Geography-3 : Maharashtra State
महाराष्ट्राचा भूगोल: भाग 3/7
महाराष्ट्रातील प्रमुख तलाव:
★ भंडारा, चंद्रपूर व ठाणे हे तलावांचे जिल्हे आहेत.
★ तानसा, वैतरणा व भातसा हे तलाव मुंबई जिल्ह्याला पाणीपुरवठा करतात.
★ वैतरणा, भातसा व तानसा हे तलाव ठाणे जिल्ह्यात आहेत.
★ तानसा तलाव हा मुंबईला पाणी पुरवठा करणारा मुख्य तलाव आहे.
★ तानसा हा ठाणे जिल्ह्यातील प्रमुख तलाव आहे.
★ पुणे शहराला खडकवासला धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.
★ पवई विहार हा तलाव मुंबई जिल्ह्यात आहे.
★ गंगापूर तलाव नाशिक जिल्ह्यात आहे.
★ रामटेक तलाव नागपूरजवळ आहे.
★ विसापूर तलाव भीमेच्या खोऱ्यात अहमदनगर जिल्ह्यात आहे.
★ धामापूर तलाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
★ लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
★ शिवाजी सागर तलाव कोयना नदीवर आहे.
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाव असलेला जिल्हा चंद्रपूर आहे.
★आंध्र लेक पुणे जिल्ह्यात आहे.
★विदर्भातील तलाव मालगुझारी नावाने ओळखले जातात.
★ बोदलकसा, चोरकमारा, नवेगाव व शिवनी तलाव भंडारा जिल्ह्यात आहेत.
★ साम्रोबा, असलामेंढा, घोडेजरी व शिंदेवाडी हे तलाव चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.
X X
महाराष्ट्रातील मृदा:
★ महाराष्ट्रातील मृदा सात विभागात विभागलेली आहे.
★ महाराष्ट्रातील मृदा मुख्यत: दोन प्रकारची आहे.
★ महाराष्ट्रातील विस्तृत क्षेत्रात रेगूर जमीन आढळते.
★ महाराष्ट्रातील जास्तीत जास्त भाग काळ्या कसदार मृदेने व्यापला आहे.
★ जगप्रसिद्ध विस्तीर्ण दखनच्या पठारावरील मृदा रेगूर प्रकारची आहे.
★ महारच्या पठारी प्रदेशातील बहुतेक भाग रेगूर मातीने व्यापलेला आहे.
★ पठारी प्रदेशातील नद्यांच्या खोऱ्यांमध्ये काळी (रेगूर) मृदा आहे.
★महाराष्ट्रातील रेगुर मृदा बेसॉल्ट खडकापासून तयार झाली आहे.
★ महाराष्ट्रातील बहुसंख्य प्रदेश अग्निजन्य खडकांनी बनलेला आहे.
★महाराष्ट्र सह्याद्रीच्या पूर्वेस पठारी प्रदेशांमध्ये काळी माती सापडले.
★महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर बरड जमीन आढळते.
★ नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात गाळमिश्रित मृदा आढळते.
★ भंडारा जिल्ह्यात उथळ व चिकण माती आढळते.
★चंद्रपूर जिल्ह्यात तांबडी माती आढळते.
★ महाराष्ट्रच्या किनारपट्टीवर खारी मृदा आढळते.
★ महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात काळी माती सापडते.
★महाराष्ट्रातील जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी माती सापडते.
★ महाराष्ट्रात कोकण विभागात तांबडी (जांभी मृदा आढळते.
★ प. महाराष्ट्रात जांभी प्रकारची मृदा आढळते.
★ महाराष्ट्रातील जांभी मातीत लोह व ॲल्युमिनियमचे अधिक प्रमाण आहे.
★ रत्नागिरी व सांगली जिल्ह्यात जांभी माती आढळते.
★ तापी पुर्णा खोऱ्यात गाळमिश्रीत माती आढळते.
★ सह्याद्री पर्वताच्या जास्त उंचीच्या भागात खडकाळ मृदा आढळते.
★ खार फुटलेल्या जमीनी सांगलीत आढळतात.
★ सडा भूरूप दक्षिण कोकणचे वैशिष्ट आहे.
★ बरड जमीनीत नाचणी सारखी पीके घेतात.
