Geography of India -9
भारताचा भूगोल भाग -9/10
★ बियास नदीच्या प्रकल्पात गुजरात राज्य सहभागी नाही.
★ दामोदर खोरे योजना ही बहुउद्देशीय योजना बिहार व प.बंगालची संयुक्त योजना आहे.
★ भारतातील सर्वात जास्त लांबीचे हिराकूड धरण महानदीवर आहे.
★ हिमाचल प्रदेशातील गोविंदसागर जलाशय सतलज नदीवर आहे.
★ उत्तरप्रदेशातील रिहांद योजना रिहांद नदीवर आहे.
★ गांधीसागर तलाव चंबळ नदीवर आहे.
★ राणा प्रतापसागर धरण चंबळ नदीवर आहे.
★ कृष्णराजसागर धरण कावेरी नदीवर आहे.
★उर्के प्रकल्प सुरत शहराजवळ आहे.
★ कोसी नदीवर हनुमानसागर धरण बांधलेले आहे.
★ तापी नदीवर काक्रापारा धरण बांधलेले आहे.
★ भारतातील पंजाब राज्यास कालव्यांचे जाळे असे म्हणतात.
★ वुलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर काश्मीरमध्ये आहे.
★ सांबर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
★ प्रसिद्ध दाल सरोवर श्रीनगर येथे आहे.
★ अष्टामुदी सरोवर केरळ राज्यात आहे.
★ भारतात सुमारे ३० टक्के सिंचित क्षेत्र विहिरीच्या पाण्यावर आधारित आहे.
★ भारतीय शेतकरी पाण्यासाठी मुख्यतः विहिरीवर अवलंबून असतो.
★ भारतात उत्तरप्रदेश राज्यात गाळाची जमीन सर्वात जास्त आहे.
★ जमिनीच्या विशिष्ट प्रकारामुळे पंजाबमध्ये नलिका विहिरी जास्त आहेत.
★ भारतात ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत.
X X
★ भारताच्या एकूण निर्यातीतील शेतीक्षेत्राचा वाटा ३५ टक्के आहे.
★भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४२ टक्के उत्पन्न शेतीतून मिळते.
★ हरितक्रांती ही संज्ञा कृषि उत्पादनाशी संबंधित आहे. ★हरितक्रांती पंजाब राज्यात यशस्वी झाली आहे.
★ भारतात पिकांचे साधारणपणे दोन हंगाम असतात.
★भात हे भारतातील बहुसंख्य लोकांचे अन्न आहे.
★भारतातील उत्तरप्रदेश राज्यात जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आहे.
★भारतामध्ये तांदळाचे उत्पादन सर्वात जास्त आहे.
★नगदी पिकांमध्ये कडधान्यांची गणना होत नाही.
★तांदूळ हे खरीप पीक आहे.
★गहू, ज्वारी व हरभरा ही रब्बी हंगामातील पिके आहेत.
★ भारतातील सर्वाधिक जमीन तांदळाच्या पिकाच्या लागवडीखाली आहे.
★प. बंगाल हे भारतातील सर्वाधिक तांदूळ पिकविणारे राज्य आहे.
★तांदूळ नागालँडमधील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे.
★ गहू हे भारतातील मुख्य रब्बी पीक आहे.
★ उत्तरप्रदेश हे भारतातील सर्वात जास्त गहू उत्पादन करणारे राज्य आहे.
★ गहू हे पंजाबमधील महत्त्वाचे पीक आहे.
★थंड हवामान हे उत्तर भारतात गहू पिकण्याचे मुख्य कारण आहे.
★ भारत कॅनडाहून प्रामुख्याने गहू आयात करतो.
★ हरभरा हे रब्बी पीक आहे.
★ भारताचा चहाच्या उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो.
★ भारतातील शेती उत्पादनापैकी चहाचे उत्पादन प्रामुख्याने निर्यातीसाठी केले जाते.
★ भारताला चहाच्या निर्यातीपासून सर्वाधिक विदेशी मुद्रा मिळते.
★ आसाम हे भारतातील सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य आहे.
★ 'हिरवे सोने' चहास म्हणतात.
