Subscribe Us

header ads

Jaiprakash Narayan or JP: Loknayak

जयप्रकाश नारायण उर्फ जेपी: लोकनायक,समाजवादी, गांधीवादी, सर्वोदयी नेते, 'संपूर्ण क्रांती'चे जनक

जन्मदिन:11 ऑक्टोबर

8 ऑक्टोबर - स्मृतिदिन 


बालपण आणि शिक्षण:

भारतीय राजकारणातील एक श्रेष्ठ संघर्ष पुरुष म्हणून जयप्रकाश नारायण यांना ओळखले जाते. जयप्रकाश नारायण यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1907 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात बिहारमधील सीताबदायरा येथे झाला.

बिहार मधील पाटणा येथे त्यांनी शालांत परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली व तेथील महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण केले.

जयप्रकाश पाटणा येथे शिकत असतानाच बिहार मधील काँग्रेस नेते ब्रिज किशोर प्रसाद यांची मुलगी प्रभावती देवी यांच्याशी ऑक्टोबर 1920 मध्ये त्यांचा विवाह झाला.

 जगदीश चंद्र बोस प्रमाणे शास्त्रज्ञ व्हावे अशी त्यांची महत्त्वकांक्षा होती परंतु त्यावेळेस बिहारमध्ये खुदीराम बोस प्रणित क्रांतिकारक विचार प्रवाह आणि गांधी प्रणित अहिंसक सत्याग्रहाचा विचार रुजला होता व याचे जयप्रकाश यांना आकर्षण होते.

 X X

अमेरिकेतील शैक्षणिक/ वैचारिक प्रवास:

1921 मध्ये गांधीजींच्या आव्हानानुसार त्यांनी महाविद्यालय सोडले व असहकार आंदोलनात सहभागी झाले परंतु चौरी- चौरा प्रकरणामुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. 

नंतर जयप्रकाश यांनी शिक्षणात लक्ष घातले. ते इंटर सायन्स परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी आठ वर्षे ते अमेरिकेत राहिले. त्यावेळेस त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव पडला.

 अमेरिकेतील शिक्षणाचा आणि परिस्थितीचा विचार करून शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी शेतीवर, कारखान्यात, हॉटेलमध्ये कामे केली.

 विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना तेथील प्राध्यापक आणि विद्यार्थी जे. पी. असे म्हणत होते. ते भारतात परत आल्यानंतर सुद्धा याच नावाने लोक ओळखले जाऊ लागले.

 अमेरिकेतील वास्तव्यत असताना त्यांनी भारतीय मार्क्सवादी विचारवंत एम. एन. रॉय यांच्या ग्रंथाचे अध्ययन केले.

1929 मध्ये ते भारतात परत आले. त्यानंतर काँग्रेस अंतर्गत "काँग्रेस समाजवादी पक्ष" स्थापन केला. ते पक्षाचे महासचिव बनले.

1942 च्या आंदोलनातील सहभागी त्यांना अटक झाली व 1946 मध्ये त्यांची सुटका झाली भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी कोणतेही पद स्वीकारले नाही .

1948 मध्ये "भारतीय समाजवादी पक्ष" त्यांनी स्थापन केला. 

X X

जयप्रकाश यांचे राजकीय विचार:

जयप्रकाश नारायण यांच्या जीवन विषयक तत्त्वज्ञान आणि राजकीय विचारात वेळोवेळी बदल झाले आहेत. त्यांच्या राजकीय विचारांची सुरुवात राष्ट्रवादी पासून झाली. 

अमेरिकेत मार्क्सवादी ,साम्यवादी ग्रंथांचे वाचन केल्यानंतर ते मार्क्सवादी बनले.

 भारतात परत आल्यानंतर त्यांनी गांधी वादाचा स्वीकार केला. काँग्रेसमध्ये भरीव कार्य केले. परंतु त्याचबरोबर गांधीवादावर टीकाही केली. 

लोकशाही समाजवादाचा स्वीकार केला आणि त्यानंतर त्यांनी सर्वोदय चा विचार स्वीकारून सर्वोदय चळवळीत कार्य केले

 परंतु तेथेही त्यांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यानंतर संपूर्ण क्रांतीचा विचार मांडला.


