Subscribe Us

header ads

Political Science-8/9 आंतरराष्ट्रीय संघटना

Political Science-8/9

राज्यशास्त्र


आंतरराष्ट्रीय संघटना

राष्ट्रीय संघ

वूल्ड्रो विल्सन यांनी इ. स. 1920 साली राष्ट्र संघाची (लीग ऑफ नेशन्सची) स्थापना केली.


संयुक्त राष्ट्र संघटना (UNO)

1. जगातील राष्ट्रांनी, दुसऱ्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एकत्र येण्याचे ठरविले. त्या दृष्टीने इ.स.1944 मध्ये वॉशिंग्टन येथे अमेरिकेच्या पुढाकाराने बैठक होऊन संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर अमेरिका, ब्रिटन व रशिया या तीन महाशक्तींच्या पुढाकाराने माल्टा येथे फेब्रु. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली.

2. इ. स. 1945 मध्ये सॅनफ्रेंन्सिस्को येथे 50 राष्ट्रांनी जागतिक पातळीवर संघटना बांधून जगाला युद्धाच्या विनाशापासून दूर नेण्याचा निश्चय केला. 

3. 24 ऑक्टोबर, 1945 ला संयुक्त राष्ट्र संघटनेची अधिकृत स्थापना झाली.

4.30 आक्टोबर, 1945 रोजी भारताने युनायटेड नेशन्सचे सभासदत्व स्विकारले.

5. संयुक्त राष्ट्र संघटनेचे प्रमुख कार्यालय न्यूयॉर्क (लोक सक्सेस) येथे आहे.

6. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रमुख भाषा इंग्रजी, फ्रेंच, चीनी, रशियन, अरेबिक व स्पॅनिश 

7. संयुक्त राष्ट्र संघटनेचा ध्वज निळ्या पार्श्वभूमीवर पांढरा ठिपका असलेला त्यावर जगाचा नकाशा व भोवती ऑलिव्ह झाडाच्या दोन फांद्या. 

8. युनोचे चिन्ह ऑलिव्ह झाडाची फांदी आहे.


संयुक्त राष्ट्र संघटना खालील गोष्टींकडे लक्ष पुरविते.

1. सुरक्षा

2. सामाजिक कल्याण

3. न्याय

4. मानवी हक


संयुक्त राष्ट्र संघटनेचे हेतु : 

1. दोन राष्ट्रांतील बाद शांततेने मिटविणे 

2. सनदेतील कलमे अंमलात आणणे 

3. अक्रमकाला मदत न करणे 

4. राष्ट्राच्या अंतर्गत वादात न पडणे..

X X

संयुक्त राष्ट्रसंघटनेत (युनोमध्ये) महत्वाच्या ६ समित्या आहेत. 

1. जनरल असेंब्ली (आमसभा) 

2. सुरक्षा समिती 

3. आर्थिक व सामाजिक समिती 

4. ट्रस्टीशिष कौन्सिल (विश्वस्त परिषद) 

5. आंतरराष्ट्रीय न्यायालय 

6. सचिवालय


जनरल असेंब्ली

1. आमसभेमध्ये प्रत्येक राष्ट्राचे सभासद असतात. एका राष्ट्राला एकच मत देण्याचा अधिकार असतो. 

2. आमसभेची बर्षातून एकदा बैठक भरते. 

3. श्रीमती विजयालक्ष्मी पंडित आमसभेच्या अध्यक्षा होत्या.


सुरक्षा समिती

1. सुरक्षा परिषदेमध्ये 15 राष्ट्र सभासद आहेत. यापैकी अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स व चिन ही 5 राष्ट्रे कायमस्वरूपी सदस्य आहेत.

2. पाच कायम सभासदांना व्हेटो म्हणजे नकाराधिकार आहे. एका राष्ट्राने नकार दिला तर सर्वांनी नकार दिला आहे असे समजतात. 

3. 10 सभासद राष्ट्र तात्पुरत्या स्वरूपाची असतात. 

4. दोन वर्षांसाठी आमसभा दहा अस्थायी सभासद निवडून देते.


