Modern History of India -7
Mahatma Gandhi and India's Freedom Struggle
महात्मा गांधी व भारताचा स्वातंत्र्य लढा
1. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर, 1869 रोजी पोरबंदर येथे झाला.
2. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी, 1915 रोजी भारतात (मुंबईत) आले.
3. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून जहाजाने परत येऊन मुंबईच्या अपोलो बंदरात उतरले.
4. महात्मा गांधींना हार्डीग्जने द. आफ्रिकेतील कार्याबद्दल 'कैसर-ए-हिंद' ही पदवी दिली.
5. महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत इंडियन ओपीनियन हे वृत्तपत्र सुरू केले.
6. महात्मा गांधींच्या पूर्वी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे होते.
7. महात्मा गांधींचा भारताच्या राजकीय क्षितिजावर इ. स. 1920 साली उदय झाला.
8. महात्मा गांधींनी इ. स. 1920 नंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले.
9. महात्मा गांधींनी भारतीय राष्ट्रीय आंदोलनाच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू केले.
10. महात्मा गांधींनी चंपारण्य येथे सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला.
11. महात्मा गांधींनी चंपारण्यातील नीळ कामगारांच्या लढ्याचे नेतृत्व केले.
12. गो. कृ. गोखले हे महात्मा गांधींजींचे राजकीय गुरू होते.
13. अखिल भारतीय स्तरावर पहिला सत्याग्रह इ. स. 1919 साली रौलेट ॲक्टविरूद्ध झाला.
14. महात्मा गांधींची इ. स. 1919 च्या खिलाफत चळवळीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
15. महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली होती.
16. असहकार चळवळीचा ठराव कलकत्ता अधिवेशनात संमत झाला.
17. असहकाराचा लढा 1 ऑगस्ट, 1920 या दिवशी सुरू झाला.
18. इ. स. 1920 च्या असहकार चळवळीनंतर महात्मा गांधींना अटक करून साबरमती जेलमध्ये ठेवण्यात आले.
19. असहकार चळवळीने इ. स. 1921 या वर्षी देशव्यापी स्वरूप घेतले होते.
20. उत्तरप्रदेशातील संयुक्त प्रांतात चौरीचौरा येथे चळवळीने हिंसात्मक स्वरूप घेतले होते.
21. चौरीचौरा हत्याकांड 1922 सालच्या 5 फेब्रुवारी या तारखेस घडले.
22. गांधीजींनी चौरीचौरा घटनेने व्यथीत होऊन इ. स. 1922 साली असहकार चळवळ मागे घेतली.
23. म. गांधींनी इ. स. 1928-29 या वर्षी संपूर्ण देशाचा तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास केला.
24. गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळीस दांडी मार्च या कार्यक्रमाने सुरूवात झाली.
X X
25. गांधीजींच्या सविनय कायदेभंगाचा लढा 12 मार्च, 1930 रोजी सुरू झाला.
26. महात्मा गांधींनी ब्रिटीश सरकारचा मिठाचा कायदा मोडण्याकरिता साबरमतीहून दांडी यात्रा काढली होती.
27. महात्मा गांधींनी मिठाचा कायदा 12 मार्च, 1930 रोजी मोडला.
28. महात्मा गांधीनी पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.
29. 5 मार्च 1931 रोजी गांधी-आयर्विन करार झाला.
30. गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेण्याची व दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्याची संमती गांधी-आयर्विन करारानुसार दिली.
31. म. गांधींच्या उपोषणाचा परिणाम म्हणून सरकारने जातीय निवाड्यात सुधारणा केली.
32. 14 सप्टेंबर, 1931 ते 1 डिसेंबर, 1931 या कालावधीत गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले.
33. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला.
34. डॉ. आंबेडकर व महात्मा गांधीत पुणे (ऐक्य) करार इ. स. 1932 रोजी झाला
35. पुणे करारान्वये हरिजनांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेण्यात आली, तथापि यांच्यासाठी 148 जागा राखीव ठेवण्यात आल्या.
36. पुणे करार येरवडा येथील तुरूंगात झाल्याने त्यास येरवडा करार असेही म्हणतात.
37. महात्मा गांधींनी इ. स. 1933 साली हरिजन सेवक संघाची स्थापना केली.
38. महात्मा गांधीजींशी मतभेद झाल्यानंतर नेताजींनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला.
39. क्रिपस साहेब बुडणाऱ्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक घेऊन आले आहेत' असे महात्मा गांधींनी म्हटले होते.
40. 8 ऑगस्ट, 1942 रोजी म. गांधींनी भारतीय जनतेस 'करा किंवा मरा' हा संदेश दिला.