जयप्रकाश यांचा समाजवाद:

जयप्रकाश नारायण समाजवादी तत्त्वज्ञानाचे भारतातील सर्वश्रेष्ठ विज्ञान म्हणून ओळखले जातात व या "व्हाय सोशालिजम" या ग्रंथात त्यांनी समाजवादाविषयी विचार मांडले आहेत.

 त्यांच्या मते समाजवाद ही वैयक्तिक प्रणाली नसून सामाजिक संघटनेची ती एक पद्धती आहे.


सर्वोदय आंदोलनात सहभाग:

1952 मध्ये ते विनोबा भावे यांच्या सर्वोदय आंदोलनात सहभागी झाले . 1954 मध्ये सर्वोदयासाठी जीवनदान जाहीर केले आणि राजकारणापासून अलिप्त राहण्याचे ठरविले. 

1971 ते 72 मध्ये जयप्रकाश यांनी चंबळ घाटीतील दरोडेखोरांना आत्मसमोर करण्याचे आवाहन केले व त्याचा प्रतिसाद म्हणून खोऱ्यातील प्रसिद्ध दरोडेखोरांनी आत्म समर्थन केले.


जयप्रकाश यांचे सर्वोदयी विचार:

आचार्य विनोबा भावेंनी 1951 मध्ये भूदान चळवळ सुरू केली. गांधीवादानुसार नव समाज निर्माण करणे हा या चळवळीचा हेतू होता. 

सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही परंतु नंतर या चळवळीतून संपत्ती दान, ग्रामदान आणि जीवनदान अशा सर्व चळवळी सुरू झाल्या. 

या सर्व चळवळी व्यवहारिक आहेत. उपयुक्त आहेत आणि त्यातून काही नवीन समाज निर्माण होऊ शकेल असा विश्वास जयप्रकाश नारायण यांना वाटू लागला.

 त्यामुळे या चळवळीत ते सहभागी झाले. 1954 च्या बुद्धगया येथे भरलेल्या सर्वोदय संमेलनात जयप्रकाश नारायण स्वतः "जीवनदाना"ची शपथ घेतली आणि स्वतःला सर्वोदय चळवळीच्या कार्यात वाहून घेतले 1956 मध्ये त्यांनी गया जिल्ह्यातील "चोखोदेवरा" या खेड्यात "सर्वोदयी आश्रमाची" स्थापना केली.

जयप्रकाश नारायण यांच्यामते सर्वोदय म्हणजे जनतेचा समाजवाद होय जनतेचा स्वेच्छिक समाजवाद जसा वाढत जाणार तसतसा राज्याने लाभलेला समाजवाद कमी होऊन समाजवादास पूर्ण आणि यथार्थ स्वरूप प्राप्त होईल.

जयप्रकाश नारायण यांनी 1956 च्या आशियाई समाजवादी परिषदेत भूदानच व्यापक असे मांडताना म्हटले होते की भूदान चळवळ ही वरवर पाहता शेती सुधारणा चळवळ वाटत असली तरी ती एक सर्वांगीण सामाजिक व मानवी क्रांतीची सुरुवात आहे. कारण समाजाबरोबरच मानवाला बदलण्याचे उद्दिष्ट तिच्यासमोर आहे.


सर्वोदयातील उणिवा व भूमिका:

सर्वोदय चळवळीचा विस्तार होत होता परंतु अपेक्षित परिणाम दिसून येत नव्हते. त्यामुळे विनोबा भावे आणि जयप्रकाश यांच्यात मतभेद झाले. 

1968 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी बिहारमध्ये अन्याय ,अत्याचार, भ्रष्टाचार, शोषण इत्यादी विरुद्ध आंदोलन सुरू केले. या आंदोलनात सर्व सेवा संघाने भाग घ्यावा किंवा नाही या प्रश्नावरून जयप्रकाश व विनोबा भावे " नाही "या प्रश्नावरून यांच्यात मतभेद झाले.

त्यामुळे नेत्यावर आणि कार्यकर्त्यावर टीका झाली. यातील तात्विक आणि व्यवहारिक अपूर्णता दाखवून देत जयप्रकाश यांनी आपला "संपूर्ण क्रांती"चा विचार व्यक्त केला. 

या संकल्पनेचे स्पष्टीकरण त्यांनी 5 जून 1974 रोजी पाटणा येथे गांधी मैदानावर केलेल्या जाहीर भाषणात संपूर्ण क्रांतीची संकल्पना स्पष्ट केली.