ट्रस्टीशिप कौन्सिल

★ जे भूभाग पूर्वी जर्मनी व जपान यांच्या ताब्यात होते तेथील व्यवस्था राखणे व देखरेख करणे या कौन्सिलचे कार्य आहे.


आर्थिक व सामाजिक समिती

1. ही समिती आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक समस्या सोडविते तसेच मानवी हक्कांच्या पालनाकडे लक्ष पुरविते. 

2. आर्थिक आणि सामाजिक मंडळामध्ये 54 सदस्य असून त्यांची निवड आमसभेकडून ३ वर्षांसाठी होते.


आंतरराष्ट्रीय न्यायालय

★ आंतरराष्ट्रीय न्यायालय हे युनोचा एक भाग असून ते हेग येथे भरते. या न्यायालयात पंधरा न्यायाधीश असतात. त्यांची 9 वर्षे सर्व्हिस असून दर 3 वर्षांनी 1/3 जज्ज निवृत्त होतात. राष्ट्रा-राष्ट्रातील कायदेशीर तंटे, आंतरराष्ट्रीय तहाचे अर्थ वगैरे समयी हे न्यायाधीश हजर असावे लागतात.


युनोचे सरचिटणीस

अनुक्रमे सरचिटणीस----कार्यकाल-----व्यक्तिची नावे 

1. पहिले सरचिटणीस-1946 ते 53 -ट्रीग्वे ली (नॉर्वे)

2. दुसरे सरचिटणीस -1953 ते 61-बॅग हॅमरशिल्ड (स्वीडन)

3. तिसरे सरचिटणीस-1961 ते 71-यु थांट (ब्रह्मदेश)

4. चौथे सरचिटणीस-1972 ते 81-कुर्त वाईल्डहाईम (ऑस्ट्रीया) 

5. पाचवे सरचिटणीस-1982 ते 91-जेविअर पेरेझ द क्युलर (पेरू)

6. सहावे सरचिटणीस-1991 -बुट्रास घाली (इजिप्त)


संयुक्त राष्ट्रसंघटनेशी संलग्न असलेल्या विशेष समित्या

संघटना----स्थापना-----मुख्यालय

1. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO)-इ. स. 1919-जीनिव्हा (स्वित्झर्लंड)

2. आंतरराष्ट्रीय अणुशक्ती संस्था (IAEA)-इ. स. 1957-व्हिएन्ना (ऑस्ट्रीया)

3. अन्न व शेती संघटना (FAO)-इ. स. 1946-रोम (इटली) 

4. पुनबांधणी व विकासासाठी आंतरराष्ट्रीय बैंक -इ. स. 1945-वॉशिंग्टन (अमेरिका)

5. जागतिक आरोग्य संघटना (WHO)-इ. स. 1948-जीनिव्हा (स्वित्झर्लंड) 

6. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक संघटना (IMCO) -इ.स. 1958-लंडन (इंग्लंड)

7. संयुक्त राष्ट्रसंघटना बालक निधी (UNICEF)-इ. स. 1946-न्यूयॉर्क (अमेरिका)

8. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) -इ. स. 1945-वॉशिंग्टन (अमेरिका)

9. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटी,-इ. स. 1863-जीनिव्हा (स्वित्झर्लंड)

10. संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO)-इ.स. 1946-पॅरिस फ्रान्स


इतर आंतरराष्ट्रीय संघटना

संघटना----स्थापना

1. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना-इ. स. 1947

2. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम-इ.स. 1972

3. संयुक्त राष्ट्र संघटनेची समिती-इ.स. 1967

4. संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्वासितांसाठी पुनर्वसन समिती-इ.स. 1950

5. संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था-इ.स. 1960

6. आंतरराष्ट्रीय विकास-इ.स. 1960

7. आंतरराष्ट्रीय वित्तीय कार्पोरेशन-इ. स. 1956

8. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटना -इ.स. 1970

9. जागतिक पोस्टल संघटना-इ. स. 1874

10. आंतरराष्ट्रीय संचार संस्था-इ. स. 1865-1944


★ युनोमध्ये 10 डिसेंबर मानवी हक्क दिन म्हणून पाळतात, 24 ऑक्टोबर 'युनो दिन' म्हणून साजर करतात, 

★ संयुक्त राष्ट्र संघाची बैठक वर्षातून एकदा होत असली तरी विशेष कार्यासाठी केव्हाही बैठक बोलवू शकतात.

