Subscribe Us

header ads

Modern History of India -1

Modern History of India -1

आधुनिक भारताचा इतिहास-1


1. इ. स. 1600 : ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना झाली. 

2. इ. स. 1608 : जहांगीर बादशहाकडून ईस्ट इंडिया कंपनीसाठी व्यापारी सवलती. 

3. इ. स. 1608: सुरतमध्ये इंग्रजांनी पहिली वखार स्थापन केली.

4. इ.स. 1610 : मुंबई बेट इंग्रजांना पोर्तुगीजांकडून आंदण मिळाले.

5. इ. स. 1611 : इंग्रजांनी मछलीपट्टणम् या ठिकाणी वसाहत स्थापन केली.

6. इ. स. 1757 : प्लासीचे युद्ध झाले. हे युद्ध इंग्रजांचा सेनापती (इंग्रजांचा पहिलागव्हर्नर) रॉबर्ट क्लाईव्ह व बंगालचा नवाब सिराजउद्दौला यांच्यात झाले. या युद्धात इंग्रज विजयी झाले.

7. इ. स. 1757: रॉबर्ट क्लाईव्हने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला.

8. इ.स. 1760 : बांदीवॉशच्या लढाईत इंग्रजांनी फ्रेंचांचे वर्चस्व संपुष्टात आणले.

9. इ.स. 1764: बक्सारचे युद्ध झाले. हे युद्ध इंग्रज व मीर कासिम, शहा आलम यांच्यामध्ये झाले. या युद्धात इंग्रज विजयी झाले. 

10. इ. स. 1765 : अलाहाबाद तहाद्वारे इंग्रजांना बंगाल, बिहार व ओरिसा या राज्यातील बहाल करण्यात आली. 

मीर जाफरचा मृत्यु.

11. इ. स. 1770: बंगालमध्ये भीषण दुष्काळ.

12. इ. स. 1773 : रेग्युलेटिंग ॲक्ट संमत झाला. 

 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार महसूलात सुसुत्रता आणली गेली. कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.

13. इ. स. 1774 : वॉरन हेस्टिंग्ज हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला.

14. इ. स. 1776 : ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांमध्ये पुरंदरचा तह.

15. इ. स. 1780 : महाराजा रणजितसिंहाचा जन्म.

16. इ. स. 1782 : हैदर अलीचा मृत्यु.

17. इ.स. 1782 : सालबाईचा तह.

18. इ.स. १७८४ : पीटस् इंडिया ॲक्ट संमत.

19. इ.स. 1790-92 : या काळात म्हैसूरचे तिसरे युद्ध झाले. या काळात लॉर्ड कॉर्नवालिसने टिपूचा श्रीरंगपट्टणम् येथे पराभव केला. 

20.इ.स. 1793 :लॉर्ड कॉर्नवालिसने बंगालमध्ये कायमधाऱ्याची पद्धत सुरु केली.

21.इ.स. 1795 : खर्ड्याची लढाई.

22. इ.स. 1795 : महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यु.

23. इ.स. 1799 :म्हैसूरच्या चौथ्या युद्धात टिपू मारला गेला. 

 म्हैसूर राज्यावर ओडियार घराण्याची सत्ता होती. 

कृष्णराज ओडियार हा म्हैसूरचा राजा होता.

24. इ. स. 1800 : नाना फडणीस यांचा मृत्यु. 

25. इ.स. 1802 : वसईच्या तहानुसार मराठ्यांच्या दरबारी तैनाती फौज आली. 

26. इ. स. 1809: अमृतसरचा तह 

27. इ.स. 1817 नेपाळ भारताच्या पूर्णपणे अंकित.

28. इ. स. 1818 : मार्क्टिस ऑफ हेस्टिंग्जने पेशवाई संपुष्टात आणली. 

खडकी लढाईत इंग्रजांकडून मराठ्यांचा पाराभव.

X X

29. इ.स. 1818 :मराठी सत्तेचा शेवट

30. इ.स. 1828 :राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मोसमाजाची स्थापना केली.

