Nana Patil: Krantisinh, Indian independence activist, freedom fighter and Member of Parliament
क्रांतिसिंह नाना पाटील: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी
3 ऑगस्ट: जन्मदिन
6 डिसेंबर: स्मृतिदिन
बालपण आणि शिक्षण:
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील बहे बोरगाव या ठिकाणी झाला. नानांचे संपूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ हे होते. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र चे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र पाटील व आईचे नाव गोजराबाई हे होते नानांनी मराठी पर्यंतचे सातवीपर्यंत शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत कसेबसे गावी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी त्याकाळची मुलकी परीक्षा उत्तीर्ण झाले तलाठ्याची काही कारणांनी नोकरी केली.
X X
सत्यशोधक समाज विचारसरणीचा प्रभाव:
नाना पाटील यांच्यावर महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज त्याच्या विचारसरणीचा प्रचंड प्रभाव होता. त्यांनी सत्यशोधक समाजाचे सदस्यत्व स्वीकारून व सत्यशोधक समाजाचा प्रचारक म्हणून सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचा प्रचार आणि प्रसार केला. समाजातील अंधश्रद्धा, देव भोळ्या समजुती, जातीभेद, हुंडा पद्धती याविरुद्ध त्यांनी कठोर प्रहार केले व सामाजिक सुधारणेच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केले. तसेच राजे छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक कार्यांचा सुद्धा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन त्यांनी बहुजनांसाठी खूप मोठी चळवळ पुढील काळात उभी केली.
स्वातंत्र्य चळवळीत सहभाग:
आपण देशासाठी काहीतरी करावे या हेतूने नाना पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग 1926 नंतर प्रत्यक्ष घेतला. काँग्रेसमध्ये सामील होऊन परकीय ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. त्यासाठी त्यांनी आपली तलाठ्याची नोकरी सोडून प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले.
समाजातील सामान्य लोकांनी सावकारशाहीच्या पाशात अडकू नये म्हणून त्यांनी सावकार शाही विरुद्ध प्रचाराची सुद्धा एक आघाडी उघडली. समाजातील लोकांचे शोषण करणाऱ्या स्वार्थी सावकारशाही व इतर अन्य मार्गाने अन्याय करणाऱ्याच्या विरुद्ध, लुबाडणूक करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार करून जनजागृती केली.
X X
जंगल सत्याग्रहात सहभाग:
महात्मा गांधींनी 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ जेव्हा सुरू केली होता. तेव्हा या चळवळीचा एक भाग म्हणून जंगल सत्याग्रह करण्यात आला. त्यावेळी नानांनी सांगली जिल्ह्यातील जंगल सत्याग्रहात सहभाग प्रत्यक्ष नोंदवला. त्यामुळे नानांना या सत्याग्रहामुळे दोन वेळा कारावासाची शिक्षा भोगावी लागली त्यांना तुरुंगात जावे लागेल.
तसेच महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम 1940 मध्ये सुरू केली. नाना पाटलांनी या मोहिमेत सुद्धा दोन वेळा सत्याग्रह केला आणि दोन्ही वेळा त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.
प्रतिसरकार ची स्थापना:
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील चले जाव चा 1942 च्या आंदोलनातील नानांचे कार्य अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्या गेले व चीरस्मरणीय होते. या आंदोलन काळात नानांनी सातारा जिल्ह्यात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात "प्रतिसरकार " ची स्थापना केली. ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार हे सूत्र त्यांनी 1942च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. नाना पाटील हे स्थानिक जनसमुदायांच्या पातळीवर प्रतिसरकारचे प्रमुख मानले जात होते. प्रतिसरकारणे अनेक दलांची स्थापना केली. त्यात तुफान सेना नावाची स्वतःची सेना उभारली. या तुफानी सेनादलाचे फिल्ड मार्शल जी डी लाड (बापू) व कॅप्टन आकाराम पवार दादा हे होते. या दलाची युद्ध शाळा प्रशिक्षण केंद्र कुंडल या ठिकाणी होते या दलामध्ये 5000 जवानांच्या दोनशे शाखा वेगवेगळ्या गावांमध्ये काम करत असत. हे जवान तलवार जांभिया या प्रशिक्षणासोबतच पिस्तूल चालवणे बॉम्ब गोळे फेकण्याचे प्रशिक्षण सुद्धा घेतलेले होते. आपली स्वतंत्र न्यायदालन व्यवस्था निर्माण करून गोरगरीब जनतेला त्वरित न्याय मिळावा यासाठी त्यांनी व्यवस्था केली. याशिवाय अस्पृश्यता निवारण , ग्रामसफाई, साक्षरता प्रसार, दारूबंदी, हुंडाबंदी, स्वदेशीचा पुरस्कार यासारखे अनेक विधायक कामेही प्रतिसरकारच्या हाती घेतली व ती अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी पार पाडली. प्रतिसरकार हे ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलनात सहभागी झाले. नानांची प्रतिसरकार हे पत्रीसरकार म्हणून सुद्धा ओळखले जात होते. नाना पाटील आणि त्यांचे सहकारी जुलमी सावकार , अधिकारी आणि फितुरांना दोन्ही पाय बांधून टाचेवर काठीचे तडाखे मारण्याची कठोर शिक्षा देत असत. या शिक्षेला सामान्य लोक ' पत्री मारणे ' म्हणत . त्यावरून या सरकारलाही ' पत्रीसरकार ' म्हणून ओळखले जाऊ लागले. 1943 ते 1947 या काळामध्ये 15000 गावांमध्ये प्रतिसरकार काम करत होते.