★ सरचिटणीसांचा 5 वर्षाचा असतो.

★ इ.स. 1988 ते 1998 युनोचे सांस्कृतिक दशक साजरे होत आहे.


युनोची जाहीर केलेली वर्षे

जाहीर केलेली वर्षे------साल

1. अपंग वर्ष----1981

2. संचार वर्ष----1982

3. वृद्ध वर्ष----1983

4. युवक वर्ष----1985

5. बालक वर्ष----1984

6. शांतता वर्ष----1986

7. बालिका वर्ष----1988

8. निवारा वर्ष----1987


प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटना

आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय इ. विविध पातळ्यांवर सहकार्याच्या हेतूने जगात दोन इन एजन्सीज् वा संघटना अस्तित्वात आलेल्या असून काही प्रादेशिक तर काही जागतिक पातळीवर क कार्य करतात.

X X

1. राष्ट्रकुल परिषद

स्थापना : 1926

सदस्य राष्ट्रे : 51

ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वायत समूह अशी राष्ट्रकुल परिषदेची सुरुवातीची संकल्पना होती. राष्ट्रकुल परिषदेच्या एकूण सदस्यांतील निम्मी स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्रे आहेत फक्त 18 सदस्य राष्ट्रे इंग्लंडच्या राणीला राज्य प्रमुख म्हणून मानतात.

जगातील सर्वात मोठे व व्यापक संघटन असलेल्या राष्ट्रकुल परिषदेच्या दर चार वर्षांनी आर्थिक व राजकीय प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अशा बैठका होत असतात. तसेच दर चार वर्षांनी ऑलिम्पिकच्या धर्तीवर राष्ट्रकुल स्पर्धाही होत असतात.

द.आफ्रिकेने इ. स. 1961 साली व पाकिस्तानने इ. स. 1972 राजीनामा दिला होता. पण कौलालंपूर येथे इ. स. 1989 साली झालेल्या राष्ट्रकुल प्रमुखांच्या परिषदेत पाकिस्तानला पुन्हा सदस्यत्व देण्यात आले आहे.


2. युरोपियन समूह

स्थापना 1958

सदस्य राष्ट्रे : 12

युरोपियन आर्थिक समूह, युरोपियन अणुऊर्जा समूह आणि युरोपियन कोळसा व पोलाद समूह या तिन्ही समुहांचे एकत्रीकरण होऊन इ. स. 1967 साली युरोपियन समूह अस्तित्वात आला. सदस्य राष्ट्रात मुक्त आयात-निर्यात व्यापार वाढविणे, शेती संदर्भात एकच संयुक्त धोरण का ठेवणे, विनिमय दर स्थिर ठेवणे इ. उद्दिष्टे कायम ठेवण्यात आली आहेत. सध्या पश्चिम युरोपातील बेल्जियम, हॉलंड, लक्झेम्बर्ग, फ्रान्स, प. जर्मनी, इटली, ब्रिटन, डेन्मार्क, आयर्लंड, ग्रीस, स्पेन व पोर्तुगाल ही 12 राष्ट्र सदस्य आहेत. राष्ट्रांची मंत्री परिषद, युरोपियन न्यायालय इ. समूहाच्या संस्था असून मुख्य कचेरी ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे आहे.


3. नाटो

स्थापना 1949

सदस्य राष्ट्रे : 17

रशिया व मित्र राष्ट्रांच्या संभाव्य आक्रमणाला उत्तर म्हणून नाटोची स्थापना इ. स. 1949 साली करण्यात आली. पाश्चिमात्य राष्ट्रांचे प्रमुख लष्करी संघटन असलेल्या नाटोची मुख्य कचेरी सेल्स येथे आहे.

अमेरिका, कॅनडा, आईसलंड, ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, लक्झेम्बर्ग, इटली, नॉर्वे, पोर्तुगाल, डेन्मार्क, प. जर्मनी, स्पेन, ग्रीस व तुर्कस्तान अशी एकूण 17 सदस्य राष्ट्रे आहेत.


