Subscribe Us

header ads

Geography-4/7 : Maharashtra State

Geography-4 : Maharashtra State

महाराष्ट्राचा भूगोल भाग-4/7




महाराष्ट्रातील लोकजीवन:


★ मुंबई-पुण्यानंतर महाराष्ट्रातील नागपूर शहराची लोकसंख्या जास्त आहे. 

★ महाराष्ट्राचा शहरीकरणाबाबत पहिला क्रमांक लागतो. 

★ तुमडी हा लोकनाट्य प्रकार विदर्भ भागात लोकप्रिय आहे. 

★ कोकणातील लोकांची घरे छप्पराची असतात.

★ महाराष्ट्रातील 65 टक्के लोक खेड्यात राहतात.

★ महाराष्ट्रात वेगाने नागरीकरण होण्यास औद्योगिकरण हा घटक कारणीभूत ठरला.

★ महाराष्ट्रातील दशलक्षी शहरांची संख्या 5 आहे. 

★ महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण 35 टक्के आहे.

★ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. 

★महाराष्ट्रातील मुंबई जिल्हयात स्त्रियांपेक्षा पुरूषांचे प्रमाण अधिक आहे.

★महाराष्ट्रात एक हजार पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 935 आहे. 

★ लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई जिल्हयात आहे.

★ गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वात विरळ लोकवस्तीचा जिल्हा आहे.

★महाराष्ट्रातील मृत्यु प्रमाण दरहजारी ११ आहे. 

★ गडचिरोली हा महाराष्ट्रातील अति मागासलेला जिल्हा आहे.

★ महाराष्ट्रातील बहुतेक लोक सुती कपडे वापरतात.

★ देशावरील लोक आहारात प्रामुख्याने पोळी हा पदार्थ घेतात.

★ भात व मासे कोकण भागातील लोकांचे अन्न आहे. 

★ बलुतेदार पद्धतीत एकूण बारा बलुतेदार असतात.

★ गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

★ सिंधी लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर असलेले उल्हासनगर हे ठाणे जिल्ह्यात आहे.

★ कोरड्या दुष्काळामुळे मराठवाडा विभागातून इतर भागात लोकांचे स्थलांतर होते.

★ कोकणातील लोक नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' म्हणतात.

★ दक्षिण कोकणात घरबांधणीसाठी सर्वसाधारणतः जांभा या दगडाचा वापर करतात. 

★ महाराष्ट्रातील देशावरील लोकांची घरे धान्याची असतात.


X X

महाराष्ट्रातील आदिवासी जमाती:


★ महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या धुळे जिल्ह्यात आहे. 

★ कोरकू आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात आढळते.

★ मेळघाट (सातपुडा) भागात कोरकू जमात आढळते. 

★ कातकरी आदिवासी जमात रायगड जिल्हयात आढळते.

★ गावीत, पारधी व भिल्ल ह्या आदिवासी जमाती धुळे जिल्हयात आढळतात. 

★ कोया व हळवा ह्या आदिवासी जमाती गडचिरोली येथे आढळतात. 

★ हळवा, पारधी व कोळम जमातीचे लोक यवतमाळ जिल्हयात आढळतात.

★ वारली ही आदिवासी जमात सह्याद्रि पर्वतात आढळते.

★ लमाण ही आदिवासी जमात मध्य महाराष्ट्रात आढळते. 

★ यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड हया ठिकाणी कोळम लोक राहतात.

★ नागपूर 'परिसरात डोंब कैकाडी या आदिवासी जमातीचे लोक आढळतात.

★ चंद्रपूर, उस्मानाबाद, परभणी व गडचिरोली येथे कोया ही जमात आढळते. 

★ आगरी ही आदिवासी जमात ठाणे व रायगड जिल्हयात मोठ्या प्रमाणावर आढळते.

★ बेरड (ढोर) ही वर्गीकृत जमात व महाराष्ट्रात आढळते.

★ माडीया गोंड ही महाराष्ट्रातील अंतिपूर्वेकडील अतिमागास आदिवासी जमात आहे. 

