Lal Bahadur Shastri: Indian politician,Prime Minister of India
लाल बहादुर शास्त्री : भारताचे पंतप्रधान
स्मृतीदिन: 11 जानेवारी
बालपण आणि शिक्षण:
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, थोर राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 साली वाराणसी मुघलसराई उत्तर प्रदेश येथे झाला.
त्यांचे वडील एक सामान्य प्राथमिक शिक्षक होते.शास्त्रीजी दीड वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले आई रामदुलारी यांनी त्यांचे संगोपन केले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मिर्झापूर येथे झाले.पुढील शिक्षण त्यांनी वाराणसीला माध्यमिक शिक्षण घेतले. त्या ठिकाणी त्यांना नीलकामेश्वर प्रसाद नावाचे पितृतुल्य व्यक्ती भेटले व त्यांनी त्यांना महात्मा गांधी लोकमान्य टिळक यांच्या जीवनाचे महत्त्व सांगून स्वातंत्र्यलढ्यात काम करणार कशा पद्धतीने काम करावे हे समजावून सांगितले.
शास्त्रीजींना कुटुंबात नन्हे या टोपण नावाने हाका मारत व बोलत असत जेव्हा ते अकरा वर्षाचे झाले.
तेव्हा महात्मा गांधींनी भारतीय संस्थानिक व राजे यांनी ब्रिटिश सरकारला मदत केल्यामुळे त्यांच्यावर आरोप केले. त्यामुळे गांधीजींच्या विचारावर ते प्रभावित होऊन आपणही राष्ट्रीय स्तरावर काहीतरी देशासाठी काम करावे म्हणून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभाग घेतला.
X X
कौटुंबिक जीवन:
त्यांच्याच मिर्झापूर शहराजवळील एका मुलीशी त्यांचा विवाह झाला त्यांचे नाव ललिता देवी. हा विवाह 1927 मध्ये पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला.
हुंडा म्हणून शास्त्रीजींनी फक्त एक चरखा आणि थोडेसे विणलेले कापड एवढेच घेतले.
X X
स्वातंत्र्य चळवळीत सहभाग:
शास्त्रीजी सोळा वर्षाचे असताना महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यासाठी असहकार आंदोलन पुकारले व त्यात सहभागी होण्यासाठी देशभक्तांना आवाहन केले.
असहकार चळवळीत सहभाग होण्यासाठी शास्त्रीजींनी निर्णय घेतला व शिक्षण सोडून द्यावे व आपण देशासाठी काम करावे असे ठरवले.
पुन्हा त्यांनी ठरवलेल्या निर्णयाला बदलले नाही पण या निर्णयामुळे त्यांची आई खूप दुःखी झाली होती. कारण शास्त्रीजन्य शिक्षण पूर्ण करावे अशी त्यांची अपेक्षा होती.
शास्त्रीजींना वाराणसीतील विद्यापीठाने " शास्त्री" ही पदवी प्रदान केली व हेच नाव त्यांच्या आयुष्याचा भाग बनवून राहिले.
ब्रिटिश राजवटीमध्ये विरोधात स्थापन झालेल्या अनेक संस्था पैकी वाराणसीतील हे एक विद्यापीठ होते या विद्यापीठात असताना शास्त्रीजींच्या मनावर अनेक महान विद्वानांचा प्रभाव पडला.
महात्मा गांधींनी जेव्हा 1930 मध्ये दांडी यात्रा काढली मिठाचा कायदा मोडला. हा प्रतिकात्मक संदेश देशांमध्ये क्रांती झाली.
यामध्ये शास्त्रीजींनी खूप मोठा सहभाग नोंदवला व स्वतःला झोकून देऊन खूप विद्रोही मोहिमांचे काम केले.
त्यामुळे त्यांना ब्रिटिशांनी सात वर्षे तुरुंगामध्ये टाकले. तुरुंगामध्ये शास्त्रीजी अधिक परिपक्व व खंबीर झाले.
X X
स्वातंत्र्यानंतर राजकिय कामगिरी:
भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसचे सरकार जेव्हा सत्तेवर आले.
तेव्हा राष्ट्रीय संग्रामातील लालबहादूर शास्त्री यांचे महत्त्व सर्वांच्या लक्षात होते.
1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर या “छोटया डायनॅमो” ला देशाच्या रचनात्मक कार्यात व कारभारात मुख्य भूमिका पार पाडण्यासाठी आवाहन करण्यात आले.