★ ब्रिटन हा भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश आहे.
★ सर्वात जास्त तागाच्या गिरण्या कलकत्ता येथे आहेत.
★ भारतातील प. बंगाल राज्यात उत्तम ज्यूट बियाणे उत्पादन होते.
★ भारतात स्थलांतरीत शेतीस 'झूमींग' म्हणतात.
★ भारतात कापसाचे उत्पादन महाराष्ट्र राज्यात अधिक होते.
★ भारतातील काळी जमीन कापसाच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
★ भारतातील निलगिरी पर्वतावर सर्वात जास्त कॉफीचे मळे आहेत.
★ भारतातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन कर्नाटकमध्ये होते.
★ भारतात सर्वात जास्त वेलदोडा उत्पादन कर्नाटक राज्यात होते.
★ भारतातील उत्तरप्रदेशात बार्लीचे उत्पादन सर्वात जास्त होते.
★ भारतीय शेतकऱ्याला तंबाखूचे नगदी पीक एकरी जास्त उत्पन्न मिळवून देते.
★ सिगारेटच्या तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन आंध्रप्रदेशात होते.
★ प. बंगाल हे भारतातील तागाचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य आहे.
★ दऱ्याखोऱ्यातील शेती आसाम राज्यात केली जाते.
★ गुजरात हे भारतातील सर्वात जास्त शेंगदाणे पिकविणारे राज्य आहे.
★ भारतातील उत्तरप्रदेश राज्यात सर्वात जास्त ऊस पिकतो.
★ ऊस हे मेघालय राज्याचे प्रमुख पीक आहे.
★ केरळ राज्यात स्थलांतरीत शेतीस 'पोणम्' म्हणतात.
★ कापूस हे पंजाबमधील नगदी पीक आहे.
★ लवंग या मसाल्याच्या पदार्थाचे उत्पादन केरळ राज्यात होते.
★ केरळ हे भारतात सर्वात अधिक मिरे उत्पादन करणारे राज्य आहे.
★ काजूचे पीक मुख्यत्वेकरून केरळ राज्यात घेतले जाते. ★ केरळ हे भारतातील सर्वाधिक कोकोचे उत्पादन करणारे राज्य आहे.
★ नारळ व खोबरे यांचे सर्वाधिक उत्पादन केरळ राज्यात होते.
★ भारतातील उत्तरप्रदेश राज्यात अफूचे उत्पादन होते.
★ खोबरेल तेलाचे सर्वात जास्त उत्पादन केरळ राज्यात होते.
★ भारतातील ९० टक्के रबर उत्पादन केरळ राज्यात होते. ★ गुजरात है सागरी मीठ उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे.
★ सांबर सरोवर मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
★ कापड उद्योग हा भारतात शेतीजन्य उद्योगापैकी आघाडीवर असलेला उद्योग आहे.
★ भारतातील धारीवाल भागात लोकरी कापड उद्योग विकास पावला आहे.
★ हातमागासाठी प्रसिद्ध असलेली भिवंडी महाराष्ट्र राज्यात आहे.
★ मुंबई व अहमदाबाद शहरास 'भारताचे मँचेस्टर' म्हणतात.
★ कोईमतूर हे दक्षिण भारतातील कापड उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र आहे.
★ भारतातील महाराष्ट्र राज्यात सुती कापडाच्या सर्वाधिक गिरण्या आहेत.
★ भारतात श्रीनगर हे शहर रेशीम निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.
★ भारतातील कर्नाटक राज्यात सर्वाधिक रेशमी कापडाचे उत्पादन होते.
★ कर्नाटकात भारतातील ६० टक्के रेशीम उत्पादन होते.
X X
★ कानपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चामडी उद्योग चालतो.
★ गुजरातमधील आनंद हे ठिकाण तूप व लोणीसाठी प्रसिद्ध आहे.
★ भारताचा जगात रेल्वेच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो.
★ भारतीय रेल्वेचा आशिया खंडात पहिला क्रमांक लागतो.
★ श्रीनगर शहर कोणत्याही रेल्वे मार्गावर नाही.
