राग, दुःख, इर्षा सारी होळीच्या अग्नीत टाकून द्या पुरणपोळीसारखा गोडवा नात्यांमध्येही येऊ द्या
होळीच्या हार्दिक शुभेच्छा....
Geography of India-7
भारताचा भूगोल भाग -7/10
भारतातील खनिज उत्पादन आणि उद्योगधंदे
1. भारतातील खनिज उत्पादन-1
1. लोखंड
बिहारमध्ये सिंगभूम व मानभुम .
ओरिसा राज्यात मयूरभंज के केओंनझार व सुंदरगड .
मध्य प्रदेशामध्ये बैलादिला .
पश्चिम बंगाल मध्ये बारद्वान व वीरभूम या ठिकाणी मिळते.
2. दगडी कोळसा
भारतात दगडी कोळशाच्या खाणी खालील ठिकाणी आहेत.
पश्चिम बंगालमध्ये राणीगंज बिहारमध्ये बोकारो गिरीधि करणपुर व झारिया महाराष्ट्रातील वर्धा खोऱ्यात चंद्रपूर, आंध्र प्रदेश मध्ये सिंग्रेनी,कश्मीरमध्ये रियाजी, नांनचीक,लद्दा.
3. चुनखडी
भारतात चुनखडी आंध्र प्रदेशात सिंगरेनी, बिहारमध्ये सिंगभूम, मध्य प्रदेशात इंदूर, गुजरात मध्ये पंचमहल, महाराष्ट्रात भंडारा, यवतमाळ आणि तामिळनाडू राज्यात मिळते.
4. पेट्रोलियम
भारतात पेट्रोलियम पदार्थ गुजरात मध्ये खांबायत, अंकलेश्वर, ओलपाड, कलोल, नवागाव आसाम मध्ये रुद्रसागर, लकवा, दिग्गोई व महाराष्ट्रात बॉम्बे हाय.
5. क्रोमाइट
भारतात क्रोमाइट हे खनिज बिहार राज्यात सिंगभूम व भागलपूर. महाराष्ट्र मध्ये रत्नागिरी या ठिकाणी मिळते. तामिळनाडूमध्ये सालेम या ठिकाणी मिळते. ओरिसा राज्यात केंजर या ठिकाणी मिळते आणि कश्मीरमध्ये लडाख या ठिकाणी मिळते.
X X
2. भारतातील खनिज उत्पादन-2
1. टीन हे खनिज बिहारमध्ये हजारीबाग या ठिकाणी मिळते.
2. अभ्रक हे खनिज बिहारमध्ये गया मुंगर हजारीबाग आंध्र प्रदेश मध्ये नेल्लोर राजस्थान मध्ये जयपुर आणि उदयपूर या ठिकाणी मिळते.
3. लिग्नाइट कोळसा हे खनिज तामिळनाडू राज्यातील नेवेली या ठिकाणी मिळते.
4. बॉक्साईट हे खनिज बिहार महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यात मिळते.
5. मॅग्नीज हे खनिज पदार्थ मध्यप्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू व उत्तर प्रदेशात मिळते.
6. टंगस्टन हे पद खनिज राजस्थान व पश्चिम बंगालमध्ये मिळते.
7. शिसे हे खनिज राजस्थान मध्ये उदयपूर व जयपूर या ठिकाणी मिळते.
8. तांबे हे खनिज पदार्थ बिहारमध्ये सिंगभूम ,बाराजामडा राजस्थान मध्ये खेत्री या ठिकाणी मिळते.
9. सोने हा खनिज पदार्थ कर्नाटक राज्यातील कोलार या ठिकाणी मिळतो.
10. चांदी हे खनिज पदार्थ कर्नाटक राज्यात गोल्डफिल्ड बिहार राज्यात सिंग भूम मानभूम या ठिकाणी मिळते.
11. हिरा हे मध्य प्रदेशातील पन्ना या ठिकाणी मिळतात.
12. थोरियम हे केरळ राज्यात रावण कोर आंध्राची किनारपट्टी व तामिळनाडूचा भाग येथे मिळते.
13. यूरेनियम हे बिहारमध्ये जादू गुड्डा व उत्तर प्रदेशात मिळते.
14. कोबाल्ट हे राजस्थान व केरळ राज्यात मिळते.
15. ग्राफाईट हे राजस्थान मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशात मिळते.
16. डोलोमाईट हे मध्य प्रदेश व ओरिसा राज्यात मिळते.
17. बेरिलियम हे बिहार मध्य प्रदेश राजस्थान व महाराष्ट्र राज्यात मिळते.
18. सल्फर हे तामिळनाडू राज्यात मिळते.
19. जिप्सम हे राजस्थानातील बिकानेर व जोधपूर आणि तामिळनाडू राज्यात त्रिचनापल्ली या ठिकाणी मिळते.
