Subscribe Us

header ads

Political Science-6/9 राज्यशास्त्र पंचायत राज

Political Science-6/9

राज्यशास्त्र

पंचायत राज-2


1. स्थानिक स्वराज्य संस्थांना चोल राजघराण्याने विशेष उत्तेजन दिले होते.

2. पंचायत राजची मूळ कल्पना महात्मा गांधींची होती.

3. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेचा ठराव इ. स. 1882 साली पास केला.

4. पंचायत राज्याच्या निर्मिती प्रक्रियेस इ. स. 1957 साली सुरूवात झाली.

5. लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून संबोधले जाते. 

6. बलवंतराय मेहता समितीची नेमणूक इ. स. 1957 साली करण्यात आली. 

7. बलवंतराय मेहता समितीने आपला अहवाल इ. स. 1958 साली सादर केला होता. 

8. पंचायतराज पद्धत भारतात स्थानिक स्वशासन या नावाने ओळखली जाते.

9. लोकशाही विकेंद्रीकरण हा पंचायतराज पद्धतीचा प्रमुख उद्देश आहे. 

10. राजस्थान हे स्थानिक स्वराज्य संस्थेची संकल्पना स्वीकारणारे पहिले राज्य आहे. 

11. आंध्रप्रदेश हे भारतात पंचायतराज पद्धतीचा स्वीकार करणारे दुसरे राज्य आहे. 

12. पंचायतराज पद्धतीची स्तरीय योजना तामिळनाडु राज्याने स्वीकारली आहे. 

13. अशोक मेहता समितीने इ. स. 1977 साली पंचायतराज पद्धतीची पाहणी केली. 

14. नागालँड हे पंचायतराज संस्था नसलेले राज्य आहे. 

15. वसंतराव नाईक समितीची स्थापना इ. स. 1960 साली करण्यात आली. 

16. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात पंचायत राज अस्तित्वात आले. 

17. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायतसमिती कायदा 1 एप्रिल, 1961 रोजी संमत झाला. 

18. ग्रामपंचायत हा पंचायतराज योजनेतील सर्वात लहान घटक आहे. 

19. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कनिष्ठ पातळीवर ग्रामपंचायत काम करते. 

20. गट ग्रामपंचायत म्हणजे दोन-तीन खेड्यासाठी मिळून संयुक्त ग्रामपंचायत होय. 

21. मुंबई ग्रामपंचायत कायदा इ. स. 1958 साली लागू करण्यात आला. 

22. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची स्थापना इ. स. 1958 च्या कायद्यानुसार करण्यात 

23. ग्रामपंचायतीची रचना व कार्य 1993 च्या नियंत्रित होतात. आली.

24. महाराष्ट्रात पंचायतराज्याची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली. 

25. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी जिस्तरीय पद्धती स्वीकारलेली आहे.

X X

26. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापण्यासाठी कमीतकमी 100 लोकसंख्या 

27. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त पंधरा सभासद असतात.

28. ग्रामपंचायतीमध्ये कमीतकमी सात सभासद असतात.

29. ग्रामपंचायतीत साधारणपणे 7 से 15 सभासद असतात.

30. 600 ते 1000 लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीवर 7 सभासद असतात. 

31. ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष निवडून आलेले 12 सभासद असतात.

32. ग्रामपंचायतीमध्ये स्त्रियांसाठी 33 टक्के जागा राखीव असतात.

33.ग्रामपंचायतीच्या निवडणूक दर पाच वर्षांनी होते. 

34. ग्रामपंचायतीच्या अध्यक्षास सरपंच म्हणतात.

35. ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख सरपंच असतो.

36. ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड ग्रामपंचायत सभासद करतात. 

37. ग्रामपंचायतीच्या सभेचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितो.

38. सरपंचाचा कार्यकाल कमी-अधिक करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यास आहे.

39. सरपंचाच्या गैरहजेरीत काम उपसरपंच पाहतो.

40. ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीच्या सभासदांना पंच म्हणतात.

41.सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे रिकामी झाल्यास ग्रामसेवक हा हंगामी सरपंच असतो.

42. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कामकाज सचिव म्हणून पाहतो. 

43. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

44. प्रमुख कार्यकारी अधिकारी (जि.प.) ग्रामसेवकाची नेमणूक करतो.

45. ग्रामपंचायत सचिव हा जिल्हा परिषदेचा नोकर असतो.

46. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीस ग्रामाधिकारी म्हणतात. 

47. ग्रामसेवक हा ग्रामपंचायत व सहकारी संस्था यामधील महत्वाचा दुवा मानला जातो.