★ रेल्वेच्या सर्वात लांब प्लॅटफॉर्मसाठी प्रसिद्ध खरगपूर प. बंगालमध्ये आहे.
★ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचे प्रमुख कार्यालय अलाहाबाद येथे आहे.
★ गंगा-यमुना मैदान हा रेल्वेचे जाळे दाट असलेला प्रदेश आहे.
★दक्षिण रेल्वेचे मुख्यालय मद्रास येथे आहे.
★कलकत्ता हे संगणकाद्वारे रेल्वे आरक्षण केले जाणारे भारतातील दुसरे शहर आहे.
★पूर्व रेल्वेचे मुख्य कार्यालय कलकत्ता येथे आहे.
★ दक्षिण-मध्य रेल्वेचे प्रमुख कार्यालय सिकंदराबाद येथे आहे.
★ रेल्वे स्टाफ कॉलेज बडोदा येथे आहे.
★ गीतांजली एक्सप्रेस मुंबई व कलकत्ता या दोन शहरांदरम्यान धावते.
★ भारतात भूयारी रेल्वे कलकत्ता येथे आहे.
★ ताज (शताब्दी) एक्सप्रेस दिल्ली ते झांसीपर्यंत धावते.
★ मुंबई ते मद्रास दरम्यान मिनार एक्सप्रेस धावते. उदयपूर ते दिल्ली दरम्यान चेतक एक्सप्रेस धावते.
★ भारतातील केरळमध्ये सर्वात जास्त लांबीचे अंतर्गत जलमार्ग आहेत.
★ मुंबई हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे.
★ भारतातील मुंबई बंदरातून सर्वाधिक कापूस निर्यात होतो.
★ भारतातील कलकत्ता बंदरातून ज्यूट व चहाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.
★ हाल्दीया हे कलकत्ता बंदराचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात आलेले बंदर आहे.
★ भारतातील मद्रास हे बंदर नैसर्गिक बंदर नाही.
★ कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरील कृत्रिम बंदर आहे.
★ कांडला (गुजरात) हे भारतातील मुक्त व्यापारी बंदर आहे.
★ कालीकत बंदर केरळ राज्यात आहे.
★ सागरी मासेमारीत केरळ राज्य आघाडीवर आहे.
★ अँड ट्रंक रोड अमृतसर व कलकत्ता या दोन शहरांना जोडतो.
★ लक्षद्विप हे क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे.
★ बिहार हे खनिज उत्पादनात प्रथम क्रमांक असलेले राज्य आहे.
★ भारतात अभ्रकाचे सर्वाधिक उत्पादन होते.
★ तुतीकोरीन बंदर तामिळनाडु राज्यात आहे.
★ धनुष्यकोडी हे बंदर तामिळनाडु राज्यात आहे.
★ क्वीलॉन बंदर केरळ राज्यात आहे.
★ पॅराद्विप हे ओरिसातील बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बसलेले आहे.
★ क्वॉलम बीच हा सागर किनारा केरळ राज्यास लाभलेला आहे.
★ महाराष्ट्राचा माशाच्या उत्पादनात भारतात प्रथम क्रमांक लागतो.
★ श्रीम्पस मासा हा सर्वात जास्त परकीय चलन मिळवून देणारा भारतीय मासा आहे.
★ कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिणेकडील टोक आहे.
★ 'सात बेटांचे शहर' हे मुंबई शहराचे टोपणनाव आहे.
★ अंदमान व निकोबार ही बंगालच्या उपसागरातील बेटे आहेत.
★ लक्षद्विप हा केंद्रशासित प्रदेश (एकूण २७ बेटांचा समुह) अरबी समुद्रात आहे.
★ पाल्कच्या सामुद्रधुनीमुळे भारत व श्रीलंका हे दोन देश वेगळे झालेले आहेत.
★ मिनाबक्कम विमानतळ मद्रास शहरात आहे.
★ भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ (डमडम) कलकत्ता येथे आहे.
★ ग्रंड ट्रंक या राष्ट्रीय महामार्गाची लांबी १५०० मैल आहे हा मार्ग अमृतसर व कलकत्ता या दोन मोठ्या शहरांना जोडतो.