★ उस कापसासाठी गाळाची मृदा सर्वात चांगली आहे.
★महाराष्ट्र २६ जानेवारी, १९६२ रोजी कमाल जमीन धारणा कायदा अंमलात आला.
महाराष्ट्रातील खनिज संपत्ती:
★ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.
★महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.
★ खनिज उत्पादनात वर्धा व वैनगंगा नद्यांचे खोरे अग्रेसर आहे.
★महाराष्ट्राचा खनिज उत्पादक जिल्हा चंद्रपूर आहे.
★ महाराष्ट्रात सर्वात अधिक लोखंड चंद्रपूर जिल्ह्यात सापडते.
★ लोखंडाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव चंद्रपूर जिल्ह्यात आहे.
★सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी येथे लोखंडाच्या खाणी आहेत.
★ सिंधदुर्ग हा कच्चे लोखंड उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे.
★ अशुद्ध लोखंड मुख्यतः नागपूर जिल्हयात सापडते.
★ नागपूर, चंद्रपूर व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अभ्रकाच्या खाणी आहेत.
★ भंडारा व रत्नागिरी या ठिकाणी क्रोमाईट सापडते.
★ मँगेनीज धातूच्या खाणी भंडारा जिल्ह्यात आहे.
★ रत्नागिरी जिल्ह्यात डोलोमाईट आढळते.
★ नागपूर हा महाराष्ट्रातील शिसे आणि जस्त मिळणारा जिल्हा आहे.
★ नागपूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक जस्त उत्पादन करणारा जिल्हा आहे.
★महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक शिसे सापडले.
★ कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तीनही जिल्ह्यात तांब्याच्या खाणी आहेत.
★ महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा प्रमुख तांबे उत्पादक जिल्हा आहे.
★ ॲल्युमिनियमचे सर्वाधिक उत्पादन कोल्हापूर जिल्ह्यात होते.
★ महाराष्ट्रात बॉक्साईटचे ५० टक्के उत्पादन होते.
★ पश्चिम घाट प्रदेशात प्रामुख्याने बॉक्साईट हे खनिज आढळते.
★ कोल्हापूर, रत्नागिरी रायगड ह्या तीनही जिल्ह्यात बॉक्साईटच्या खाणी आहेत.
★ भारतातील मँगेनीजच्या ४० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
★ भंडारातील तुमसर येथे मंगल धातूच्या खाणी आहेत.
★ मँगेनीज धातू भंडारा जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळतो.
★ मंगल धातूच्या खाणींसाठी प्रसिद्ध रामटेक व सावनेर नागपूर जिल्ह्यात आहेत.
★ महाड येथे मंगल धातूच्या खाणी आढळतात.
★ भारतातील दगडी कोळशाच्या उत्पादनापैकी ४ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
★ खनिज कोळसा भंडारा येथे सापडतो.
★ महाराष्ट्रात दगडी कोळशाचे उत्पादन प्रामुख्याने पूर्व भागातून मिळते.
★ नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यात प्रामुख्याने कोळशाच्या खाणी आहेत.
★ दगडी कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले उमरेड नागपूर जिल्ह्यात आहेत.
★ दगडी कोळशाच्या सर्वात जास्त खाणी कामठी (नागपूर) येथे आहेत.
★ यवतमाळ जिल्ह्यातील वणी दगडी कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.
★ बल्लारपूर दगडी कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.
★ सोने हे महाराष्ट्रात न सापडणारे खनिज आहे.
★ कायनाईट या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.
★ देहुगाव (भंडारा) येथे कायनाईटच्या खाणी आहेत.
★ गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले राजापूर रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
★ महाराष्ट्रातील वज्रेश्वरी या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत.
★ चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
★ महाराष्ट्रात बेसॉल्ट हा अग्निजन्य खडक मोठ्या प्रमाणावर आढळतो.
★ गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध उनपदेव व सुनपदेव जळगाव जिल्ह्यात आहे.
★ गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध साव व पाली रायगड जिल्ह्यात आहेत.
★ बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे.
★ बॉम्बे हाय तेलक्षेत्र मुंबईपासून २४० कि. मी. अंतरावर आहे.
