Sayajirao Gaekwad III : Maharaja of Baroda State
महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड, जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड: बडोदा संस्थानचे अधिपती,अत्यंत पुरोगामी , कर्तृत्ववान संस्थानिक लोकपाळ राजा :
जीवन चरित्र
11 मार्च: जन्मदिन
6 फेब्रुवारी: स्मृतिदिन
11 मार्च, 1863: सयाजीरावांचा जन्म, वडील काशीराव, आई उमाबाई.
28 नोव्हेबर, 1870: खंडेराव महाराजांचे निधन.
ऑगस्ट 1871 : मल्हारराव गायकवाड राज्याभिषेक.
14 जानेवारी, 1875 : मल्हारराव यांच्यावर विषयप्रयोगाच्या आरोपामुळे राज्यत्याग.
19 एप्रिल, 1875: मल्हाररावांची पदच्युती.
X X
2 मे, 1875 : महाराणी जमनाबाई (खंडेरावांच्या पत्नी) यांचे बडोद्यात पुनरागमन.
3 मे, 1875 : सर टी. माधवराव यांचे बडोद्यात आगमन
X X
27 मे, 1875 : गोपाळरावांचे दत्तविधान व राज्यारोहण. सयाजीराव तिसरे नामकरण.
7 जून, 1875 : सयाजीरावांच्या शिक्षणाचा आरंभ. केशवराव पंडित व भाऊ मास्तर हे शिक्षक.
10 डिसेंबर, 1875 : महाराजांचे शिक्षक मि. इलियट यांचे बडोद्यात आगमन.
1 जानेवारी, 1877: पहिला दिल्ली दरबार आणि मोठा प्रवास.
16 जुलै, 1877 : वडिल श्री. काशीनाथ बाबांचे निधन.
6 जानेवारी, 1880: महाराजांचा पहिला विवाह, तंजावरच्या हैबतराव मोहित्यांच्या लक्ष्मीबाईंशी.
X X
10 जानेवारी, 1880 : लक्ष्मी विलास राजवाड्याचा पाया.
28 डिसेंबर, 1881 : महाराजांना राज्याधिकार प्राप्ती.
29 डिसेंबर, 1881: सार्वजनिक सभा, पुणे तर्फे मानपत्र अर्पण.
1882 ते 84 : महाराजांचा बडोदा राज्याचा दौरा. प्रजेचे प्रश्न समजून घेतले.
1882 : अस्पृश्य - आदिवासी मुलांसाठी शाळा व वसतिगृह सुरू केले. सोनगड - नवसारीत.
3 ऑगस्ट, 1882: राजपुत्र फत्तेसिंहाचा जन्म.
1883 : लँड सर्व्हे डिपार्टमेंटची सुरुवात..
1884: जोतिबा फुले यांना 'शेतकऱ्याचा असूड' ग्रंथास आर्थिक मदत.
8 जानेवारी, 1885 : आजवा तलाव खोदण्यास सुरुवात.
7 मे, 1885 : पहिल्या राणी चिमणाबाईंचे निधन.
28 डिसेंबर, 1885 : महाराणी चिमणाबाई (दुसऱ्या) यांच्याशी विवाह.देवासच्या बाजीराव घाटगे यांची गजराबाई कन्या होत्या.
29 मे, 1887 : पहिल्या युरोप सफरीस महाराज निघाले.
X X
ऑक्टोबर, 1888 : टी. माधवराव रजेवर गेले. काझी शहाबुद्दीन आले.
1890: शेती खात्याची सुरुवात.
10 फेब्रुवारी, 1890: लक्ष्मीविलास राजवाड्यात गृहप्रवेश.
1890 : सॅनिटरी डिपार्टमेंटची सुरुवात.
1891 : गावोगाव ग्रामपंचायतीची कायद्याने सुरुवात.
X X
1891 : अस्पृश्यांसाठी खास दहा वेगळ्या शाळांना सुरुवात.
1891 : हुजूर हुकूम "आज्ञापत्रिका" नावाने मराठी भाषेत गॅजेटियरची सुरुवात.
1892 : सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षणाची कायद्याने सुरुवात.
29 मार्च, 1892 : बडोद्यास अजवा धरणातून नळाचे पाणी आणले.
एप्रिल 1892 : बडोदा राज्यात म्युनिसिपालिटीचा कायदा..
1894 : दानधर्मासंबंधी / पुरोहितासाठी परीक्षा व कायदा.
1896 : ब्राह्मणेतरांसाठी मराठीतून वेदोक्त पाठशाळा व राजघराण्यात वेदोक्त विधीची सुरुवात..
जानेवारी, 1897: इलियट यांची निवृत्ती.
X X
29 नोव्हेंबर, 1898 : राजमाता जमनाबाई यांचे निधन.
22 जून, 1899 : महाराजांची लॉर्ड कर्झन यांची भेट.
11 जुलै, 1900: महाराणी चिमणाबाईंच्या शस्त्रक्रियेसाठी युरोपला.
28 मार्च, 1901 :मुंबईच्या ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजात महाराजांचे भाषण व कॉलेजास मदत.
22 नोव्हेंबर, 1901: जोतीराव फुल्यांचे कार्यकर्ते. श्रीरामचंद्र धामणस्करांची दिवाण म्हणून नेमणूक.
1902: ग्रामपंचायतींची स्थापना व त्यांना कायद्याने लोकशाहीचे अधिकार दिले. निरक्षर मतदारांना मतदानांचा अधिकार नव्हता.