41. 30 जानेवारी, 1948 रोजी नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची हत्त्या केली.
42. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी महात्मा गांधी कलकत्यात नौखाली येथे होते.
43. गांधीजींच्या मते विद्याथ्यांनी सुट्टी समाजसेवा याप्रकारे घालवावी.
44. मोहनदास गांधींना 'महात्मा' या उपाधीने प्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी संबोधले.
45. 'यंग इंडिया' हे वर्तमानपत्र म. गांधींनी सुरू केले होते.
46. महात्मा गांधी फक्त एक वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रसचे अध्यक्ष होते.
47. महात्मा गांधींवर लिओ टॉलस्टॉय या विचारवंताचा विशेष प्रभाव होता.
48. माझे सत्याचे प्रयोग हा जगप्रसिध्द ग्रंथ महात्मा गांधींनी लिहिला.
49. विनोबा भावे हे महात्मा गांधींनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होत.
50. महात्मा गांधींनी 'हरिजन' साप्ताहिक सुरू करून आपले अस्पृश्यता विरोधी विचार मांडले.
51. महात्मा गांधींनी खेड्यापाड्यातील सामान्य माणसाला स्वातंत्र्य चळवळीत आणले.
52. महात्मा गांधींनी 'सत्याग्रह व कायदेभंग' ही भारतीयांना दिलेली दोन शस्त्रे होत.
53. 'गांधी आणि लेनीन' हा ग्रंथ भाई अमृत डांगे यांनी लिहिला.
54. महात्मा गांधीचे अर्थकारण 'विश्वस्त' तत्त्वावर आधारीत होते.
55. महात्मा गांधीनी 'मजूर महाजन' संघाची स्थापना केली.
X X
1909, 1919 व 1935 च्या कायद्यांची ठळक वैशिष्टये
1. 1909 चा भारत सरकार कायदा म्हणजे मोर्ले मिंटो ' सुधारणा कायदा होय.
2. 1909 च्या कायद्याच्या वेळी लॉर्ड मिंटो भारताचे व्हॉईसराय होते.
3. 1909 च्या कायद्याद्वारे मुसलमानांसाठी विभक्त मतदार संघ देण्यात आला.
4. 1909 च्या कायद्यान्वये कार्यकारी मंडळात भारतीयांचा समावेश करण्यात आला.
5. 1909 च्या कायद्याने मुसलमानांना दुहेरी मतदानाचा अधिकार मिळाला.
6. 1909 च्या कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाची सदस्यसंख्या 69 होती.
7. 1909 च्या कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाचे 32 सदस्य निर्वाचीत असत.
8. 1909 च्या कायद्यान्वये भारतात प्रौढ मतदानपद्धती स्विकारण्यात आली.
9. 1909 च्या कायद्याने जमाखर्चावर नियंत्रणाचा अधिकार कायदेमंडळास मिळाला .
10. 1909 च्या कायद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे तत्व मांडण्यात आले.
11. 1909 च्या कायद्याने कायदेमंडळाच्या रचनेत बदल करण्यात आला.
12. 1909 च्या कायद्याने भारतीयांना निवडणुकीचा हक्क दिला परंतु सार्वत्रिक मतदानाचा हक्क मात्र दिला नाही.
13. 1909 च्या सुधारणा कायद्यान्वये केंद्रीय कायदेमंडळात सभासदांचे तर प्रांतिक कायदे बिनसरकारी सभासदांचे बहुमत राहणार होते.
14. 1909 च्या सुधारणा कायद्यान्वये सभासदांना प्रश्न विचारण्याचा अंदाजपत्रकावर चर्चा अधिकार देण्यात येणार होता.
15. 1909 च्या सुधारणा कायद्यान्वये सभासदांना ठराव मांडण्याचे अधिकार होते तथापि संमत ठराव सरकारवर बंधनकारक असणार नव्हते.
16. 1919 चा भारत सरकार कायदा म्हणजे 'मॉर्टग्यू-चेम्सफोर्ड' सुधारणा कायदा होय.
17. 1919 च्या कायद्याच्या वेळी मॅटिंग्यू हे भारतमंत्री होते.
18. 1919 च्या कायद्याच्या वेळी लॉर्ड चेल्मस्फोर्ड भारताचे व्हाईसरॉय होते.
19. 1919 च्या कायद्याद्वारे शिखांसाठी वेगळे मतदार संघ देण्यात आले.
20. 1919 च्या कायद्याने प्रांतात द्विदल राज्यपद्धती निर्माण करण्यात आली.
21. 1919 च्या कायद्याने भारतमंत्र्यांच्या पगाराचा बोजा इंग्लंडच्या तिजोरीवर पडला.
