Subscribe Us

header ads

Geography of India -8/10 भारताचा भूगोल

Geography of India -8

भारताचा भूगोल भाग -8/10


★ भारताचे क्षेत्रफळ सुमारे 33 लाख चौ. कि. मी. आहे.

★ क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे जगात सातवे स्थान आहे.

भारताची दक्षिणोत्तर लांबी 3214 कि. मी. आहे. 

★ भारताचे एकूण सहा विभाग (झोन्स) आहेत. 

★ भारताचे भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या तीन भाग पडतात.

★ दख्खनचे पठार हा भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या भारतातील सर्वात प्राचीन भाग आहे. 

★ भारतात एकच प्रमाणवेळ आहे. 

★ भारताच्या सागर किनाऱ्याची लांबी 8100 कि. मी. आहे.

★ भारताची पूर्व किनारपट्टी पश्चिम किनारपट्टीपेक्षा रूंद आहे.

★ भारतातील 30 शहरे किनाऱ्यालगत वसलेली आहेत.

★ पाल्कची सामुद्रधुनी हा भारत व श्रीलंकेस जोडणारा पाण्याचा भाग आहे. 

★ भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे.

★ मलबार किनारपट्टीवरील खाऱ्या पाण्याच्या सरोवरांना 'कायल' असे म्हणतात.

★ भारताची प्रादेशिक जल सरहद्द किनाऱ्यापासून बारा नाविक मैल असते.

★ भारत व चीन या दोन देशांमध्ये मॅकमोहन रेषा आहे.

★ ड्युरॅंड रेषा ही पाकिस्तान व अफगाणिस्तान दरम्यानची सीमारेषा आहे. 

★ ड्युरॅंड रेषा ही फाळणीपूर्व भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा आहे.

★ अफगाणिस्तान हा भारताच्या वायव्येकडील पाकिस्तान व्यतिरिक्त देश आहे.

X X

★ भारताची नेपाळबरोबरची सरहद्द प्रवेशासाठी खुली केलेली आहे.

★ भारताच्या उत्तरेस चीन व नेपाळ हे देश आहेत.

★ भारताच्या पश्चिमेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

★ ॲडम्स ब्रिज (आदामचा पूल) हा भारत व श्रीलंकेमधील पुल आहे.

★ लडाख (काश्मीर) हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे.

★ अरुणाचल प्रदेश हे नॉर्थ-ईस्ट फ्रॉन्टीयर एजन्सीचे नवीन नाव आहे.

★ अरुणाचल प्रदेश हे भारतातील चोवीसावे राज्य आहे.

★ गोवा हे भारताचे पंचविसावे राज्य आहे. 

★ भारतात एकूण आठ पिनकोड झोन्स आहेत.

★ भारतातील उत्तरप्रदेशात सर्वात जास्त जिल्हे आहेत.

★ भारताची भू-सीमा इतर सात देशांच्या भू-सीमांशी भिडलेली आहे.

★ भारताच्या भू-सीमांची लांबी 15168 कि. मी. आहे.

★ गोवा हे क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात लहान राज्य आहे.

★ मध्यप्रदेश हे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे.

★ मध्यप्रदेश राज्याची सीमारेषा सर्वाधिक राज्यांना जोडून आहे.

★ मध्यप्रदेशाच्या सीमा इतर सात राज्यांच्या सीमांशी संलग्न आहेत. 

★ अंदमान निकोबार बेटे भारताचा अतिदक्षिणेकडील भाग आहे.

★ तेलगू ही आंध्रप्रदेश राज्याची राजभाषा आहे. 

★ इंग्रजी ही नागालँडची प्रमुख भाषा आहे.

★ भारतात महाराष्ट्र व गोवा या ठिकाणी कोकणी भाषा बोलली जाते. 

★ खासी आणि गारो हया मेघालय राज्याच्या प्रादेशिक भाषा आहे.

★ उर्दू ही जम्मू-काश्मीर राज्याची राजभाषा आहे.

★ मल्याळम् ही केरळ राज्याची राजभाषा आहे.

★ ओरिया ही ओरिसा राज्याची बोलीभाषा आहे. 

★ आसामी ही आसाम राज्याची प्रमुख भाषा आहे.

★ भारतात हिंदी भाषेच्या खालोखाल तेलगू भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते. 

★ हिंदी ही मध्यप्रदेशाची प्रमुख भाषा आहे.

★महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे. 

★ बिहार हे भारतातील चारही बाजूंनी जमीन असलेले राज्य आहे.

★ गोवा हे सर्वात कमी समुद्र किनारा असलेले राज्य आहे.

