Indian History:
Famous persons of ancient India-2
भारताचा इतिहास: प्राचीन भारतातील प्रसिद्ध व्यक्ति
1. वेद व्यास :
★ एक प्रसिद्ध संस्कृत पंडित व ऋषी.
★ महाभारतातील 18 प्रकरणे आणि वेदांत सुत्राची रचना केली.
★ अखिल जगतास मानवतेचा संदेश देणारा भगवद्गीता महाभारताचाच एक भाग आहे.
2. वाल्मिकी :
★ भारताच्या श्रेष्ठ कलाकृतीची-रामायणाची निर्मिती.
★ वाल्मिकी पूर्वायुष्यात वाल्या कोळी होता.
★ उत्तरायुष्यात तो वाल्मिकी ऋषी झाला.
3. मनू:
★ प्राचीन भारतातील प्रसिद्ध कायदेपंडित
★ मनुस्मृती हा समाजविषयक राजकारणविषयक माहिती देणारा ग्रंथ लिहिला.
4. पाणिनी:
★ प्राचीन काळचा प्रख्यात संस्कृत व्याकरणतज्ञ.
5. यास्क:
★ निरूक्तचा कर्ता.
★ प्राचीन काळचा प्रसिद्ध लेखक.
6. चार्वाक:
★ भारतीय दर्शनी लोकायत दर्शनाचा प्रवर्तक, नास्तिकांचा शिरोमणी, खा-प्या व मजा करा' असे तत्त्वज्ञान मांडले.
★ आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म ह्या कल्पना झुगारून दिल्या.
★ भौतिकवादी विचारसरणीचा व्याख्याता.
7. घोषला:
★ वैदिक युगातील एक प्रमुख ब्रह्मवादिनी स्त्री, जिच्या नावावर ऋग्वेदातील अनेक सुक्ते आहेत.
8. अजातशत्रु :
★ मगधचा राजा बिंबिसारचा पुत्र.
★ बिंबिसारला ठार करून राजगादी बळकावली.
★ गौतम बुद्धांचा समकालीन इ. स. पू. 516 ते इ. स. पू. 489 पर्यंत शासन केले.
9. गौतम बुद्ध:
★ लुंबिणी येथे जन्म.
★ नेपाळमधील कपिलवस्तू येथील शुद्धोधन राजाचा पुत्र.
★ गौतम बुद्ध यांनी आपल्या राजपदाचा, सुंदर पत्नीचा व लहान बाळाचा त्याग केला.
★ दीर्घकाळ चिंतन केल्यानंतर गौतम बुद्ध यांनी बिहार येथील बुद्धगया येथे बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली
★ बौद्ध धर्माचे संस्थापक.
10. महावीर:(599-527)
★ जैन धर्माचे 24 वे तीर्थकर
★ सत्य, अहिंसा व सदाचार या सद्गुणांचा प्रसार केला.
★ महावीर स्वतःला जीत म्हणजेच जिंकलेला असे मानत.
★ महावीर यांच्या अनुयायांना जैन म्हणतात.
11. अलेक्झांडर: ( 356 -323 )
★ ग्रीक सम्राट.
★ अलेक्झांडरने भारतावर इ. स. पू. 327 मध्ये स्वारी केली.
★ अलेक्झांडरने राजा पोरस व इतर टोळ्यांचा पराभव करून बियास नदीपर्यंतचा प्रदेश पादाक्रांत केला.
★ तिथे अलेक्झांडरच्या सैनिकांनी पुढे जाण्यास नकार दिल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली.
★ परतीच्या प्रवासातच बाबिलोन (बगदादजवळ) अलेक्झांडरचा इ. स. पू. 323 मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी मृत्यु झाला.
12. पोरस:
★ पंजाबचा प्रसिद्ध शूर राजा.
★ अलेक्झांडरने याचा पराभव केला, परंतु पोरसचे अतुलनीय शौर्य व धाडस पाहून त्याचे राज्य त्याला परत दिले.
13. चंद्रगुप्त मौर्य :
★ मौर्य राजवंशाचा संस्थापक.
★ भारताचा पहिला सम्राट.
★ भारताच्या हद्दीबाहेर राज्य वाढविले.
★ कौटिल्य हा चंद्रगुप्त मौर्यचा कार्यक्षम पंतप्रधान होता.
14. चाणक्य : (ख्रिस्तपूर्व 4 थे शतक)
★ मूळ नाव विष्णुगुप्त, पण चाणक्य अथवा कौटिल्य ह्या नावाने प्रसिद्ध,
★ चंद्रगुप्ताचा राजगुरू,
★ उच्च प्रतीचा राजकारणी, मुत्सद्दी
★ मौर्याला सिंहासनावर बसण्यासाठी चाणक्यने मदत केली.