48. ग्रामसेवकाच्या कार्यावर गटविकास अधिकाऱ्याचे नजिकचे नियंत्रण असते.

49. ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 असावे लागले.

50. 600 ते 1200 लोकसंख्येला एक ग्रामसेवक नेमावा लागतो.

51. एक ग्रामसेवक जास्तीत जास्त दोन गावांचा कारभार पाहू शकतो.

52. खेड्यात जन्म-मृत्यु नोंद तसेच जननक्षम जोडप्यांची नोंद ग्रामसेवक करतो.

53. खेडयातील घरपट्टी ग्रामसेवक वसूल करतो.

54. ग्रामसेवकाचा पगार जिल्हा परिषदेच्या निधीतून दिला जातो.

55. ग्रामपंचायत 30 टक्के सेस घेऊ शकते.

56. ग्रामस्थ ग्रामपंचायतीस कर रूपाने अर्थ पुरवठा करतात.

57. महाराष्ट्रात ग्रामसभेची बैठक वर्षातून एक वेळा होते.

58. ग्रामसभेमध्ये फक्त प्रौढ स्त्री-पुरुष मतदारांचा समावेश होतो.

59. विधानसभा मतदार यादीतील सर्व गावकरी मिळून ग्रामसभा बनते.

60. ग्रामसभा ग्रामपंचायतीची कार्यकारी समिती निवडते.

61. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या वर्षभरात किमान बारा सभा होतात. 

62. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा महिन्यातून एकदा घेतली जाते.

63. दिवाबत्ती हे काम ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही.

64. आरोग्य संवर्धन, शिक्षण व ग्रामोद्योग ही ग्रामपंचायतीची विकास कामे आहेत.

65. महाराष्ट्रात सुमारे 25858 पेक्षा जास्त ग्रामपंचायती कार्यरत आहेत. 

66. तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यरत असले.

67. महाराष्ट्रात पंचायत समिती ही पंचायतराज व्यवस्थेचा मधला स्तर आहे.

68. पंचायत समितीचा प्रमुख सभापती (पंचायत समिती) असतो. 

69. पंचायत समितीच्या सभापतीची निवड निवडून आलेले पंचायत समिती सदस्य व त्या गटातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य करतात.

70. पंचायत समितीला सल्ला व मार्गदर्शन देण्याचे काम सभापती करीत असतो.

X X

71. पंचायत समितीच्या समचे अध्यक्षस्थान सभापती (पं. स.) भूषवितो.

72. पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे पाठवितात.

73. पंचायत समितीचा उपसभापती आपला राजीनामा सभापतीला सादर करतात. 

74. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी गटविकास अधिकारी (B.D.O.) असतो.

75. पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव गटविकास अधिकारी (B.D.O.) असतो. 

76. गटविकास अधिकान्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते.

77. पंचायत समितीत जिल्हा परिषदेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या निश्चित नसते.

78. महाराष्ट्रात सुमारे 300 पंचायत समित्या कार्यरत आहेत. 

79. जिल्हा परिषद ही पंचायतराज व्यवस्थेतील सर्वोच्च संस्था आहे.

80. महाराष्ट्रात जिल्हा परिषदा इ. स. 1962 साली अस्तित्वात आल्या.

81. जिल्हा परिषद ही जिल्हा पातळीवर पंचायत राज्याची संघटना आले.

82. जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी किमान वय 25 वर्षे असावे लागते.

83. जिल्हा परिषदेचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो.

84. जिल्हा परिषदेचा कार्यकाल सहा महिन्यांनी वाढविता येतो.

85. जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव असतात.

86. जिल्हा परिषदेचे साधारणपणे २/३ सदस्य प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडले जातात.

87. जिल्हा परिषद अध्यक्षांचे पद निर्वाचित स्वरूपाचे असते.

88. जिल्हा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद अध्यक्ष भूषवितो.

89. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो.

90. जिल्हा परिषद अध्यक्षपद लागोपाठ तीन वेळा भूषविता येत नाही.

91. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा जिल्हा परिषद उपाध्यक्षाकडे सादर करतात.

92. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासन अधिकारी सी. ई. ओ. (Z.P.) असतो.

93. जिल्हा परिषदेस जमीन महसूलाच्या ७० टक्के रक्कम शासनाकडून देण्यात येते.

94. जिल्हा परिषदेची हिशेब तपासणी स्थानिक निधी खाते व महालेखापाल करतो.

95. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये काही वाद निर्माण झाल्यास ते विभागीय आयुक्तामार्फत मिटवले जातात. 

96. स्थायी समिती ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती आहे.

97. जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष असतो. 

98. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष हे पद पदसिद्ध स्वरूपाचे असते.

99. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध चिटणीस डेप्यूटी सी. ई. ओ. असतो. 

100. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर अनुसूचित जातीजमातीचे दोन सभासद असतात.

101. जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचा पदसिद्ध सचिव मुख्य लेखाधिकारी असतो. 

102. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी समितीवर सात सभासद निवडले जातात.

103. शिक्षणाधिकारी हा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

104.जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीवर आठ सभासद निवडले जातात. 

105. जिल्हा कृषि अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या कृषि समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

106. जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन समितीवर सात सभासद निवडतात.

107. महाराष्ट्रातील मुंबई व मुंबई उपनगर जिल्हबास जिल्हा परिषद नाही. 

108. राज्य सरकार जिल्हा परिषदेस अर्थपुरवठा करते.

109. जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाल आहे. 

110. महाराष्ट्र शासनाने जून, 1984 मध्ये पंचायत राज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी प्रा. पी. बी. पाटील समिती नेमली होती.

111. प्रा. पी. बी. पाटील समितीने राज्य शासनास आपला अहवाल जून, 1986 मध्ये सादर केला.

112. शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांचे पाच प्रकार पडतात. 

113. महाराष्ट्र नगरपालिका कायदा इ. स. 1965 साली पास झाला.

114. महाराष्ट्रात एकूण 28 महानगरपालिका आहेत.

115. नगरपालिकेचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो. 

116. महाराष्ट्रात एकूण 233 अ-17, ब -73, क -143 नगरपरिषदा आहेत.

117. नगरपालिका अध्यक्षास नगराध्यक्ष या नावाने संबोधले जाते. 

118. मुख्याधिकारी हा नगरपालिकेत प्रशासन प्रमुख असतो.

119. नगर परिषदेची सभासद संख्या कमीत कमी वीस असावी लागते.

120. नगरपालिकेचा सभासद आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

121. जकातीचे उत्पन्न हा नगरपालिकेच्या उत्पन्नाचा मोठा मार्ग आहे.

122. नगर परिषदेत एकूण पाच विषय समित्या असतात.

123. नगर परिषदेच्या स्थायी समितीत एकूण नऊ सदस्य असतात. 

124. 75 हजार लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्येची नगरपालिका अ दर्जाची असते.

125. 30 हजार ते 75 हजार लोकसंख्येच्या नगरपालिकेस व दर्जा असतो. 

X X

126. महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात.

127. महानगरपालिकेच्या अध्यक्षास महापौर म्हणतात. 

128. महापौरास शहराचा प्रथम नागरिक मानले जाते.

129. महापौर पदाची मुदत एक वर्षे असते. 

130. महानगरपालिकेच्या मतदार संघाला वॉर्ड म्हणतात.

131. महानगरपालिकेच्या सभासदांना नगरसेवक म्हणतात. 

132. मुंबई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. 

133. पिंपरी-चिंचवड ही महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे.

134. जकातीचे उत्पन्न हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मोठा मार्ग आहे.

135. कटक मंडळ ही संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही.

136. महाराष्ट्रात एकूण सात कटकमंडळे (कॅन्टोनमेंट बोर्डस्) आहेत.

137. ग्रामपंचायतीच्या प्रमुखास सरपंच म्हणतात. 

138. जिल्हा परिषदेच्या एकूण नऊ समित्या असतात.

139. शासकीय कारभारातील तालुकापंचायत हा सर्वात तळाचा घटक आहे.

140. कार्यकारी अभियंता हा जिल्हा स्तरावर बांधकाम खात्याचा प्रमुख अधिकारी म्हणून काम करतो. 

141. वरिष्ठ पातळीवर स्थानिक स्वराज्य व जिल्हापरिषद ही संस्था कार्य करते.

142. ग्रामपंचायतीचा कार्यकाल कमी-अधिक करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यास आहे.

143. सरपंच आपला राजीनामा जिल्हा परीषद अध्यक्षांकडे सादर करतो.

144. जिल्हापरिषद सभासदांची किमान वयोमर्यादा 25 असते. 

145. जिल्ह्यातील एकूण शेतसाऱ्यापैकी 70 ट उत्पन्न जिल्हापरिषदेस मिळते.

146. ग्रामपंचायत व जिल्हापरिषद यामधील महत्त्वाचा दुवा पंचायत समितीस मानला जातो.

147. पंचायत समितीवर ग्राम दोन सभासद नियुक्त करते.

148. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा महाराष्ट्रात 1 मे, 1962 पासून लागू केला.











View, Comments and share..........

 

Post a Comment

2 Comments