X X
महाराष्ट्रातील पिके:
★ महाराष्ट्रातील एकूण उत्पन्नात शेतीचा वाटा २८ टक्के आहे.
★ महाराष्ट्राच्या एकूण गरजेच्या ८० टक्के अन्नधान्य उत्पादन महाराष्ट्रात होते.
★ पीक विमा योजनेची मुळ कल्पना डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आहे.
★ महाराष्ट्रात शेती महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे आहे.
★ महाराष्ट्रात शेतीचे खरीप व रब्बी असे दोन हंगाम आहेत.
★ तांदूळ हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक आहे.
★ चंद्रपूर व भंडारा येथे तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
★महाराष्ट्रात तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन भंडारा जिल्ह्यात होते.
★ कोकण भागात तांदूळ हे पीक विपुल प्रमाणात घेण्यात येते.
★ रायगड हा कोकणातील सर्वात जास्त तांदूळ पिकविणारा जिल्हा आहे.
★ वैनगंगेच्या खोऱ्यात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
★ महाराष्ट्रात ज्वारीचे पीक खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते.
★ महाराष्ट्र ज्वारी व बाजरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
★ महाराष्ट्रात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
★ ज्वारी व बाजरी या पिकांच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण आहे.
★महाराष्ट्रात सर्वात जास्त जमीन ज्वारीच्या लागवडीखाली आहे.
★ महाराष्ट्रात मराठवाडा भागात ज्वारीचे जास्त उत्पादन होते.
★ सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
★ सोलापूर जिल्ह्यास 'ज्वारीचे कोठार' म्हणतात.
★ रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक मार्च महिन्यात तयार होते.
★ नाशिक जिल्ह्यात बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
★ उबदार हवामान व कमी पावसात बाजरीचे पीक येते.
★ महाराष्ट्रात सर्वात जास्त गहू नाशिक जिल्ह्यात पिकतो.
★ नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांत गव्हाचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते.
★ महाराष्ट्रामध्ये गव्हाची कापणी फेब्रुवारी महिन्यात करतात.
★ कोकणामध्ये रबराची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात येत आहे.
★ महाराष्ट्रात रब्बी हंगामात हरभरा हे पीक घेतले जाते.
★ हरभरा या पिकाचा समावेश कडधान्यात होतो.
★ तूर, मूग व हरबरा ही कडधान्ये महाराष्ट्र पठारावर पिकविली जातात.
★ वाल व कुळीथ ही कडधान्ये कोकण भागात घेतली जातात.
★ ऊस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक आहे.
★ कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे.
★ कापूस व ऊस ही महाराष्ट्रातील नगदी पिके आहेत.
★ काळी मृदा ही ऊस व कापसासाठी सर्वात चांगली मृदा आहे.
★ ऊसाचे पीक महाराष्ट्र पठारावर चांगले येते.
★ ऊस उत्पादनासाठी अहमदनगर जिल्हा प्रसिद्ध आहे.
★ महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील रेगूर मातील कापसाचे पीक उत्तम येते.
★ तापी पूर्णा व गोदावरीच्या खोऱ्यात कापसाचे पीक मुबलक प्रमाणावर मिळते.
★ कोल्हापूर-सांगली येथे तंबाखूचे सर्वाधिक पीक घेतले जाते.
★ भुईमूग, तीळ व जवस या पीकांचा गळीताच्या पिकात समावेश होतो.
★महाराष्ट्रामध्ये वनस्पती तूप मुख्यतः भुईमूगाच्या तेलापासून बनविले जाते.
★महाराष्ट्रात भुईमूगाचे सर्वात जास्त उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते.
★ कांदा व लसूण ह्यासाठी निफाड व लासलगाव अग्रेसर आहेत.
★ जळगाव जिल्ह्यात तीळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
★ सांगली व सातारा जिल्हे हळद उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
★ शेतमालाची प्रत व प्रमाणीकरण करणारी केंद्रीय संस्था आनंद नागपूर येथे आहे.
★ पंचगंगेचे खोरे हा महाराष्ट्रातील शेती अतिशय संकन प्रदेश आहे, कारण पंचगंगा व तिच्या उपनद्या मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून आणतात त्यामुळे खोऱ्यातील जमीन अतिशय सुपीक आहे.