आर्थिक विकेंद्रीकरण विचार:

सामूहिक लोकशाहीत राजकीय सत्तेच्या विकेंद्रीकरणाबरोबरच आर्थिक विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे असा विचार जयप्रकाश नारायण यांनी मांडला. 

हे केल्याशिवाय राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण परिणामकारक होणार नाही असे त्यांचे मत होते.

 सहकार आणि सहभाग या तत्त्वानुसार आर्थिक विकेंद्रीकरण केले पाहिजे सहभागी लोकशाहीत उद्योगधंदे हे लहान पण स्वयंपूर्ण राहतील. या उद्योगात स्थानिक साधन संपत्ती तसेच मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर केला जाईल त्यासंबंधीचे योग्य नियोजनही केले जाईल. 

भारतातील आर्थिक प्रश्न हा शेती आणि उद्योगधंदे या दोन्हीही संबंधित आहे त्यामुळे यांचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे.

जयप्रकाश नारायण यांच्या जाहीर भाषणांचे संकलन करून 1975 मध्ये " संपूर्ण क्रांती" आणि "संपूर्ण क्रांती की खोज मे" ही पुस्तके प्रकाशित केली. यात त्यांना संपूर्ण क्रांतीत "परिवर्तन आणि नवनिर्मिती" अशा दोन्ही गोष्टी अपेक्षित होत्या आणि त्या शीघ्र गतीने व्हाव्यात असे त्यांचे मत होते.


भारतातील राष्ट्रीय आणीबाणी:

जयप्रकाश यांनी संपूर्ण क्रांतीची ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळी 1975 मध्ये उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची निवड रद्द ठरवल्याने त्यांचा राजीनामा मागण्याच्या आंदोलनाचे नेतृत्व जयप्रकाश यांनी केले. 

त्याचा परिणाम असा झाला की 26 जून 1975 रोजी इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली.त्यामुळे जयप्रकाश यांना अटक झाली. 

नोव्हेंबर 1975 मध्ये प्रकृतीच्या कारणावरून त्यांची सुटका झाली. आणीबाणीच्या विपरीत अवस्थेतून देशाची सुटका व्हायची असेल तर लोकांपुढे विश्वसनीय पर्याय असला पाहिजे या हेतूने त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून राजकीय पक्ष निर्माण केला पाहिजे हे पटवून दिले आणि त्यातून "जनता पक्ष" ची निर्मिती त्यांनी केली. 

1977 च्या निवडणुकीत या पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आणि जयप्रकाश नारायण हे "लोकनायक " या नावाने ओळखू लागले. 

X X

ग्रंथ संपदा /निर्मिती:

जयप्रकाश नारायण यांनी काही ग्रंथांची निर्मिती केलेली आहे.

1. व्हाय सोशॅलिझम
2. फ्रॉम सोशालिजम टू सर्वोदय
3. मेरी विचार यात्रा
4. टोवर्डस स्ट्रगल
5. आमने सामने 
6. लोकस्वराज्य
7. जयप्रकाश यांच्या जाहीर भाषणांचे संकलन करून 1975 मध्ये "संपूर्ण क्रांती" आणि "संपूर्ण क्रांती की खोज मे" ही पुस्तके प्रकाशित केली गेली.


पुरस्कार व सन्मान:

1. लोकनायक:

जयप्रकाश नारायण यांचे एकंदरीत विचार आणि कार्य लक्षात घेता भारतीय राजकीय विचारवंता त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे ठरते.

भारतातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील प्रश्नांचा विचार करून ते प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेली आंदोलने आणि त्यांचा भारतीय राजकारणावर पडलेला प्रभाव यामुळे त्यांना लोकांनी "लोकनायक" ही सन्मानाची पदवी बहाल केली.

2. जयप्रकाश नारायण यांना 1965 मध्ये "रॅमन मॅगसेस" हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

3. जयप्रकाश नारायण यांना भारत सरकारने 1998 मध्ये देशातील सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न " त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

निधन:

समाजवादी ,गांधीवादी,अशा या सर्वोदयी आंदोलनात सहभागी असलेल्या व आणीबाणी झालेल्या शारीरिक छळामुळे त्यांची प्रकृती कायमची बिघडत होती. त्याचा परिणाम जयप्रकाश नारायण या महान व्यक्तीचा 8 ऑक्टोबर 19 79 रोजी मृत्यू झाला.







View, comments and Share 

 

Post a Comment

2 Comments