★ भारतातील केरळ राज्यात रस्त्यांचे दाट जाळे आहे.
★ राजस्थान हे भारतातील संगमरवरासाठी प्रसिद्ध असलेले राज्य आहे.
★ भारत हा अभ्रक खनिजाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.
★ जगातील एकूण अभ्रक उत्पादनाच्या ८० टक्के उत्पादन भारतात होते.
★ हजारीबाग ह्या भारतात अभ्रकासाठी प्रसिद्ध असलेल्या खाणी आहेत.
★ भारतात युरेनियमचे साठे कुर्नूल (केरळ) येथे आहेत.
★ भारतातील युरेनियमच्या खाणी जादूगुडा येथे आहेत.
★ भारतातील राजस्थान राज्यात शिशाचे साठे मोठ्या प्रमाणावर सापडतात.
★ भारत तांबे हे खनिज आयात करतो.
★आंध्र प्रदेशातील रामगिरी सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे.
★ राजस्थानमधील खेत्री येथे तांब्याच्या खाणी आहेत.
★ सोन्याच्या सर्वात जास्त खाणी कर्नाटकमध्ये आहेत.
★ कोलार (कर्नाटक) ही भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे.
★ भारतात कोळशाचे उत्पादन बिहार राज्यात अधिक होते.
★ प. बंगाल हे भारतात कोळशाचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य आहे.
★ भारतातील बिहार राज्यात कोळशाचे साठे सर्वात जास्त आहेत.
★ भारतात कोळशाच्या खाणी प्रथम राणीगंज येथे इ. स. १७७४ साली सुरु करण्यात आल्या.
★ झारिया ही भारतातील सर्वात मोठी कोळशाची खाण आहे.
★ राणीगंज हा सर्वात महत्त्वाचा कोळसा खाणींचा प्रदेश आहे.
★ गोंदवन कोळशाचे साठे मध्यप्रदेशात आढळतात.
★ आंध्रप्रदेशातील सिंग्रेणी कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.
★ लिग्नाईट नैसर्गिक कोळसा आहे.
★ भारतात पन्ना व्यतिरिक्त वज्रकरूर येथे हिऱ्याच्या खाणी आहेत.
★ भारतात मध्यप्रदेश राज्यात पन्ना येथे हिऱ्याच्या खाणी अधिक आहेत.
★ भारतात बिहार राज्यात युरेनियमचे सर्वात जास्त साठे सापडतात.
★ मेवाड भागात निलम हे किंमती रल सापडते.
★ राजस्थानमध्ये जस्त हे खनिज मोठ्या प्रमाणावर सापडते.
★ भद्रावती (कर्नाटक) हे ठिकाण लोखंड व पोलादाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
★ सिंगभूम हे लोहखनिज उत्पादन केंद्र बिहार राज्यात आहे.
★ हिंदुस्तान स्टील लिमिटेड रांची (बिहार) येथे आहे.
★ भारतातील गोवा राज्यातील लोह खनिज मुख्यतः निर्यात केले जाते.
★ भारत जपान देशाला लोह निर्यात करतो.
★ हिंदुस्तान आयर्न ॲण्ड स्टील कंपनी बर्नपूर (कर्नाटक) येथे आहे.
★ लोखंड व पोलाद उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले दुर्गापूर प. बंगालमध्ये आहे.
★ टाटा आयर्न ॲण्ड स्टील कंपनी जमशेदपूर येथे आहे. ★ जमशेदपूर हे लोह-पोलाद निर्मितीचे केंद्र बिहार राज्यात आहे.
★ दुर्गापूर पोलाद प्रकल्प ब्रिटनच्या सहकार्याने उभारला आहे.
★ बोकारो स्टील प्लॅन्ट बिहार राज्यात आहे.
★ बोकारो स्टील कारखाना रशियाच्या सहकार्याने निर्मिला आहे.
★ भिलाई (मध्यप्रदेश) पोलाद कारखाना रशियाच्या सहकार्याने उभारण्यात आला आहे.
★ रूरकेला (ओरिसा) पोलाद कारखाना प, जर्मनीच्या सहकायनि उभारला आहे.