1902: विधवा पुनर्विवाह कायदा,
1903: लाहोर येथील इस्लामिया कॉलेजमध्ये भेट व भाषण.
1904: बालविवाह बंदी कायदा.
नोव्हेंबर 1904: कलकत्ता येथील कॉंग्रेस अधिवेशनास हजर.
17 मे 1905: गंगनाथ राष्ट्रीय शाळेची नर्मदाकाठी स्थापना. महाराजांचा राजाश्रय.
जुलै 1906: सर्व राज्यभर सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण कायदा व अंमलबजावणी.
X X
9 जुलै, 1908: बडोदा बँकेची स्थापना.
14 सप्टेंबर, 1908: युवराज फत्तेसिंहाचे निधन.
1908: धारा सभा अर्थात मिनी पार्लमेंट स्थापून त्यांना अधिकार दिले.
1909 : जातिभेद निर्मूलनाचा प्रयत्न.
1 जून, 1909: क्रांतिकारी थोर विचारवंत श्री. रमेशचंद्र दत्त यांची दिवाणपदी नेमणूक.
1909: स्वतःच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण कायदा करविला.
17 मार्च, 1910: इलियट यांचा मृत्यू.
23 मे, 1910: जपानच्या बादशहांशी भेट.
12 जून, 1910: अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांची भेट.
X X
12 डिसेंबर, 1910: बडोद्यात सेंट्रल लायब्ररीची स्थापना.
28 जुलै, 1911: पहिले जागतिक मानवंश परिषद ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, लंडन अधिवेशनाचे सयाजीराव अध्यक्ष होते.
7 नोव्हेंबर, 1912: मुंबई येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाचे महाराजांच्या हस्ते उद्घाटन.
ऑगस्ट, 1914: पहिल्या महायुद्धाची सुरुवात.
ऑक्टोबर 1915 : देशी भाषांतील ग्रंथ प्रकाशनासाठी महाराजांनी दोन लक्ष रुपयांची देणगी दिली.
23 मार्च, 1918: मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे महाराज अध्यक्ष.
1 एप्रिल, 1918: महाराजांची नात इंदुमती यांचा शाहू महाराजांचे पुत्र राजाराम यांच्याशी विवाह.
24 नोव्हेंबर, 1919: राजपुत्र शिवाजीरावांचे बडोदे येथे निधन.
1 ऑगस्ट, 1920: लोकमान्य टिळकांचा मृत्यू.
X X
20 डिसेंबर, 1922: महाराजांचे जावई कुचबिहारचे राजपुत्र यांचे लंडन येथे निधन.
27 डिसेंबर, 1923: राजपुत्र जयसिंहरावांचे युरोपात निधन.
19 मार्च, 1924: मुंबई येथे अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे महाराज अध्यक्ष.
19 जानेवारी, 1924 : बनारस हिंदू विद्यापीठाकडून एल.एल.डी. पदवी.
मार्च, 1926: महाराजांची जन्मगाव कवळाण्यास भेट.
19 डिसेंबर, 1927: मुंबई येथे अ. भा. तत्त्वज्ञान परिषदेचे महाराज अध्यक्ष.
10 जानेवारी, 1930 : मुंबई येथे महाराजांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथ संपादक मंडळीचे अधिवेशन.
12 नोव्हेंबर, 1930: लंडन येथे पहिल्या गोलमेज अधिवेशनात महाराजांचे भाषण.
21 सप्टेंबर, 1931 : लंडन येथे दुसऱ्या गोलमेज अधिवेशनात महाराजांचे भाषण.
25 सप्टेंबर, 1931: महात्मा गांधी व महाराजांची भेट.
18 डिसेंबर, 1932 : महाराष्ट्र साहित्य संमेलन कोल्हापूरचे सयाजीराव अध्यक्ष.
27 ऑगस्ट, 1933: दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद शिकागोचे महाराज अध्यक्ष.
X X
27 डिसेंबर, 1933: बडोदे येथील प्राच्यविद्या परिषदेच्या सातव्या अधिवेशनाचे महाराज उद्घाटक.
24 मार्च, 1934: दिल्ली येथील तेविसाव्या अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे महाराज अध्यक्ष.
16 एप्रिल, 1934: भाऊराव पाटलांच्या श्री. शाहू छत्रपती बोर्डिंग,साताऱ्यास भेट.
4 ऑक्टोबर, 1934 : संपतराव गायकवाड यांचा मृत्यू.
27 मार्च, 1935: महाराजांचा हीरक महोत्सव.
1 जुलै, 1935: सर्वधर्म परिषदेच्या कार्यकारी मंडळाची सभा महाराजांच्या अध्यक्षतेखाली.
25 ऑक्टोबर, 1935 : ब्रिटिश लायब्ररी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी महाराज.
1935: बर्लिन येथील ऑलिम्पिकला उपस्थिती. हिटलर यांची भेट.
जानेवारी, 1936 : हीरक महोत्सव कार्यक्रम.
6 फेब्रुवारी, 1939 : महाराज मुंबई येथे दिवंगत झाले.
6 फेब्रुवारी, 1939 : प्रतापसिंहांचा राज्याभिषेक.
1948: बडोदे राज्य स्वतंत्र भारतात विलीन.
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-6-day-of-special-dinvishesh.html
👆
February 6 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 6: दिनविशेष
X X
View, Comments and share









3 Comments
👍👍
ReplyDeleteNice sirji
ReplyDelete👍👍👍
ReplyDelete