Har Gobind Khorana: Indian American biochemist, faculty of the University of Wisconsin–Madison, he shared the 1968 Nobel Prize for Physiology or Medicine with Marshall W. Nirenberg and Robert W. Holley for research that showed the order of nucleotides in nucleic acids, which carry the genetic code of the cell and control the cell's synthesis of proteins.
Har Gobind Khorana: Indian American biochemist
हरगोविंद खुराना:
भारतीय जैव-रसायनशास्त्रज्ञ,नोबेल पारितोषिक विजेते
9 जानेवारी : जन्मदिन
9 नोव्हेंबर : स्मृतिदिन
डॉ. हरगोविंद खुराना हे भारतात जन्मलेले शास्त्रज्ञ असुन जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील त्यांचा महत्त्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल यांना रॉबर्ट डब्ल्यू. हॉली आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्या सोबत 1968 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.
X X
बालपण व शिक्षण:
नोबेल पारितोषिक विजेते जीव रसायन शास्त्रज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना यांचा जन्म 9 जानेवारी 1922 मध्ये अविभाजित भारतातील पंजाब राज्याच्या मुल्तान जिल्हातील रायपुर या गावी झाला होता. सध्या पाकिस्तानचा भाग आहे. त्यांचे आई वडील कृष्ण देवी खुराणा व गणपत राय हे होते. खुराना यांचे वडिल पटवारी होते. आपल्या चार भावंडांपैकी डॉ. खुराना हे सर्वात लहान होते. डॉ. खुराना यांची कुटुंबिक अर्थिक परिस्थिती बेताची असतांना देखील, त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष दिले होते.
डॉ. खुराना हे केवळ 12 वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांचे मोठे भाऊ नंदलाल यांनी सांभाळली. अश्या परीस्थित डॉ. खुराना यांनी शालेय तसचं महाविद्यालयीन शिक्षण आपल्या प्रतिभेच्या बळावर स्कॉलरशिप मिळवून पूर्ण केलं. डॉ. खुराना यांचे प्रारंभिक शिक्षण स्थानिक शाळेतच पूर्ण केलं होत. यानंतर त्यांनी मुल्तान येथील डी. ए. वी. माध्यमिक शाळेत आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केलले. डॉ. खुराना दरवर्षी आपल्या गुणवत्तेच्या निकषावर स्कॉलरशिप मिळवीत असत. व आपले शिक्षण पूर्ण करत असत.
यानंतर खुराना यांनी 1943 वर्षी पंजाब मधील विश्वविद्यालया मधून बी. एस. सी. (ऑनर्स) तथा 1945 वर्षी एम. एस. सी. (ऑनर्स) ची पदवी प्राप्त केली. डॉ. खुराना यांनी उच्च शिक्षणाकरिता भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंड देशांत उच्च शिक्षणासाठी गेले. त्याठिकाणी त्यांनी लिवरपूल विश्वविद्यालया मधून प्रा. रॉजर जे. एस. बियर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून डॉक्टरेट (पीएच.डी.)ची पदवी प्राप्त केली.
X X
डॉ. खुराना यांचे वैयक्तिक जीवन:
डॉ. खुराना यांनी मूळ स्विस वंशीय एस्थर एलिजाबेथ सिब्लर नामक महिलेशी 1952 साली विवाह केला. या खुराना दाप्त्यांना जूलिया एलिज़ाबेथ (1953), एमिली एन्न (1954) और डेव रॉय (1958) ही तीन आपत्ये झाली.
डॉ. खुराना यांच्या पत्नी ने त्यांना त्यांच्या संशोधन कार्यात पूर्ण सहयोग दिले होते. डॉ. खुराना यांच्या पत्नी एस्थर एलिझाबेथ यांचे 2001 साली निधन झाले.
X X
संशोधनात्मक कार्य :
डॉ. खुराना यांना भारत सरकारतर्फे संशोधन करण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली. यावेळी ते झ्यूरिक (स्वित्झर्लंड) मधील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रोफेसर व्ही. प्रेलॉग यांच्या सोबत संशोधन करू लागले.
आपलं संशोधन पूर्ण झाल्यानंतर डॉ. खुराना पुन्हा भारतात वापस आले. परंतु त्यांना आपल्या जोगे काम न मिळाल्यामुळे ते इंग्लड देशांत परत गेले. त्याठिकाणी त्यांना कैम्ब्रिज विद्यापीठाची सदस्यता मिळाली तसच लॉर्ड टाद यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
आरएनएमध्ये दोन घटक पुन्हा पुन्हा येऊन [UCUCUCU…….- CUC, UCU, CUC] परत परत येणारी दोन अमिनो ॲसिड तयार होतात. ह्या शोधासोबत नीरेनबर्गच्या प्रयोगातून असे सिद्ध झाले की, CUC ल्युसीन अमिनो ॲसिडचा संकेत आहे आणि UCU सेरीन अमिनो ॲसिडचा. तीन युनिट्सचे पुनरावर्तन असणाऱ्या आरएनएपासून तीन अमिनो ॲसिडची मालिका बनते. [UACUACUAC ….. – UACUAC किंवा ACUACU किंवा CUACUA] UAG, UAA किंवा UGA सहित चार पुनरावर्तित युनिट्स असणारे आरएनए फक्त डायपेप्टाईड आणि ट्रायपेप्टाईडच तयार करतात. यावरून हे लक्षात आले की UAG, UAA आणि UGA हे प्रथिन संश्लेषण थांबवण्याचे संकेत आहेत. (STOP CODON). रासायनिक पद्धतीने ऑलिगोन्यूक्लिओटाईड तयार करणारे खोराना हे पहिले शास्त्रज्ञ होते.