★ भारतात थोरियम अणुइंधनाचा प्रचंड साठा आहे.
★ थोरियमच्या खाणींसाठी प्रसिद्ध त्रावणकोर केरळ राज्यात आहे.
★ ॲल्युमिनियमच्या 'कच्च्या धातूस 'बॉक्साईट' म्हणतात.
★ भारतातील मध्यप्रदेश राज्यात ॲल्युमिनियमचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात.
★ सार्वजनिक क्षेत्रातील प्रचंड ॲल्युमिनियम प्रकल्प कोरबा मध्यप्रदेशात आहे.
★ भारतात मँगेनीजचे सर्वाधिक उत्पादन ओरिसा राज्यात होते.
★ कोबाल्ट धातूचे उत्खनन राजस्थान व बिहार राज्यात केले जाते.
★ राजस्थानमधील खेत्री प्रकल्प तांब्यासाठी प्रसिद्ध आहे.
★ सिमेंटचे सर्वाधिक कारखाने बिहार राज्यात आहेत.
★ कर्नाटक राज्यात बिहारखालोखाल सिमेंटचे कारखाने आहेत.
★ भारत पेट्रोलियमच्या आयातीसाठी सर्वात जास्त पैसे खर्च करतो.
★ अंकलेश्वर (गुजरात) पेट्रोल व पेट्रोलियम पदार्थांच्या खाणींसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
★ खनिजतेल उत्पादक माकूम प्रदेश आसाम राज्यात आहे.
★ बॉम्बे हाय हे भारतातील प्रमुख खनिजतेल उत्पादक क्षेत्र आहे.
★ ज्वालामुखी हा खनिजतेल मिळवून देणारा जिल्हा आसाम राज्यात आहे.
★ आसाममध्ये सुमारे ४० टक्के ऑईल मिळते.
★ बरौनी तेलशुद्धीकरणासाठी प्रसिद्ध आहे.
★ नूनमती हे तेलशुद्धीकरण कारखान्याशी संबंधित ठिकाण आहे.
★ हाल्दीया पेट्रोरसायन प्रकल्प प. बंगाल राज्यात आहे.
★ दिग्बोई हा भारतातील तेल शुद्धीकरणाचा सर्वात मोठा कारखाना आहे.
★ भारतात पिंपरी व्यतिरिक्त ऋषीकेश येथे पेनिसिलीन कारखाना आहे.
★ सिंद्री हा भारतातील सर्वात मोठा रासायनिक खत कारखाना आहे.
★ थळवायशेत खतप्रकल्प महाराष्ट्र राज्यात आहे.
★ सिंद्रीचा कृत्रिम खत प्रकल्प बिहारमध्ये आहे.
★ सुती कापड उद्योग हा भारतातील सर्वात जुना उद्योग आहे.
★ मुंबई व अहमदाबाद ही भारतातील सर्वात मोठी सुती कापड केंद्रे आहेत.
★ भारतातील सुतीकापड गिरणी या उद्योगात सर्वात जास्त कामगार गुंतलेले आहेत.
★ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या तामिळनाडु राज्यात आहेत.
★ हिंदुस्तान मशीन टूल्स कंपनी बंगलोर येथे आहे.
★ हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेडचा पाचवा घड्याळ कारखाना श्रीनगर येथे आहे.
X X
★ कायनेटिक होंडा स्कूटरसाठी प्रसिद्ध असलेले पिठम्पूर मध्यप्रदेशात आहे.
★ बंगलोर व कानपूर ही शहरे विमाने उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
★ भारतात कोरापत येथे विमाने निर्मितीचा कारखाना आहे.
★ MIG-29 ही विमाने तयार करण्याचा कारखाना ओझर (नाशिक) येथे आहे.
★ विजयंता रणगाडे आवडी (तामिळनाडु) येथे तयार होतात.
★ ॲम्युनिशन फॅक्टरी (दारूगोळ्याचा कारखाना) महाराष्ट्रात खडकी (पुणे) येथे आहे.
★ भारतात माझगाव डॉक (मुंबई) येथे युद्धनौका बनविल्या जातात.