4. ओपेक

स्थापना : 1960

सदस्य राष्ट्रे : 13

निर्यातदार राष्ट्रांची संघटना ओपेकची स्थापना इ. स. 1960 साली करण्यात आली. एकूण 13 खनिज तेल निर्माण करणाऱ्या राष्ट्रांचे हितसंबंध जपणे या प्रमुख उद्दिष्टपूर्तीसाठी पेट्रोल यापैकी बहुतेक सदस्य अरब राष्ट्र असून मुख्य कचेरी सिएना (ऑस्ट्रिया) येथे आहे. इ. स. 1970 ते 1980 या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढविण्यास ही संघटना कारणीभूत ठरली होती. इ. स. 1980 नंतर तेलाच्या वाढत्या उत्पादनावर नियंत्रण / ठेवण्यास संघटना असमर्थ ठरली. अमेरिका, ब्रिटन, मेक्सिको व नॉर्वे यांच्या वाढत्या तेल उत्पादनाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या किंमतीवर मोठा परिणाम झाल्यामुळे ओपेकचे महत्त्व घटले.


वॉर्सा करार

दक्षिण व पूर्व युरोप साम्यवादी गटातील राष्ट्रांतील नाटोच्या धर्तीवरील वॉर्सा करार 1955 साली करण्यात आला. बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड व रूमानिया ही कराराची सदस्यराष्ट्रे आहेत. युगोस्लाव्हीया वॉर्सा कराराचा सदस्य नाही. दक्षिण व पूर्व युरोप साम्य गटातील राष्ट्रांतील संघटनेची मुख्य कचेरी मॉस्को येथे आहे. सध्या ही संघटना इतिहास जमा झाली


5. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघ

स्थापना : 1985

सदस्य राष्ट्रे 7

दक्षिण आशियाई देशात आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवून प्रादेशिक शांतता व सामंजस्य कायम टिकविण्यासाठी डिसेंबर, 1985 मध्ये ढाक्यात सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली.

सार्क संघटनेची भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, भूतान, श्रीलंका आणि मालदीव ही सात सदस्यराष्ट्रे आहेत. सार्क संघटनेचे पहिले अधिवेशन डिसेंबर 1985 मध्ये ढाक्यात झाले होते.

X X

6. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल

स्थापना 1961

ब्रिटीश वकील पीटर बेरेन्सन यांनी पुढाकार घेऊन मुलभूत मानवी हक्क अबाधित राखण्यास झगडणारी आंतरराष्ट्रीय संघटना ॲम्नेस्टी इंटरनॅशनल 28 मे 1961 रोजी स्थापन केली. अमे इंटरनॅशनल या संघटनेचे 150 हून अधिक राष्ट्रात 5 लाखांहून अधिक सदस्य आहेत. या संघटने इ. स. 1977 चा नोबेल शांतता पुरस्कार बहाल करण्यात आला होता. या संघटनेचे मुख्यालय येथे आहे.


7. इंटरपोल

स्थापना 1956

सदस्य राष्ट्रे : 138

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरूद्धच्या कामात विविध राष्ट्रांतील पोलीस दलात परस्पर सहका व समन्वय साधणारा आंतरराष्ट्रीय पोलीस आयोग इंटरपोल या नावाने प्रसिध्द आहे. इंटरपोलची स्थापना इ. स. 1956 साली झाली असून मुख्यालय पॅरीस येथे आहे. इंटरप सदस्य संख्या 138 आहे.


8. रेड क्रॉस

स्थापना: 1863 

लढाईत किंवा भूकंपासारख्या अनर्थात जखमी झालेल्यांची देखभाल करणारी आंतरराष्ट्रीय संस्था मे 1863 मध्ये संस्थापक हेन्री ड्युनाट यांनी स्थापना केली. लाल क्रॉस (बेरजेची खूण) ही संस्थेची खूण आहे. संस्थेच्या शाखा 145 देशात असून 25 कोटींहून अधिक सभासद संख्या आहे. आतापर्यंत संस्थेस इ. स. 1917, 1944 व 1963 साली असा तीन वेळा नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. संस्थेचे मुख्यालय जीनिव्हा येथे आहे.










View, Comments and share...


Post a Comment

1 Comments