Geography: Maharashtra State-2
महाराष्ट्राचा भूगोल : भाग 2- 2/7
महाराष्ट्रातील जंगले:
★ भारताच्या एकूण जंगलव्याप्त क्षेत्राच्या ८.५ टक्के जंगलक्षेत्र महाराष्ट्रात आहे.
★ महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी २१ टक्के जमीन जंगलव्याप्त आहे.
★ विदर्भात प्रामुख्याने आर्द्र पानझडी प्रकारची जंगले आढळतात.
★ चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात.
★महाराष्ट्रात साग हा पानझडी अरण्यातील महत्त्वाचा वृक्ष आहे.
★ महाराष्ट्रात कमी पावसाच्या प्रदेशात शुष्क पानझडी प्रकारचे वृक्ष आढळतात.
★ पश्चिम महाराष्ट्रात सदाहरीत अरण्ये आढळतात.
★ कोकणात निम-सदापर्णी प्रकारचे वृक्ष आढळतात.
★ अति पाऊस पडणाऱ्या भागात उष्णकटीबंधीय सदाहरीत अरण्ये आढळतात.
★ गडचिरोली हा दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा आहे.
★ गडचिरोली हा सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे.
★ गढ़चिरोली हा चंद्रपूरपेक्षा अधिक जंगलमय जिल्हा आहे.
★ विदर्भ विभागात सर्वाधिक जंगले आहेत.
★ महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात सर्वात कमी जंगले आहेत.
★ महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल उत्पादन जंगली लाकडाचे होते.
★ महाराष्ट्रातील दुष्काळी भागात काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणावर आढळतात.
★ गवताळ जमिनी ठाणे जिल्हघात आढळतात.
★ मुशी गवत ठाणे जिल्हयात मोठ्या प्रमाणात आढळते.
★ महाराष्ट्रात २६ जानेवारी, १९६२ रोजी सामाजिक वनीकरण सुरू झाले.
★ सुबाभूळाची लागवड लोकप्रिय करण्याशी 'मनीभाई देसाई' संबंधित आहे.
★ सध्या अस्तित्वात असलेल्या जंगलावरील ताण कमी करणे, हा सामाजिक वनीकरणाचा मुख्य हेतू आहे.
★ चंद्रपूर भंडारा जिल्हयात पावसाचे प्रमाण खूप असूनही पानझडी प्रकारची अरण्ये आढळतात कारण
★उन्हाळयात हवेतील तसेच जमिनीतील आर्द्रता अतिशय कमी असल्याने वृक्षांची पाने गळून पडतात.
X X
महाराष्ट्रातील वने उपवने व अभयारण्ये:
★ सांबर चितळ हे प्राणी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात आढळतात.
★ सोलापूर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.
★ महाराष्ट्रातील अजिंठा अरण्य अभयारण्य नाही.
★ यावल अभयारण्य जळगाव जिल्हयात आहे.
★ कर्नाळा अभयारण्य रायगड जिल्हयात आहे.
★ देऊळगांव रेहकुरी अभयारण्य काळविटांसाठी प्रसिद्ध आहे.
★ गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्हयात आहे.
★ हरणांसाठी प्रसिद्ध असलेले सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्हयात आहे.
★ अंधेरी अभयारण्य चंद्रपूर जिल्हयात आहे.
★ चांदोली अभयारण्य सांगली व कोल्हापूर जिल्हयांत आहे.
★ चबराळा अभयारण्य गडचिरोली जिल्हयात आहे.
★ भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्हयात आहे.
★ गौताळा औटरमघाट अभयारण्य औरंगाबाद व जळगाव जिल्हयात आहे.
★ टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्हयात आहे.
★ विवया (विळ्या) व मोरांसाठी प्रसिद्ध किनवट अभयारण्य नांदेड जिल्ह्यात आहे.
★ तानसा वन्य प्राणी अभयारण्य ठाणे जिल्हयात आहे.
★ बोर अभयारण्य वर्धा जिल्हयात आहे.
★ माळढोक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य अहमदनगर व सोलापूर जिल्हयात आहे.
★ वाघासाठी प्रसिद्ध असलेले ढाकणा कोलकाझ अभयारण्य अमरावती जिल्हयात आहे.
★ वाघासाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्हयात आहे.
★कळसूबाई अभयारण्य अहमदनगर जिल्हयात आहे.
★फणसाड अभयारण्य रायगड जिल्हयात येते.
महाबळेश्वर अभयारण्य मधुमक्षीका पालनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
अनेर अभयारण्य धुळे जिल्हयात आहे.
★नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक जिल्हयात आहे.
★ हरिण व डुकरांसाठी प्रसिद्ध कोयना अभयारण्य सातारा जिल्हयात आहे.
★पाल अभयारण्य जळगाव जिल्हयात आहे.
★महाराष्ट्रात एकूण चार राष्ट्रीय उद्याने आहेत.
★चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ ११७ चौ. कि. मी. आहे.
★मुंबई जिल्हयातील बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ ८७ चौ. कि.मी. आहे.
★नागपूर जिल्ह्यातील पेंच राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ २५७ चौ. कि. मी. आहे.
★नवेगांव आंध (भंडारा जिल्हा) या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ १३४ चौ. कि. मी. आहे.
★तोरणमाळ वनोद्यान धुळे जिल्हयात आहे.
★शिवनेरी वनोद्यान पुणे जिल्हयात आहे.
★हिमालय बाग वनोद्यान औरंगाबाद जिल्हयात आहे.
★सप्तशृंगी वनोद्यान नाशिक जिल्ह्यात आहे.
★अजिंठा वनोद्यान औरंगाबाद जिल्हयात आहे.
★सेमिनरी हिल्स हे वनोद्यान नागपूर जिल्हयात आहे.
★जायकवाडी उद्यान औरंगाबाद जिल्ह्यात आहे.
★ सिंहगड वनोद्यान पुणे जिल्हयात आहे.
★राणीबाग वनोद्यान बुलढाणा जिल्हयात आहे.
★पाचगाव पार्वती वनोद्यान पुणे जिल्हयात आहे.
★बनेश्वर उद्यान पुणे जिल्हयात आहे.
★तबक बाग (पन्हाळा) कोल्हापूर जिल्हयात आहे.
★नरेंद्र डोंगर सिंधुदुर्ग जिल्हयात आहे.
★लोणार क्रेटर वनोद्यान बुलढाणा जिल्हयात आहे.
★भांबुर्डी वनोद्यान पुणे जिल्हयात आहे.
★दांडोबा डोंगर वनोद्यान सांगली जिल्हयात आहे.
★प्रतापगड वनोद्यान सातारा जिल्हयात आहे.
★अंबोली वनोद्यान सिंधुदुर्ग जिल्हयात आहे.
★मुळा-मुठा वनोद्यान पुणे जिल्हयात आहे.
★ कजेभ्वरी वनोद्यान ठाणे जिल्हयात आहे.
★ प्रतापसिंह उद्यान सातारा जिल्हयात आहे.
★ पाटणादेवी उद्यान जळगाव जिल्हयात आहे.
★ एलिफंटा उद्यान रायगड जिल्हयात आहे.
★ माथेरान उद्यान रायगड जिल्हयात आहे.
★ गंगापूर उद्यान नाशिक जिल्हयात आहे.
★ कस्तुरचंद पार्क नागपूर येथे आहे.
★ पं. नेहरू पार्क नांदेड जिल्हयात आहे.
★हँगींग गार्डन मुंबई या ठिकाणी आहे.
महाराष्ट्राचे हवामान:
★ महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.
★ हवामानाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे तीन भाग पडतात.
★ महाराष्ट्राच्या पठारी भागाचे हवामान विषम व कोरडे आहे.
★ सहयाद्रीच्या घाटमाव्यावर थंड व आर्द्र प्रकारचे हवामान असते.
★ कोकण किनारपट्टीचे हवामान दमट व सम प्रकारचे असते.
★ खंडांतर्गत स्थानामुळे नागपूरचे हवामान विषम प्रकारचे आहे.
★ चंद्रपूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा आहे.
★ महाराष्ट्रातील हवेत मे महिन्यात जास्त उष्मा असतो.
★ खारे बारे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहतात.
★ मुंबईत दमट हवामानामुळे कापड गिरण्या जास्त आहेत.
