Subscribe Us

header ads

Geography of India -10/10 भारताचा भूगोल

Geography of India - 10

भारताचा भूगोल भाग- 10/10


★ तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

★ भाभा अणुशक्ती केंद्र महाराष्ट्रात तारापूर येथे आहे.

★ ध्रुव अणुभट्टी ही उद्योगधंद्यासाठी निर्माण केलेली पहिली अणुभट्टी आहे. 

★ ओरिसा हे अणुशक्ती केंद्र नसलेले भारतीय राज्य आहे.

★ भारतातील पाचवे अणुशक्ती केंद्र काक्रापारा येथे आहे.

★ भारतीय लाख संशोधन केंद्र रांची येथे आहे. 

★ मध्यवर्ती तंबाखू संशोधन संस्था राजमहेंद्री येथे आहे. 

★ सेंट्रल मायनींग रिसर्च स्टेशन धनबाद येथे आहे. 

★ कोडाईकॅनॉल हे मद्रासमधील ठिकाण वेधशाळेसाठी प्रसिद्ध आहे. 

★ आर्यभट्ट हे भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव आहे. 

★ नॅशनल फिजीकल लॅबोरेटरी नवी दिल्ली येथे आहे. 

★ भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर मुंबई येथे आहे. 

★ राष्ट्रीय साखर संशोधन संस्था कानपूर येथे आहे.

★ कलपक्कम् अणुवीज प्रकल्प तामिळनाडु राज्यात आहे. 

★ भारतातील कलपक्कम अणुवीज केंद्र नुकतेच कार्यान्वीत झाले.

★ संपूर्ण भारतीय बनावट हे कलपक्कम येथील अणुविद्युत केंद्राचे वैशिष्ट्य आहे.

★ नरोरा अणुवीज केंद्र उत्तरप्रदेश राज्यात आहे.

★ राणाप्रतापसागर हे अणुशक्ती केंद्र राजस्थान राज्यात आहे.

★ भारताने पोखरण (राजस्थान) येथे सर्वप्रथम अणुस्फोट केला. 

★ सेंटर ऑफ इलेक्ट्रॉनिक डिझाईन ॲण्ड टेक्नॉलॉजी औरंगाबाद येथे आहे.

★ नॅशनल मेटॅलर्जीकल लॅबोरेटरी जमशेदपूर येथे आहे.

X X

★ केंद्रीय ज्यूट संशोधन संस्था कलकत्ता येथे आहे.

★ मध्यवर्ती भात संशोधन संस्था कटक येथे आहे.

★ भारतामध्ये सर्वात जास्त प्रयोगशाळा केरळ राज्यात आहे.

★ पणजीचे Department of Oceanography अंटार्क्टिका मोहीम पाठविते.

★ टेक्सटाईल्स रिसर्च असोसिएशन मुंबई येथे आहे.

वूल रिसर्च असोसिएशन मुंबई शहरात आहे.

★ सेंट्रल बिल्डींग रिसर्च इन्स्टिट्यूट रूरकी येथे आहे. 

★ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसियनॉग्राफी पणजी येथे आहे.

★ केंद्रीय औषधी संशोधन संस्था लखनौ येथे आहे. 

★ सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट दिल्ली येथे आहे.

★ भारतीय वनस्पती सर्वेक्षण मुख्यालय कलकत्ता येथे आहे.

★ सफदरजंग रोड दिल्ली येथे आहे.

★ अरुणाचल प्रदेशाच्या तावांग जिल्ह्यात सुमदोरांग-चू खोरे आहे. 

★ 'कथ्थकली' हा नृत्यप्रकार केरळ राज्याचे वैशिष्ट्य आहे.

★ 'मोहिनी अत्तम' नृत्य तामिळनाडु राज्याशी संबंधित आहे.

★ 'यक्षांगण' हे कर्नाटक राज्याचे पारंपारिक नृत्यनाट्य आहे. 

★ 'कुचीपुडी' हा नृत्यप्रकार आंध्रप्रदेश राज्याचे वैशिष्ट्य आहे.

★ 'ओणम' सण केरळ राज्यात साजरा करतात.

★ 'पोंगल' सण तामिळनाडु राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 

★ कोडाईकॅनॉल हे तामिळनाडु राज्यात आहे.

★ पोंगल हा मल्ल्याळी लोकांचा प्रमुख सण आहे. 

★ श्रीहरीकोटा आंध्रप्रदेश राज्यात आहे.

★ मेणपुरी जिल्हा उत्तरप्रदेशात आहे.