शास्त्रीजींनी ही भूमिका समर्थपणे पार पाडली.
देशातील काँग्रेस सरकारमध्ये काम करत असताना त्यांना उत्तर प्रदेशचे संसदीय सचिव म्हणून नियुक्त केले.
त्यानंतर ते लगेच गृहमंत्री म्हणून कामकाज करू लागले.
शास्त्रीजीची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता ओळखून त्यांना 1951 मध्ये दिल्लीला बनवणे बोलवण्यात आले.
त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री अशा पदावर काम करावे लागले.
भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांच्याकडे बिन खात्याचे मंत्री पद हे देण्यात आले होते.
त्यांची कार्यक्षमता वाढतच गेली रेल्वेमंत्री असताना एक अपघात झाला व त्या अपघाताची जबाबदारी म्हणून त्यांनी रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला.
त्या अपघातात अनेक लोकांचे प्राण गेले होते. त्यांच्या या अभूतपूर्व निर्णयाची पंडित नेहरूंनी व संसदेने प्रशंसा केली व शास्त्रीजी किती इमानदार आहेत व त्यांची किती आदर्श मूल्य आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारला व हे इतिहासामध्ये अशा पद्धतीची घटना इतिहासजमा झाली.
रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले,
“कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.”
X X
काँग्रेस पक्षातील कामगिरी:
शास्त्रीजी काँग्रेस पक्षाच्या व्यवहाराकडेही लक्ष देत असत व त्यातही त्यांनी अतिशय भरीव कामगिरी केली.
1952 ,1957, 1962 च्या सार्वजनिक निवडणुकीत पक्षाच्या निर्णयाक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य हे दिसून येते.
त्यांची क्षमता व त्यातील योगदान हे अतिशय वाखाण्याजोगे आहे.
शास्त्रीजी यांच्यावर महात्मा गांधींचा राजकीय प्रभाव खूप मोठा होता ते त्यांना गुरु मानत.
एकदा त्यांनी सांगितले
" कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे."
ही महात्मा गांधींची परंपरा शास्त्रीजींनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करून पूर्णत्वास नेली.
त्यांच्या कार्यामुळे कठोर परिश्रमामुळे जनतेचे प्रश्न जिव्हाळ्याने सोडवण्यामुळे ती जनतेचे एक प्रकारचे मित्रच बनले होते. ही कारकीर्द त्यांनी जवळपास तीस वर्ष अंगीकारली.
X X
भारताचे पंतप्रधान:
स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी 1951 मध्ये सूत्र हातात घेतली.
त्यावेळेस 1956 ला शास्त्रीजींना रेल्वेमंत्री करण्यात आले.
1957 मध्ये काँग्रेसच्या निवडणुकीत मोठा सहभाग नेतृत्व करून शास्त्रीजींनी काँग्रेसला पूर्ण बहुमतात निवडून आणले.
27 मे 1964 मध्ये पंतप्रधान नेहरू यांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांच्या अमोघ परिश्रमाने निर्माण झालेले त्यांचे कर्तुत्व त्यामुळे एक मताने त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून सर्वांनी निवडून दिले.
पाकिस्तानी या संधीचा फायदा घेऊन आक्रमण युद्ध केले.
त्यावेळी त्यांनी भारतात ' जय जवान, जय किसान' हा नारा दिला.
युनोने युद्धबंदी घोषित केली. रशियाच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाली. त्यावेळी पाकिस्तानला हार पत्करावी करावी लागली.
X X
निधन:
एक कर्तुत्ववान व कीर्तिमान असा प्रजासत्ताक भारताचा दुसरा पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवून अमोघ असे कार्य केले.
9 जून 1964 मध्ये पंतप्रधानांचे सूत्रे हातात घेतल्यानंतर 1965 मध्ये पाकिस्तान भारत युद्ध झाले.
युद्धबंदी झाल्यानंतर युद्धबंदीचा करार करण्यासाठी ते ताश्कंद सोवियत संघ या ठिकाणी गेले असता 11 जानेवारी 1966 मध्ये त्यांच्यावर विष प्रयोग करण्यात आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/bharat-ratna-indias-highest-honor-award.html
👆
Bharat Ratna: India's highest honor award
भारतरत्न : भारतातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार
View, comments and Share




2 Comments
Nice
ReplyDelete👍
ReplyDelete