22. 1919 च्या कायद्याने मतदानाच्या अधिकार प्राप्तीसाठी मालमत्तेची अट ठेवली.
23. 1919 च्या कायद्याने भारतातर्फे इंग्लंडमध्ये हाय कमिश्नरची नियुक्ती केली गेली.
24. 1919 च्या कायद्यानुसार राज्यसभेचा कार्यकाल 5 वर्षे होता.
25. 1919 च्या कायद्यानुसार केंद्रीय विधानसभेचा कार्यकाल 3 वर्षे होता.
26. 1919 च्या कायद्याने राज्यस्तरावर राखीव खाती व सोपीव खाती अशी विभागणी झाली.
27. 1919 च्या कायद्यानुसार राखीव खात्यात स्थानिक स्वराज्य खात्याचा समावेश नव्हता.
28. 1935 च्या भारत सरकार कायद्यात 14 प्रकरणे होती.
29. 1935 च्या भारत सरकार कायद्यात 10 परिशिष्टे होती.
30. 1935 च्या कायद्यान्वये राज्यसमेतील 156 सदस्य प्रांतातून येणार होते.
31. 1935 च्या कायद्यान्वये राज्यसमेतील 104 सदस्य संस्थानातून येणार होते.
32. 1935 च्या कायद्यान्वये राज्यसभा सदस्यांची संख्या 260 आहे.
33. 1935 च्या कायद्यान्वये केंद्रीय विधानसभेची सदस्यसंख्या 375 होती.
34. 1935 च्या कायद्यान्वये विधानसभेचे 250 सदस्य प्रांतातून येणार होते.
35. 1935 च्या कायद्यान्वये भारतीय संघराज्याची कल्पना मान्य केली.
36. 1935 च्या कायद्यान्वये गव्हर्नर घटना प्रमुख म्हणून कार्य करणार होता.
37. 1935 च्या कायद्याने केंद्रात द्विदल राज्यपद्धती निर्माण करण्यात आली.
38. 1935 च्या कायद्यानुसार राखीव खात्यात शिक्षण खात्याचा समावेश नव्हता.
39. 1935 च्या कायद्यान्वये केंद्र स्तरावर राखीव व सोपीव खाती अशी विभागणी झाली.
40. 1935 च्या कायद्यान्वये लोकसेवा आयोगाची स्थापना झाली.
41. 1935 च्या कायद्याद्वारे संपूर्ण भारतासाठी संघराज्य निर्माण करण्यात आले.
42. 1935 चा भारत सरकार कायदा झाला त्यावेळी 'लॉर्ड विलींग्टन' व्हॉईसरॉय होते.
43. 1935 च्या कायद्याने सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केली आहे.
44. 1935 च्या कायद्याने विविध विषयांच्या तीन सूर्चीची तरतूद केली.
45. 1935 च्या कायद्याने प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली.
46. 1935 च्या कायद्याची पंडित नेहरूंनी 'इंजिन नसलेले पण मजबूत ब्रेक्स असलेले मशीन' अशी निर्भत्सना केली.
47. 1935 च्या कायद्याने 'जनमताचा गळा दाबण्याचे काम केले आहे.' असे उद्गार राजेंद्र बाबूंनी काढले .
48. 1935 च्या कायद्यान्वये सरकारी कामकांजाच्या विषयांचे केंद्रीय सूची, प्रांतिक सूची आणि समवर्ती सूची असे वर्गीकरण करण्यात आले.
49. 1935 च्या कायद्याने ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपीयन्स आणि डिप्रेस्ड क्लास लोकांना वेगळे प्रतिनिधीत्व देण्यात आले.
50. 1935 च्या कायद्याद्वारे काही प्रांतात द्विगृही तर काही प्रांतात एकगृही कायदेमंडळे अस्तित्वात आली.
51. 1935 च्या कायद्यानुसार बटहुकूम काढण्याचा व कायदेमंडळाची बैठक बोलविण्याचा वा रद्द करण्याचा अधिकार व्हॉईसरॉयला बहाल करण्यात आला होता.
52. 1935 च्या कायद्यानुसार व्हॉईसरॉयच्या मदतीसाठी कार्यकारी मंडळाची निर्मिती करण्यात आली.
53. 1935 च्या कायद्यानुसार सोपीव खात्यांच्या कारभारासाठी दहापेक्षा कमी मंत्री नेमण्याची तरतूद करण्यात आली.
54. 1935 च्या कायद्यान्वये आणीबाणीच्या परिस्थितीत व्हॉईसरॉयला विशेषाधिकार देण्यात आले होते.
55. 1935 च्या कायद्यान्वये केंद्र व प्रांत यांच्यासाठी स्वतंत्र खाती निश्चित करण्यात आली होती.