स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या दरम्यान नाना पाटील व त्यांचे सहकारी 44 महिने भूमिगत राहिले. सर्व युवकांना घेऊन भूमिगत राहूनच प्रतिसरकारचे कार्य चालू ठेवले. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांनी आपली स्वतंत्र शासन यंत्रणा निर्माण केली. किसन वीर व वसंतदादा पाटील या गटात सामील झाले . काही काळातच यशवंतराव चव्हाणही या गटाला येऊन मिळाले . त्यावेळी सांगली व सातारा जिल्ह्यात इंग्रजांवर खूप मोठी दहशत प्रति सरकारच्या माध्यमातून निर्माण झाली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. नाना पाटील हे या प्रतिसरकारचे प्रणेते व नेते होते.26 मे 1966 साली मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये भरलेल्या सभेत आचार्य अत्रे यांनी क्रांतिकारक नाना पाटील यांना ‘क्रांतीसिंह’ ही पदवी बहाल केली. त्या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना सर्व जनता समाज "क्रांतीसिंह" म्हणून ओळखले जाऊ लागले.प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
X X
शेतकरी कामगार पक्ष व कम्युनिस्ट पक्ष प्रवेश:
नाना पाटलांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथम शेतकरी कामगार पक्षात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी कम्युनिस्ट पक्षांमध्ये प्रत्यक्ष काम करू लागले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी अनेक लढे उभारले. शेतकऱ्यांच्या आवश्यक असणाऱ्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी खूप आंदोलने केली. शेतकरी वर्गाला त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेऊन ते 1955 मध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील विविध चळवळीत सहभाग:
स्वतंत्र प्राप्तीनंतर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चळवळीमध्ये क्रांतीसिंह नानांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन खूप मोठे कार्य केले. त्यांनी कोल्हापूर संस्थानातील प्रजा परिषदेच्या चळवळीस व मराठवाड्यातील रजाकार विरोधी चळवळीस त्यांनी मराठी भाषिक प्रदेशाचे महाराष्ट्रात विलनीकरण व्हावे म्हणून खूप मोठा लढा उभारला होता. त्यामध्ये नानांचा खूप मोठा सहभाग होता. नानांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही सहभाग नोंदवला होता. त्यांचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. ग्रामीण समाजात लोकजागृतीचे कार्य त्यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडले. अनेक जण आंदोलनात भाग घेऊन त्यांनी कारावासही भोगला.
X X
लोकसभेचे सदस्य-खासदार:
क्रांतिसिंह नाना पाटील हे लोकसभेचे दोन वेळेस सदस्य खासदार म्हणून निवडून आले व त्यांनी अतिशय छान पद्धतीने अनेक प्रश्न लोकसभेत प्रखरपणे मांडत असत व ते सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत प्रभावीपणे कार्य करत असात.
सर्वप्रथम ते उत्तर सातारा लोकसभा मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून 1957 ते 62 या काळात लोकसभेचे खासदार म्हणून निवडून लोकसभेवर गेले.
दुसऱ्यांदा ते बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून 1967 ते 1971 मध्ये लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले.
क्रांतिसिंह नाना पाटील हे दोन्ही वेळा पण निवडून लोकसभेमध्ये गेल्यानंतर संसदेमध्ये त्यांनी मराठीतून भाषण करत असत. मराठीतून भाषण करणारे ते पहिले महाराष्ट्रीयन खासदार आहेत.
निधन:
क्रांतीसिंह नाना पाटील यांचे निधन वयाच्या 76 व्या वर्षी 6 डिसेंबर 1976 मध्ये वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी झाले.
View, Comments and share........
X X

.jpg)






1 Comments
Nice 👍
ReplyDelete