Geography of India -4
भारताचा भूगोल : भाग -4/10
भारतीय संरक्षण दल
1. सेनादल:
मुख्यालय : नवी दिल्ली
विभाग : 5
जनरल या हुद्याचा अधिकारी लष्कर प्रमुख असतो.
सोयीसाठी लष्कराचे पाच विभाग पाडले आहेत.
(1) उत्तर कमांड
(2) पश्चिम कमांड
(3) मध्य कमांड
(4) कमांड
(5) दक्षिण कमांड
प्रत्येक कमांडचा प्रमुख हा लेफ्टनंट जनरल हुद्याचा अधिकारी असतो. भारताच्या खड्या सेनेत अंदाजे दहा लाख पेक्षा अधिक सैनिक आहेत.
2. नौदल:
मुख्यालय : नवी दिल्ली
विभाग : 3
ॲडमिरल दर्जाचा अधिकारी प्रमुख असतो.
सोयीसाठी तीन उपक्षेत्रे (कमांड)
(1) पश्चिम कमांड - मुंबई
(2) पूर्व कमांड - विशाखापट्टणम्
(3) दक्षिण कमांड - कोचीन.
X X
आरमारचे दोन गटात विभाजन :
1. पश्चिमी आरमार व
2. पूर्वी आरमार.
जगातील सातव्या क्रमांकाचे नौदल- जहाजांची एकूण संख्या 472 विमानवाहू नौका (विक्रांत व विराट), 12 पाणबुड्या, अनेक विनाशिका, युद्धनौका, गस्तीजहाजे, सर्वेक्षण नौका, प्रशिक्षण नौका, इत्यादी विविध प्रकारची जहाजे.
3. भारतीय हवाईदल:
मुख्यालय : नवी दिल्ली.
विभाग : 5
एअर चीफ मार्शल या दर्जाचा अधिकारी हवाईदल प्रमुख असतो.
स्थापना 1932 मध्ये कराची येथे शाही हवाई दल (रॉयल एअर फोर्स) म्हणून.
प्रशासकीय कार्यासाठी भौगोलिक दृष्ट्या पाच कार्यकारी विभाग
(1) पश्चिम हवाई कमांड
(2) नैऋत्य हवाई कमांड
(3) मध्य हवाई कमांड
(4) पूर्व हवाई कमांड
(5) दक्षिण हवाई कमांड.
याशिवाय
1. परिरक्षा (मेन्टेनन्स) कमांड आणि 2. प्रशिक्षण कमांड ही आणखी दोन कमांड.
एकूण स्क्वाड्रन्स: 45.
4. सैनिकी प्रशिक्षण:
सैनिकी शाळा एकूण: 18
राष्ट्रीय सैनिकी महाविद्यालय: देहरादून
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA): खडकवासला, पुणे
तिन्ही दलातील अधिकारी तयार करण्याचे मुलभूत प्रशिक्षण (3 वर्षे)
भारतीय सैनिक अकादमी (IMA) : डेहराहून सेनादलासाठी लागणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षण देणारी संस्था.
अधिकारी प्रशिक्षण प्रशाला : मद्रास.
डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO):
स्थापना : 1958
नवीन आधुनिक हत्यारे उपकरणाची निर्मिती व संशोधन हे प्रमुख कार्य, देशभर 42 प्रयोगशाळा व संस्था.
5. प्रादेशिक सेना (TA):
स्थापना : 1949
नागरी स्वयंसेवक दल असे स्वरूप नागरिकांना त्यांच्या मोकळ्या वेळात लष्करी प्रशिक्षण मिळावे हा मूळ हेतु.
आणीबाणी वा संकटसमयी सेनादलाला सहाय्य करणे वा सेना समांतर अशी कामे करणे. भारताबाहेर लष्करी कार्य करण्यास प्रवेश खुला
X X
6. राष्ट्रीय छात्र सेना (NCC):
स्थापना : 1948
युवकांमध्ये नेतृत्व, चारित्र्य, खिलाडूवृत्ती, सहकार्य इ. गुणांचा विकास करणे. हे प्रमुख उद्देश.