★ हिमालयाचा भारतातील सर्वाधिक भाग अरुणाचल प्रदेशात आहे. 

★ कर्कवृत्त भारताच्या मध्यभागातून जाते.

★ भारतातील आग्रा हे शहर कर्कवृत्ताच्या उत्तरेस आहे. 

★ २२ डिसेंबर हा भारतातील सर्वात लहान दिवस आहे.

★ भारताचा लोकवस्तीच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो.

★ भारत व पाकिस्तान यांच्या प्रमाणवेळेत 30 मिनिटांचा फरक आहे.

★ भारताची लोकसंख्या तरुण लोकसंख्या आहे.

★ भारतीय लोकसंख्येच्या संदर्भात इ. स. 1921 या वर्षास महाविभाजनाचे वर्ष मानतात.

★भारतात एकूण साडेपाच लाख खेडी आहेत. 

★ अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

★ प. बंगाल राज्यात लोकसंख्येची घनता अधिक आहे. 

★ भारतातील दिल्ली या शहरात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे.

★ उत्तरप्रदेश हे भारतात सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. 

★ लक्षद्विप हा भारतात सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आहे.

★ केरळ हे साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य आहे. 

★ बिहार हे दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य आहे. 

★ भारतात नैऋत्य मोसमी वारे सप्टेंबर महिन्यात माघारी फिरतात. 

★ ईशान्य मोसमी वारे नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांमध्ये वाहतात. 

★भारताच्या दक्षिण भागात हवामान अत्यंत विषम असते.

★ भारतातील चंदिगड या केंद्रशासित प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. 

★ भारतामध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे.

★ भारतातील केरळ राज्यात दर हजारी पुरुषांशी स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

★ भारतातील केरळ राज्यातून लोक मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी मध्य पूर्वेस जातात.

X X

★ संथाल ही भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. 

★बस्तार हा मध्यप्रदेशातील आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे.

★ सातपुडा पर्वताच्या खोऱ्यात भिल्ल जमातीचे लोक राहतात. 

★ टोडा ही आदिवासी जमात निलगिरी पर्वतात आढळते.

★ गारो, खासी व जैनतिया या जमाती मुख्यत्वे करून नागालँड राज्यात आढळतात.

★ गोंड, कोलाम व मुरीया ह्या आदिवासी जमाती मध्यप्रदेशात आढळतात. 

★ गारो आदिवासी जमात भारतातील छोटा नागपूर भागात आढळते.

★ भारतातील छोटा नागपूर भागात 'हो' जमातीचे लोक राहतात.

★ मोसमी वारे संपूर्ण भारताला पाऊस देणारे बारे आहेत.

★ भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सर्वात जास्त (90 टक्के) पाऊस पडतो. 

★ भारताच्या मुख्य भूमिवर मोसमी पावसाचे आगमन सर्वसाधारणपणे 7 जूनला होते.

★ नैऋत्य मोसमी वारे मे ते सप्टेंबर महिन्यांमध्ये वाहतात.

★भारताच्या पूर्व किनाऱ्यावर (मद्रासमध्ये) ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून हिवाळ्यात पाऊस मिळतो.

★ वाळवंटी प्रदेशाचे हवामान कोरडे असते. 

★ भारतात सर्वात जास्त दुष्काळ कर्नाटक राज्यात पडतो. ★ भारतातील संक्रमण काळाचा महिना फेब्रुवारी आहे.

★ उन्हाळ्यात केरळ राज्यात नॉर्वेस्टर वारे वाहतात.

★ भारतात 21 मार्च या दिवशी दिवस व रात्र समान असतात. 

★ भारतातील सर्वात कमी सरासरी तापमान 15.7 सेंटिग्रेड आहे.

★ भारतात दुपारचे बारा वाजले असल्यास इराणमध्ये सकाळचे दहा वाजले असतील. 

★ हिमालय पर्वत हा घडीचा पर्वत आहे.

★ एव्हरेस्ट शिखराची उंची 8848 मीटर आहे. 

★ भारतामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो.

★ कांचनगंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे.

★ कांचनगंगा शिखराची उंची 28280 फूट आहे. 

★ अरवली ही भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे.

★ अन्नामुदी हे दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर आहे.

★ अरवली हा भारतातील 'अवशिष्ट पर्वत' या नावाने ओळखला जाणारा पर्वत आहे.

★ 'निळा पर्वत' निलगिरी पर्वताला म्हटले जाते.

★ दोडाबेट्टा पर्वत शिखर निलगिरी पर्वतात आहे. 