★ मौर्य राजघराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्याचा चाणक्य हा प्रधानमंत्री होता.
★ शासननीतिवर आधारित "अर्थशास्त्र" ह्या ग्रंथाचा कर्ता.
X
X
15. मॅगेस्थेनीस:
★ सेल्युकस निकेटरले मेगस्थेनीसला इ. स. पू. 312 चे आसपास पाटलीपुत्र येथे चंद्रगुप्त मौर्याचे दरबारात ग्रीक राजदूत म्हणून पाठविले.
★ मॅगेस्थेनीसने मौर्याच्या प्रशासन विषयी पुष्कळ माहिती 'इंडिका' ग्रंथात लिहून ठेवली आहे.
16. सम्राट अशोक :
★ मौर्य राजवंशातील तिसरा सम्राट
★ चंद्रगुप्ताचा नातू व भारताचा श्रेष्ठ सम्राट
★ कलिंगच्या युद्धातील मानवसंहार पाहून युद्धाविषयी घृणा.
★ अशोकाने कलिंग युद्धात विजय संपादन केला.
★ कलिंग युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
★ अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी भारताबाहेर अनेक धर्मप्रचारक पाठविले.
★ अशोकाने एक हजार स्तूप बांधले, पण त्यापैकी एक स्तूप वगळता बाकीचे सर्व नष्ट झाले. अनेक ठिकाणी त्याचे शिलालेखही सापडतात.
★ अशोकाने रस्ते, धर्मशाळा, पाणपोई, वृक्षसंवर्धन अशी लोकहिताची कामे केली.
★ अशोकाने बळापेक्षा प्रेमाने विरोधकाना जिंकता येते ही विचारधारा रूजविली.
17. उपगुप्त :
★ एक प्रसिद्ध बौद्ध भिक्षू.
★ सम्राट अशोकाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली.
18. चारूमती:
★ सम्राट अशोकाची मुलगी.
★ बौद्ध भिक्षुणी झाली व बौद्ध धर्मप्रसारात भाग घेतला.
19. पतंजली:
★ अग्निमित्र राजांच्या कारकिर्दीतील सुप्रसिद्ध पंडित.
★ पाणिनीचे व्याकरण व योगशास्त्रावरील त्यांच्या टीका प्रसिद्ध आहेत.
20. गौतमीपुत्र सातकर्णी :
★ सातवाहन वंशातील अत्यंत महत्त्वाचा राजा.
21. कनिष्क:
★ कुशाण वंशाचा सर्वात प्रसिद्ध राजा.
★ उत्तर भारतावर राज्य करणारा तिसरा कुशाण राजा.
★ कनिष्कला साहित्य व कला यांमध्ये रस होता.
★ कनिष्क हा बौद्ध धर्माचा प्रचारकही होता.
★ प्राचीन भारतात कनिष्कला 'द्वितीय अशोक' समजतात.
22. पुष्यमित्र शुंग :
★ मौर्य सेनेत सेनानी.
★ मौर्य घराण्याचा नाश करून शुंग घराण्याची राजवट सुरू केली.
23. करिकाल:
★ चोल राजघराण्यातील सर्वात प्राचीन राजा.
★ करिकालचा काल इ. स. 100 समजला जातो.
24. आर्यदेव:
★ दुसऱ्या शतकातील एक प्रसिद्ध बौद्ध आचार्य.
25. नागार्जुन :
★ दुसऱ्या शतकातील एक प्रसिद्ध बौद्ध विद्वान.
★ बौद्ध काळातील प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ.
★ चीन व तिबेटमध्ये कार्य.
26. पैन्तेलियोन:
★ एक भारतीय यवनी राजा.
★ चौकोर चलन चालविले.
27. प्लिनी:
★ एक प्राचीन युनानी भूगोलवेता.
★ त्याने नॅचरल हिस्ट्री नामक ग्रंथात भारताचे वर्णन केले आहे.
28. चंद्रगुप्त दुसरा:
★ गुप्त घराण्यातील शूर राजा.
★ चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य नावाने प्रसिद्ध होता.
★ विक्रमादित्याच्या राजवटीला हिंदुस्थानचे सुवर्णयुग म्हणतात.
★ हिंदु कला व संस्कृतीचा चाहता असल्याने विक्रमादित्याच्या कारकिर्दीत भारतामध्ये साहित्य, शास्त्र, कला यांची भरभराट.
★ विक्रमादित्याच्या दरबारात कवी कालिदासासारखी नवरत्ने होती.
★विक्रमादित्याची राजधानी उज्जैनी येथे होती.
★ पहिला चिनी प्रवासी फाहेन विक्रमादित्याच्याच कारकिर्दीत भारताला भेट देऊन गेला.
29. आर्यभट्ट:
★ चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारातील सुप्रसिद्ध गणिती व खगोलशास्त्रज्ञ.