★ रामोशी ही वर्गीकृत जमात मुख्यत्वे मध्य महाराष्ट्र भागात आढळते.

★ वारली ही आदिवासी जमात ठाणे जिल्ह्यात आढळते.

★ महादेव कोळी ही जमात ठाणे जिल्ह्यात आढळते.

★ गोंड ही आदिवासी जमात चंद्रपूर जिल्ह्यात आढळते.

★ पारधी, ठाकूर, भिल्ल व कातोडी हवा जमातीचे लोक ठाणे जिल्ह्यात आढळतात. 

★ गोंड, माडीया गोंड, कोया व हळवा ह्या जमाती अमरावती जिल्हयात आढळतात.




महाराष्ट्रातील महामार्ग:


★ महाराष्ट्राचा रस्ता वाहतुकीत देशात आठवा क्रमांक लागतो.

★ महाराष्ट्रातून एकूण नऊ राष्ट्रीय महामार्ग जातात...

★ धुळे-नागपूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही.

★ महाराष्ट्राच्या चंद्रपूर या जिल्हयातून 

★ मुंबई-बंगलोर हा क्रमांक चारचा राष्ट्रीय महामार्ग आहे.

★ धुळे - नागपूर कलकत्ता क्रमांक सहाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. 

★ राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक सात व सहा नागपूर जिल्ह्यात एकत्र येतात.

★ वाराणसी - नागपूर - हैद्राबाद महामार्ग ७ या क्रमांकाने ओळखला जातो. 

★ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ हा मुंबई- अहमदाबाद या दोन शहरांना जोडतो.

★ पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक ९ ने ओळखला जातो.

★ सोलापूर-विजापूर रायचूर हा क्रमांक तेराचा राष्ट्रीय महामार्ग आहे.

★ राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक सतरा कोकण भागातून जातो.

★ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतराने मुंबई पनवेल-गोवा हा मार्ग ओळखला जातो. 

★ पन्नास नंबरचा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे महाराष्ट्रातून जातो.

★ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 पुणे ते नाशिक जातो.

★ मुंबई-आग्रा महामार्ग व मुंबई-कलकत्ता महामार्ग हे धुळे येथे अलग होतात.

★ नागपूर व भंडारा ही शहरे मुंबई-कलकत्ता या महामार्गावर आहेत.

★ मुंबई- बंगलोर महामार्ग व मुंबई-हैद्राबाद महामार्ग पुणे येथे अलग होतात.

★ वसई शहर मुंबई-गोवा महामार्गावर आहे.

★ पुणे-बंगलोर राष्ट्रीय हमरस्ता सातारा शहरातून जातो.

★ कोल्हापूर शहर पुणे-बंगलोर महामार्गावर आहे.


X X

महाराष्ट्रातील रेल्वे:


★ रेल्वे वाहतूकीच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात चौथा क्रमांक लागतो.

★ महाराष्ट्रातील लोहमार्गाचे सर्वाधिक जाळे सोलापूर जिल्हयात आहे. 

★ महाराष्ट्रातील बहुसंख्य लोहमार्ग मध्य रेल्वेच्या नियंत्रणाखाली येतात.

★ मध्य रेल्वेची मुख्य कचेरी मुंबई येथे आहे. 

★ ब्रॉडगेज रेल्वे लाईनची रूंदी 1.676 मीटर आहे.

★ इंद्रायणी एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वेगाडी आहे.

★महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रातून सर्वात जास्त अंतर धावणारी गाडी आहे. 

★ सिंहगड एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील पहिली दुमजली रेल्वे गाडी आहे.

★ चर्चगेट ते विरार हा उपनगर मार्ग प. रेल्वे या विभागात मोडतो. 

★ मीटरगेज, ब्रॉडगेज व नॅरोगेज हे तीनही लोहमार्ग मिरज या एकाच ठिकाणी आहेत.

★ भुसावळ हे महाराष्ट्रातील मोठे रेल्वे जंक्शन आहे. 

