Lala Lajpat Rai: Punjab Kesari,Indian author, freedom fighter and politician. Members of the Lal Bal Pal trimurti.
लाला लजपत रॉय : पंजाब केसरी, स्वातंत्र सेनानी
जन्मदिन: 28 जानेवारी
स्मृतीदिन: 17 नोव्हेंबर
बालपण आणि शिक्षण:
भारतीय स्वातंत्र्य सेनानी राज राजकारणी पंजाब केसरी भारतीय लेखक असे लाल बाल तीन त्रिमूर्ती पैकी एक असलेले लाल लाला लजपत रॉय यांचा जन्म धुडेकी जिल्हा फिरोजपुर सध्याचे पंजाब राज्य स्वातंत्र्यपूर्वपूर्व असलेले पाकिस्तानचा ब्रिटिश भारत भाग येथे वडील राधाकृष्ण रॉय व आई गुलाबदेवी रॉय यांच्या कुटुंबात 28 जानेवारी 1865 रोजी जन्म झाला.
वडिलांचे नाव मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल असे होते. ते अग्रवाल (वैश्य) म्हणजे वाणी समुदायातील होते शिवाय एक चांगले उर्दु व फारसी भाषेचे शिक्षक म्हणुन देखील परिचीत होते.
उर्दु व फारसी भाषेचे ते चांगले जाणकार होते.त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी होते आणि त्या शिख परिवारातील होत्या. त्या एक सामान्य आणि धार्मिक व्यक्तिमत्वाच्या होत्या.त्यांचे वडिल सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते त्यामुळे लालाजींचे सुरूवातीचे शिक्षण त्याच शाळेत 1970 मध्ये पुर्ण झाले.
1880 मध्ये कलकत्ता आणि पंजाब विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण.कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले.
1886 मध्ये कायद्याची पदवी मिळविली आणि दक्षिण पंजाब मधील हिसारला त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता.1849 मध्ये लाला लजपतरायांचा विवाह राधादेवींशी झाला.
X X
'आर्य समाज' सार्वजनिक कार्यात सहभाग:
स्वामी दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेला 'आर्य समाज' सार्वजनिक कार्यात अग्रेसर होता.स्वातंत्र्य सैनिक लाला लजपत राय हे 1882 साली पहिल्यांदा आर्य समाजाच्या लाहौर वार्षिक उत्सवामधे सहभागी झाले. या सम्मेलनाने ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी आर्य समाजात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
आर्य समाजाच्या विकासोन्मुख आदर्शाकडे व समाजसुधारणेच्या योजनांकडे लालाजी आकर्षित झाले. ते वयाच्या सोळाव्या वर्षी आर्य समाजाचे सदस्य बनले.
आर्य समाजाच्या वतीने 1886 साली लाहोरला दयानंद अँग्लो- वैदिक कॉलेज काढण्याचे ठरले. त्यासाठी लालाजींनी पंजाबातून पाच लाख रुपये गोळा केले. कॉलेजची स्थापना 1 जून 1886 रोजी झाली. लालाजी त्याचे सचिव बनले.
आर्य समाजाचे अनुयायी म्हणून ते अनाथ मुले, विधवा, भूकंपग्रस्त व दुष्काळग्रस्त लोकांच्या साहाय्याला धावून जात.
काँग्रेसतर्फे भारताची बाजू मांडण्यासाठी लालाजींना इंग्लंडला 1905 मध्ये पाठवावयाचे ठरले. त्यासाठी त्यांना जो पैसा देण्यात आला त्यातील निमा पैसा त्यांनी दयानंद अँग्लो- वैदिक कॉलेजला व निमा अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला. इंग्लंडला जाण्याचा खर्च त्यांचा त्यांनीच केला.
X X
पीएनबी आणि लक्ष्मी विमा कंपनीची स्थापना:
(PNB-Punjab National Bank)
लाला लजपत रायांनी राष्ट्रीय काॅंग्रेस च्या 1888 आणि 1889 या वार्षिक सत्रा दरम्यान प्रतिनीधी म्हणुन सहभाग घेतला, पुढे 1892 साली न्यायालयात सराव करण्याकरीता ते लाहौर येथे गेले. या ठिकाणी त्यांनी पंजाब नॅशनल बॅंक व लक्ष्मी विमा कंपनी ची पायाभरणी केली.
X X
इंडियन होमरूल लीग' ची स्थापना:
लाला लजपत रॉय शेतकऱ्यांना चिथावणी देतात, सरकार विरोधी लोकांना भडकवितात या आरोपांवरून सरकारने त्यांना 1907 मध्ये मंडालेच्या तुरुंगात ठेवले होते.