★महाराष्ट्रात तीन ऋतू होतात.
★ कोकणातील हवा बाराही महिने दमट असते.
★ माथेरानमधील हवामान नेहमी सम असते.
★ घाटमाथ्यावर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची आवश्यकता असते.
★महाराष्ट्रात डिसेंबर फेब्रुवारी दरम्यान हिवाळा असतो.
★ महाराष्ट्राचा पूर्वभाग भारतातील कमी पावसाच्या प्रदेशात मोडतो.
★महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो.
★ महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून सर्वाधिक पाऊस मिळतो.
★ महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रावरून येतात.
★ महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो.
★ वाईला कमी प्रमाणात पाऊस पडतो, कारण ते स्थळ पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडते.
★ महाराष्ट्रात कोकण विभागात सर्वाधिक पाऊस पडतो.
★ कोकण किनारपट्टीला पाहतो.
★ मोसमी वारे सहयाद्री पर्वताने अडविले जावून कोकणात भरपूर पाऊस पडतो.
★महाराष्ट्रात येणारे नैऋत्य मोसमी वारे सहयाद्री पर्वतामुळे अडविले जातात.
★अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वान्यांपासून महाराष्ट्रात पाऊस पडतो.
★महाराष्ट्रातील कोकण भागात २५०० ते ३५०० मिलीमीटर पाऊस पडतो.
★महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडतो.
★अंबोली हे सहभाद्रीवरीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे.
★अंबोली व महाबळेश्वर सह्याद्रिवरील सर्वाधिक पावसाची ठिकाणे आहेत.
★सह्याद्रि पर्वताच्या पश्चिम उतारावर (घाटमाथ्यावर) प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
★महाराष्ट्रात सहयाद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर सर्वात जास्त पाऊस पडतो.
★सह्याद्रिच्या घाटमाथ्यावर सरासरी ६०० सें. मी. पाऊस पडतो.
★महाराष्ट्र पठाराच्या बन्याच भागात फार कमी प्रमाणात पाऊस पडतो.
★महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते.
★अहमदनगर-सोलापूर हे जिल्हे महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारे जिल्हे होत.
★अहमदनगर-सोलापूर भागात सरासरी ५० सें. मी. पाऊस पडतो.
★चंद्रपूर, भंडारा परिसरात सरासरी १५० सें. मी. पाऊस पडतो.
★अहमदनगर महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्हा आहे.
★दक्षिण महाराष्ट्रात उन्हाळ्यात आम्रसरी पडतात.
★नागपूर विभागाच्या पूर्व विभागात जास्त पाऊस असतो.
★सोलापूर हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे.
★पर्जन्यमानाच्या दृष्टीकोनातून सोलापूर व नगर जिल्हयांना 'पर्जन्यछायेचा प्रदेश' म्हणतात.
X X
महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या:
★गोदावरी नदीस 'दक्षिण भारताची गंगा' असे म्हणतात.
★गोदावरी नदीस 'महाराष्ट्राची गंगा' असेही म्हणतात.
★गोदावरी ही महाराष्ट्रातील मुख्य नदी आहे.
★गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. ★उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे.
★गोदावरी नदी खोऱ्याचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.
★गोदावरी नदी सह्याद्रि पर्वतात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.
★गोदावरी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते.
★गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.
★गोदावरी नदीची लांबी ९६८ कि. मी. आहे.
★महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या काठावर सर्वात जास्त तीर्थक्षेत्रे आहेत.
★सिंधफणा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे.
★दक्षिणपूर्णा ही गोदावरीची उपनदी आहे.
★ दारणा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे.
★ वैनगंगा, पैनगंगा, प्रवरा, मांजरा व पूर्णा ह्या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
★ मांजरा नदी बीड जिल्हयात बालघाट डोंगरात उगम पावते.
★ पठारी प्रदेशातून वाहणारी तापी नदी पश्चिमवाहिनी आहे.
★ नर्मदा नदी धुळे जिल्हयातून बाहते.
★ भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर पुणे जिल्हघात आहे.
★ कुकडी नदी भीमा नदीची उपनदी आहे.
★ पवना नदी भीमा नदीची उपनदी आहे.
★ मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतात तापी नदी उगम पावते.