31. इ.स. 1829 :गवर्नर जनरल विल्यम बेंटिकने सतीबंदी कायदा संमत केला.

32. इ. स. 1831: रणजितसिंहाच्या नेतृत्त्वाखाली शीखांचा उठाव.

33. इ. स. 1835 : विल्यम बेंटिकने शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजीस मान्यता दिली.

34. इ. स. 1839 :महाराजा रणजितसिंहाचा मृत्यु.

35. इ.स. 1845-46 : लॉर्ड हार्डिजच्या कारकीर्दीत पहिले इंग्रज शीख युद्ध व पुण्यात शीखांचा पराभव.

36. इ. स. 1846 : लाहोरचा तह.

37. इ. स. 1848 : लॉर्ड डलहौसीने दत्तकपुत्र घेऊ नये या कारणावरून सातारा राज्य खालसा केले.

38. इ. स. 1848 : भारतात स्वतंत्र तार व पोस्ट खाते सुरु झाले. 

39. इ.स. 1849 :ब्रिटिशांनी पंजाब प्रांत ताब्यात घेतला.

40. इ.स. 1852 :पाकिस्तानमधील कराची येथे पहिल्या पोस्ट स्टॅम्पची विक्री.

41. इ.स. 1852 :दादाभाई नौरोजी व जगन्नाथ शंकरशेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. 

42. इ.स. 1853 :लॉर्ड डलहौसीने मुंबई-ठाणे (अंतर 33 कि. मी.) ही भारतातील पहिली रेल्वे सुरु केली.

43. इ. स. 1854 : मुंबईत पहिली स्वदेशी कापड गिरणी सुरु झाली.

44. इ. स. 1854 : झाशीचे राज्य खालसा.

45. इ.स. 1856 लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला.

46. इ.स. 1856 भारतात सार्वजनिक बांधकाम खाते सुरु झाले.

47. इ.स. 1856 हिंदु विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करण्यास कायद्याने मान्यता.

48. इ.स. 1856 : कलकत्त्यास प्रथम तारसेवेचे उद्घाटन.

49. इ.स. 1857 हा काळ भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी प्रसिद्ध आहे. 

मंगल पांडे या सैनिकाने काडतुसाचे कारण दाखवून प्रथमतः संग्रामास सुरुवात केली. या संग्रामाची पहिली सुरुवात मीरत येथे झाली. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी या प्रमुख व्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला.

50. इ. स. 1857 : कलकत्ता, मुंबई व मद्रास विद्यापीठांची स्थापना. 

51. इ.स. 1858 : व्हिक्टोरिया राणीचा जाहिरनामा प्रसिद्ध झाला. त्यानुसार भारतीय राजवट ईस्ट इंडिया कंपनीकडून राणीकडे सुपुर्व झाली.

52. इ. स. 1861: इंडियन पिनल कोड सुरु झाले. 

53. इ. स. 1861 इंडिया कौन्सिल ॲक्ट 1861 अन्वये सदस्यांची विधीमंडळात नियुक्ती.

54. इ.स. 1861 : रवींद्रनाथ टागोरांचा जन्म

55. इ.स. 1861: मोतीलाल नेहरूंचा जन्म.

56. इ. स. १८६२: मुंबई येथे हायकोर्टाची स्थापना करण्याचा प्रस्ताव झाला.

57. इ. स. 1863: स्वामी विवेकानंदांचा जन्म.

58. इ. स. 1865 : लाला लजपतरायांचा जन्म.

59. इ. स. 1865 : मुंबई, मद्रास व अलाहाबाद येथे उच्च न्यायालये स्थापन.

60. इ.स. 1869 : 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींचा जन्म पोरबंदर (गुजरात) येथे झाला.

X X

61. इ. स. 1870 : ग. वा. जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना केली. 

62. इ.स.1874 :बंगालमध्ये भीषण दुष्काळ.

63. इ.स. 1875: स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे आर्यसमाजाची स्थापना केली.

