Modern History of India -5
आधुनिक भारताचा इतिहास -5
राष्ट्रीय चळवळ (1885 ते 1919)
1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 च्या 28 डिसेंबर रोजी स्थापन झाली.
2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए. ओ. हयूम यांनी केली.
3. जन्माने स्कॉटिश असलेले सर ए. ओ. ह्यूम हे सनदी नोकर होते.
4. काँग्रेसचे (राष्ट्रसभेचे) पहिले अधिवेशन इ. स. 1885 साली मुंबई येथे भरले होते.
5. लॉर्ड डफरिन हा कॉंग्रेसच्या स्थापनेच्यावेळी भारताचा व्हॉईसराय होता.
6. राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते.
7. स्वा. सावरकरांनी इ. स. 1904 साली क्रांतिकारकांची अभिनव भारत ही संघटना स्थापन केली.
8. अनुशीलन समिती ही क्रांतीकारी संघटना बंगाल प्रांतात कार्यरत होती.
9. इ. स. 1904 च्या मुंबई कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सर हेन्री कॉटन होते.
10. राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते.
11. स्टॅट्यूटरी सिव्हील सर्व्हस लॉर्ड लिटनने सुरू केली.
12. स्टॅट्यूटरी सिव्हील सर्व्हस लॉर्ड लान्सडाऊन या व्हॉईसरायने बंद केली.
13. पुण्यामध्ये प्लेगची साथ इ. स. 1899 साली आली होती.
14. पुण्याच्या जुलमी प्लेग कमिशनर रँडचा वध दामोदर चाफेकरांनी केला.
15. रँड हया अधिकाऱ्याचा खून लॉर्ड एल्गिन दुसरा या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत झाला.
16. इ. स. 1897 साली लोकमान्य टिळकांवर भरलेल्या राजद्रोहाच्या खटल्यात त्यांना दीड वर्षाची शिक्षा झाली.
17. भारतीय चलन कायदा लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत इ. स. 1899 साली संमत झाला.
18. लॉर्ड कर्झनने इ. स. 1901 साली इंपिरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली.
19. लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत भारतासाठी सुवर्णप्रमाण स्विकारण्यात आले.
20. अभिनव भारतच्या अनंत कान्हेरे या क्रांतीकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला.
21. लॉर्ड कर्झनने इ. स. 1904 साली विद्यापीठ कायदा संमत केला.
22. लॉर्ड कर्झनने इ. स. 1904 साली प्राचीन स्मारक कायदा संमत केला.
23. बंगालची फाळणी इ. स. 1905 साली झाली.
24. बंगालच्या फाळणीमुळे कापूस व ज्यूट या क्षेत्रातील कारखान्यांना सर्वात जास्त झळ पोहचली.
25. स्वा. सावरकरांनी इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे जीवन चरित्र लिहिले.
X X
26. सावरकरांनी मॅझिनीचे चरित्र इ. स. 1906 मध्ये लिहिले.
27. 1886, 1893 व 1906 असे तीन वेळा राष्ट्रसभेचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा मान दादाभाई नौरोजींनी मिळविला होता.
28. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ह्या चतुःसूत्रीचे धडाडीचे पुरस्कर्ते लो. टिळक होते.
29. स्वदेशी चळवळ म्हणजे ब्रिटिश बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालणे.
30. भारतीयांना स्वराज्याचा मंत्र लोकमान्य टिळकांनी दिला.
31. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच' हे उद्गार लो. टिळकांनी काढले.
32. आगाखान यांनी इ. स. 1906 साली मुस्लीम लिगची स्थापना केली.
33. इ.स. 1907 साली काँग्रेसचे तेविसावे अधिवेशन सुरत येथे भरले होते.
34. इ. स. 1907 च्या सुरत कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी घोष होते.
35. राष्ट्रसभेमध्ये जहाल गटाचा उदय होण्यास बंगालची फाळणी ही बाव विशेषत्वाने कारणीभूत ठरली.
36. जहाल गटाचा महाराष्ट्र, पंजाब व बंगाल या प्रांतात सर्वात जास्त प्रभाव होता.
37. इ.स. 1906 साली अहमदनगर येथील भाषणाबद्दल टिळकांवर खटला भरला गेला.
38. बॅ. जिनांनी 1906 च्या राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांची वकिली केली होती.
39. लोकमान्य टिळकांना इ. स. 1908 साली मंडालेच्या तुरूंगात पाठविण्यात आले.
40. लोकमान्य टिळकांनी ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरूंगात सहा वर्षाची शिक्षा भोगली.
41. गदर हे वर्तमानपत्र गदर पार्टीचे नेते लाला हरदयाळ यांनी चालविले होते.
42. अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळांनी केली होती.
43. भारताची राजधानी कलकत्याहून दिल्लीला आणण्याची घोषणा पंचम जॉर्जने केली.
44. लॉर्ड हार्डीग्जच्या काळात भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला गेली.
45. 12 डिसेंबर, 1991 रोजी दिल्ली येथे दरबार भरवून बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्जने केली.
46. लाल-बाल-पाल हे राष्ट्रसभेचे तीन प्रमुख जहाल नेते होते.
47. लॉर्ड हार्डीग्जवर रासबिहारी घोषने बाँबहल्ला केला होता.