राष्ट्रीय आणीबाणीच्या परिस्थितीत उपयोगी पडेल असे शिस्तबद्ध व प्रशिक्षित दल निर्माण करणे.
संरक्षण दलात प्रवेश घेण्यास उपयुक्त गुणवत्ता निर्माण करणे हे सुद्धा अन्य महत्वाचे हेतू आहेत.
विद्यापीठे महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेच्छेने प्रवेश.
1985-86 मध्ये देशभर सुमारे 12 लाख छात्र सैनिक होते.
7. कॅन्टोन्मेन्ट बोर्डस् (राष्ट्रीय छावण्या):
1924 च्या कायद्यानुसार निर्मिती, संरक्षण दलातील अधिकारी व कर्मचारी ज्या परिसरात राहतात तेथे आरोग्य व अन्य मुलभूत सुविधा पुरविणे, त्यांच्या सुरक्षितता व कल्याणार्थ योजना राबविणे, या हेतूने निर्मिती.
भारतीय सेनादल :
भारतीय सैन्याच्या तीनही दलांचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती हे असतात .
खालीलपैकी 1.भूदल (आर्मी) 2.नौदल (नेव्ही) 3.हवाई दल (एअरफोर्स) मधील क्रमानुसार अधिकारी वर्ग वरिष्ठ श्रेणीनुसार.
1. भूदल (आर्मी):
1. जनरल
2. लेफ्टनंट जनरल
3. मेजर जनरल
4. ब्रिगेडियर
5. कर्नल
6. लेफ्टनंट कर्नल
7. मेजर
8. कॅप्टन
9. लेफ्टनंट
10. सेकंड लेफ्टनंट
2. नौदल (नेव्ही):
1. ॲडमिरल
2. व्हाईस ॲडमिरल
3. रिअर ॲडमिरल
4. कमोडर
5. कॅप्टन
6. कमांडर
7. लेफ्टनंट कमांडर
8. लेफ्टनंट
9. सब-लेफ्टनंट
10. रिअर लेफ्टनंट
3. हवाई दल (एअरफोर्स):
1. एअर चीफ मार्शल
2. एअर मार्शल
3. एअर व्हाईस मार्शल
4. एअर कमोडर
5. ग्रुप कॅप्टन
6. विंग कमांडर
7. स्क्वाड्रन लिडर
8. फ्लाईट लेफ्टनंट
9. फ्लाईंग ऑफिसर
10. पायलट ऑफिसर
X X
सैनिकी प्रशिक्षण संस्था:
1. भूदल (आर्मी):
★ स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली.
★ कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग, दापोडी (पुणे)
★ ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल, मद्रास.
★ इंडियन मिलिटरी ॲकेडमी, डेहराडून.
★ आर्मी ऑर्डनन्स कॉर्पस् स्कूल, जबलपूर.
★ नॅशनल डिफेन्स ॲकेडमी, खडकवासला.
★ नॅशनल डिफेन्स कॉलेज, न्यू दिल्ली.
★ आर्मी कॅडेट कॉलेज, डेहराडून.
★ इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून.
2. नौदल (नेव्ही):
★ आय.एन्.एस्. हमला, मालाड (मुंबई).
★ आय.एन्. एस्. वालसुरा, गुजराथ.
★ आय. एन्. एस्. वेंडूरथी, कोचीन.
★ नेव्हल एअर स्टेशन-गरूड (कोचीन).
★ आय. एन्. एस्. शिवाजी, लोणावळा (पुणे).
★ आय. एन्. एस्. सिकर्स, विशाखापट्टणम्.
★ नेव्हल ॲकेडमी, कोचीन.
3. हवाई दल (एअरफोर्स):
★ एअर फोर्स ॲकेडमी, हैद्राबाद.
★ पॅराट्रूप्स् ट्रेनिंग स्कूल, आग्रा.
★ एअर फोर्स स्कूल, साम्रा (बेळगाव)
★ कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर, सिकंदराबाद.
★ एअर फोर्स टेक्निकल कॉलेज, जल्हाली (बंगलोर).
★ एअर फोर्स ॲडमिनिस्ट्रेशन कॉलेज, कोईमतूर.
View, Comments and share...........
1 Comments
👍
ReplyDelete