64. इ. स. 1876 : कलकत्त्यात सुरेंद्रनाथ बॅनर्जी व आनंद मोहन बोस यांनी इंडिया असोसिएशनची स्थापना केली.

65. इ. स. 1877 : दिल्ली दरबार.

66. इ.स. 1878: मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी करणारा व्हार्णाक्युलर प्रेस ॲक्ट अंमलात आला.

67. इ.स. 1879 : सी. राजगोपालाचारी यांचा जन्म.

68. इ.स. 1881 : टिळकांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरु केली.

69. इ. स. 1882 : लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा संमत केला.

70. इ. स. 1883 : इलबर्ट बीलाविषयी प्रसिद्ध. इलबर्ट बीलामुळे भारतीय न्यायाधीशांना इंग्रज लोकांच्या केसेस चालविण्याबाबत हा मिळाले.

71. इ.स. 1883 : वि. दा. सावरकरांचा जन्म.

72. इ. स. 1884 : डॉ. राजेंद्र प्रसादांचा जन्म.

73. इ. स. 1885 : भारतीय कॉंग्रेसची ए. ओ. हयुम यांनी मुंबई येथे स्थापना केली. 

कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी, दुसरे अध्यक्ष दादाभाई नौरोजी तर तिसरे व पहिले पारशी अध्यक्ष अनुद्दीन तैयबजी हे होते.

74. इ. स. 1889 : पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अलाहाबाद येथे जन्म झाला. 14 नोव्हेंबर हा पंडित नेहरूंचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करतात. 

75. इ.स. 1890:महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक व स्वयंस्फुर्तीने समतावाद प्रतिपादणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन.

76. इ.स. 1891 :डॉ. आंबेडकरांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदोरजवळील महू या गावी झाला, तर बालपण रत्नागिरी जिल्ह्यात गेले.

77. इ. स. 1892 : भारतीय कौन्सिल कायदा संमत झाला.

इ.स. 1893: स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील जागतिक धर्म परिषद गाजवली.

78. इ.स. 1897: चाफेकर बंधूनी प्लेग कमिशनर रँन्ड यास ठार केले.

79. इ. स. 1904 : सहकारी पत पेढीबाबत पहिला कायदा संमत झाला. 

80. इ.स. 1905 : लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.

81. इ. स. 1905 : गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.

82. इ. स. 1905 : लोकमान्य टिळकांनी स्वदेशी चळवळ सुरु केली.

83. इ. स. 1906 : ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली.

84. इ. स. 1909 : मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा संमत झाला.

85. इ. स. 1911 : इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज यांची भारत भेट. 

86. इ.स. 1911: लॉर्ड हार्डिंग्जच्या प्रयत्नामुळे भारताची राजधानी कलकत्याहून दिल्लीला गेली.

87. इ. स. 1911 : बंगालची फाळणी रद्द करण्यात आली.

88. इ. स. 1915 : महात्मा गांधी आफ्रिकेतून परत आले.

89. इ.स. 1916: हिंदु-मुस्लिम समझोत्यात लखनौ करार झाला. 

90. इ. स. 1916 : महात्मा गांधींनी साबरमती आश्रमाची स्थापना केली.

91. इ.स. 1916 :ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली.

92. इ.स. 1916 :मुस्लिम लीगला मोर्ले-मिंटो कायद्यान्वये मिळालेल्या स्वतंत्र मतदार संघाच्या तत्वास राष्ट्रीय समेत मान्यता.

93. इ.स. 1917 : म. गांधींनी निळ कामगारांसाठी चंपारण्य येथे पहिला सत्याग्रह केला.

94. इ. स. 1919 : रौलेट ॲक्ट (काळा कायदा) संमत. (6 फेब्रुवारी) 

रौलेट ॲक्टच्या विरुद्ध आंदोलने. 

 जालियनवाला बाग हत्याकांड (13 एप्रिल) झाले तेव्हा सर मायकेल ओडवायर हा पंजाबचा गव्हर्नर होता. जनरल डायरने गोळीबार केला.