महाराष्ट्रातील पिकांच्या जाती:
★ चंपाकळी, साबरमती, आंबेमोहर व पुसा-३३ ह्या सर्व तांदळाच्या जाती आहेत.
★ कर्जत, दिल्ली, मसुरी, हंसा व प्रभावती ह्या सर्व तांदळाच्या जाती आहेत.
★ कमोद, कोलम, बासमती व आय. आर.-८ ग्राच्या जाती आहेत.
★ जया, रत्नागिरी-३ व ४, नागपूर-२२, सोना-३४९ व हवाली ह्या तांदळाच्या जाती आहेत.
★ सुवर्णा व एच. पी. व्ही. ह्या ज्वारीच्या जाती आहेत.
★खपली, सरबती, २१८९ व गुजरात विनाट ह्या गव्हाच्या जाती आहेत.
★ कल्याण सोना, सोनालीका, मेघदुत व नर्मदा ह्या गव्हाच्या जाती आहेत.
★ DWS-२३ व DWs-५० ह्या गव्हाच्या जाती आहेत.
★ चाफा व फुले या हरभऱ्याच्या जाती आहेत.
★ वसंत, CSH-१, CSH-५, CSH- ७ व MSH-३३ ह्या ज्वारीच्या जाती आहेत.
★ कोपरगाव-३, कऱ्हाड-४ व फुले प्रगती ह्या भुईमूगाच्या जाती आहेत.
★ प्रभा व पुसा ह्या तुर पिकाच्या जाती आहेत.
★ B-१, E-३१, A-१० व MBH ११० ह्या बाजरीच्या जाती आहेत.
★देवराज, एच-४, पुसा सिलेक्शन व सावित्री ह्या कापसाच्या जाती आहेत.
★संजय, विजया, लक्ष्मी व वरलक्ष्मी ह्या कापसाच्या जाती आहेत.
★ देवराज ही महाराष्ट्रातील कापसाची संकरीत व सुधारीत जात आहे.
★ सिमला, चंद्रमुखी व कुपरी ह्या बटाट्याच्या जाती आहेत.
★ KO-४१९, KO-१२०, KO- ७१५, JKO -७२८ ह्या ऊसाच्या जाती आहेत.
★ पुसा रूबी ही टोमॅटो पिकाची जात आहे.
★ थॉमसन, तासगाव, चमण, राणी व सीमा ह्या द्राक्षाच्या जाती आहेत.
★ चिमासाहेबी, अनाशाही ह्या द्राक्षाच्या जाती आहेत.
★ हापूस, पायरी, रत्ना, सफेदा, रायवळ, महाहारी व मानखुर्द ह्या आंब्याच्या जाती आहेत.
X X
महाराष्ट्राचे फलोत्पादन:
★ राजेवाडी अंजीरासाठी प्रसिद्ध आहे.
★ डहाणू व घोलवड चिकूसाठी प्रसिद्ध आहे.
★मालवण हे ठिकाण काही प्रसिद्ध आहे.
★ अहमदनगर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे.
★ लिची ही फळझाडे ठाणे जिल्ह्यात आढळतात.
★ महाबळेश्वर राजबेरीसाठी (स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे.
★महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.
★ केळीच्या उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे.
★वसई सुकेळीसाठी प्रसिद्ध आहे.
★ रत्नागिरी जिल्हा काजूंसाठी प्रसिद्ध आहे.
★ दौलताबाद सीताफळप्रसिद्ध आहे.
★महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात चिकूचे सर्वात जास्त उत्पादन होते.
★ नाशिक व सांगली हे दोन जिल्हे द्राक्षाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
★ फळे डबाबंद करण्याचा उद्योग नागपूर जिल्ह्यात विकास पावला आहे.
★ संत्र्याचे पीक विदर्भ विभागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
★ नागपूर जिल्हा संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
★ कागदी लिंबाचे उत्पादन पुणे जिल्ह्यात होते.
★ अलिबाग हे ठिकाण कलिंगडांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
★ औरंगाबाद, मेहरूण व राहुरी ही ठिकाणे बोरांसाठी प्रसिद्ध आहेत.
★ श्रीरामपूर मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
View, Comments and share






0 Comments