★ महादेव डोंगर रांगा मध्यप्रदेश राज्यात आहेत.

★ हिंदकुश ही भारतीय उपखंडाची पश्चिम सीमा असलेली पर्वतरांग आहे.

★ डलहौसी हे हिमाचल प्रदेशातील थंड हवेचे ठिकाण आहे.

★ मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तरप्रदेशात आहे.

★ माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण अरवली पर्वतात बसलेले असून राजस्थान राज्यात आहे.

★ सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण उटकमंड (उटी) तामिळनाडु राज्यात आहे. 

★ कुलू व मनाली हे थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेशात आहे.

★ दार्जीलिंग हे थंड हवेचे ठिकाण प. बंगालमध्ये आहे.

★ भारत 2000 वर्षांपर्यंत देशातील किमान 33 टक्के जमीन जंगलाखाली आणणार आहे.

★ भारतातील एकूण क्षेत्रफळापैकी 23 टक्के क्षेत्र हे जंगलाखाली आहे.

★ आसाम हे भारतातील सर्वाधिक जंगलक्षेत्र (टक्केवारीनुसार) असलेले राज्य आहे. 

★ सामाजिक वनीकरणात प्रामुख्याने निलगिरी झाडांची लागवड केली जाते.

★ भारतातील वन प्रकारांपैकी काटेरी झुडुपांची वने खूप विरळ असतात. 

★ भारतातील सदाहरित बने जास्त उपयोगी आहेत.

★ दख्खनच्या पठारावर काटेरी वनस्पती आढळतात.

★ शिवालय पर्वत उतारावर रोजवूड जातीचे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात.

★ भारतात पानझडी वृक्षांची पाने जमिनीला भेगा पडू लागल्यावर गळतात. 

★ चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन कर्नाटक राज्यात होते.

★ भारतात मँग्रूव्ह वृक्षांची जंगले सुंदरबन येथे आढळतात.

★ भारतामध्ये एकूण वीस राष्ट्रीय उद्याने आहेत.

★ कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तरप्रदेश राज्यात आहे. 

★ भारतीय सिंहासाठी प्रसिद्ध गीरचे जंगल सौराष्ट्र (गुजरात) प्रांतात आहे.

★ बेटला नॅशनल पार्क बिहार राज्यात आहे. 

★ पेरियार अभयारण्य केरळ राज्यात आहे.

★ काझीरंगा अभयारण्य आसाम राज्यात आहे. 

★ मानस अभयारण्य भारतातील आसाम राज्यात आहे.

★ कान्हा नॅशनल पार्क मध्यप्रदेशात आहे. 

★ दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तरप्रदेश राज्यात आहे.

★ केवलादेव हे राजस्थानमधील घाना पक्षी अभयारण्याचे नवीन नाव आहे.

★ ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्यात आहे. 

★ रणथभोर राष्ट्रीय अभयारण्य राजस्थानमध्ये आहे.

★ कॉर्बेट नॅशनल पार्क (उत्तरप्रदेश) हे भारतातील सर्वात उंच व मोठे अभयारण्य आहे. 

★ भारतातील काझीरंगा अभयारण्यात एकशिंगी गेंदा आढळतो.

★ दुधवा नॅशनल पार्क हा वाघांसाठी राखीव असलेला उत्तरप्रदेशातील नॅशनल पार्क आहे.

★बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यात आहे. 

★ गंगा, यमुना व गोमती या नद्यांचा उगम हिमालयात होतो.

★ गंगा नदी ही भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदी आहे.

★ गंगा नदी खोरे हे भारतातील सर्वात मोठे नदी खोरे आहे.

★ गंगा नदी तीन राज्यांतून वाहते.

★ बांगलादेश व भारत यांच्यामध्ये गंगा नदीवरून वाद चालू आहे.

★ गंगा नदी बंगालच्या उपसागराकडे वाहत जाताना ओरिसा राज्यातून जात नाही.

★ उत्तर भारतातील नद्या जलमार्गास उपयुक्त आहेत.

★ भारतातील बहुतेक नद्या उत्तरपूर्व दिशेस वाहतात.

★ भारतातील ब्रह्मपुत्रा नदीचा जलवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.

★ ब्रह्मपुत्रा ही भारतामधील आकारमानाने सर्वात मोठी नदी आहे.

★ ब्रह्मपुत्र नदी ही आसाममधील महत्त्वाची नदी आहे.

★ ब्रह्मपुत्रा नदीचा ऋग्वेदामध्ये फारसा उल्लेख नाही.

★ आसामला दरवर्षी ब्रह्मपुत्रा नदीच्या पुराचा त्रास होतो.