★ शेरपूर हे गाव पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात आहे.

★ कन्याकुमारी तामिळनाडु राज्यात आहे. 

★ कर्नाटकच्या किनाऱ्यास 'कारवार' नावाने ओळखतात.

★ हिस्सार जिल्हा हरियाना राज्यात आहे. 

X X

★ आनंदपूर साहीब पंजाबमधील रोपार जिल्ह्यात वसलेले आहे.

★ कुचविहार जिल्हा प. बंगाल राज्यात आहे. 

★ बेळगाव कर्नाटक राज्यात आहे.

★ झोजीला ही श्रीनगर-लेह मार्गावरील खिंड आहे.

★ अमृतसर पंजाब राज्यात आहे.

★ खुंजेराब खिंड चीन व अफगाणिस्तानमधून जाते. 

★ भारतात सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

★ बॅरनद्विप हा भारतातील एकमेव सुप्त ज्वालामुखी आहे.

★ रॉयलसीमा हा प्रदेश आंध्रप्रदेशात आहे.

★भारतात जम्मू-काश्मीर राज्यात चांगल्या जातीच्या मेंढ्यांची पैदास होते. 

★ भूदान चळवळ प्रथम आंध्रप्रदेश राज्यात सुरु झाली.

★ भारतामध्ये सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये नलिका-बेबी जन्माला आली.

★ अंत्योदय योजना प्रथम राजस्थान राज्यात सुरु झाली. 

★ भारतातील पंजाब प्रांताचे दरडोई उत्पन सर्वाधिक आहे.

★ एअर इंडिया ही भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. 

★ नागपूर विमानतळाचा आंतरराष्ट्रीय विमानतळात समावेश होत नाही.

★ गुलमर्ग हे भारतातील सर्वात अधिक उंचीवरील शहर आहे.

★ इंदिरा गांधीनगर हे हरियानाच्या नवीन राजधानीचे नाव आहे. 

★ भारतातील उत्तर-पूर्व भागाला 'सात बहिणींचा प्रदेश' असे म्हणतात.

★ ली कार्बुझियर यांनी चंदिगड शहराची रचना केली. 

★ चंदीगड हे भारतातील सुनियोजित शहर आहे.

★ गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे.

★ भारतातील सर्वात मोठे वाळवंट राजस्थान राज्यात आहे.

★ थरचे वाळवंट (राजस्थान) हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. 

★भारतात पहिले दूरदर्शन केंद्र नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले.

★ प्रसिद्ध सारनाथ उत्तरप्रदेश राज्यात आहे.

★ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेजेस् भारतातील कर्नाटक राज्यात आहे.

★ जंतरमंतर वेधशाळा दिल्ली येथे आहे. 

★ इंडिया गेट दिल्ली येथे आहे.

★ आगाखान पॅलेस पुणे येथे आहे.

★ लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरी येथे आहे. 

★ चारमिनार हे जगप्रसिद्ध ठिकाण हैद्राबाद (आंध्रप्रदेश) येथे आहे.

★ प्रसिद्ध रायटर्स बिल्डिंग कलकत्ता येथे आहे. 

★ एडवर्ड ल्यूटेन्स याने नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाची रचना केली.

★ नेकचंद हे चंदिगड येथील देव देवतांच्या साम्राज्याचे व रॉक गार्डनचे निर्माते आहे.

★ पूर्वेचे व्हेनीस अलेप्पी (केरळ) शहराला म्हणतात. 

★ कॉटन टेक्नॉलॉजी रिसर्च लॅबोरेटरी मुंबई शहरात आहे. 

★ दिल्लीचे हृदय असे चांदणी चौकास म्हणतात.

★ कोणार्क (ओरिसा) ब्लॅक पॅगोडासाठी प्रसिद्ध शहर आहे.

★ तेलंगण हे आंध्रप्रदेश राज्याचे प्रादेशिक नाव आहे. 

★ भारतातील लाल किल्ल्यात लाहोर गेट आहे.

★ हावडा ब्रिज पश्चिम बंगाल राज्यात आहे. 

★ भारतातील प्रसिद्ध हवामहल जयपूर येथे आहे.

★ कोणार्कचे सूर्य मंदिर ओरिसा राज्यात आहे.

★ काशी विश्वेश्वराचे मंदिर बनारस येथे आहे. 

★ अमरनाथ गुहा जम्मू-काश्मीर राज्यात आहे.

★ दिलवारा मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेले माऊंट अबू राजस्थान राज्यात आहे.'