★ तापी ही महाराष्ट्रात दोन वेळा येऊन पुढे जाणारी नदी आहे.
★ तापी नदी पुळे जिल्हयाच्या सरहद्दीवरून वाहणारी नदी आहे.
★ तापी नदी सुरत या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते.
★ तापी नदी महाराष्ट्रातील जळगाव व धुळे या दोन जिल्ह्यातून बाहले.
★ गिरणा नदी तापी नदीची उपनदी आहे.
★ पूर्णा नदी तापी नदीची उपनदी आहे..
★ नर्मदा नदी महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून वाहते.
★ नर्मदा ही नदी विंध्य व सातपुडा पर्वतातून वाहते.
★ नर्मदा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे.
★ नर्मदा ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहणारी नदी आहे.
★ नर्मदा नदी अरबी समुद्राला भडोच येथे मिळते.
★ भीमा व कृष्णा हा दक्षिण महाराष्ट्रातील मुख्य नद्या आहेत.
★ भीमा नदी सह्याद्री पर्वतात उगम पावते.
★ भीमा नदी सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाते.
★ भीमा नदी कृष्णा नदीस मिळते.
★ नीरा नदी भीमा नदीची उपनदी आहे.
★ नीरा ही बालाघाटच्या दोन डोंगरातून बाहेर पडणारी नदी आहे.
★ इंद्रायणी, घोड, सीना, मुळा आणि मुठा या भीमा नदीच्या उपनद्या आहेत.
★ अर्धवर्तुळाकार वाहणाऱ्या भीमेस पंढरपूर येथे 'चंद्रभागा' नावाने ओळखले जाते.
★ सातारा जिल्हयातील महाबळेश्वर येथून कृष्णा नदी उगम पावते.
★ कृष्णा नदी महाराष्ट्रानंतर कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यातून वाहत जाते.
★ वेण्णा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे.
★ येरळा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे.
★ महादेव डोंगरामुळे भीमा व कृष्णा यांची खोरी वेगळी झाली आहेत.
★ कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेश अत्यंत सुपीक आहे.
★ गोदावरी व कृष्णा या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात.
★कोकणातील नद्या अरूंद व वेगवान आहेत.
★कोकणातील नद्या पहाडांच्या उतारामुळे पश्चिमवाहिनी आहेत.
★वैतरणा ही सह्याद्रि पर्वतात उगम पावणारी नदी आहे.
★वैतरणा, उल्हास, सावित्री आणि वशिष्ठी या पश्चिमवाहिनी नद्या कोकण भागातून वाहतात.
★कोयना, वारणा व पंचगंगा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत.
★कन्हान नदी वैनगंगा नदीची उपनदी आहे.
★वैनगंगा ही महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील महत्त्वाची नदी आहे.
★वैनगंगा नदी सातपुडा पर्वतात उगम पावते.
★वैनगंगा नदी शिवणी येथे उगम पावते.
★पैनगंगा नदी वैनगंगा नदीची उपनदी आहे.
★पैनगंगा नदी अजिंठा डोंगरात बुलढाणा जिल्हयात उगम पावते.
★वर्धा नदी वैनगंगा नदीची उपनदी आहे.
★वर्धा व वैनगंगा यांच्या संगमातून निर्माण झालेल्या नदीस 'प्राणहिता नदी' म्हणतात.
★गडचिरोली जिल्ह्याच्या व मध्यप्रदेशाच्या सीमेवरून प्राणहिता नदी वाहते.
★बिंदुसरा नदी सिंधफणा नदीची उपनदी आहे.
★काटेपूर्णा नदी पूर्णा नदीची उपनदी आहे.
★नळगंगा नदी पूर्णा नदीची उपनदी आहे.
★महाराष्ट्रात मुठा नदीवर खडकवासला या ठिकाणी धरण बांधलेले आहे.
★कोयना योजना महाराष्ट्रातील कोयना नदीवर आहे.
★ज्ञानगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यातून वाहते.
★इंद्रावती ही महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे.
★महाराष्ट्र व गोवा यांना जोडणाऱ्या मांडवी नदीवर नेहरू पूल आहे.