★ नागपूर हे मुंबई-कलकत्ता या लोहमार्गावरील जंक्शन आहे.

★ महाराष्ट्रातील माथेरान या हिलस्टेशनवर रेल्वेने जाण्याची सोय आहे.

★ महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबई - कोल्हापूर या दोन शहरांदरम्यान धावते. 

★ मुंबई-मद्रास व मुंबई-कोल्हापूर रेल्वे मार्ग पुणे येथे अलग होतात.

★ मद्रास-दिल्ली रेल्वेमार्गावर वर्धा स्टेशन आहे.

★ हावडा एक्सप्रेस मुंबई येथून हावडा येथे धावते. 

★ मिनार एक्सप्रेस मुंबई-हैद्राबाद या शहरांदरम्यान धावते.

★ कोयना एक्सप्रेस मीरज येथून मुंबई येथे आहे.

★ विदर्भ एक्सप्रेस मुंबई-नागपूर या शहरांदरम्यान भावते.

★ सिंहगड एक्सप्रेस पुणे-मुंबई या दोन स्टेशनांदरम्यान धावते. 

★ सिद्धेश्वर एक्सप्रेस मुंबई-सोलापूर या दोन स्टेशनांदरम्यान धावते. 

★ डेक्कन क्वीन मुंबई-पुणे या शहरांदरम्यान भावते.

★ इंद्रायणी एक्सप्रेस मुंबई-पुणे या शहरांदरम्यान धावते. 

★ भुसावळ-सुरत (गुजरात) हा ब्रॉडगेज प्रकारचा मार्ग आहे. 

★ सोलापूर-विजापूर (कर्नाटक) हा मीटरगेज प्रकारचा मार्ग आहे.

★ फ्लाईंग राणी मुंबई-सुरत या शहरांदरम्यान धावते.

★ फ्रॉंटिअर मेल मुंबई-अमृतसर या शहरांदरम्यान धावते. 

★ झेलम एक्सप्रेस पुणे-जम्मूतावी या शहरांदरम्यान धावते.

★ गितांजली एक्सप्रेस मुंबई-कलकत्ता शहरांदरम्यान धावते.

★महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूर-कोल्हापूर या दोन शहरांदरम्यान धावते. 

★ सहयाद्री एक्सप्रेस मुंबई-कोल्हापूर या दोन शहरांदरम्यान धावते.

★ पंचवटी एक्सप्रेस मुंबई-मनमाड या दोन शहरांदरम्यान धावते.

★ अहिंसा एक्सप्रेस पुणे येथून अहमदाबाद येथे धावते. 



महाराष्ट्रातील जलवाहतूक:


★ महाराष्ट्रात सध्या लहान-मोठी मिळून 49 बंदरे आहेत.

★ मुंबई हे महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचे बंदर आहे.

★ मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे.

★ मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर आहे.

★ मुंबई बंदरातून परदेशाशी होणारा व्यापार भारताच्या व्यापाराच्या 25 टक्के आहे. 

★ दळणवळणाची भरपूर साधने व रस्त्यांचे जाळे असल्याने मुंबई बंदरात रहदारी आहे.

★ न्हावाशेवा हे मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी उभारलेले नवीन बंदर आहे. 

★ रेडी बंदर सिंधुदुर्ग जिल्हयात आहे.

★ रेडी हे खनिजांच्या निर्यातीसाठी विकसित केलेले कोकणातील बंदर आहे.

★ कोकण किनाऱ्यावरील वाहतूक पावसाळ्यात पूर्णपणे बंद असते.



महाराष्ट्रातील उद्योगधंदे:


★महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक उद्योगप्रधान राज्य आहे. 

★ औद्योगिकरणात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो.

★ सिकॉमची स्थापना इ. स. 1966 साली झाली.

★ जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना इ. स. 1978 साली झाली.

★ महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना इ. स. 1962 साली झाली.

★ महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 

★ महाराष्ट्र राज्य वित्तिय महामंडळाची स्थापना इ. स. 1962 साली झाली.