★ चंबळ नदी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व राजस्थान राज्यातून वाहते.

★सिंधु नदी भारतातील जम्मू-काश्मीर राज्यातून वाहते.

★'बिहारचे अश्रू' असे कोसी नदीस संबोधतात.

★ भारतातील कृष्णा नदी बंगालच्या उपसागरास मिळते.

★ नर्मदा तापी व शरावती या अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या आहेत. 

★ तुंगभद्रा ही कृष्णा नदीची उपनदी आहे.

★गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. 

★ गोदावरीचे खोरे हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खोरे आहे.

★ गोदावरी नदी ही दख्खनच्या पठारावरील सर्वात लांब नदी आहे. 

★गोदावरी नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश राज्य वाहते.

★ कावेरी नदी कर्नाटक व तामिळनाडू राज्यातून वाहते. 

★ भारतातील नर्मदा व तापी या नद्या पश्चिमवाहिनी आहेत.

★ नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. 

★ नर्मदा नदीचे उगमस्थान मध्यप्रदेश राज्यात आहे.

★ जोग (गिरसप्पा) धबधबा शरावती (कर्नाटक) नदीवर आहे. 

★ हावडा पूल हुगळी नदीवर बांधला आहे.

★ गंगा यमुनेचा संगम अलाहाबादजवळ होतो.

★ भारतातील सर्वात मोठा पूल शोण नदीवर बांधण्यात आला आहे.

★ भारतातील सर्वात उंच पूल चंबळ नदीवर आहे.

★ भारतातील दामोदर नदीस 'बंगालचे दुःखाश्रू' असे म्हणतात.

★ 'पाच नद्यांचा प्रदेश' असे पंजाब राज्यास म्हणतात. 

★ भारतातील हुगळी नदीकाठी ज्यूट उद्योगाचा विकास झाला आहे.

★ महात्मा गांधी सेतू गंगा नदीवर बांधण्यात आला आहे. ★ दिब्रुगड ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर बसलेले आहे.

★ नाशिक शहर गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर बसलेले आहे.

★ फिरोजपूर शहर सतलज नदीकाठावर वसलेले आहे.

★ उत्तर भारतातील अलाहाबाद शहर गंगा-यमुना यांच्या संगमाजवळ बसलेले आहे.

X X

★ लेह शहर रावी नदीकाठावर वसलेले आहे.

★ महानदीच्या किनान्यावर संबलपूर शहर वसलेले आहे. ★ भारतात पंजाब राज्यात ओलिताची सोय सर्वाधिक आहे.

★ भाक्रा धरण (हिमाचल प्रदेश) भारतातील सर्वात उंच धरण आहे.

★ भाक्रा नानगल बहुउद्देशीय प्रकल्प सतलज नदीवर आहे.

★ भाक्रा धरणाची उंची 226 मीटर आहे.

★ हिराकूड हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.

★ जगातील सर्वात लांब असलेले हिराकूड धरण ओरिसा राज्यात महानदीवर आहे.

★ नानगल धरण पंजाब राज्यात आहे. 

★ नागार्जुनसागर धरण कृष्णा नदीवर आहे.

★ नागार्जुनसागर प्रकल्प आंध्रप्रदेश राज्यात आहे.

★ म्हैसूर शहराजवळ कावेरी नदीवर कृष्णराज सागर धरण आहे.

★ फराक्का प्रकल्प हुगळी नदीवर आहे.

★ कृष्णा नदीवरील तेलगूगंगा प्रकल्पाद्वारे मद्रास शहरास पाणीपुरवठा होणार आहे.

★ शिवाजीसागर धरण कोयना नदीवर आहे. 

★ गोविंदसागर तलाव चंबळ योजनेशी संबंधित आहे.

★ रिहांद धरण उत्तरप्रदेश राज्यात रिहांद नदीवर पिंपरी (मिर्झापूर) येथे आहे. 

★ इंदिरा गांधी कॅनॉल प्रोजेक्ट राजस्थानमध्ये आहे.

★ इंदिरा गांधी कॅनॉलची लांबी 649 किलोमीटर आहे. 

★ शरावती योजना कर्नाटक राज्यात आहे.

★ मेत्तूर योजना कावेरी नदीवर केवाडिया येथे आहे.

★ सरदार सरोवर नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प आहे.

★ सरदार सरोवर प्रोजेक्ट गुजरात राज्यात आहे.

★ सरदार सरोवराचा लाभ गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांना होणार आहे.

क्रमशः......








View, Comments and share....

Post a Comment

2 Comments