56. 1935 च्या कायद्यान्वये संघराज्यासाठी फेडरल कोर्ट स्थापन करण्याचे मान्य करण्यात आले होते.
X X
भारतातील ब्रिटीश अधिकाऱ्यांचे कार्य
1. 'केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येणारा जलमार्ग वास्को-द-गामाने शोधला.
2. इ. स. 1510 साली अल्बुकर्क या पोर्तुगीज अधिकाऱ्याने गोवा ताब्यात घेतला.
3. भारतातील राजाच्या पदरी सादर झालेला इंग्लंडचा पहिला वकील- सर टॉमस रो.
4. इंग्रज व नवाब सिराजउद्दौला यांच्यात प्लासीची लढाई झाली.
5. प्लासीच्या लढाईत इंग्रज सैन्याचे नेतृत्व लॉर्ड क्लाईव्हने केले होते.
6. इ. स. 1757 च्या प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव रॉबर्ट क्लाईव्हने केला.
7. भारतात सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना लॉर्ड डलहौसीने केली.
8. लॉर्ड डलहौसीने झाशीचे राज्य दत्तक वारसा हक्क नामंजूर करून खालसा केले.
9. लॉर्ड कॅनिंग हा व्हॉईसराय पूर्वायुष्यात भारताचा गव्हर्नर जनरल होता.
10. भारतामध्ये इंडियन सिव्हील सर्व्हिस परीक्षा लॉर्ड कॅनिंगने सुरू केली.
11. इ. स. 1828 च्या ब्रिटीश पार्लमेंटच्या कायद्याची घोषणा लॉर्ड कॅनिंगने केली.
12. इ. स. 1858 साली इंग्लडची महाराणी व्हिक्टोरीया होती.
13. देशी वृत्तपत्र कायदा लॉर्ड लिटन या गव्हर्नर जनरलने संमत केला.
14. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचा कायदा इ. स. 1882 साली पास केला.
15. लॉर्ड रिपनने देशी वृत्तपत्र कायदा इ. स. 1882 साली रद्द केला.
16. भारताची पहिली शिरगणती लॉर्ड मेयोच्या कारकिर्दीत झाली.
17. बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना सर विल्यम वॉर्ड यांची होती.
18. लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेब या मोगल बादशहाशी केली जाते.
19. भारतीय सहकारी पतपेढी कायदा लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने संमत केला.
20. इ. स. 1904 चा सहकारी पतपेढीचा कायदा लॉर्ड कर्झनच्या काळात संमत झाला.
21. इ. स. 1905 साली बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केली.
22. मुंबईचे 'गेट वे ऑफ इंडिया' राजा पंचम जॉर्जच्या स्वागताप्रित्यर्थ बांधण्यात आले.
23. इ. स. 1916 ते इ.स. 1921 च्या दरम्यान भारताचे व्हॉईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड होते.
24. जमावबंदीचा व विनाचौकशी अटकेचा रौलेट ॲक्ट लॉर्ड चेम्सफोर्डच्या कारकिदाँत झाला.
25. माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा लॉर्ड चेम्सफोर्डच्या कारकिर्दीत झाली.
26. जालीयनवाला बाग हत्याकांडाच्यावेळी पंजाबच्या गव्हर्नरपदी मायकेल ओडवायर होते.
27. लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ल्याचा आदेश साँडर्सने दिला.
28. इंग्लडने मार्च, 1942 मध्ये वाटाघाटीसाठी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठविले होते.
29. बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला तेव्हा व्हॉईसराय लॉर्ड बेव्हेल होता.
30. लॉर्ड वेव्हेलने वेव्हेल योजना इ. स. 1945 साली सादर केली.
31. इ. स. 1945 मध्ये इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचे मत्रीमंडळ अधिकारपदावर आले.
32. ॲटली सरकारने भारतातील सत्तांतराची ठरविलेली कालमर्यादा : जून 1948
33. परतंत्र भारतातील शेवटचा इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन
34. भारताचा शेवटचा व्हॉईसराय : लॉर्ड माऊंटबॅटन
35. माऊंटबॅटन प्लॅन 3 जून, 1947 रोजी जाहीर करण्यात आला.
36. भारत व पाकिस्तान असे विभाजन माऊंटबॅटन योजनेनुसार झाले.
37. भारताच्या स्वातंत्र्याचा राष्ट्रध्वज लॉर्ड माऊंटबॅटनच्या शुभहस्ते फडकविण्यात आला.
38. स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटीश गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन
View, Comments and share.........





.jpg)

1 Comments
👍
ReplyDelete