★ महाराष्ट्रातील औद्योगिक व्यवहार मुंबई, पुणे व ठाणे येथे केंद्रित झाला आहे. 

★ गडचिरोली हा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा आहे.

★ पैठण हे पैठण्या व शालूंसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. 

★ पैठण येथे गुजराती फेटे तयार केले जातात.

★ औरंगाबाद हिमरू शालींसाठी प्रसिद्ध आहे. 

★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापूस स्पिनिंग मिल इचलकरंजी येथे आहे.

★ हातमागाच्या साड्या व लुगड्यांसाठी इचलकरंजी ठिकाण प्रसिद्ध आहे.

★महाराष्ट्रात हातमागावर उत्कृष्ट कलाकुसर मालेगावला करतात.

★ 'महाराष्ट्राचे मँचेस्टर' असे इचलकरंजी शहरास संबोधले जाते.

★ इचलकरंजी कोल्हापूर जिल्हयात आहे.

★ भारतातील पहिली सहकारी सूत गिरणी इचलकरंजी येथे आहे.

★ महाराष्ट्रात सर्वात जास्त कापड गिरण्या मुंबई येथे आहेत. 

★ मध्य मुंबई हे मुंबईतील कापड गिरण्यांचे मोठे केंद्र आहे.

★ अहमदनगर सुती व रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. 

★ पितांबरांसाठी प्रसिद्ध असलेले येवला नाशिक जिल्हयात आहे.

★ अकोला व अमरावती हवा कापसाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठा आहेत.

★ सोलापूर चादरी उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे.

★ सर्वात जास्त हातमाग मालेगाव येथे आहेत.

★ रेशमी कापडासाठी प्रसिद्ध असलेले साबळी चंद्रपूर जिल्हयात आहे. 

★ रेशमी कापडासाठी प्रसिद्ध असलेले एकोडी नागपूर जिल्हयात आहे.

★ बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे कापसाची मोठी बाजारपेठ आहे. 

★ महाराष्ट्र स्टेट हॅण्डलम कॉर्पोरेशन नागपूर येथे आहे.

★ कृत्रिम धागा निर्मितीत महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो. 

★ सावंतवाडी लाकडी (रंगीत) खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे.

★ महाराष्ट्रात भंडारा या ठिकाणी पितळी भांडी तयार केली जातात. 

★ चपलांसाठी प्रसिद्ध असलेले कापशी कोल्हापूर जिल्हयात आहे..

★ भारतातील सर्वात मोठा गुळबाजार कोल्हापूर येथे आहे. 

★ भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे तांदळाची मोठी बाजारपेठ आहे. 

★ अहमदनगर, सोलापूर, भंडारा व नाशिक (सिन्नर) हे विडी उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत.

★ हवाबंद अन्नपदार्थ निर्मितीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. 

★ नागपूर जिल्हा फळे हवाबंद करण्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

★ ठाणे, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत मिठागरे आहेत.

★ मँगेनीज शुद्ध करण्याचा कारखाना तुमसर येथे आहे. 

★ थळ-वायशेत हा रायगड जिल्हयातील महत्त्वाचा खत प्रकल्प आहे.

★ तुर्भे हा महाराष्ट्रातील थळवायशेत व्यतिरिक्त खत प्रकल्प आहे. 

★ रासायनिक द्रव्ये तयार करण्याचे कारखाने पनवेल व अंबरनाथ येथे आहेत. 

★ आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात आहे. 

★ 'फ्युएल इन्स्ट्रुमेंटस् ॲण्ड इंजिनिअर्स लि.' ही संस्था इचलकरंजी येथे आहे.

★ केळ्याची पुड (भुकटी) बनविण्याचा कारखाना जळगाव येथे आहे. 

★ टेलिफोन वितरणात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो.

★ खडकी, पिंपरी व चिंचवड हा औद्योगिक भाग पुणे शहराजवळ आहे. 