सहा महिन्यांनी त्यांची सुटका झाली पण त्यांच्या पाठीशी लागलेल्या सरकारी हेरांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते अमेरिकेस गेले.
तिथे असलेल्या भारतीयांमध्ये स्वदेशाच्या स्वातंत्र्याची लालसा निर्माण करण्यासाठी त्यांनी 'यंग इंडिया' हे वृत्तपत्र काढले.
तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीला वेग देण्यासाठी 'इंडियन होमरूल लीग' ची स्थापना केली.1917 मध्ये अमेरिकेला गेले. ऑक्टोबर 1917 मध्ये त्यांनी न्यू यॉर्कमध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली. ते 1927 ते 1930 पर्यंत अमेरिकेत वास्तव्यास होते.
X X
महत्त्वपूर्ण योगदान:
1882 साली हिंदी व उर्दू यांपैकी कोणत्या भाषेला मान्यता असावी. याबद्दल मोठा वाद चाललेला होता. लालाजी हिंदीच्या बाजूचे होते. त्यांनी सरकारला तसा एक अर्ज केला व त्यावर हजारो लोकांच्या सह्या गोळा केल्या.
स्वदेशाविषयी परदेशी लोकांत विशेष जागृती निर्माण करून 1920 मध्ये ते मायदेशी परतले.
1920 साली कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनासाठी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला व तुरुंगवास भोगला. तत्पूर्वी लालाजींनी लाहोरमध्ये 'टिळक राजनीतिशास्त्र शाळा' नामक राष्ट्रीय शाळा सुरू केली होती. लालाजींनी 'पीपल्स सोसायटी' (लोकसेवक संघ) नावाची समाजसेवकांची संस्था काढली होती.
1926 मध्ये जिनिव्हाला आंतरराष्ट्रीय श्रमसंमेलन झाले. भारतीय श्रमिकांचे प्रतिनिधी म्हणून लालाजींनी त्यात भाग घेतला. ब्रिटन आणि फ्रान्समध्ये झालेल्या अशाच संमेलनांतही त्यांनी भाग घेतला.
1921 मध्ये त्यांनी लाहोरमध्ये लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्त्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केली.
X X
सायमन कमिशन विरुद्ध आंदोलन:
भारतात काही सुधारणा कर देण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये सायमन कमिशनची नियुक्ती केली पण सायमन कमिशनमध्ये सातही सदस्य हे इंग्रजच होते. त्यात एकही भारतीय नव्हता म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
30 ऑक्टोबर 1928 ला सायमन कमिशन पंजाबमधील लाहोर येथे पोहोचले, लोकांनी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निषेधासाठी प्रचंड मोर्चा काढला होता.
पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी केलेल्या निर्दयी लाठीहल्ल्यात लाला लजपतराय जखमी झाले.जखमी होऊनसुद्धा लाला लजपतरायांनी या जमावासमोर भाषण केले. "आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो."
X X
वृत्तपत्र/ नियतकालिक /दैनिक:
2. 1925 मध्ये 'वंदे मातरम्' नामक उर्दू दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.
3. 'यंग इंडिया' हे वृत्तपत्र काढले.
4. लाहोर स्थित "आर्य गॅझेट"चे संस्थापक, संपादक
X X
ग्रंथसंपदा:
2. "श्रीकृष्ण आणि त्याची शिकवण", आणि "दयानंद सरस्वती" यांच्या जीवनावर पुस्तके लिहिली.
3. "यंग इंडिया"
4. "अन हॅपी इंडिया"
5. "आर्य समाज " ग्रंथ लिहिले.
6. "द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपत राय". संपादक: बी.आर.नंदा
7. "लाला लजपत राय रायटिंग ॲन्ड स्पीचेस "
8. "महान अशोक"
सन्मान व पुरस्कार:
2. 'पंजाब केसरी' हा किताब लोकांकडून लालाजींना मिळाला.
3.1925 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान लालाजींनी भूषविले.
4. लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य
X X
निधन:
पंजाब मधील लाहोर या ठिकाणी सायमन कमिशनच्या विरोधात काढलेल्या मोर्चामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात लालाजी जखमी झाले आणि दोन आठवड्यांनंतर रुग्णालयातच हृदय विकाराच्या धक्क्याने 17 नोव्हेंबर 1928 रोजी लालाजींचे निधन झाले.
X X
View, Comments and share....




2 Comments
Nice
ReplyDelete👍
ReplyDelete