महाराष्ट्रातील नदीकाठावरची शहरे :
★नांदेड शहर गोदावरी नदीच्या काठी बसलेले आहे.
★जेजूरी कन्हा नदीच्या काठावर वसलेले आहे.
★आळंदी व देहू ही इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली आहेत.
★शेगांव उरमोडी नदीच्या तीरावर वसलेले आहे.
★सिरोंचा शहर गोदावरी-प्राणहिता संगमावर वसलेले आहे.
★नेवासे हे शहर प्रवरा नदीकाठी बसलेले आहे.
★वाई व सांगली ही शहरे कृष्णा नदीकाठी बसलेली आहेत.
★गंगाखेड व कोपरगाव ही शहरे गोदावरी नदीकाठी वसलेली आहेत.
★माहूर हे इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ आहे.
★रामटेक बैनगंगा नदीच्या काठी वसलेले आहे.
★संगमनेर प्रवरा नदीकाठी बसलेले आहे.
★ पैठण गोदावरी नदीकाठी बसलेले आहे.
★ पंढरपूर हे तीर्थक्षेत्र भीमा नदीच्या तीरावर बसलेले आहे.
★ पैनगंगा व वर्धा यांचा संगम चंद्रपूर येथे झाला आहे.
★ कृष्णा व कोयना नक्यांचा संगम कन्हाड प्रितीसंगम येथे होतो.
★ भीमा-कृष्णा नदीचा संगम रायचूर येथे झाला आहे.
★ कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम नरसोबाची वाडी येथे झाला आहे.
★ पहिल्या पाटबंधारे (जलसिंचन) आयोगाचे अध्यक्ष स. गो. बर्वे होते.
★ अहमदनगर हा सर्वात जास्त जलसिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे.
★ 'गंगापूर' हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
★ जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. ★ जायकवाडी जलाशयाचे नाव 'नाथसागर' असे आहे.
★ जायकवाडी धरणाचा पहिला टप्पा २४ फेब्रुवारी, १९७६ रोजी पूर्ण झाला.
★ वर्धा व वैनगंगा संगम शिवनी येथे झाला आहे.
★ मुळा-मुठा नदीचा संगम पुणे येथे झाला आहे.
★कृष्णा-वारणा नदीचा संगम हरीपूर येथे झाला आहे.
X X
महाराष्ट्रातील जलसिंचन:
★ महाराष्ट्रात जलसिंचन महामंडळ नाशिक येथे आहे.
★महाराष्ट्रातील १२.३ टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे.
★ महाराष्ट्रातील शेतीसाठी विहिरी हे सर्वाधिक पाणी पुरवठ्याचे साधन आहे.
★ महाराष्ट्रातील एकूण जलसिंचनापैकी ५८% जलसिंचन विहिरीमार्फत होते.
★ गंगापूर धरण हे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख घरण आहे.
★ गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प पैठण येथे आहे.
★ बोर नदीवरील यशवंत घरण वर्धा येथे आहे.
★ तुळशी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
★ सिद्धेश्वर धरण दक्षिण-पूर्णा नदीवर आहे.
★ कोयना नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात.
★ धरण नांदेड जिल्ह्यातील पूर्णा नदीवर आहे.
★ नांदेड जिल्ह्याचा कायापालट करणारा विष्णुपुरी प्रकल्प मराठवाडा विभागात आहे.
★ सूर्य योजना ठाणे जिल्ह्यासाठी आहे.
★ भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द येथील इंदिरा सागर प्रकल्प विदर्भ भागात आहे.
★ कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले आहे.
★ तानसा धरण ठाणे जिल्ह्यात आहे.
★ पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण नीरा नदीवर आहे.
★धरण वारणा नदीवर आहे.
★कुकडी योजनेचा फायदा पुणे व अहमदनगर या दोन जिल्ह्यांना होणार आहे.
★अप्पर पैनगंगा योजना परभणी, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांसाठी आहे.
★कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक सातारा जिल्ह्यात आहे.
★ प्रवरा कॅनॉलमुळे अहमदनगर जिल्ह्यास फायदा झाला आहे.
★ प्रवरा नदीवरील विल्सन डॅम (भंडारदरा धरण) अहमदनगर जिल्ह्यात आहे.
★उजनी प्रकल्प सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर आहे.
