Subscribe Us

header ads

Indira Gandhi: Former Prime Minister of India

Indira Priyadarshini Gandhi: Indian politician, female prime minister of India. 

इंदिरा गांधी :भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

जन्मदिन -19 नोव्हेंबर

स्मृतीदिन: 31 ऑक्टोबर


बालपण आणि शिक्षण:

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान व भारतरत्न पुरस्काराच्या पहिल्या महिला मानकरी इंदिरा प्रियदर्शनी नेहरू (गांधी) यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रयागराज, अलाहाबाद येथे 19 नोव्हेंबर 1917 मध्ये झाला. अलाहाबाद मध्ये त्या आनंद भवन या ठिकाणी त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि आई कमला जवाहरलाल नेहरू . इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. इंदिरा गांधी यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण अलाहाबाद, पुणे, मुंबई, कलकत्ता या ठिकाणी पुर्ण झाले. सेंट सेसिलिया आणि सेंट मेरी ख्रिश्चन कॉन्व्हेंट स्कूल अलाहाबाद या ठिकाणी शिक्षण झाले त्यानंतर मॉडर्न स्कूल दिल्ली या ठिकाणी 1934 मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या विश्वभारती शांतीनिकेतन विद्यापीठात गेल्या त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना प्रियदर्शनी हे नाव दिले.

उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला उच्च शिक्षणातील त्यांचे विषय इतिहास राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे होते.पण काही कारणांस्तव पदवी न मिळविता भारतात त्या परत आल्या.नंतर विद्यापीठाने त्यांना मानद पदवी दिली.

X X

विवाह:

1942 मध्ये इंदिरा प्रियदर्शनी नेहरू आणि फिरोज गांधी यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्या इंदिरा फिरोज गांधी झाल्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. 1942  मध्ये इंदिरा प्रियदर्शनी नेहरू आणि फिरोज गांधी यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्या इंदिरा फिरोज गांधी झाल्या.लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधी हे भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघांत दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर 1960 मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.दोन मुलांपैकी राजीव गांधी हे त्यांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान झाले. 


स्वातंत्र्य लढ्यातील योगदान:

1930 च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळी काँग्रेसच्या स्वयंसेवकांना साहाय्य करण्यासाठी त्यांनी लहान मुलांची 'वानरसेना' स्थापन केली.

1942 च्या 'चले जाव' आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि त्याबद्दल तुरुंगवास भोगला.


स्वातंत्र्य भारताततील कामगिरी:

1955 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीच्या त्या सदस्या बनल्या. पुढे 1959 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली. 1964 मध्ये पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर लालबहादुर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात इंदिराजींनी माहिती व नभोवाणी खात्याच्या मंत्री म्हणून काम पाहिले. 


भारताच्या मंत्रिमंडळातील कामगिरी:

1. जानेवारी 1980 मध्ये संरक्षण मंत्रालयाची मंत्री म्हणून जबाबदारी.

2. मार्च 1971 ला सूचना आणि प्रसारण मंत्रालयाची मंत्री म्हणून जबाबदारी.

3. जून 1970 ते नोव्हेंबर 1973 पर्यंत गृह मंत्रालयाची मंत्री म्हणून जबाबदारी.

4. 16 जुलै 1969 ते 26 जून 1970 पर्यंत वित्त मंत्रालयाची मंत्री म्हणून जबाबदारी.

5. सप्टेंबर 1967 ते मार्च 1977, मध्ये सीमा वरती परमाणुऊर्जा आणि अंतरिक्ष खात्याची मंत्री म्हणून जबाबदारी.

6. 5 सप्टेंबर 1967 ते 14 फेब्रुवारी 1969 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाची  मंत्री म्हणून जबाबदारी.

7. 1966 ते 1977 पर्यंत भारताच्या तिसऱ्या प्रथम महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला व त्यानंतर 1980 ते 84  त्यांचे निधन होईपर्यंत त्या भारताच्या पंतप्रधान होत्या.

X X

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान:

1966 मध्ये लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला.

1969 मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडून जुन्या काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली सिंडिकेट काँग्रेस व इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिकेट काँग्रेस असे दोन वेगळे पक्ष अस्तित्वात आले. याच वर्षी त्यांनी पुरोगामी व लोककल्याणकारी कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची जोरदार मोहीम उघडली. प्रथम त्यांनी देशातील चौदा बड्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. याशिवाय संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय घेतला. 1971 मध्ये इंदिराजींनी लोकसभा विसर्जित करून लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घोषित केली. या निवडणुकीमध्ये त्यांनी 'गरिबी हटाव' ची घोषणा दिली. या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष प्रचंड बहुमताने विजयी झाला. काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्या हाती केंद्रित झाली आणि त्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या बनल्या.