वरील पद्धतीचा अवलंब करून खोरानांनी पहिले कृत्रिम जनुक (gene) तयार केले. पॉलिमरेझ आणि लायपेझ या विकरांचा उपयोग करून डीएनएचे तुकडे एकमेकांशी जोडून दाखवले. याच्यावरूनच नंतर पॉलिमरेझ चेन रिॲक्शनचा शोध लागला. या कृत्रिम जनुकांचा उपयोग जीवशास्त्रामध्ये नवीन वनस्पती आणि प्राण्यांमध्ये क्लोनिंग, सीक्वेन्सिंग इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात होतो. मानवी उत्क्रांती आणि माणसांमध्ये होणाऱ्या अनुवांशिक आजारांच्या अभ्यासासाठीही याचा खूप उपयोग होतो. आता खोरानाच्या संशोधनाच्या आधारे अनेक कंपन्या स्वयंचलित यंत्रांच्या मदतीने व्यावसायिक स्तरावर कृत्रिम जनुके व ऑलिगोन्यूक्लिओटाईड आवश्यकतेनुसार तयार करून देतात.
त्यांच्या प्रयोगशाळेत 1970 मध्ये पेशींच्या पटलामध्ये असणाऱ्या बॅक्टेरीयो रॉडॉप्सीन या प्रथिनाचा जैवरासायनिक अभ्यास झाला. हे प्रथिन प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करते. याच्याच आधारे नंतर डोळ्यामध्ये असणाऱ्या रॉडॉप्सीन या रंगद्रव्याचाही अभ्यास केला गेला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील त्यांचे माजी सहकारी त्यांना रासायनिक जीवशास्त्राचे जनक असे गौरवितात.
X X
डॉ.खुराना यांना अमेरिकेचे नागरिकत्व:
डॉ. खुराना यांना 1952 साली कॅनडा मधील व्हँकुव्हर कोलंबिया विद्यापीठा मार्फत बोलावणी आली. डॉ. खुराना त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांना जैव रासायनशास्त्र विभागाचे अध्यक्ष पद देण्यात आले.1960 मध्ये संयुक्त राज्य अमेरिका येथील विस्कॉन्सिन विद्यापीठातील एंझाइम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.1966 वर्षी डॉ. खुराना यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
डॉ. खुराना यांना मॅसॅच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, सन 1968 साली डॉ. खुराना यांना अनुवांशिक संहिताची भाषा समजण्यासाठी आणि प्रथिने संश्लेषणातील भूमिकेबद्दल वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिकाने त्यांचा सन्मान करण्यात आला.
X X
पुरस्कार व सन्मान:
डॉ. हरगोविंद खुराना यांना त्यांच्या संशोधन व कार्याबद्दल अनेक पुरस्कार व सन्मानाने गौरविण्यात आले.
1. 1968 साली त्यांना वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त झाले.डॉ. हरगोविंद खुराना हे नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती होते.
2. 1958 साली कॅनडा देशातील मार्क मेडल्स प्रदान करण्यात आले.
3.1960 साली कॅनडियन पब्लिक सर्विस तर्फे त्यांना स्वर्ण पदक प्रदान करण्यात आले.
4. 1967 साली डॅनी हॅनमन पुरस्कार मिळाला.
5. 1968 साली लॉस्कर फेडरेशन पुरस्कार आणि लूसिया ग्रास हारी विट्ज पुरस्कार द्वारे सन्मानित करण्यात आलं.
6. 1969 साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.
X X
ग्रंथ संपदा/निर्मिती:
Chemical Biology: Selected Papers Of H G Khorana (With Introductions): 5 (World Scientific Series In 20th Century Biology)
X X
निधन:
नोबेल पारितोषिक विजेते जीव रसायन शास्त्रज्ञ डॉ. हरगोविंद खुराना यांचे निधन अमेरिकेतील कॉनकॉर्ड, मॅसाचूसिट्स या ठिकाणी 9 नोव्हेंबर 2011 रोजी झाले.
View, Comments and share..
X X




2 Comments
Very nice information👌
ReplyDeletevery nice
ReplyDelete