★ काचेच्या वस्तु बनविणे हा उद्योगधंदा प्रामुख्याने ओगलेवाडी या शहरात चालतो.

★ उल्हासनगर व कल्याण येथे रेयॉन धागा बनविला जातो. 

★ विदर्भ व मराठवाडा हे महाराष्ट्रातील औद्योगिकदृष्ट्या अविकसित भाग आहेत.

★ अहमदनगर हा साखर उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे.

★महाराष्ट्रात साखर उद्योगधंद्याचा प्रभाव आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यात आहेत.

★ प. महाराष्ट्रास महाराष्ट्रातील 'साखरेचे कोठार' म्हणतात.

★ अलिकडे महाराष्ट्रात साखर उद्योगधंद्याचा प्रभाव दिसून आला आहे. 

★ कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग दूध उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

★ कागद गिरण्यांसाठी प्रसिद्ध असलेले खोपोली रायगड जिल्ह्यात आहे.

★ कागद गिरण्यांसाठी प्रसिद्ध असलेले मुंढवा पुणे जिल्ह्यात आहे.

★ बल्लारपूर कागद कारखाना चंद्रपूर जिल्हयात आहे. 

★महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर येथे आहे.

★ महाराष्ट्रात तुर्भे येथे तेल शुद्धिकरण केंद्र आहे.

★ महाराष्ट्र हे चित्रपट उद्योगात आघाडीवर असलेले राज्य आहे. 

★ जवसाचे तेल काढण्याच्या गिरण्या मुख्यतः नागपूर विभागात आहेत.'

★ महाराष्ट्रातील सिनेमा उद्योगाचे केंद्र कोल्हापूर येथे आहे. 

★ महाराष्ट्रात चंद्रपूर येथे सिमेंट कारखाना आहे!

★ महाराष्ट्रात वनस्पती तूप मुख्यतः भूईमूगाच्या तेलापासून बनविले जाते.

★ एंप्रेस मिल नागपूर येथे आहे. 

★ विद्युत पंखे निर्मितीचा कारखाना मुंबई येथे आहे.

★ दारूगोळा बनविण्याचा व शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना खडकी-पुणे येथे आहे.

★ खडकी या ठिकाणी संरक्षण साहित्य तयार होते. 

★ मिग विमानांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध ओझर नाशिक जिल्हयात आहे.

★ ठाणे-मुंबई या ठिकाणी पोलाद कारखाने आहेत.

★ मुंबई व कोल्हापूर ही चर्मोद्योगासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. 

★ वनस्पती तूप मुंबई येथे बनविले जाते.

★ रबर व प्लॅस्टिक उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो.

★ रेडिओ बनविण्याचे कारखाने प्रामुख्याने पुणे येथे आढळतात.

★ रसायनी (पनवेल) औषधे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

★ महाराष्ट्रात मोटार निर्मिती प्रामुख्याने मुंबई येथे केली जाते.

★ पोस्टाची कार्डे व पाकिटे छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात नाशिक येथे आहे. 

★ आपट्याची व टेंभुर्णीची पाने विड्या बनविण्यासाठी वापरली जातात.

★ मंदील, तुक्की व वसन्नी गुजराती फेटे पैठण येथे तयार केले जातात.

★ अंबरनाथ येथे ऑर्डनन्स फॅक्टरी आहे.

★ पिंपरी (पुणे) हे अँटीबॉयोटिक्स उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे.

★महाराष्ट्रात खनिज तेल शुद्धिकरण कारखाना तुर्भे येथे आहे.

★ महाराष्ट्रात राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टीलायझर्स प्रकल्प ट्रॉम्बे (चेंबूर) येथे आहे. 

★ ऑईल इंजिने व शेती अवजारांसाठी प्रसिद्ध किर्लोस्करवाडी सातारा जिल्ह्यात आहे. 

★ स्टेट इंडस्ट्रियल ॲण्ड इनव्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र हा सिकॉमचा लॉंगफॉर्म आहे.

★महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावरील संस्था सहकारी ग्राहक भांडार

★ महाराष्ट्रातील बहुसंख्य साखर कारखाने पश्चिमेकडील जिल्हयात उभारलेले आहेत.


X X

महाराष्ट्रातील वीज उत्पादन:


★ सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्र राज्यात होते. 

★ महाराष्ट्रात सर्वाधिक वीजनिर्मिती औष्णिक विद्युत या मार्गाने केली जाते.

★ वर्धा हा महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा आहे.

★ नागपूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्युत उत्पादन करणारा जिल्हा आहे.

★ महाराष्ट्रात सर्वाधिक औष्णिक विद्युत वीज निर्माण केली जाते.

★ महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्राची संख्या दहा आहे. 

★ कोराडी औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्हयात आहे.

★ खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे.

★ पारस हे औष्णिक वीज केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. 

★ परळी वैजनाथ हे औष्णिक वीज केंद्र मराठवाड्यातील बीड जिल्हयात आहे.

★ बल्लारपूर हे औष्णिक केंद्र चंद्रपूर जिल्ह्यात आहे.

★ चोला हे औष्णिक वीज केंद्र कल्याण येथे आहे. 

★ नाशिकजवळील एकलहरे येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.

★ दिपनगर (पोकरी) हा औष्णिक विद्युत प्रकल्प भुसावळ येथे आहे.

★ तुर्भे या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र आहे.

★ कोयना जलविद्युत प्रकल्प पोफळी येथे आहे. 

★ कोयना योजनेचे वीजनिर्मिती हे मुख्य उद्दिष्ट आहे.

★ कोयना हे महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत केंद्र आहे. 

★ राधानगरी हे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे.

★ वैतरणा जलविद्युत केंद्र नाशिक जिल्हयात आहे. 

★ भाटघर जलविद्युत केंद्र पुणे जिल्ह्यात आहे.

★ तिल्हारी जलविद्युत केंद्र कोल्हापूर जिल्हयात आहे.

★ वीर जलविद्युत केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. 

★ भिरा जलविद्युत केंद्र कर्जत (रायगड) येथे आहे.

★ पेंच जलविद्युत केंद्र नागपूर येथे आहे.

★ पवना जलविद्युत प्रकल्प जिल्हयात आहे.

★ भंडारदरा जलविद्युत प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात आहे.

★ पैठण-जायकवाडी जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे. 

★ जायकवाडी जलविद्युत् प्रकल्पास जपान देशाचे सहाय्य लाभले आहे.

★ खोपोली हे जलविद्युत केंद्र आहे. 

★ खोपोली हे महाराष्ट्रातील पहिले बीजनिर्मिती केंद्र आहे.

★ टाटा हायड्रो इलेक्ट्रीक प्रोजेक्ट महाराष्ट्र राज्यात आहे.

★ गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास जपान या देशाचे सहाय्य लाभले आहे. 

★ येलदरी हे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे.

★ केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्र खडकवासला येथे आहे.

★ तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

★ तारापूर अणुवीज केंद्राची स्थापना इ. स. 1969 साली करण्यात आली. 

★ अप्सरा ही अणुभट्टी तुर्भे (ट्रॉम्बे) येथे आहे.

★ महाराष्ट्रात खोपडी (सिन्नर) या ठिकाणी पवन विद्युत केंद्र आहे.

★ एकात्मिक ग्रामीण उर्जा प्रकल्पासाठी दापुर या गावाची निवड झाली आहे.

★ गॅस टर्बाइनद्वारा उरण (रायगड) येथे वीजनिर्मिती केली जाते. 

★ औरंगाबाद जिल्हा सौरशक्ती व ऊर्जाशक्ती संदर्भात अग्रेसर आहे.

★महाराष्ट्रातील पहिला वात (पवन) विद्युत प्रकल्प देवगड (सिंधुदुर्ग) येथे आहे.

★ वीज निर्मितीसाठी पवनशक्तीचा वापर करणाऱ्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो.











View, Comments and share 

Post a Comment

0 Comments