20. ॲस्बेटास हे कर्नाटक व राजस्थान राज्यात मिळते.
21. खनिज मीठ हे हिमाचल प्रदेशातील मंडी या ठिकाणी मिळते.
22. चिनी माती हे बिहारमध्ये सिंगभूम व केरळ राज्यात मिळते.
23. पांढरा दगड हा राजस्थान मध्ये मिळतो.
24. सिलिका (वाळू ) उत्तर प्रदेश व गुजरात राज्यात मिळते.
25. पांढरा दगड राजस्थान मध्ये जोधपुर या ठिकाणी मिळतो.
X X
भारतातील प्रमुख उद्योगधंदे-1
1. सुती कापड
मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अहमदाबाद, बंगलोर, मद्रास, दिल्ली, मदुराई, कानपूर,कोईमतूर, मसुरी, लुधियाना, इंदोर व कलकत्ता.
2. हातमाग उद्योग
बंगलोर, मद्रास, कलकत्ता, कटक, भिंवडी, कानपूर, मदुराई, कोईमतूर, हैद्राबाद, मालेगाव, उल्हासनगर व इचलकरंजी
3. कागद कारखाने
वृत्तपत्राचा कागद-नेफानगर (मध्यप्रदेश) डालमियानगर (बिहार), बल्लारपूर (महाराष्ट्र), अमलाई (मध्यप्रदेश) टिटाघर, कलकत्ता, मुंबई- लखनौ, पुणे, जगात्तरी (हरियाना), पूनालूर (केरळ), बराड़ी- (गुजरात), सहारणपूर (उत्तरप्रदेश), शिरपूर व कारवार (कनार्टक)
4. कागद साहित्य
कच्चा माल, गवत, बांबू (मऊ लाकडाचा लगदा) यंत्राच्या सहाय्याने कागद तयार करण्याचा कारखाना देशात प्रथम इ.स. १८६७ साली कलकत्त्याजवळ बालमिस्लस् येथे झाला. कागदासाठी लागणारा लगदा सोनगड (गुजरात) येथे तयार होतो.
5. पोलाद कारखाने
जमशेदपूर (बिहार), भिलाई (मध्यप्रदेश), बोकारो (बिहार), रूरकेला (ओरिसा), दुर्गापूर (प. बंगाल), रांची (बिहार), बर्नपूर, तुंगभद्रा भद्रावती (कर्नाटक) विशाखापट्टणम् (आं.प्रदेश) हिरापूर, मनोहरपूर व कुल्ती कटनी (मध्यप्रदेश)
6. खतांचे कारखाने
सिंद्री(बिहार),गोरखपूर, पाणकी (उ.प्र.) कांडला (गुजरात), गोरखपूर, कोरवा (मध्यप्रदेश), रूरकेला (ओरिसा), कोचीन (केरळ), नेव्हेली, पतकी, (तामिळनाडु),नानगल (पंजाब), मथुरा (उ.प्र), दुर्गापूर (प.बंगाल), कोटा, बरौनी, नामरूप (आसाम) विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश), बेळगोळा (कर्नाटक), ट्रॉंबे (तुर्भे), थळवायशेत (महाराष्ट्र), बेळगोळा (कर्नाटक) व अलवाये (केरळ)
7. जहाज बांधणी
हिंदूस्तान शिपयार्ड (विशाखापट्टणम्), माझगाव गोदी (बांधणी व दुरूस्ती) (महाराष्ट्र), कोचीन (केरळ), भावनगर, जामनगर व मद्रास
8. विमान कारखाने
ओझर-नाशिक (मिग विमाने), कानपूर, हैद्राबाद (लढाऊ विमाने) व बंगलोर (प्रवासी विमानांचा कारखाना)
9. औषध कारखाने
पेनिसिलीन-पिंपरी (पुणे) व ऋषीकेश (उ. प्रदेश) सियेटिक ड्रग्ज-हैद्राबाद, बडोदा, कलकत्ता,मुंबई, डी.डी.टी-दिल्ली व अलवाये
10. मशीन टुल्स
अंबरनाथ, हैद्राबाद, जलहळ्ळी (बंगलोर), पिंजोर (हरियाना), कालाभासारी (केरळ) व कुकटपल्ली (हैद्राबाद)
11. ताग गिरण्या
कलकत्ता, हावडा, चंद्रनगर, श्रीरामपूर, टिटाघर, बिहार, तामिळनाडु, पहिली ताग गिरणी १८५१ मध्ये रिस्म येथे सुरू. एकूण ७० पैकी ५५ गिरण्या हुगळी नदीच्याकाठी आहेत.