भारतावर सतत आक्रमण करण्याऱ्या पाकिस्तानच्या पूर्वबंगालमधील गांजलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्यासाठी लष्करी मदत करून त्यांनी भारतद्वेष्ट्या पाकिस्तानचे 'बांगला देश' व 'पाकिस्तान' असे दोन तुकडे केले. तत्पूर्वीच इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले घनिष्ठ संबंध विचारात घेऊन मोठ्या धूर्तपणे 1971 मध्ये सोव्हिएत युनियनशी वीस वर्षांचा ऐतिहासिक असा मैत्री व परस्पर सहकार्य करार घडवून आणला. त्यांची ही असामान्य कामगिरी लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी त्यांचा  1971 मध्ये 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी गौरव केला.

1972 मध्ये इंदिराजींनी पाकिस्तानशी द्विपक्षीय 'सिमला करार' करून आपल्या मुत्सद्देगिरीचे दर्शन घडविले.1975 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिराजींची रायबरेली मतदार संघातून लोकसभेवर झालेली निवड अवैध ठरविली. इंदिरा गांधींनी 1975 मध्ये आणीबाणी लागू केली. पण भारतातील लोकशाहीप्रेमी जनता त्यामुळे नाराज झाली व 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हार खावी लागली. स्वतः इंदिरा गांधी रायबरेली मतदारसंघातून पराभूत झाल्या. परिणामी जनता पक्षाच्या हातात सत्ता गेली पण त्या पक्षाचे व सरकारमधील घटक पक्षांचे भांडण लागल्याने 1980 मध्ये मुदतपूर्व झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दैदीप्यमान विजय मिळविला आणि इंदिराजी पुन्हा भारताच्या पंतप्रधान झाल्या.1982 मध्ये दिल्लीत नवव्या आशियायी स्पर्धांचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.1983 मध्ये नवी दिल्लीत अलिप्ततावादी राष्ट्रांची सातवी शिखर परिषद भरविली गेली. या परिषदेचे तसेच अलिप्त राष्ट्र चळवळीचे नेतृत्व इंदिरा गांधी यांच्याकडे सोपविण्यात आले.


पुरस्कार व सन्मान:

1. 1971 मध्ये, बांगलादेश मुक्ती युद्धात भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिल्यानंतर, राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांनी इंदिरा गांधींना "भारतरत्न" हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.

2. 2011 मध्ये, इंदिरा गांधींना बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील त्यांच्या "उत्कृष्ट योगदानासाठी" बांग्लादेश स्वाधीनता सन्मान हा बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर बहाल करण्यात आला. 

3. 1999 मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधींना "वुमन ऑफ द मिलेनियम" असा किताब देण्यात आला.

4. 2012 मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी सातव्या क्रमांकावर होत्या.

5. भारताच्या सर्वात दक्षिणेकडील ठिकाणाला इंदिरा पॉइंट (6.74678°N 93.84260°E) हे त्यांच्या नावावर आहे.


निधन:

पाकिस्तानच्या चिथावणीने पंजाबमधले शीख अतिरेकी पंजाबचे स्वतंत्र 'खलिस्तान' नावाचे राष्ट्र निर्माण करण्यासाठी विघातक कारवाया करू लागले. शीख अतिरेकी अमृतसरमधील सुवर्णमंदिरासारख्या पवित्र जागेत शस्त्रास्त्रे ठेवू लागले. त्यामुळे इंदिराजींनी देशहितासाठी सुवर्णमंदिरात सैन्य घुसविले. सैनिकी कारवाई करून देशद्रोही अतिरेक्यांना मारावे लागले. या घटनेने काही अविचारी शिखांची मस्तक भडकली. परिणामी 31 ऑक्टोबर 1984 रोजी सतवंतसिंग व बेअंतसिंग या शीख शरीररक्षकांनीच त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दिल्ली या ठिकाणी शक्ती स्थळ येथे त्यांची समाधी आहे.




रशियाने सन 1984 मध्ये काढलेले इंदिरा गांधी याचे पोस्टाचे तिकिट

X X


https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/bharat-ratna-indias-highest-honor-award.html

👆

Bharat Ratna: India's highest honor award

भारतरत्न : भारतातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार



View, Comments and share












Post a Comment

7 Comments