X X

95. इ.स. 1919:मॅटिग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा.

96. इ. स. 1919 : तिसरे अफगाण युद्ध.

97. इ. स. 1920 :महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरु केली. 

98. इ. स. 1920 : लोकमान्य टिळकांचा मृत्यु.

99. इ. स. 1920 : खिलाफत चळवळ. अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे अध्यक्ष म. गांधी होते. 

100. इ. स. 1921 : मलबारात मोपल्यांचे बंड.

101. इ. स. 1922 : चौरीचौरा (उत्तरप्रदेश) येथे पोलीस स्टेशन जाळल्यामुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली. बार्डोली सत्याग्रह, कायदेभंग चळवळ.

102. इ.स. 1923 : मोतीलाल नेहरू व सी. आर. दासांनी कायदेमंडळात जाऊन सरकारची अडवणुक करण्याच्या उद्देशाने स्वराज्य पार्टीची स्थापना केली. 

103. इ. स. 1923 : शुद्धी आंदोलनास सुरुवात.

104. इ.स. 1924 सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रह केला. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाचे उद्घाटन.

105. इ. स. 1925 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना. 

106. इ. स. 1925 : सी. आर. दास यांचा मृत्यु.

107. इ.स. 1926: स्वामी श्रद्धानंदांचे बलिदान.

108. इ.स. 1920 : 1919 च्या कायद्याने मिळालेल्या सुधारणांचे परीक्षणासाठी सायमन कमिशन नेमले. (8 नोव्हेंबर)

109. इ.स. 1920: भारतातील पहिले रेडिओ प्रसारण केंद्र मुंबईत सुरु झाले.

110. इ. स. 1928 : सायमन कमिशन भारतात आले. 

सायमन कमिशनमधील सर्व प्रतिनिधी इंग्रज असल्यामुळे निषेध करण्यात आला. 

मोर्चामध्ये लाला लजपतराय यांचा मृत्यु.

भगतसिंगाने लाला लजपतराय यांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या सोडर्सचा खून केला.


111. इ. स. 1928 : सरदार वल्लभभाई पटेलांनी बार्डोलीत शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह केला.

112. इ. स. 1928 : राष्ट्रीय घटनेच्या आराखड्याबाबत मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. समितीने साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली. (नेहरू रिपोर्ट)

113. इ. स. 1929 : 31 डिसेंबरला लाहोर अधिवेशनात पंडीत नेहरूंनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली.

114. इ. स. 1930 : 26 जाने. पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. 


115. इ. स. 1930 : म. गांधींनी पिठाचा कायदा तोडण्यासाठी साबरमती ते दांडी ही दांडी यात्रा सुरु केली.

116. इ. स. 1930 : 12 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान लंडनमध्ये झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेवर काँग्रेसने बहिष्कार टाकला होता.

117. इ. स. 1931 : राष्ट्रीय सभेने कायदेभंग चळवळ स्थगित ठेवणे व गोलमेज परिषदेस हजर राहणे या उद्देशाने 5 मार्च रोजी गांधी-आयर्विन करार केला. 

118. इ. स. 1931 : कराची काँग्रेस अधिवेशनात मुलभूत हक्कांचा ठराव पास.

119. इ. स. 1931 : भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी.

120. इ.स. 1932 : रॅमसे मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. 

जातीय निवाड्यानुसर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ न देता काही जागा राखीव ठेवाव्यात असे ठरविले.

121. इ. स. 1932 : तिसरी गोलमेज परिषद.

122. इ. स. 1932 : महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुणे करार.

123. इ. स. 1933 : भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती संदर्भात श्वेतपत्रिका

124. इ. स. 1934 : जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, डॉ. लोहिया, अशोक मेहता व युसूफ मेहेरअली यांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

125. इ. स. 1935 : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट संमत झाला.

126. इ. स. 1935 : 1935 च्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली.

127. इ. स. 1935 : 1935 च्या कायद्यानुसार ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला. 






View, Comments and share....

X X

Post a Comment

2 Comments