12. विजेची भारी यंत्रसामुग्री
भोपाळ, रामचंद्रपूरम् (आंध्र), राणीपूर, (उ.प्रदेश) हैद्राबाद, त्रिचनापल्ली, हरीद्वार व तिरूवेरम्बूर
13. लोकरी वस्तू व सतरंज्या
धारीवाल, हिस्सार(हरियाना), गढवाल, नैनिताल, अलमोडा आणि अमृतसर (पंजाब),कानपूर (यू.पी.), बिकानेर (राजस्थान), मुंबई, ठाणे, व बंगलोर (शाली व गालीचे)
14. रेशीम उद्योग
मुर्शिदाबाद (प.बंगाल), श्रीनगर, जम्मु, तुतीकोरीन, बंगलोर, सुरत, अहमदाबाद, कोईमतूर (तामिळनाडु) व आसाम, अमृतसर, जालंधर, लुधियाना, वाराणसी, श्रीनगर, म्हैसुर, मुंबई, त्रिचनापल्ली, मुर्शिदाबाद, भागलपूर, मद्रास, कलकत्ता, नागपूर व अहमदाबादरेयॉन उद्योग ग्वाल्हेर (मध्यप्रदेश), उल्हासनगर (महाराष्ट्र) व अहमदाबाद
15. आगकाडी उद्योग
मद्रास, कलकत्ता, बरेली, मेरठ (उ.प्र.) ग्वाल्हेर, हैद्राबाद, घुबरी (आसाम), बिलासपूर (मध्यप्रदेश), कोटा (राजस्थान), शिमोगा (कर्नाटक), केरळ, अंबरनाथ, हैद्राबाद, अलाहाबाद, पेरंबूर, विजयवाडा व असिफनगर
16. तेल उद्योग
दिग्बोई, तुर्भे, विशाखापट्टणम्, बरौनी, कोयाली, कोचीन, हाल्दिया, (सार्वजनिक क्षेत्र) मुंबई , अंकलेश्वर, मथुरा, नुनमती व गोहत्ती, एस्सो-ट्रॉंबे, बर्माशेल (मुंबई), इंडियन ऑईल (विशाखापट्टणम्) (खाजगी क्षेत्र) व आसाम ऑईल (आसाम)
17. काच सामान
कलकत्ता, राणीगंज, फिरोजाबाद, सालेम व कोईमतूर तर महाराष्ट्रात पुण्याजवळ तळेगाव- दाभाडे व साताऱ्याजवळ ओगलेवाडी ही काच उपकरणांची प्रमुख केंद्रे आहेत.
18. सिमेंट उद्योग
पोरबंदर, ओखा, कटनी व जबलपूर (मध्यप्रदेश), सूरजपूर (हरियाना), बुंदी, शहाबाद (आंध्र), राजगंगापूर (ओरिसा), बागलकोट (कर्नाटक), डालमियानगर (बिहार), कैमूर, लखेरी, ग्वाल्हेर, गुंटूर (आंध्रप्रदेश).
19. साखर उद्योग
गोरखपूर, कानपूर, मिरत, लखनौ (उ. प्रदेश), महाराष्ट्र, तामिळनाडु, चोप्रा पंजाब, आंध्रप्रदेश, मवाना, मोदीनगर, बुलंदशहर, शाहजहांपुर, हमीरा, डालमियानगर, चंपारण्य, जागघरी, पानीपत, फगवाडा व मुजफ्फरपूर
20. कोळसा उद्योग
राणीगंज, झारीया बोकारो, गिरदीह, नरणपूर, पंचव्हॅली, चंद्रपूर, सिंग्रेणी, माकूम व चिरीमिरी
21. शिसे उद्योग
फिरोजाबाद, बाजोई, अमृतसर, अंबाला, दिल्ली, मद्रास, नागपूर, बेळगाव व प. बंगाल.