★ जगन्नाथ मंदिर ओरिसा राज्यात आहे.

★ शीखांचे सुवर्णमंदिर अमृतसर येथे आहे.

★ 'सुवर्ण मंदिरांचे शहर' या टोपण नावाने अमृतसर हे शहर ओळखले जाते.

★ कलकत्ता हे भारतातील 'राजवाड्याचे शहर' आहे. 

★ काश्मीर हे 'भारताचे नंदनवन' म्हणून गौरविले जाणारे ठिकाण आहे.

★ खजूराहो हे भारतातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे.

★'मंदिरांचे माहेरघर' हे बनारस शहराचे टोपण नाव आहे.

★'भारताचे उद्यान' हे बंगलोर शहराचे टोपण नाव आहे.

★मोहन-जो-दारो हे सिंधु संस्कृतीकालीन शहर सध्याच्या सिंध (पाकिस्तान) प्रांतात आहे.

★ कुतुबमिनार व लाल किल्ला ही स्थळे दिल्ली शहरात आहेत.

★ कुतुबमिनारची उंची 288 फूट आहे.

★ भारतातील सर्वात मोठी मशीद (जामा) दिल्ली येथे आहे.

★ 'गुलाबांचे शहर' असे चंदिगड शहरास म्हणतात. 

★ तिरूपतीचे मंदिर आंध्रप्रदेश राज्यात आहे.

★ भारतातील सर्वात उंच मनोरा दिल्ली येथे आहे. 

★ घारापुरी ही प्रेक्षणीय लेणी मुंबई शहराजवळ आहे. 

★ लाल बहादूर शास्त्री यांची समाधी विजयघाट (दिल्ली) येथे आहे. 

★ इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली येथे आहे. 

★ सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद येथे आहे. 

★ भारतात कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर हैद्राबाद येथे आहे. 

★ केंद्रीय पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय हैद्राबाद येथे आहे. 

★ हिंदुस्तान शिपयार्ड विशाखापट्टणम् येथे आहे.

★ सिंधु संस्कृतीकालीन लोथल शहर सध्याच्या गुजरात राज्यात आहे. 

★ प्रसिद्ध 'अप्पूघर' दिल्ली शहरात आहे.

★ दिलवारा मंदिरे मऊंट अबूस आहेत. 

★ भारतातील सर्वात मोठा दरवाजा फत्तेपूर-शिक्री या शहरात आहे.

★ भारतातील प्रसिद्ध वृंदावन बाग म्हैसूर (कर्नाटक) येथे आहे. 

★ प्रसिद्ध नटराज पुतळा चिदंबरम् शहरात आहे.

★ नॅशनल बोटॅनिकल गार्डन्स लखनौ येथे आहे. 

X X

★ प्रसिद्ध तिहार जेल दिल्ली शहरात आहे.

★ राम जन्मभूमि उत्तरप्रदेश राज्यात आहे.

★ मीनाक्षी मंदिर मदुराई (तामिळनाडु) येथे आहे. 

★ साबरमती आश्रम गुजरात राज्यात आहे.

★ भारताचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे आहे. 

★ भारतातील सर्वात मोठे म्युझियम कलकत्ता शहरात आहे.

★ संगीत नाटक ॲकेडमी दिल्ली येथे आहे.

★ इंडियन नेव्हल ॲकेडमी ही संस्था कोचीन येथे आहे.

★ भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र माऊंट अबू येथे आहे.

★ इंडियन मिलिटरी ॲकेडमी ही संस्था डेहराडून येथे आहे. 

★ भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कारवार येथे आहे.

★ नेताजी सुभाषचंद्र बोस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् पतियाळा येथे आहे. 

★ इंडियन पॅराशूट ट्रेनिंग कॉलेज आग्रा येथे आहे.

★ अमृतबझार पत्रिका हे दैनिक कलकत्ता शहरातून प्रसिद्ध होते. 

★ प्रागज्योतिषपूर ही आसाम राज्याची नियोजीत राजधानी आहे.

★ भारत जगातील दहावा गरीब देश आहे. 

★ भारतामध्ये एकूण पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.

★ पाँडेचरी हा केंद्रशासित प्रदेश आहे.

★ भारतीय प्रमाणवेळ ही अलाहाबाद येथील स्थानिक वेळ आहे. 

★ भारताची प्रमाणवेळ ८२.५° पूर्व रेखावृत्तांवरील स्थानिक वेळेनुसार ठरवितात.












View Comments and share...


Post a Comment

2 Comments