★ आर्यभट्टने शून्याचे महत्त्व सांगितले.
★ आर्यभट्टला सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाचे खरे कारण माहीत होते.
★ भारताच्या पहिल्या उपग्रहाला आर्यभट्टचेच नाव दिले आहे.
30. वराहमिहीर:
★ प्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ.
★ प्राचीन भारतातील सुप्रसिद्ध ज्योतिषी, गणिती व तत्त्वज्ञानी विक्रमादित्य (दुसरा चंद्रगुप्त) याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक.
X
X
31. धन्वंतरी:
★ चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारातील एक सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक
32. चरक :
★ 'चरक संहिता' चे लेखक आणि प्राचीन भारताचा सुविख्यात चिकित्सक
33. कालिदास:
★ विक्रमादित्याच्या राज्यसभेतील जगप्रसिद्ध संस्कृत कवी व नाटककार. यांनी शाकुंतलम्, कुमारसंभव, मेघदूत व ऋतूसंहार इ. ची रचना केली.
34. फाहेन:
★ फाहेन हा बौद्ध चिनी प्रवासी चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या कारकिर्दीत भारतात येऊन गेला.
35. हर्षवर्धन: 606-647)
★ कनोज आणि थानेश्वरचा प्रसिद्ध राजा.
★ प्राचीन काळचा उत्तर भारतातील शेवटचा हिंदू राजा. सातव्या शतकात मोठ्या वैभवाने राज्य केले.
★ हर्षवर्धनने बौद्ध धर्माचा प्रसार केला. त्याच्या कारकिर्दीत प्रसिद्ध चिनी हा ह्यू-एन-त्संग भारतात येऊन गेला.
36. ह्यू-एन-त्संग:
★ एक चिनी बौद्ध भिक्षु व विद्वान.
★ ह्यू-एन-त्संगनी हर्षकालीन भारताचे जिवंत विवरण लिहिले आहे.
37. पुलकेशी प्रथम :
★ दक्षिणेतील बदामीच्या चालुक्य वंशाचा प्रवर्तक.
38. पुलकेशी द्वितीय :
★ चालुक्य वंशाचा सर्वात प्रतापी राजा.
★ पुलकेशीने हर्षवर्धनाला पराजित केले होते.
39. दिवाकर:
★ सम्राट हर्षवर्धनाचा समकालीन कवी.
40. दंडी:
★ सहाव्या शतकातील कवी व गद्य लेखक.
★ दशकुमारचरित्राचा रचनाकार
41. बाणभट्ट:
★ प्रसिद्ध संस्कृत पंडित.
★ हर्षवर्धनाच्या दरवारातील राजकवी.
★ सातव्या शतकात 'कादंबरी' व 'हर्षचरित' हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले.
42. कुमारील भट्ट:
★दक्षिण भारतात इ. स. 700 मध्ये त्यांचा जन्म झाला.
★ आठव्या शतकातील हिंदु तत्त्वज्ञानाचा प्रख्यात प्रसारक.
★ हिंदुची धर्मसुत्रे व पूर्वमिमांसा दर्शनचे विद्वान भाष्यकार.
43. कल्हण :
★ ११ व्या शतकातील काश्मिरी कवी.
★ 'रजतरंगिनी' हे काव्य लिहिले.
44. भास्कराचार्य:
प्रसिद्ध गणिततज्ञ आणि ज्योतिषाचार्य
★ 'सिद्धांत शिरोमणी' ची रचना केली.
45. शंकराचार्य:
★ उत्तरगुप्त काळातील प्रसिद्ध दार्शनीक
★ म्हैसूर येथील शृंगेरी, काठेवाड येथील द्वारका, ओरिसामधील जगन्नाथपूरी आणि हिमालयामधील बद्रिनाथ येथे मठांची स्थापना केली.
X
X
46. धीमान:
★ 9 व्या शतकातील बंगालच्या पाल राजाच्या काळातील एक प्रसिद्ध कलाकार व मूर्तिकार.
47. अतिशा:
★ दुसऱ्या शतकातील प्रसिद्ध बौद्ध आचार्य.
48. राजेंद्र चोल:
★ अकराव्या शतकातील चोल घराण्यातील एक वैभवशाली राजा.
★ राजेंद्र चोलकडे अतिशय कार्यक्षम व भक्कम असे नाविक दल होते.
★ राजेंद्र चोलने शक्तीशाली नाविक दलाच्या सहाय्याने सिलोन, पेगू, अंदमान व निकोबार ही बेटे चोल साम्राज्याला जोडली.
49. कामंदक:
★ राज्यशास्त्राचा एक भारतीय लेखक.
★ कामंदकनी "नितीसार" हा ग्रंथ लिहिला.
View, Comments and share........
1 Comments
Nice
ReplyDelete