22. रबर उद्योग
त्रिवेंद्रम्, कोझीकोडे, बंगलोर, मुंबई, पुणे, कलकत्ता, अहमदाबाद, दिल्ली व शाहीगंज (प. बंगाल)
23. यंत्र व यांत्रिक साधने
रांची (बिहार), मुंबई, पुणे, बंगलोर (कर्नाटक) व सिंकदराबाद (आंध्र प्रदेश) हैद्राबाद-भोके पाहणारी यंत्रे, मिलिंग मशीन, मशीन टुल्स, स्क्रू व इंजिनाचे भाग दुर्गापूर-खाणींसाठी लागणारी यंत्रे, स्वयंचलित आणि डिझेल इंजिनाचे भाग
24. लाकडावरील कोरीवकाम
काश्मीरात अक्रोडच्या लाकडावरील कोरीव काम, कर्नाटकातील म्हैसूर-चंदन, रोजवूड(रक्तचंदन) केरळ
25. भातुवरील नक्षीकाम
तांबे व ब्राँझ पासून मुर्ती बनविण्याचे काम हैद्राबादला तर मण्यांचे काम लखनौ, वाराणसी,जयपूर व मुरादाबाद
26.युद्धसामुग्री
तिरूची (शस्त्रे), रणगाडे आवडी (तामिळनाडु) काडतूसे, गोळ्या व बंदुका (कानपूर) व दारूगोळा-खडकी (पुणे)
X X
भारतातील प्रमुख उद्योगसंदे-2
उद्योग-शहरे
★ कापड गिरण्या- मुंबई, अहमदाबाद, ग्वाल्हेर, इंदोर, मद्रास, सुरत व कानपूर
★ विद्युत् रेल्वे इंजिने- चित्तरंजन (प. बंगाल)
★ डिझेल रेल्वे इंजिने-वाराणसी व कानपूर (उत्तरप्रदेश)
★ रेल्वे डबे- बंगलोर (कर्नाटक) व पेरंबूर (तामिळनाडु)
★ रेल्वेचे सामान-अजमेर, मद्रास, मुंबई, झांसी व खरगपूर
★ रेल्वे रूळ व चाके- जमशेदपूर
★ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट- मद्रास
★ मोटार उद्योग- मुंबई, कलकत्ता, जमशेदपूर, दिल्ली, हैद्राबाद व मद्रास
★ इलेक्ट्रीक मशीन- भोपाळ (मध्यप्रदेश)
★ टेलिफोन यंत्रसामुग्री- रूपनारायणपूर, बंगलोर व मुंबई
★ टेलिप्रिन्टर्स- मद्रास
★ विद्युत् यंत्रसामुग्री- बंगलोर, हैद्राबाद व औरंगाबाद
★ शिवणयंत्रे- प. बंगाल, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश
★ रासायनिक उद्योग- मिठापूर, व धांगना, महाराष्ट्रात-मुंबई, अंबरनाथ व रसायनी
★ बारदान उद्योग- बरेली, अहमदाबाद, कलकत्ता, मुंबई, पुणे, श्रीनगर, नागपूर, घुवरी व हैद्राबाद (१०२)
★ काचेच्या बांगड्या- फिरोजाबाद
★ शाल उद्योग- श्रीनगर, पंजाब, जयपूर, आग्रा, बिकानेर, वरंगळ व औरंगाबाद
★ कातडी उद्योग- मुंबई, कलकत्ता, आग्रा, दिल्ली, कानपूर, कोईमतूर, बंगलोर व मद्रास,
★ ॲल्युमिनीयम उद्योग- असनसोल (प.बंगाल), कटनी(म.प्र.), अश्यपूरम् (केरळ) व त्रे. के. खाणी (बिहार)
★ सायकली व मशीनपार्ट- कलकत्ता, मुंबई, पाटणा, सोनपत, मद्रास व लुधियाना
★ सिगारेट व चिरूट- मद्रास, मोंगीर, त्रिचनापल्ली, ग्वाल्हेर, मुंबई, कलकत्ता, नागपूर, व हैद्राबाद.
★ साबण- मुंबई, मद्रास व केरळ
★ प्लॅस्टिक उद्योग- अमृतसर, कानपूर, कोईमतूर, हैद्राबाद, मुंबई व कलकत्ता
★ सुंभ (कत्था)- मद्रास, म्हैसुर व कोचीन
★ लाकूड कटाई - साग-म. प्रदेश, चंदन-कर्नाटक, हिरडा-राधानगरी (महाराष्ट्र) ओरिसा व प. बंगाल
★ मातीची भांडी- ग्वाल्हेर, अलिगड, कोटा, लखनौ, मदूरा व जालंदर
★ हस्तीदंत (विम) - केरळ, कर्नाटक, उत्तरप्रदेश व राजस्थान (कोरीव काम)
★ इंजिनिअरिंग कारखाने- मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण (महाराष्ट्र), हैद्राबाद व कलकत्ता
★ रेडिओ- मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर व हैद्राबाद
★ दुधाचे पदार्थ- आनंद(गुजरात), आरे कॉलनी (मुंबई) व वारणानगर (कोल्हापूर)
★ वनस्पती तूप- महाराष्ट्र, प. बंगाल व उत्तरप्रदेश
★ इंजिने व पंप- हरिहर(कर्नाटक), सातारा, किर्लोस्करवाडी, कोल्हापूर व पुणे.
★ हेवी वॉटर प्लॅट- नरोरा (उत्तरप्रदेश) नानगल(पंजाब), तुतीकोरीन व कलपक्कम्
★ शस्त्रक्रिया उपकरणे- गिंडी (मद्रासजवळ)
View, Comments and share....









.jpg)









.jpg)


1 Comments
Very nice information sir
ReplyDelete