★ भारतातील सर्वात मोठा जहाज बांधणी कारखाना विशाखापट्टणम् येथे आहे.
★ कोचिन येथे आगबोटी बांधल्या जातात.
★ नेफानगरला कागद कारखाना आहे.
★ गुजरात राज्यात सोनगढ येथे कागदनिर्मिती प्रकल्प आहे.
★ भारतामध्ये पहिली कागद गिरणी इ. स. १८७० साली स्थापन झाली.
★ कागद कारखान्यांसाठी प्रसिद्ध असलेले सहारणपूर उत्तरप्रदेशात आहे.
★ भारतात टिटाघर येथे कागदाचे उत्पादन होते.
★ मध्यप्रदेशातील नेफानगर वृत्तपत्र छपाईच्या कागद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
★ नोटांची छपाई करणारी मुद्रणशाळा नाशिक येथे आहे.
★ भारतात आगगाडीचे डबे पेरांबूर येथे तयार केले जातात.
★ विद्युत् रेल्वे इंजिन निर्मितीसाठी प्रसिद्ध चित्तरंजन प. बंगालमध्ये आहे.
★ आगगाडीचे डबे बनविण्याचा नवीन कारखाना कपूरथळा (पंजाब) येथे होत आहे.
★ भारतीय रेल्वे ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे.
★ दमनज्योती ॲल्युमिनियम प्रकल्प ओरिसा राज्यात आहे.
★ भारतातील सर्जीकल इन्स्ट्रुमेंटस्चा कारखाना मद्रास येथे आहे.
★ भारतात टेलीफोन साहित्य बंगलोर येथे तयार होते.
★ हिंदुस्तान अँटिबायोटिक्सचा कारखाना भारतात पिंपरी (पुणे) येथे आहे.
★ भारतात सर्वात जास्त साखर कारखाने उत्तरप्रदेश राज्यात आहेत.
★ विक्रम साराभाई स्पेस सेंटर त्रिवेंद्रम (केरळ) येथे आहे.
★ खेळसाहित्य बनविण्याचे कारखाने पतियाळा येथे आहे.
★ थुंबा केरळ राज्यात आहे.
★ विशाखापट्टणम् हे जपानला कच्चे लोखंड पाठविण्यासाठीच चालू केलेले बंदर आहे.
★ श्रीहरीकोटा (आंध्रप्रदेश) हे भारतातील उपग्रह उड्डाणाचे सर्वात मोठे केंद्र आहे.
★ थुंबा (केरळ) रॉकेट प्रक्षेपणासाठी प्रसिद्ध आहे.
★ बीजनिर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र राज्याचा भारतात प्रथम क्रमांक लागतो.
★ कोयना जलाशयाचे पाणी भुयारी बोगद्यांमार्फत डोंगरावर पाहून बीजनिर्मिती केली जाते.
★शिवसमुद्र योजना हा भारतातील पहिला जलविद्युत् प्रकल्प आहे.
★ सलाल जलविद्युत् निर्मिती प्रकल्प जम्मू-काश्मीर राज्यात आहे.
★ टाटा हायड्रो इलेक्ट्रीक प्रोजेक्ट महाराष्ट्र राज्यात आहे.
★ सलाल जलविद्युत् प्रकल्प चिनाब नदीवर आहे.
★ विनाब नदीवरील डलहस्ती जलविद्युत् प्रकल्प जम्मू-काश्मीर राज्यात आहे.
★ भारतातील प. बंगाल हे राज्य औष्णिक ऊर्जेवर अवलंबून आहे.
★गुजरातमध्ये घुवारण या ठिकाणी औष्णिक विद्युत् केंद्र आहे.
★ गांधीसागर धरणाचा जलसिंचनापेक्षा बीज निर्मितीसाठी अधिक उपयोग होतो.
★ जगातील सर्वात उंच जलविद्युत् प्रकल्प भारतात लेह येथे आहे.
★ भारतातील पहिले सौरग्राम खांडीया (गुजरात) येथे आहे.
View, Comments and share


1 Comments
Nice
ReplyDelete