★चासकमान योजना पुणे जिल्ह्यात आहे.
★पुणे जिल्ह्यातील पानशेत व खडकवासला ही धरणे मुठा नदीवर आहेत.
★मुळा योजनेचा फायदा पुणे व अहमदनगर या जिल्ह्यांना होतो.
★भीमा सिंचन योजनेपासून पुणे जिल्ह्यास पाणी मिळते.
★मुळशी हे धरण मुळा नदीवर पुणे जिल्ह्यात आहे.
★पेंच योजनेचा फायदा नागपूर व भंडारा जिल्ह्यांना होतो.
★दारणा धरण नाशिक जिल्ह्यात दारणा नदीवर बांधले आहे.
★येळवंडी नदीवरील लॉईड धरण खोपोली येथे आहे.
★मोडकसागर धरण रायगड जिल्ह्यात आहे.
★बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा धरण नळगंगा नदीवर बांधले आहे.
★अप्पर तापी योजना जळगाव जिल्ह्यात आहे..
★काळ योजना रायगड जिल्ह्यात आहे.
★ बांध योजना भंडारा जिल्ह्यात आहे.
★वाघुर योजना जळगाव जिल्ह्यात आहे.
★दुधगंगा योजनेचा फायदा कोल्हापूर जिल्ह्याला होतो.
★अप्पर वर्धा योजना अमरावती जिल्ह्यात आहे.
★पैनगंगा धरण बुलढाणा जिल्ह्यात आहे.
★ कोयना नदीवरील शिवाजीसागर हे धरण सातारा जिल्ह्यात आहे.
★गिरणा नदीवर चणकापूर येथे धरण बांधले आहे.
★ काटेपुर्णा धरण अमरावती जिल्ह्यात आहे.
★वारणा धरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
★बिंदुसरा धरण बीड जिल्ह्यात आहे.
★वैतरणा नदीवर मोडकसागर धरण बांधले आहे.
★ तापी खोऱ्यातील गिरणा प्रकल्प धुळे जिल्ह्यात आहे.
★ नर्मदा प्रकल्पाचा फायदा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यास होणार आहे.
★निळवंडे धरण अहमदनगर जिल्ह्यात बांधण्यात येत आहे.
★असलमेंढा धरण चंद्रपूर जिल्ह्यात आहे.
★इटियाडोह योजनेचा फायदा भंडारा व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना मिळतो.
★महाराष्ट्राने 'पाझर तलाव' योजना यशस्वीरित्या राबविली आहे.
★ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोरडवाहू जमीन ओलीताखाली आणणे या प्रमुख हेतुने हाती घेण्यात आला.
★ उपसा जलसिंचन योजना जेथे शेतजमीन पाण्यापेक्षा उंचपातळीवर असते त्या ठिकाणी उपयुक्त ठरते.
★ जायकवाडी योजना स्टेज- २ औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी व नांदेड जिल्ह्यांसाठी आहे
महाराष्ट्रातील आंतरराज्यीय प्रकल्प:
★ पेंच प्रकल्प हा महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प आहे.
★ तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने गोवा राज्याचे सहकार्य घेतले आहे.
★ लोअर पैनगंगा प्रकल्पासाठी महाराष्ट्राने आंध्रप्रदेश राज्याचे सहकार्य घेतले आहे.
★ बावनथडी प्रकल्प मध्यप्रदेश राज्याच्या सहकार्याने निर्मिला आहे.
★ तेलगु गंगा प्रकल्प महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे.
★ भोपाळपट्टल प्रकल्प महाराष्ट्र, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे.
★ दूधगंगा प्रकल्प कर्नाटक राज्याच्या सहकार्याने उभारला आहे.
★ महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश यांच्या सीमेवर नांदेड जिल्हयात इंचमपल्ली प्रकल्प आहे.
★ कालीसरार प्रकल्प महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांच्या सहकायनि उभारला आहे.
★ लेंडी प्रकल्प आंध्रप्रदेश राज्याच्या सहकायनि उभारलेला आहे.
★ नर्मदा विकास प्रकल्पाशी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचा संबंध आहे.
View, Comments and share....



1 Comments
Nice sir 👍
ReplyDelete