यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.

x x

20. 1988 मध्ये तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केलेले अभिनेते ज्यांनी 1977 ते 1987 मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून उत्कृष्ट काम केले असे एम.जी. रामचंद्रन यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


21. 1990 मध्ये भारतातील थोर समाज सुधारक व दलित समाजाचे आधारस्तंभ यांनी दलित समाजासाठी खूप महत्त्वाचे योगदान आपल्या कार्यातून दिले. त्यांनी घटनेचा मसुदा तयार केला आणि भारताचे ते पहिले कायदामंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व त्यांनी 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले.

22. 1990 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे स्वातंत्र्य सेनानी व राष्ट्रपती ते 1994 ते 1999 या कालखंडात होते. ते Anti apartheid moment leader होते. त्यांना 1993 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गांधी विचारसरणीचे ते प्रेरित असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेत त्यांना Gandhi of South Africa असेही संबोधत. नेल्सन मंडेला त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

23. 1991 मध्ये एक स्वातंत्र्य सेनानी भारताचे लोहपुरुष समाज सुधारक भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान म्हणून ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांना भारताचे आयर्न मॅन ऑफ इंडिया असे सुद्धा संबोधले जाते असे सरदार वल्लभभाई पटेल यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

24. 1991 मध्ये ज्यांनी 1977 ते 1979 या कालखंडात देशाचे सावे प्रधानमंत्री म्हणून काम केले त्यांना निशान ए पाकिस्तान नावाचा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक किताब देण्यात आला असे मोरारजी देसाई यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

25. 1992 मध्ये भारतातील एक उद्योगपती भारतामध्ये एअर इंडिया देशाची पहिली विमान कंपनी यांनी सुरू केली त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ची स्थापना केली. तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, टाटा मोटर्स आणि टीसीएस हे उद्योग समूह ज्यांनी निर्माण केले. असे उद्योगपती जे आर डी टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

26. 1992 मध्ये भारतातील एक स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी सगळ्यांना शिक्षण यासाठी पुढाकार घेतला. ते देशाचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून उत्कृष्ट काम केली. त्यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर हा नॅशनल एज्युकेशन डे म्हणून देशभरात साजरा केला जातो असे अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

27. 1992 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील चित्रपट निर्माते ज्यांनी भारतीय सिनेमाला जागतिक दर्जाची ओळख निर्माण करून दिली व ज्यांना 1984 मध्ये सिनेसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला असे सत्यजित रे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

28. 1997 मध्ये एक भारतातील एक स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी 1964 ते 1966 मध्ये देशाचे इंटेरिअम प्राईम मिनिस्टर म्हणून उत्कृष्ट काम केले असे गुलझारीला नंदा यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

29. 1997 मध्ये भारताचे मिसाईल मॅन म्हणून ज्यांची ओळख सातासमुद्रापलीकडे आहे ज्यांनी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च मध्ये उत्कृष्ट काम केले व ज्यांनी 2002 ते 2007 या कालखंडात देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. असे ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

x x

30. 1997 मध्ये भारताच्या चळवळीतील 1942 च्या quit India momentच्या वेळी ज्यांनी भारताचा ध्वज फडकवला होता. तसेच त्या दिल्लीच्या 1958 मध्ये पहिल्या मेयर म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

31. 1998 मध्ये भारतातील एक स्वातंत्र्य सेनानी तसेच समाज सुधारक ज्यांना लोक लोकनायक म्हणून सुद्धा ओळखतात ज्यांनी टोटल रेवोल्युशन मोमेंट ह्या चळवळीला जेपी मोमेंट म्हणून सुद्धा देशात ओळख प्राप्त करून दिली. अशा या चळवळीचे मुख्य उद्देश हा भ्रष्टाचार विरोधी सरकार बदलणे असा होता. असे स्वातंत्र्य सेनानी जयप्रकाश नारायण यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

32. 1998 मध्ये भारतात हरितक्रांती स्थापना करण्याबद्दल ओळखले जाणारे, 1964 ते 1966 मध्ये देशाचे कृषिमंत्री राहिलेले व 1970 मध्ये ज्यांनी मेक्सिकोच्या इंटरनॅशनल मेज अँड व्हीट रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये काम केलेले. तसेच मनिलाच्या इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा अभ्यास करून देशात परत आलेले. असे चिदंबरम सुब्रमण्यम यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

33. 1999 मध्ये भारतातील एक सतार वादक ज्यांनी चार वेळा ग्रामी अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. त्यांना the world's best known exponent of Hindustani classical music म्हणून ओळखले जाते असे पंडित रविशंकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

x x

34. 1999 मध्ये भारतातील एक अर्थशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ यांनी समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र मधल्या विविध विषयावर सखोल असा अभ्यास पूर्ण विवेचन जगासमोर मांडले . ज्यांना 1998 मध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल मेमोरियल प्राईस प्रदान करण्यात आले असे अमर्त्य सेन यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

35. 1999 मध्ये भारतीय स्वातंत्र्यातील एक स्वातंत्र्य निर्णय सेनानी व समाज सुधारक ज्यांनी 1946 ते 1950 मध्ये आसाम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली असे गोपीनाथ बोर्डोलाई यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