48. अरविंद घोष हे जहालवादी नंतर आध्यात्मिक नेत्यात परिवर्तित झाले.
49. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरूंगातून इ. स. 1914 या वर्षी सुटून आले.
50. लोकमान्य टिळकांनी एकही वेळा कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविले नाही.
X X
51. "ईश्वर जर अस्पृश्यता मानत असेल तर मी ईश्वरालाच मानणार नाही' अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी अस्पृश्यतेचा धिक्कार केला होता.
52. पंजाब केसरी म्हणून लाला लजपतरायांस संबोधले जाते.
53. 'न्यू इंडिया' हे वर्तमानपत्र विपीनचंद्र पालांनी सुरू केले होते.
54. राष्ट्रसभेच्या लखनौ अधिवेशनात इ. स. 1916 साली जहाल व मवाळांत तडजोड झाली.
55. राष्ट्रसभेच्या 1916 मधील अधिवेशनाचे अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार होते.
56. कॉंग्रेस व मुस्लीम लीगमध्ये इ. स. 1916 साली लखनौ करारान्वये समझोता झाला.
57. होमरूल चळवळ ॲनी बेझंट यांनी सुरू केली होती.
58. होमरूल लीगची स्थापना इ. स. 1916 साली झाली.
59. लो. टिळकांनी ॲनी बेझंटच्या मदतीने महाराष्ट्रात होमरूल लिगची स्थापना केली.
60. राष्ट्रसभेच्या 1917 च्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षा ॲनी बेझंट होत्या.
61. भारतासाठी जबाबदार राज्यपद्धतीची घोषणा 20 ऑगस्ट, 1917 रोजी झाली.
62. भारतासाठी जबाबदार राज्यपद्धतीची घोषणा माँटेंग्यू या भारतमंत्र्याने केली.
63. भारतासाठी जबाबदार राज्यपद्धती घोषित झाली त्यावेळी लॉर्ड चेल्मस्फोर्ड हे भारताचे व्हॉईसरॉय होते.
64. लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारितेची घोषणा इ. स. 1919 ला केली.
65. वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतीकारक या नावाने संबोधले जाते.
66. हिंदूस्थान सोशॉलिस्ट रिपब्लीकन असोसिएशनची स्थापना चंद्रशेखर आझाद यांनी केली.
67. काँग्रेस सोशॉलिस्ट पार्टीची स्थापना आचार्य नरेंद्रदेव यांनी केली.
68. नरेंद्र गोस्वामी हा कलकत्ता बाँबस्फोट खटल्यातील माफीचा साक्षीदार होता.
69. कन्हैयालाल दत्त व सत्येंद्रनाथ बोस यांनी नरेंद्र गोस्वामीस ठार केले.
70. सैद अहमदखान यांनी अलिगढ येथे मोमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज काढले.
71. सर सैद अहमदखान अलीगढ चळवळीशी संबंधित होते.
72. गोपाल कृष्ण गोखल्यांचे गुरू न्या. म. गो. रानडे होते.
73. 'वंदे मातरम्' हे इंग्रजी साप्ताहिक अरविंद घोषांनी काढले होते.
74. बारिंद्रकुमार घोष हे अरविंद घोषाचे बंधू होते.
75. भूपेंद्रनाथ दत्त स्वामी विवेकानंदाचे बंधू होते.
X X
76. गुरु रामसिंगांनी इंग्रजांविरूद्ध नामधारी शीख चळवळ /कुका चळवळ उभारली होती.
77. गुरू रामसिंगांनी पंजाबमध्ये जणु प्रतिसरकारच निर्माण केले होते.
78. कलेक्टर किंग्जफोर्ड कलकत्ता प्रांताचा मॅजिस्ट्रेट होता.
79. खुदीराम बोस व प्रफुल्लचंद्र चार्कोनी किंग्जफोर्डच्या वधाचा प्रयत्न केला होता.
80. जपानमध्ये इंडियन नॅशनल पार्टीची स्थापना रासबिहारी घोषांनी केली.
81. इंडिया हाऊसच्या मदनलाल धिंग्रा या क्रांतीकारकाने कर्झन वायलीचा वध केला.
82. कानपूर व मीरत कटातील खटल्यात क्रांतीकारी व दहशतवाक्यांना शिक्षा देण्यात आली.
83. कायदेमंडळात बाँबस्फोट घडवून आणण्यात भगतसिंगांना बटुकेश्वर दत्तने साथ दिली.
84. राजकारणात नसतो तर गणिताचा प्रोफेसर झालो असतो असे लो. टिळक म्हणत.
85. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना भारतीय 'राष्ट्रवादाचे जनक' म्हणतात.
86. लो. टिळक हे संस्कृतबरोबरच गणिताची आवड असणारी राजकारणी व्यक्ति होते.
87. 'गीतारहस्य' हा ग्रंथ बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिला.
88. सर व्हॅलेंटिन चिरोल हे लोकमान्य टिळकांना 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणत.
89. गांधीजींच्या पूर्वी राजकीय क्षितीजावर जहालवाद्यांचे नेतृत्व लो. टिळकांनी केले.
90. इ. स. 1920 नंतर जहालवाद संपुष्टात आला.
View, Comments and share......






1 Comments
👍
ReplyDelete