36. 2001 मध्ये भारताच्या गानसम्राज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्यांनी 1940 मध्ये आपल्या गायन या करिअरची सुरुवात केली त्यांनी एकूण 36 भाषांमध्ये गायनिक गायली त्याबद्दल त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला अशा गानसम्राज्ञ लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

37. 2001 मध्ये शहनाई वादक ज्यांनी भारतीय शहनाईला भारतीय संगीतामध्ये महत्त्वाचे स्थान मिळवून दिले असे हे हिंदुस्तानी क्लासिकल शहनाई परफॉर्मर " म्हणून ज्यांची ओळख जगाला आहे असे उस्ताद बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

38. 2009 मध्ये भारतीय शास्त्रीय संगीत गायक ज्यांना त्यांच्या mystery over rhythm and exact notes बद्दल ओळखले जाते संगीतामध्ये केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शास्त्रीय संगीतकार पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

39. 2014 मध्ये क्रीडा भारतीय क्रीडा क्षेत्रातील भारतीय क्रिकेटर म्हणून ज्यांची जगाला ओळख आहे. ज्यांना क्रिकेटचा देव असे म्हटले जाते त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून आपल्या क्रिकेट खेळण्याच्या कारकिर्दीत सुरुवात केली ज्यांच्या नावावर अनेक जागतिक रेकॉर्ड्स आहेत. त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

40. 2014 मध्ये भारतातील एक प्रोफेसर आणि संशोधक ज्यांच्या सॉलिड स्टेट अँड मटेरियल केमिस्ट्री स्पेक्ट्रोस्कॉपी आणि मॉलिक्युलर स्ट्रक्चर मधल्या संशोधनाबद्दल ती जागतिक पातळीवर ओळखले जातात. त्यांनी एकूण 63 विद्यापीठामधून त्यांना अनररी डॉक्टरेट्स मिळालेल्या आहेत. त्यांचे आत्तापर्यंत 48 पुस्तके प्रसिद्ध आहेत. असे सी एन आर राव यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

41. 2015 मध्ये भारताच्या स्वतंत्र पूर्व काळांमधील शैक्षणिक कार्याबद्दल ओळखले जाणारे ज्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना व अखिल भारतीय हिंदू महासभेची स्थापना केली तसेच त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसचे चार वेळा नेतृत्व केले असे पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

x x

42. 2015 मध्ये 40 वर्ष देशाच्या पार्लमेंटचे सदस्य असणारे ज्यांनी तीन वेळा देशाचे पंतप्रधान पद भूषवले व उत्कृष्ट कामगिरी केली. ज्यांनी मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स म्हणून सुद्धा काम केलेले आहे. त्यांना 1994 मध्ये बेस्ट पार्लमेंटरीयन पुरस्कार प्रदान करण्यात आला. असे उत्कृष्ट पंतप्रधान व कवी अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

43. 2019 मध्ये भारतातील एक उत्कृष्ट राजकारणी यांनी 2012 ते 2017 मध्ये भारताचे तेरावे राष्ट्रपती पद भूषवून अतिशय छान काम केले. तसेच ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे महत्त्वाचे सदस्य होते. 2009 ते 2012 मध्ये त्यांनी देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री पदी उत्कृष्ट कामगिरी केली. असे प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

44. 2019 मध्ये भारतातील असामी भाषेतील एक गायक ज्यांना Sudhakantha म्हणून सुद्धा ओळखले जाते. कवी, गायक गीतकार वादक असून त्या चित्रपट निर्माते सुद्धा आहेत. त्यांना चित्रपटसृष्टीतील 1992 चा दादासाहेब फाळके पुरस्कार 1977 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केल्या गेले अशा भूपेन हजारिका यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

45. 2019 मध्ये भारतातील एक समाज सुधारक ज्यांनी शिक्षण आरोग्य तसेच ग्रामीण स्वातंत्र्य यावर उत्कृष्ट काम केले. असे भारतीय जनसंघाचे मुख्य नेते तसेच राज्यसभेचे सदस्य त्यांना 1950 मध्ये पद्मविभूषण अवॉर्ड देण्यात आले. असे नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



x x

महाराष्ट्रातील भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे सन्माननीय व्यक्ती


1. 1958 मध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2. 1963 मध्ये समाजसेवा या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पांडुरंग वामन काने यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.

3. 1983 मध्ये समाजसेवा या सामाजिक कार्याबद्दल आचार्य विनोबा भावे यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.

4. 1990 मध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्य बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

5. 1992 मध्ये उद्योग समूहातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जे आर डी टाटा यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

6. 2001 मध्ये सिनेसृष्टीतील कला गायन या क्षेत्राबद्दल उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गायिका लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

7. 2008 मध्ये गायन क्षेत्रातील कलेमुळे अतिशय प्रसिद्ध असलेले भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

8. 2014 मध्ये क्रीडा क्षेत्रात तीन क्रिकेट या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

9. 2019 मध्ये सामाजिक सेवा उत्कृष्ट केल्याबद्दल नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.


1993 सालच्या प्रजासत्ताक दिनी भारतरत्न पुरस्कार न्यायालयीन स्थगिती आदेशामुळे करण्यात आले नाही.







x x

View, Comments and share....

Post a Comment

1 Comments